________________
'जिना'च्या वाणीला अथवा उपदेशाला 'आगम' म्हणतात. जिन त्यांना म्हणतात- जे राग, द्वेषांना जिंकतात. 'राग-द्वेषं जयति इति जिनः', ज्यांना कुणाच्याही प्रती राग, द्वेष वाटत नसतो ते 'जिन' होत आणि त्यांच्याद्वारे प्रतिपादित मार्गाचे नाव 'जैन' आहे.
जर ऐतिहासिक दृष्टीने पाहिले तर जैन धर्म पूर्वी ह्याच नावाने प्रचलित नव्हता तर जैन धर्मासाठी 'निर्ग्रन्थ प्रवचन' शब्दाचा उपयोग केला जात होता. जैन आगमात 'निग्गंथ' शब्द प्रसिद्ध आहे. निग्गंथ शब्दाचे संस्कृत रूप निर्ग्रन्थ आहे. 'निर्ग्रन्थ' म्हणजे (धन, धान्य इत्यादी) बाह्यग्रंथी आणि (मिथ्यात्व, अविरति आणि क्रोध, मान, माया, लोभ इत्यादी) आंतर-ग्रंथी अर्थात बाह्यांतर परिग्रहाने रहित संयमी साधूला 'निग्रंथ' म्हटले जात होते. त्यांनी सांगितलेल्या सिद्धांताला 'निग्रंथ प्रवचन' म्हटले जाते.
आवश्यक सूत्रात 'निग्गंथं पावयणं' शब्द आला आहे.९ पावयणं शब्दाचा अर्थ 'प्रवचन' होतो. ज्यात जीवाजीव इत्यादी पदार्थांचे आणि ज्ञान, दर्शन इत्यादी रत्नत्रयाच्या साधनेचे यथार्थ रूपात निरूपण केले जाते. शास्त्रानुसार बिंदुसारापूर्वीपर्यंतचे ज्ञान निग्रंथ प्रवचनामध्ये समाविष्ट झाले आहे.१०
'निर्ग्रथ' आणि 'जिन' शब्दाचा अर्थ सारखाच आहे. 'प्रवचन' शब्दाचा अर्थ 'उपदेश' आहे. 'निग्रंथ प्रवचन' म्हणजे 'वीतराग वाणी' असा अर्थ होतो. निर्ग्रन्थ प्रवचनच पुढे जाऊन जैन धर्माच्या नावाने प्रसिद्ध झाले आहे.
जैन आगम प्राचीन ग्रंथ आहेत, त्यात वर्तमान अवसर्पिणी काळाचे अंतिम तीर्थंकर श्रमण भगवान महावीरांचा उपदेश समाविष्ट आहे. भगवान महावीरांच्या आचारविचारांचा संग्रह ज्याच्यात आहे त्याला द्वादशांगी वाणी म्हणतात. ज्याचे संकलन, आकलन गणधरांनी केले आहे ते अंगसूत्राच्या रूपात व्यवस्थित आहे. 'अंगसूत्राला' समवायांग सूत्रात 'गणिपिटक' म्हटले आहे. ज्यांच्यामध्ये गुणांचा समुदाय असतो अशा आचार्यांना 'गणि' म्हणतात आणि पिटक म्हणजे पेटी, मंजूषा, पेटारा असा अर्थ होतो. अशाप्रकारे श्रुतरत्नांच्या पेटीला गणिपिटक म्हणतात.११
अकरा अंग, बारा उपांग, चार मूळ, चार छेद आणि एक आवश्यक सूत्र अशाप्रकारे बत्तीस आगमांना स्थानकवासी आणि तेरापंथी परंपरेचे अनुयायी मानतात. श्वेतांबर मूर्तिपुजक नियुक्ति आणि प्रकीर्णक' या ग्रंथांना मिळवून पंचेचाळीस आगम मानतात. दिगंबर समाजाची अशी मान्यता आहे की सगळ्या आगमांचा विच्छेद झाला