________________
(८१)
राहतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे भाव उमटतच राहतात. इतकेच काय, जेव्हा तो इंद्रिये सक्रिय नसतात तेव्हाही मन अक्रिय राहत नाही. कोणतेही कार्य करायचे असेल तर प्रथम त्याचे भावमय आणि विचारात्मक रूप मनात निर्माण होते. जसे ते निर्माण होते त्यांची म्हणून सर्वप्रथम मनाला वश करणे अत्यंत आवश्यक बाह्यपरिणती सुद्धा त्याचप्रमाणे बदलते
आहे.
“मनुष्याचे मनच बंधन आणि मोक्षाचे कारण आहे. इंद्रिय विषयभोगामध्ये आसक्त झालेले मन बंधन करणारे आहे आणि विषयभोगापासून मन जेव्हा अनासक्त होते तेव्हा तेच मन मोक्षाचा हेतू बनतो. ज्यांनी मनाला वश केले असेल त्यांच्यासाठी मन सर्वश्रेष्ठ बंधु आहे आणि ज्यांनी मनाला वश केले नाही त्यांचे मनच त्यांचा परम शत्रू आहे. "३
ह्या मनासंबंधी श्री मुनीसुंदर सूरी यांनी फार सुंदर सांगितले आहे, "जप केल्याने मोक्ष मिळत नाही किंवा बाह्य व आभ्यंतर अशा दोन प्रकारचे तप केल्याने मोक्ष मिळत नाही. तसेच संयम, दमन आणि मौन धारण केल्यानेही मोक्ष मिळत नाही आणि पवन इत्यादींची साधना केल्याने सुद्धा मोक्ष मिळत नाही. परंतु चांगल्याप्रकारे वश केलेले मनच मोक्षाचे कारण आहे.’४ केले म्हणून मनामध्ये जे अशुभ संकल्प - विकल्प उठतात ते दूर पाहिजेत. मनोनिग्रहाशिवाय सर्व बाह्य अनुष्ठान व्यर्थ आहे.
संसारी मनुष्याचे जीवन बहिर्मुखच असते. तो बहिरात्मभावातच निमग्न राहतो. म्हणून त्याच्या अंतःकरणाचा भाव विकृत आणि दूषित राहतो. ते विकार आणि दूषण त्याला कुमार्गावर घेऊन जातात. म्हणून भाव शुद्धीवर जैनशास्त्रात जास्त जोर दिला आहे. उत्तराध्ययन सूत्रामध्ये भावाचे महत्त्व सांगताना श्रमण भगवान महावीर स्वामी सांगतात की, “भाव सत्याने जीबात्मा भावशुद्धी - भावनेची शुद्धता प्राप्त करतो आणि भावशुद्धी झाल्यावर तो सर्वज्ञ निरूपित धर्माची आराधना करण्यासाठी तत्पर होतो. सर्वज्ञभाषित धर्माची आराधना करण्यामध्ये उद्युक्त व्यक्ती परलोकधर्माचा आराधक होतो. ५
जेव्हा भावनेमध्ये शुद्धता येते तेव्हा साधक अध्यात्मविकासाच्या मार्गाचा अवलंब
करतो.
आचार आणि विचार ह्या जीवनाच्या दोन बाजू आहेत. विचारांचा संबंध ज्ञानाबरोबर आहे आणि आचाराचा संबंध क्रियेबरोबर आहे. जैन धर्मात ज्ञान आणि क्रिया याद्वारे मोक्षाची प्राप्ती स्वीकारलेली आहे.