________________
RE
ग्रहांच्या गतीच्या गणिती पद्धतीने विवेचन आहे.
जम्बद्वीप-प्रज्ञप्ति, चंद्रप्रज्ञप्ति आणि सूर्यप्रज्ञप्ति ह्या तीन उपांगसूत्राचा ह्याच्या अंतर्गत समावेश होतो.
४) द्रव्यानुयोग - यामध्ये जीव, अजीव इ. सहा द्रव्ये, नऊ तत्त्वे, यांचे विस्तृत आणि सूक्ष्म विवेचन आहे. याच्या अंतर्गत सूत्रकृतांग, स्थानांग, समवायांग व्याख्या प्रज्ञप्ति ही चार अंगसूत्रे, जीवाजीवाभिगम, प्रज्ञापना ही दोन उपांग सूत्रे आणि नंदीसूत्र व अनुयोगद्वार ही दोन मूळ सूत्रे अशा एकूण आठ सूत्रे येतात.
- हे उपरोक्त वर्गिकरण विषय सादृश्याच्या दृष्टीने केलेले आहे. परंतु निश्चित रूपाने हे सांगता येणार नाही की अन्य आगमात इतर अनुयोगाचे वर्णन नाही. उदा. उत्तराध्ययन सूत्रात धर्मकथेबरोबर दार्शनिक तथ्याचे सुद्धा विवेचन आहे. भगवती सूत्र तर अनेक विषयांचा महासागरच आहे. आचारांग यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या विषयांची चर्चा आहे.
अर्थात काही आगमांना सोडून अन्य आगमात चारही अनुयोगांचे संमिश्रण दिसून येते. येथे जे वर्गीकरण केले आहे ते स्थूलदृष्टीने केलेले आहे.
हे कार्य आगम व्यवस्थेला सरळ बनविण्यासाठी आर्यरक्षित याच्याकडून वीर निर्वाण सं ५९२ वि. सं. १२२ च्या जवळपास संपन्न झाले.
१७. आगमांचे महत्त्व प्राचीन भारतीय साहित्यात आगम साहित्याचे एक विशिष्ट आणि गौरवपूर्ण स्थान आहे. आगम केवळ अक्षररूपी देहानेच विशाल आणि व्यापक नाहीत तर ज्ञान आणि विज्ञानाचे, न्याय आणि नीतीचे, आचार आणि विचाराचे धर्म आणि दर्शनांचे अध्यात्म आणि अनुभवांचे अनुपम आणि अक्षय कोश आहे. जर आपण भारतीय चिंतनातून काही क्षणासाठी जरी जैन आगम साहित्याला वेगळे करण्याची कल्पना केली तरी भारतीय साहित्याची जी आध्यात्मिक गरिमा आणि दिव्य ज्ञानाची जी उज्ज्वलता, निर्मलता आहे ती निस्तेज वाटू लागेल आणि असे वाटू लागेल की आपण फार मोठ्या ज्ञानकोषापासून वंचित झालो आहोत.
- वैदिक परंपरेत जे स्थान वेदाचे आहे, बौद्ध परंपरेत जे स्थान त्रिपिटकाचे आहे. ईसाई धर्मात जे स्थान बायबलचे आहे, ईस्लाम धर्मात जे स्थान कुराणाचे आहे, पारसी धर्मात जे स्थान अवेस्ताचे आहे तेच स्थान जैन परंपरेत आगम साहित्याचे