________________
१६८
क्लेश रहित जीवन
त्यावर तर अनेक शास्त्र लिहिता येतील. पण या अंतिम अर्थावरून तुम्ही समजून घ्या.
आणि 'सिन्सियारीटी' म्हणजे जो माणूस दुसऱ्याला 'सिन्सियर' राहत नाही, तो स्वत:ला देखील 'सिन्सियर' राहत नाही. कोणालाही थोडे देखील 'इनसिन्सियर' असता कामा नये, त्यामुळे आपलीच 'सिन्सियारीटी' तुटते.
____'सिन्सियारीटी' आणि 'मोरालिटी' या काळात हे दोन गुण असतील तर खूप झाले. अरे यापैकी एक गुण जरी असेल तरीही तो तुम्हाला थेट मोक्षापर्यंत घेऊन जाईल! पण तुम्ही या गुणांना घट्ट धरून राहिले पाहिजे. आणि जेव्हा-जेव्हा तुम्हाला अडचण येईल तेव्हा ज्ञानी पुरुषांची भेट घेऊन स्पष्टता करून घेतली पाहिजे की ही 'मोरालिटी' आहे की नाही?
ज्ञानी पुरुषांचा राजीपो (गुरुंजनांची कृपा आणि प्रसन्नता) आणि 'सिन्सियारीटी' या दोन्हींच्या गुणाकाराने सर्व कार्ये सफळ होतील!
'इनसिन्सियारीटी' ने सुद्धा मोक्ष एखादा वीस टक्के सिन्सियर आणि ऐंशी टक्के इनसिन्सियर माणूस जर माझ्याजवळ आला आणि त्याने मला विचारले की, 'मला मोक्ष हवा आहे आणि माझ्यात तर असा माल (दुर्गुण) भरलेला आहे तर मी काय केले पाहिजे?' तेव्हा मी त्याला सांगेल शंभर टक्के 'इनसिन्सियर' होऊन जा, मग मी तुला मोक्षाला जाण्याचा दुसरा मार्ग दाखवीन. या ऐंशी टक्याच्या कर्जाची भरपाई तो कशी करणार? त्यापेक्षा एकदम दिवाळेच काढ. 'ज्ञानी पुरुषां' चे फक्त एक वाक्य जरी पकडून चाललात तरीही मोक्ष प्राप्त कराल. संपूर्ण जगाशी 'इनसिन्सियर' राहिलात तरी देखील मला हरकत नाही पण एक इथे (ज्ञानीपुरुषांशी) सिन्सियर राहिला तर ते तुला मोक्षात घेऊन जातील. शंभर टक्के 'इनसिन्सियारीटी' हा पण एक