________________
[८] आपण सर्व निसर्गाचे 'गेस्ट'
निसर्ग, जन्मापासूनच हितकारक या संसारात जितकेही जीव आहेत ते सर्वच निसर्गाचे 'गेस्ट' (पाहुणे) आहेत. तुम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट निसर्ग तुमच्यासाठी तयार करून पाठवितो. योग्य समज नसल्यामुळे तुम्हाला सतत क्लेशबेचैनी-चिंता वाटत राहते कारण तुम्हाला असे वाटते की हे 'मीच करत आहे.' हिच भ्रांती आहे. खरे तर कुणाकडून काहीही होऊ शकत नाही. __इथे जन्म होण्यापूर्वीच, आपण या संसारात येण्याआधीच लोक सगळीच तयारी करून ठेवतात. भगवंतांची स्वारी येत आहे! जन्म होण्याआधी बाळाला काळजी करावी लागते का की बाहेर आल्यानंतर माझ्या दुधाचे काय होईल? इथे तर दुधाच्या कुंड्या वगैरे आधीच तयार असतात! डॉक्टर, सुईन सगळेच तयार असतात? आणि सुईन नसेल तर न्हावीन तरी असतेच. पण कसली ना कसली तयारी असेलच. मग जसा 'गेस्ट' असेल तशी! 'गेस्ट' फर्स्ट क्लास असेल त्याची तयारी वेगळी, सेकण्ड क्लासची वेगळी आणि थर्ड क्लासची वेगळी, सगळे क्लास असतात ना? म्हणजे सगळ्याच तयारीनिशी तुम्ही आला आहात. मग एवढी हाय-उपस कशासाठी करता?
आपण ज्यांचे पाहुणे असू, तिथे त्यांच्याबरोबर विनय कसा असला पाहिजे? मी तुमच्या घरी पाहुणा म्हणून आलो तर मला पाहुणा