________________
१३६
क्लेश रहित जीवन
तुम्ही स्वतः शुद्धात्मा आहात आणि हा सगळा व्यवहार तुम्हाला वरवर म्हणजे सुपरफ्लुअस करायचा आहे. स्वतः 'होम डिपार्टमेंट' मध्ये (शुद्धात्म्यात) राहायचे आणि फोरेन डिपार्टमेंट मध्ये सुपरफ्लुअस राहायचे. सुपरफ्लुअस म्हणजे कुठेही तन्मायाकार वृत्ती नाही. फक्त नाटकीय. फक्त हे नाटकच साकारायचे आहे. नाटकात नुकसान झाले तरी हसायचे आणि फायदा झाला तरी देखील हसायचे. नाटकात दिखावा पण करावा लागतो. नुकसान झाले असल्यास तसे हावभाव पण करावे लागतात! तोंडाने बोलायचे की खूप नुकसान झाले पण आतून तन्मयाकार व्हायचे नाही. आपण लटकता सलाम (वरवरचा, दुरून नमस्कार) करायचा. बरेच जण सांगतात ना की, 'भाऊ, माझा तर याच्याशी दुरुन नमस्काराचा संबंध आहे!' अशाच प्रकारे संपूर्ण जगाशी राहावे. ज्याला साऱ्या जगाशी दुरुन नमस्कार करणे जमले तो ज्ञानीच झाला. या देहालाही दुरुन नमस्कार! आम्ही निरंतर सगळ्यांशी दुरुन नमस्काराचाच संबंध ठेवत असतो. तरीही सगळे म्हणतात की आमच्यावर आपला खूप चांगला भाव आहे. मी सगळाच व्यवहार करतो पण आत्म्यात राहून.
प्रश्नकर्ता : कित्येकदा घरात खूप मोठे भांडण होते. तर अशा वेळी काय करावे?
दादाश्री : शहाणा माणूस असेल तर लाख रुपये दिले तरी तो भांडण करणार नाही! आणि इथे तर फुकट भांडण करतो, मग तो अडाणी नाही तर काय? महावीर भगवंताना कर्म संपवण्यासाठी साठ मैल चालून दूर अनार्य क्षेत्रात जावे लागले, आणि आत्ताचे लोक तर पुण्यवान, म्हणून त्यांना घर बसल्या अनार्य क्षेत्र उपलब्ध आहे! केवढे हे धन्य भाग्य! कर्म संपविण्यासाठी तर हे खूपच लाभदायक आहे, पण सरळ राहिला तर!
गुन्हा एका तासाचा, दंड आयुष्यभराचा एक तास नोकराला, मुलाला किंवा बायकोला छळले असेल तर