________________
म
क्लेश रहित जीवन
लोकांना व्यवहार धर्म पण इतका उच्च प्रतीचा मिळाला हवा की त्यामुळे लोकांना जीवन जगण्याची कला येणे सहज शक्य होईल. जीवन जगण्याची कला येणे यालाच व्यवहारधर्म म्हटले आहे. ही कला काही तप, त्याग केल्याने येत नाही, अपचन झाले तर उपवास वगैरे जरुर करा. ज्याला जीवन जगण्याची कला जमली त्याला संपूर्ण व्यवहारधर्म समजला आणि निश्चय धर्म तर डेव्हलप होऊन आला असाल तेव्हा प्राप्त होते आणि या अक्रम मार्गात तर निश्चय धर्म ज्ञानींच्या कृपेमुळेच प्राप्त होत असते! 'ज्ञानीपुरुषां' जवळ तर अनंत ज्ञानकला असतात आणि अनंत प्रकारच्या बोधकलाही असतात! त्या कला इतक्या सुंदर असतात की त्या आपल्याला सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त करतात.
समज कशी? की दुःखमय जीवन जगलो 'हे' ज्ञानच असे आहे की, जे सर्व सुलट (सरळ) करते, आणि जगातील लोक तर असे आहेत की आपण सुलट टाकले असेल तरीही त्यास उलट करतील. कारण समजच चुकीची आहे. चुकीची समज असल्यामुळे ते चुकीचे करतात, नाही तर या हिंदुस्तानात कुठेच दुःख नाही. ही जी काही दु:खं आहेत ती सर्व चुकीच्या समजुतीमुळेच आहेत आणि लोक विनाकारण सरकारला दोष देतात, देवाला दोष देतात की तुम्ही आम्हाला दुःखं देता! लोक तर फक्त दोष देण्याचेच धंदे शिकले आहेत.
समजा आता जर कोणी चुकून ढेकूण मारण्याचे औषध प्यायले तर ते औषध त्याला सोडेल का?
प्रश्नकर्ता : नाही सोडणार
दादाश्री : का बरे? त्याने तर चुकून प्यायले होते ना? त्याने काही जाणून बुझून प्यायलेले नव्हते, मग का नाही सोडणार?
प्रश्नकर्ता : नाही. औषधाचा परिणाम होणारच. दादाश्री : मग आता त्याला कोणी मारले? तर ते ढेकूण मारण्याचे