________________
(२८)
या भवसागरात यावे लागते, त्यानंतर त्याला निर्वाण प्राप्त होतो त्याला 'सकृत आगामी '
म्हणतात.
जो साधक आपल्या साधनेत इतक्या उच्च पातळीवर चढतो की तो त्याच जन्मी मुक्त होतो, ज्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही त्याला 'अनागामी' म्हणतात. महायानामध्ये स्वकल्याणबरोबरच परकल्याण अथवा करुणेवर जास्त भर दिला आहे. त्यांच्यामते करुणेशिवाय कोणी निर्वाण प्राप्त करू शकत नाही. प्राण्यांवर दया करण्यासाठी तथागत बुद्ध अनेक रूपात जन्म घेतात. जातककथेत याचे विस्तृत वर्णन आहे.
महायानामध्ये महाकरुणेबरोबर महाशून्य तत्त्वाचा स्वीकार केला गेला आहे. ही ज्ञानाची परमोच्च दशा आहे. महायानामध्ये अनेक संस्कृत ग्रंथांची रचना झालेली आहे. ह्यात दार्शनिक दृष्टीने अनेक वादांचा उद्भव आणि विस्तार झाला. दिङ्नाग, नागार्जुन, धर्मकीर्ती, वसुबन्धू इत्यादी अनेक विद्वान आचार्य झाले, ज्यांना भारतीय साहित्यात फार महत्त्व आहे.
• हीनयान नाव पूर्वी नव्हते. महायान पंथातील लोकांनी केवळ स्वकल्याणासंबंधी साधना पद्धतीला महायान म्हटले. त्यांनी त्यांना आपल्यापेक्षा हीन अथवा न्यून दाखवले. पुढे हेच नाव रूढ झाले. महायानी पाली तिपिटकावर विश्वास ठेवतात.
बौद्ध धर्मात आराधनेच्या दृष्टीने मध्यम प्रतिपदेला स्वीकारले गेले आहे. त्याचा अर्थ- मध्यम म्हणजे मधला मार्ग. बुद्धांनी अधिक भोग किंवा अधिक त्याग न करता मध्यम मार्गाचा स्वीकार केला. त्यांच्याद्वारे उपदिष्ट मार्गाला 'अष्टांगिक मार्ग' म्हणतात.
करुणा, दया, सेवाभाव इत्यादींचा बौद्धधर्मात उत्तरोत्तर विकास होत गेला. धर्मसाधनेच्या सरलतेमुळे बौद्ध संघाचे सांसारिक सदस्य धार्मिक पुरोहितापासून वेगळे राहिले.
१०. श्रमण परंपरेचे अन्य संप्रदाय जैन परंपरा आणि बौद्धपरंपरा यांच्याशी मिळता-जुळत्या श्रमण धर्माच्या अनेक शाखा भूतकाळात होत्या, ज्या भगवान महावीर आणि बुद्धांच्या वेळी प्रचलित होत्या. त्यांचे सिद्धांत महावीर आणि बुद्धांच्या सिद्धांतांबरोबर जुळत नव्हते. परंतु जीवनचर्या आणि तपाचरण इत्यादींची अशी विशेषता होती की त्याच्यामुळे त्यांचा समावेश