________________
(९४)
औषधोपचाराने बरे होतात. परंतु 'कर्मज' रोग ते होत, जे पूर्वजन्मात केलेल्या कर्मामुळे त्यांचा उदय होतो. ते औषधोपचाराने शांत होत नाहीत. ते रोग नष्ट करण्यासाठी त्याच्या मूळाशी असलेल्या कर्माचा नाश करणे आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी एकमात्र तेच शरणरूप आहे, ज्याने कर्म क्षीण होते. जैन परंपरेमध्ये चार शरण अत्यंत प्रसिद्ध आहेतअरिहंते शरणं पवज्जामि, सिद्धे शरणं पवज्जामि,
साहु शरणं पवज्जामि, केवली पण्णवतं धम्मं शरणं पवज्जामि |
अरिहंत, सिद्ध, साधू आणि सर्वज्ञ निरुपित धर्माची शरण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जीवनाची दिशा बदलली तरच दशा बदलते. भौतिकतेपासून तोंड फिरवून अध्यात्माकडे जाण्याची आवश्यकता आहे. कारण हे भौतिक पदार्थ मर्यादित सहयोग देऊ शकतात. जेव्हा मृत्यू येतो तेव्हा संपत्ती तिजोरीतच राहते. पशुधन वाड्यात बंद राहते, स्त्री दारापर्यंत आणि सेवक स्मशानापर्यंत पोहचविण्यासाठी येतात आणि यापुढे जशी करणी तशी भरणी, जशी मती तशी गती होते.
जगाच्या मोहजालाला शरण जाणारा कधीही जिंकत नाही आणि जिनेश्वरांन शरण जाणारा कधी हारत नाही. ही गोष्ट ज्यांच्या हृदयात कोरली गेली आहे ते कधीच धनाच्या, स्वजनांच्या अधीन राहून आनंदी होत नाहीत, मात्र जिनेश्वरांचे शरणच त्याला अत्यंत प्राणप्रिय वाटते.
जगातील सर्व शरण अशरणात परिवर्तित होणार आहे. परंतु अरिहंत देव, निर्ग्रन्थ गुरू आणि केवली निरूपित धर्म ह्यांचे शरण असे आहेत की जो रोगामध्ये, गरिबीमध्ये श्रीमंतीमध्ये इहलोक आणि परलोकामध्ये आपल्या आत्म्याचे रक्षण करते.
‘अर्जुनमाळी' सारख्या हत्याऱ्याने, रोहिणी या चोराने प्रभुमहावीरांचे शरण घेतले तर त्याचाही उद्धार झाला. शालीभद्र आणि जम्बुकुमारासारखे पुण्यवान जीव संसारी सुखाची सर्व अनुकूलता असताना सुद्धा प्रभूंना शरण गेले तेव्हा अद्भूत चमत्कार झाला.
ह्या सर्व शरणागतीपासून जर पुढे जायचे असेल तर 'अप्पाणं शरणं गच्छामि' मी माझ्या आत्म्याचे शरण ग्रहण करतो. त्याच्यासाठी व्यक्तीला अंतरात्म्यामध्ये निरीक्षण करण्याची जरूरी आहे. आत्माच परमात्मा आहे. “आदाहु मे सरणं’४८ आत्मा माझा शरणरूप आहे.
आपल्या आत्म्यामध्ये अनंतशक्ती आहे. त्याला जागृत करण्याची आवश्यकता
आहे.