________________
SHARAMSHRASESSIONEE
H
B
(९१)
- हे विद्वानांनो ! जर तुमचे मन, चित्त भवभ्रमणाने संसारात पुन्हा पुन्हा आवागमनाच्या दुःखाने पराङ्मुख झाले असेल, सुटण्याची इच्छा ठेवत असेल आणि जर तो मोक्षाच्या अनंत सुखाला अव्याबाध आनंदाला मिळविण्याची इच्छा ठेवत असेल तर निर्वेदमय उत्तम भावनारसाने परिपूर्ण माझ्या शांतसुधारस काव्याचे सेवन करावे.
वास्तविक ह्या श्लोकाचा अर्थ फारच गंभीर आहे. भावनेच्या सम्यक् आराधनेने त्यांना चांगल्याप्रकारे आत्मसात केल्याने जीवनधारेमध्ये अशाप्रकारचे वळण येते की तो अशुभापासून शुभाकडे, अप्रशस्तापासून प्रशस्ताकडे, भोगापासून त्यागाकडे उन्मुख होतो. असे झाले तर मनुष्य सहजपणे आत्मसाधनेच्या मार्गावर आरूढ होतो. त्या मार्गावर उत्तरोत्तर पुढे वाढत राहतो व शुभोपयोगापासून शुद्धोपयोगामध्ये प्रविष्ट होत जातो. परिणाम आपल्या कर्माचे बंधन तोडत जातो. नव्या कर्माचा बंध होऊ देत नाही आणि एक दिवस असा येतो की तो सर्व कर्माच्या बंधनाला तोडून कर्मक्षय करून मुक्त होतो. सिद्ध, बुद्ध व मुक्त होतो. मोक्ष प्राप्त करतो, ज्याचा आनंद सागराप्रमाणे अमर्याद आहे. ही आत्मभावनेने परमात्म्याला प्राप्त करण्याची अवस्था आहे.
र भावनेच्या अभ्यासाने जीवनामध्ये किती मोठी कार्ये होतात. वास्तविक जीवनाचे लक्ष्यपूर्ण होते. म्हणूनच विनयविजयजी महाराजांनी ह्या उपरोक्त श्लोकामध्ये ह्या गोष्टीचे सुंदर स्पष्टीकरण केले आहे.
वेगवेगळ्या आचार्यांनी आणि विद्वानांनी भावनेवर आपल्या आपल्या शैलीने अत्यंत विस्तृत विवेचन केले आहे.
- ह्या पृष्ठभूमीवर प्रस्तुत शोधग्रंथामध्ये भावनेचे बहुमुखी चिंतन, विवेचन आणि समीक्षात्मक दृष्टीने परिशीलन करणे हा माझा अभिप्राय आहे. द्वादश भावनांची नावे आणि परिचय
१) अनित्य २) अशरण ३) संसार ४) एकत्व ५) अन्यत्व ६) अशुची ७) आश्रव ८) संवर ९) निर्जरा १०) धर्म ११) लोक १२) बोधिदुर्लभ. ह्या बारा भावना आहेत. ह्यांना अनुप्रेक्षा सुद्धा म्हणतात. .
अनित्य भावना - जगात जे काही उत्पन्न होते त्यांचा नाश निश्चित आहे. काळापासून हा जीव सांसारीक पौद्गलिक वस्तूमध्ये आणि भोगविलासामध्ये सुख । आनंद मानत आहे. परंतु ही फार मोठी चूक आहे. कारण ह्या जगातल्या सर्व वस्तू
EDIAWA
श
अनित्य आहेत.