________________
(३४)
स्थापना केली. स्त्रियांना चौसष्ठ कला आणि पुरुषांच्या बहात्तर कलांचे प्रतिपादन केले.१६
वैदिक साहित्यातही भगवान ऋषभदेवांचा उल्लेख मिळतो वग्वेदामध्ये त्यांना यद्धात अजय, महापराक्रमी म्हणून संबोधिले आहे. त्यांना इंद्राने रथ आणि युद्धसाम्रगी भेटस्वरूप दिली होती.१७
हठयोगामध्ये हठयोग विद्येचे उपदेष्टाच्या रूपात आदिनाथ प्रभूला नमस्कार केलेला आहे.१८
बौद्धांच्या धम्मपदात ऋषभ आणि महावीर ही दोन्ही नावे एकाचवेळी आल्याने असे प्रतीत होते की हे नाव जैन परंपरेच्या प्रथम आणि अंतिम तीर्थंकरांचा सांकेतिक रूपात येथे नामनिर्देश करत आहे.१९
भगवान ऋषभदेव संस्कृतीच्या निर्मितीचे सूत्रधार होते. त्यांच्या पूर्वी युगलिक जीवन होते, भोगमूलक दृष्टीची प्रधानता होती, कल्पवृक्षाच्या आधारावर जीवन चालत होते. ह्यांनी कर्म आणि कर्तव्याची सुषुप्त भावना जागृत केली. सामाजिक चेतना आणि लोकदायित्वाच्या भावनेचा उद्भव केला. भोगमूलक संस्कृतीच्या ठिकाणी कर्ममूलक संस्कृतीची स्थापना केली. वृक्षवेलीवर अवलंबून राहणाऱ्या लोकांना शेती करणे शिकविले. जड अशा संस्कृतीला कर्माची चेतना दिली. कौटुंबिक जीवनाचा पाया मजबूत केला. विवाहप्रथेचा प्रारंभ केला. कला कौशल्य आणि उद्योगधंद्याची व्यवस्था करून निष्क्रिय जीवनाला सक्रिय व सक्षम बनवले. म्हणूनच वेदामध्येसुद्धा त्यांच्या गुणगौरवाचे गायन केलेले आहे. वेदात त्यांना मानव संस्कृतीच्या उद्धारकाच्या रूपात पूज्य मानले आहे. प्राचीन वैदिकऋषी त्यांच्या महान उपकाराला विसरले नाहीत. त्यांनी मोकळ्या मनाने ऋषभदेवांची स्तुती केली आहे.
'अनर्वाणं वृषभं मन्द्राजिह्व बृहस्पतिं वर्धया नव्यमर्के'२०
अर्थात - मितभाषी, ज्ञानी, स्तुत्य, ऋषभाला पूजासाधक मंत्राद्वारे वृद्धिंगत करा, सन्मानित करा.
- भगवान ऋषभदेवांना आपल्या सर्वतोमुखी प्रतिभासंपन्नतेने आणि अलौकिक व्यक्तिमत्वामुळे सर्व क्षेत्रात आदर आणि सन्मान प्राप्त झाला. पूर्वायुष्यात आपल्या संसारी कर्तव्यातून निवृत्त होऊन त्यांनी दीक्षा घेतली. त्यांच्याबरोबर चार हजार व्यक्तींनी सुद्धा दीक्षा घेतली. ते जनकल्याणासाठी आणि जीवांच्या रक्षणासाठी पदयात्रा करत