________________
श्रमण परंपरेत होत होता.
त्या परंपरेतल्या काही आचार्यांचा इथे निर्देश केलेला आहे.
आचार्य पुरणकश्यप
सूत्रात वर्णित अक्रियावाद, अकारकवाद इत्यादी बरोबर जुळणार आहे. त्यांचे मत असे आहे की शुभ कार्याने पुण्य आणि अशुभकार्याने पाप घडते असे काही नाही.
-
(२९)
जे सैद्धांतिकवादी होते. सैद्धातिकवाद 'सूत्रकृतांग'
आचार्य मंखली गोशालक यांचे वर्णन भगवती सूत्राच्या पंधराव्या शतकात विस्तृत रूपात आले आहे. तो काही काळापर्यंत भ. महावीरांचे शिष्य बनून राहिला. परंतु नंतर स्वतंत्रपणे विचरण करू लागला. तो स्वतःला तीर्थंकर म्हणत होता. भ. महावीरांच्याबरोबर संघर्ष करत होता, आणि नियतिवादाला मानत होता. तो उत्थान, कर्म, बल, वीर्य, पौरुष आणि पराक्रमाचे अस्तित्व मानत नव्हता. त्याचे मत होते की जे काही होत आहे ते सर्व तेच होते जशी नियती आहे.
आचार्य अजीत केसकंबली - दानादिंना हे आचार्य वेडेपणा समजत होते. १६ आत्म्याच्या आस्तित्वाला सुद्धा ते स्वीकारत नव्हते.
-
पकुध कच्चायन नावाचे एक आचार्य होते. ते अज्ञेयवादी होते.
संजय वेलठ्ठीपुत्र हे विक्षेपवादी होते.
उपरोक्त सर्व धर्माचार्य
त्यांचे सिद्धांत अव्यवस्थित आणि असंतुलित होते.
धर्मनायक स्वतःला 'अर्हत' म्हणवत होते. परंतु
इथे एक प्रश्न उपस्थित होतो की जर हे जैन किंवा बौद्ध दोन्ही संप्रदायात समाविष्ट होत नाहीत तर त्यांना श्रमण परंपरेत का घेतले ? इथे हे समजण्यासारखे आहे की श्रमण शब्दात ‘श्रम' शब्द महत्त्वपूर्ण आहे. तो उद्योगी, अध्यवसाय अथवा परिश्रमाचा वाचक आहे, ज्याच्या अंतर्गत वैराग्य, तितिक्षा, तपस्या इत्यादींचा सहज समावेश होतो. उपरोक्त श्रमणांचे जीवन घोर तपमय होते. ते बाह्य सुखसुविधेच्या आकर्षणापासून खूप लांब होते. स्वतः प्रयत्नपूर्वक कष्ट सहन करत होते. म्हणून श्रमणपरंपरेच्या अंतर्गत समाविष्ट होतात. त्यांना इतर कोणत्याही परंपरेबरोबर जोडता येणार नाही. ते बाह्य शुद्धी, कर्मकांड इत्यादींना महत्त्व देत नव्हते. तपस्येत अग्रगण्य राहत होते. निर्भयपणे कष्ट करत होते.
ह्या संप्रदायाच्या संबंधी विशिष्ट शोध करण्याची फार आवश्यकता आहे.