________________
१६०
क्लेश रहित जीवन
दादाश्री : समोरच्या व्यक्तीची वागणूक आपण पाहायची नाही, ती त्याची जबाबदारी आहे, जर समोरुन दरोडेखोर येत असेल तर तुम्ही दोन हात केलेत तर ठीक आहे पण तेव्हा तर तुम्ही सगळे देऊन टाकता ना? निर्बळ व्यक्तीवर तुम्ही अधिकार गाजवता त्यात काय विशेष? हातात अधिकार असून देखील तुम्ही निर्बळ व्यक्तीशी नम्रतेने वागलात तर बरोबर.
हे ऑफिसर लोक घरी बायकोशी भांडून येतात आणि ऑफिसमध्ये असिस्टन्ट लोकांचे तेल काढतात (छळतात)! अरे, असिस्टन्टने जर चुकीच्या कागदावर तुमची सही घेतली तर तुझी काय दैना होईल? असिस्टन्टची तर खूपच गरज आहे।
___ आम्ही असिस्टन्टची खूप काळजी घेतो. कारण त्याच्यामुळे तर आपले काम चालते. काहीजण शेठला खुश करण्यासाठी स्वत:ची हुशारी दाखवतात. शेठने सांगितले 'वीस टक्के घ्या.' तेव्हा स्वतःची हुशारी सिद्ध करण्यासाठी पंचवीस टक्के घेतो. असे करुन पापाचे गासुडे का बांधता?