________________
(७१)
मरावे. संयम, साधना, तप आराधना करता करता अधिक जगण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा जीवनाच्या लालसेमध्ये धर्मापासून च्यूत व्हावे लागेल असे वाटले तर धर्म आणि संयमामध्ये दृढ राहून समाधीमरणासाठी हसता हसता तयार व्हावे. मृत्यू कशाप्रकारेही टाळता येत नाही पण संधाऱ्याच्या साधनेद्वारा मृत्यूला सफल करू शकतो.
ह्या प्रकीर्णकामध्ये संस्तारकाच्या प्रशस्ततेचे अत्यंत सुंदर शब्दात वर्णन केले गेले आहे. ज्यांनी संथारायुक्त पंडित मरण प्राप्त केले त्यांचे वर्णन ह्या प्रकीर्णकात आहे.
जे देहत्याग करू इच्छितात ते भूमीवर दर्ग (घास) इत्यादींनी संस्तारक अर्थात झोपण्याचे अंथरुण तयार करून त्याच्यावर झोपतात. त्या अंथरुणावर स्थिर होऊन साधक साधनेद्वारा संसार सागर पार करतो,
संधान्यामध्ये साधक सगळ्यांकडे क्षमायाचना करून कर्माचा क्षय करतो
आणि तीन भवामध्ये मोक्ष प्राप्त करू शकतो.
७) गच्छायार गच्छ चार
ह्यांच्यामध्ये गच्छ अर्थात समूहात राहण्याच्या श्रमणांच्या आचाराचे वर्णन आहे. हे प्रकीर्णक महानिशिथ बृहत्कल्प आणि व्यवहार सूत्राच्या आधारे लिहिलेले आहेत. असदाचारी श्रमण गच्छामध्ये राहतो आणि तो संसारपरिभ्रमण वाढवतो. पण जो सदाचारी श्रमण गच्छामध्ये राहतो तो धर्मानुष्ठानाची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढवत जातो जो आध्यात्मिक साधनेमध्ये उत्कर्ष करण्याचा इच्छुक आहे त्याने जिवंत असेपर्यंत गच्छामध्येच राहिले पाहिजे कारण गच्छामध्ये राहिल्याने साधनेत अडचण येत नाही.
-
Я
झांच्यामध्ये 'गच्छ गच्छातील साधू, साध्वी आचार्य यांचे परस्पर व्यवहार नियम, इत्यादींचे विस्तृत वर्णन आहे. ब्रह्मचर्यचे पालन करताना भ्रमणवृंदाला नेहमी जागृत राहण्यासाठी प्रेरित केलेले आहे. हा विषय अधिक स्पष्ट करण्यासाठी सांगितले आहे की स्थविरांच्या चित्तामध्ये दृढता असते तरी सुद्धा ज्याप्रमाणे तूप अनीजवळ असल्यावर द्रवित होते त्याचप्रमाणे स्थविरांच्या संपर्काने साध्वीचे चित्त द्रवित होण्याची शंका टाळता येणार
नाही.
,
‘चंदोवज्झय’ हा गच्छाचाराचा दुसरा भाग आहे. ह्याच्यामध्ये विनय, आचार्य गुण, शिष्य गुण, विनयनिग्रह गुण अशा सात विषयांचे विस्तृत झाले आहे.