________________
१५६
क्लेश रहित जीवन
आणि मन न बिघडवता केला तरीही ६६,६१६ रुपयेच होणार, मग कुठला व्यापार करावा?
आमचे मोठमोठे व्यापार चालतात पण व्यापाराचे पत्र 'आमच्या' डोक्यावर कधी येत नाहीत. कारण व्यापारातील नफा आणि व्यापारातील तोटाही आम्ही व्यापारातच ठेवतो. जर मी नोकरी केली असती तर मला जो पगार मिळाला असता तेवढाच पैसा मी घरी घेऊन जातो. बाकीचा नफाही व्यापाराचा आणि तोटाही व्यापाराच्या खात्यात.
पैशांचे ओझे ठेवण्यासारखे नाही. बँकेत जमा झाले की आनंद, गेलेली दु:ख. या जगात काहीच हुश्श... करून मस्त वाटून घेण्यासारखे नाही. कारण सगळे टेम्पररी (तात्पुरते) आहे.
व्यापारात हिताहित कोणता व्यापार चांगला? तर ज्या व्यापारात हिंसा नाही असा व्यापार चांगला, कुणालाही आपल्या व्यापारामुळे दुःख होत नसेल. धान्याचा व्यापार असेल तर धान्य मोजताना मापातून थोडे काढून घेतात. हल्ली तर भेसळ करायचे शिकले आहेत. त्यातही जे खाण्याच्या वस्तूंमध्ये भेसळ करतात ते तिर्यंच (जनावर) गतीत चार पायात जातील. चार पाय असले म्हणजे पडणार तर नाहीत ना? व्यापारात धर्म असू द्या, नाही तर अधर्म शिरेल.
प्रश्नकर्ता : व्यापार किती वाढवावा?
दादाश्री : व्यापार इतका करावा की रात्री शांतपणे झोपू शकाल. आपल्याला जेव्हा बदलायचा असेल तेव्हा बदलू शकू. स्वतःहून उपाधीला आमंत्रण देऊ नये.
व्याज घेण्यात काही हरकत? प्रश्नकर्ता : शास्त्रात व्याज घेण्यास मनाई केलेली नाही ना?