________________
[९]
मनुष्यपणाची किंमत
किंमत तर सिन्सियारीटी व मोरालिटीची
साऱ्या जगाचा ‘बेसमेन्ट' (पाया) सिन्सियारीटी व मोरालिटी याच दोन गोष्टी आहेत. या दोन्ही गोष्टी सडल्या तर सगळे कोसळून पडते. या काळात सिन्सियारीटी आणि मोरालिटी असेल तर ती खूप मोठी संपत्ती आहे. हिंदुस्तानात या गोष्टी खूप मुबलक प्रमाणात होत्या पण हिंदुस्तानातील लोकांनी या गोष्टींची परदेशात निर्यात केली आहे. आणि त्या बदल्यात परदेशातून काय आयात केले आहे हे माहित आहे का तुम्हाला ? ही एटीकेट ची भुते (शिष्टाचाराचा वेडेपणा) मागवली ! त्यामुळे या बिचाऱ्यांना चैन पडत नाही. आपल्याला या एटीकेटच्या भुतांची काय गरज आहे ? ज्यांच्यात नूर नाही त्यांच्यासाठी गरज आहे. आपण तर तीर्थंकरी नूर असणारे लोक आहोत, ऋषीमुनींचे संतान आहोत ! तुमचे कपडे फाटले असतील तरी तुमच्या चेहऱ्यावरचे तेजच सांगेल की 'तुम्ही कोण आहात ?'
प्रश्नकर्ता : 'सिन्सियारीटी' आणि 'मोरालिटी' चा नेमका अर्थ काय ? ते समजवा.
दादाश्री : ‘मोरालिटी' चा अर्थ काय ? की स्वत:च्या हक्काचे आणि सहज मिळत असेल ते उपभोगण्याची सूट. हा 'मोरालिटी' चा अगदी अंतिम अर्थ आहे. 'मोरालिटी' तर अतिशय खोल गोष्ट आहे.