________________
तयRARISMAnnarestak
(९२)
या जीवाने पूर्वायुष्यात अनंतवेळा अनंत शरीरे धारण केली आहेत आणि
आहेत. पण शरीर कधीच स्थिर राहिले नाही. शरीरातून जुने परमाणू गळून जातात नवे परमाणू येतात. जगात असा एकही परमाणू नसेल की ज्याने मागच्या अनेक यगात ह्या शरीरात प्रवेश केला नसेल. अशाप्रकारे शरीर अस्थिर, अनित्य आणि विनाशी
मत्यूनंतर पशुपक्ष्यांच्या शरीराचे भाग तरी उपयुक्त आहेत परंतु मनुष्य शरीराचा काहीच उपयोग होत नाही. ज्याला तर जाळून भस्म केले जाते अशा शरीरात सार मानणे हे अज्ञान आहे.
ज्याप्रमाणे नदीच्या लहरी निघून गेल्यावर पुन्हा येऊ शकत नाही त्याप्रमाणे जीवाची सुंदरता, लावण्य, रूप, बळ इत्यादी नष्ट झाल्यावर पुन्हा प्राप्त होत नाही.
साधक जेव्हा ध्यानाद्वारे आत्मपरीक्षण करतो तेव्हा अनुभव करतो की, ह्या जगात जसे सर्व पदार्थ बदलतात तसेच शरीरातील प्रत्येक अणूमध्ये आणि संवेदनेत प्रतिक्षणाने बदल घडत असतो. पाहता पाहता संवेदना उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. संसारात दृश्य असणारा कोणताच पदार्थ नित्य नाही.
सुख, दुःख, परिस्थिती, अवस्था, धन, तन, मन, स्वजन, परिजन, मित्र, भूमी भवन सर्व काही अनित्य आहे. राजा, राणी, सम्राट, चक्रवर्ती, सेठ, सावकार विद्वान, धनवान सत्तावान, शक्तिवान सर्वजण शेवटी मेल्यानंतर मातीत मिसळतात.
2 पदार्थांची स्थिती हत्तीच्या कानासारखी, संध्याकालीन सूर्यासारखी, दवबिंदूसारखी, मधाकृतीसारखी अस्थिर आहे. म्हणून अनित्य पदार्थाची इच्छा, त्याचा संग्रह, त्यांचा उपभोग घेणे म्हणजे शक्ती क्षीण करण्यासारखे आहे. असा अनुभव करून समतेमध्ये स्थिर राहणे, त्याच्याबद्दल राग द्वेष न करणे म्हणजे अनित्यानुप्रेक्षा आहे..
शरीराच्या अनित्यतेबरोबर आत्म्याच्या नित्यतेचे चिंतन केले पाहिजे की हा आत्मा सुर, असुर, मनुष्य, राजा इत्यादी विकल्पाने रहित आहे. आत्मा ज्ञानस्वरूप आहे आणि नेहमी स्थिर राहणारा आहे.
भगवान ऋषभदेव - प्रथम तीर्थंकराचे पुत्र भरतमहाराजांनी सहा खंड साधून चक्रवर्ती पद मिळविले. एकदा आरसे महालात बसले होते. त्यांच्या बोटातून अंगठी खाली पडली तेव्हा बोटाचे सौंदर्य जणू अंगठीशिवाय निस्तज
सादये जणू अंगठीशिवाय निस्तेज झाले. ते चिंतन करू लागले.