________________
(४८)
ASTRAat
समवायांगाचे वर्णन संक्षिप्त आहे. स्थानांगामध्ये एका प्रकारच्या पदार्थाचे वर्णन करण्यासाठी अनेक सूत्रे आहेत आणि समवायांगामध्ये एका प्रकारच्या पदार्थाचे वर्णन एकाच सूत्रात आहे. ह्यात जंबूद्विप, घातकी खंड द्विप, पुष्करार्धद्विप आणि पर्वतांचा विस्तार उंची व प्रकार इत्यादींचे वर्णन आहे.
समवायांगामध्ये द्रव्य, क्षेत्र, कल, भाव अशा चतुर्विध दृष्टीने वर्णन केलेले आहे.
द्रव्याच्या दृष्टीने - जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश इत्यादींचे निरूपण आहे.
क्षेत्राच्या दृष्टीने - लोक, अलोक, सिद्धशिला इत्यादींवर प्रकाश टाकला आहे.
काळाच्या दृष्टीने - समय, अवलिका, मुहूर्त इत्यादींपासून पल्योपम, सागरोपम उत्सर्पिणी, अवसर्पिणी, पुद्गलपरावर्तन तसेच चार गतींच्या जीवांची स्थिती इत्यादींचे वर्णन आहे.
भावाच्या दृष्टीने - वर्ण, गंध, रस, स्पर्श, संस्थान इ. अजीव भावाचे वर्णन आहे.
व्याख्याप्रज्ञप्ति (भगवती सूत्र) - द्वादशांगीमध्ये व्याख्याज्ञप्तिचे पाचवे स्थान आहे. प्रस्तुत अंग प्रश्नोत्तर शैलीत आहे. प्रश्नकर्ता गणधर गौतम आणि उत्तर देणारे स्वतः ‘भगवान महावीर' आहेत. प्रश्नोत्तर शैलीत ह्या सूत्राची रचना असल्याने ह्याचे नाव 'व्याख्याप्रज्ञप्ति' आहे. ह्यात एक श्रुतस्कंध आणि दहा अध्ययने आहेत. अन्य आगमग्रंथांपेक्षा प्रस्तुत आगम विशाल आहे. विषयवस्तुच्या दृष्टीने सुद्धा ह्यात विविधता आहे. ह्या सूत्रात श्रमण भगवान महावीरांच्या जीवनाचे, त्यांचे शिष्य भक्त, गृहस्थ, उपासक अन्य तीर्थिक आणि त्यांच्या मान्यतेचे विस्तृत वर्णन आहे. तसेच जैन सिद्धांत, इतिहास, भूगोल, समाज आणि संस्कृती इत्यादींचे अत्यंत सुंदर विश्लेषण
आहे.
दर्शन, आचार, लोक, परलोक इत्यादी सर्व विषयांची चर्चा ह्या आगमात आहे. क्वचितच असा विषय असेल की ज्याची चर्चा ह्यात नसेल म्हणूनच ह्याला 'ज्ञानाचा महासागर' म्हटले आहे.
ह्या अंगसूत्राची एक विशेषता अशी आहे की ह्या सूत्राच्या सुरुवातीला मगलाचरण आहे. ह्याच्या अतिरिक्त अन्य कोणत्याही अंग किंवा अंगबाह्य ग्रंथात