________________
दर्शनशुद्धीला सुद्धा ह्यात अत्यंत महत्त्वपूर्ण सांगितले आहे. साधनेच्या स्थिरतेसाठी मनोनिग्रहच्या आवश्यकतेचेही ह्यात वर्णन आहे.
५) तंदलवेयालिय-तन्दुलवैचारिक - 'तंदुल' याचा अर्थ 'तांदुळ' असा होतो. या प्रकीर्णकात एका दिवसात शंभर वर्षाचा एक पुरुष जितके तांदुळ खातो त्या संख्येला उद्देशून हे नामकरण झालेले आहे.
ह्याच्यात जीवाचे गर्भातील आहार, स्वरूप, श्वासोच्छवासाचे परिणाम, शरीरामध्ये सांध्याची स्थिती आणि स्वरूप, नाड्यांचे परिमाण, रोमछिद्र, पित्त, रुधिर, शुक इत्यादींचे वर्णन आहे. त्याचबरोबर गर्भकाळ, आई वडिलांचे अंग, जीवाची बालक्रीडा, मंदा इत्यादी दहा अवस्था आणि धर्माचा अध्यवसाय इत्यादी संलग्न विषयांचे सुद्धा ह्यात विवेचन आहे.
ह्या प्रकीर्णकामध्ये स्त्रीचे हीन चित्रही रेखांकित केलेले आहे. अनेक विचित्र व्युत्पत्तींद्वारे स्त्रीला कुत्सित आणि बिभत्स पदार्थाच्या रूपात चित्रित करण्यामागे असा हेतू असावा की मनुष्याला काम आणि कामिनी या दोघांचेही भय वाटून तो त्यापासून दर जावा. त्याला त्यांच्याविषयी विरक्तीची भावना निर्माण व्हावी.
पुरुषांकरिता स्त्रिया जशा त्याज्य म्हणून सांगितल्या आहेत त्याचप्रमाणे खियांसाठी पुरुष सुद्धा त्याज्य आहेत.
शेवटी सांगितले आहे की जन्म, जरा, मृत्यू आणि वेदनेने युक्त असलेले हे शरीर एकप्रकारे शकट म्हणजे गाडी आहे. म्हणून ह्याद्वारे असे कार्य केले पाहिजे की ज्यामुळे संपूर्ण दुःखातून मुक्ती मिळू शकेल.
६) संथारग-संस्तारक - जैन साधनापद्धतीमध्ये संथारा-संस्तारकाचे अत्याधिक महत्त्व आहे. संपूर्ण जीवनामध्ये जो काही चांगली अथवा वाईट कृत्ये केली असतील त्याच्या हिशोब होतो. आणि अंतिम वेळी सर्व दुष्प्रवृत्तींच्या परित्याग करणे, मन, वचन आणि शरीराला संयमात ठेवणे, ममतेला मनातून काढून समतेमध्ये रममाण करणे, आत्मचिंतन करणे, आहार इत्यादी सर्व उपाधींचा त्याग करून आत्म्याला निर्द्वन्द्व आणि निःस्पृह बनविणे हा संथाऱ्याचा अर्थात संस्तारकाचा आदर्श आहे.
मृत्यूने भयभीत होऊन त्याच्यापासून वाचण्यासाठी पापपूर्ण प्रवृत्ती जोपासणे, रडणं आणि उदास होणे योग्य नाही. जैन धर्माचा हा पवित्र आदर्श आहे की जोपर्यंत जगावे तोपर्यंत आनंदाने जगावे आणि जेव्हा मत्य येईल तेव्हा विवेकपूर्वक आनदान