________________
(१०४)
होHARAMMAR
कर्म निर्जरा करणे हाच तपाचा उद्देश असतो. परमशांती, सुख मिळविण्यासाठी
धापासन मुक्त करावेच लागेल आणि कर्मबंध तोडण्याचे अपूर्व साधन आहे. जसे संसाराचे सर्वात प्रिय तत्त्व पैसा आहे तसा आत्मार्थी साधकाचे सर्वात यि तत्त्व परमात्मा आहे. त्या परमतत्त्वाला प्राप्त करण्यासाठी जे काही सहन केले जाते से तय आहे. ज्याने कर्म निर्जरा होते. भवभ्रमणाचे मूळ कारण कर्म आहे आणि त्याला आल्यापासून दूर करणे निर्जरा आहे. ह्या भावनेचे पुन्हा पुन्हा चिंतन केल्याने अर्जुनमाळी माल्या हत्याराही आपल्या आत्म्याला भावित करून शुद्ध झाला. सुदर्शन श्रावकाच्या संयोगाने अर्जुनमाळीला भगवान महावीरांचे दर्शन झाले व त्यांची देशना ऐकूनच अर्जनमालीचे हृदय पश्चातापामुळे द्रवित झाले व त्याने भगवान महावीरांच्या चरणी दीक्षा घेतली. दीक्षा घेतल्यानंतर दोन दोन उपवासाची तपसाधना सुरू केली, पारण्याच्या दिवशी भिक्षेसाठी गेले तर आपल्या स्वजनांची हत्या करणाऱ्याला समोर पाहून त्यांच्या तपाला आदर देण्याऐवजी लोक त्यांना शिव्या देत होते, मारत होते. परंतु अर्जुनमाळी समजत होता की हे माझे केलेल्या कर्माचे फळ आहे. ते समभावाने सर्व काही सहन करत होते. आणि कर्माची निर्जरा करीत होते. सहनशीलता, समभाव आणि तपाचा प्रचंड पुरुषार्थ यामुळे सहा महिन्यांमध्ये ते कर्मबंधातून मुक्त झाले आणि आत्मा विशुद्ध झाला व ते लोकाग्रावर अर्थात सिद्धशीलेपर्यंत पोहचले, मोक्षास गेले. हा निर्जरा भावनेचा प्रभाव आहे. लोक भावना
'लोक' शब्द संस्कृतच्या 'लोक' धातूपासून निष्पन्न झाला आहे.५६ त्याचा अर्थ बघणे, पाहणे असा आहे. 'लोक्यते इति लोकः' - जो बघितला जातो, ज्याची अनुभूती येते, तो लोक आहे. किंवा 'लोक्यन्ते पदार्था यस्मिन लोकः' ज्याच्यात पदार्थ दिसतात त्याला 'लोक' म्हणतात.
'भगवती' सूत्रामध्ये 'लोक' शब्दाची उत्पत्ती अशाच प्रकारे केलेली आहे. "जे SN सलाए अर्थात प्रमाणाद्वारे ज्याचे अवलोकन केले जाते त्याला 'लोक' म्हणतात लोक म्हणजे 'समस्त विश्व' आहे.५७
___ लोक दोन प्रकारचा आहे. लोकाकाश आणि अलोकाकाश. जितक्या जागेत धर्म आणि अधर्म द्रव्याच्या निमित्ताने जीव आणि पुद्गलाची स्थिती, गती होते आणि जो पद्व्यांनी युक्त आहे तो लोकाकाश आहे, आणि जेथे केवळ आकाश आहे ते अलीकाकाश आहे.५८