________________
प्राप्त झाले. नंतर उत्तमकुळात जन्म घेऊन, साधना करून सुबाहुकुमारादि पंधरा भवानंतर सिद्ध झाले. काही जीवांनी तर त्याच भवामध्ये मोक्ष प्राप्त केला.
हिंसा, अस्तेय आणि ब्रह्मचर्य ह्या अशुभ भावनेचे ह्यात वर्णन केलेले आहे.
स्थानांग सूत्राच्या दहाव्या स्थानामध्ये, विपाक सूत्राच्या पहिल्या श्रतस्कंधातील दहा अध्ययनांची नावे खालीलप्रमाणे आली आहेत - १) मृगापुत्र २) गोत्रास ३) अंड ४) शकट ५) ब्राह्मण ६) नंदीषेण ७) शौरीक ८) उदुम्बर ९) सहस्रोद्यह अभरक १०) कुमारलिच्छाई.
आज जे विपाक सूत्र आस्तित्वात आहे त्याच्या प्रथम श्रुतस्कंधाच्या दहा अध्ययनाचे नावे - १) मृगापुत्र, २) उज्झितक ३) अभग्न सेन ४) शकट ५) बृहस्पतिदत्त ६) नंदीवर्धन ७) उंबरदत्त ८) शौरीकदत्त ९) देवदत्त १०) अंपु. अशी आहेत. दोघांमध्ये नावांचा फरक दिसून येतो.
दृष्टिवाद - हे बारावे अंगसूत्र आहे दृष्टीचा अर्थ 'दर्शन' आहे. आणि 'वाद' या शब्दाचा अर्थ 'चर्चा' असा आहे. अशाप्रकारे दृष्टिवादाचा शब्दार्थ दर्शनाची चर्चा असा होतो. ह्या सूत्रात प्राधान्याने दार्शनिक चर्चा असेल असे ह्या ग्रंथाच्या नावावरून प्रतीत होते.
दृष्टिवाद कोणत्या भाषेत रचलेले होते हा विषय चिंतनीय आहे. ह्याची रचना संस्कृतमध्ये होती असे म्हटले जाते. परंतु येथे सुद्धा असा प्रश्न उपस्थित होतो की, तीर्थकरांच्या देशनेनुसार आगमाचे संकलन झाले. तीर्थंकर अर्धमागधीमध्ये देशना देतात असे असतांनाही बारावे 'दृष्टिवादाचे अंग' संस्कृतमध्ये कसे संकलित झाले ? तीर्थंकर तर लोकभाषेमध्येच प्रवचन देतात.
जैन वाङ्मयाबरोबर संस्कृतचा उपयोग व्याख्याग्रंथ अथवा टीकाग्रंथाच्या रूपातच विशेषत्वाने झालेला आहे. त्याचबरोबर व्याकरण, न्यायदर्शन, ज्योतिष इ. विषयांवर संस्कृत भाषेत रचना झाल्या ह्याचे एक कारण असेही आहे की ह्या शताब्दीमध्ये ज साहित्य रचले गेले तेव्हा वैदिक, बौद्ध इ. परंपरेच्या विद्वानांनी संस्कृत भाषेचाच अधिक प्रयोग केला. प्रमाणशास्त्राची अधिकांशरीत्या संस्कृतमध्येच रचना झाली. दिगंबर आणि श्वेतांबर दोन्ही परंपरेच्या विद्वानांकडून संस्कृतमध्येच संशोधनात्मक आणि महत्त्वपूर्ण ग्रंथरचना झाली.