________________
क्लेश रहित जीवन
दादाश्री : त्यांच्या दृष्टीत भेदभाव नसतोच, वीतरागताच असते. त्यांच्या व्यवहारात (वागण्यात) फरक असतो. एक मिल मालक आणि त्याचा ड्रायव्हर इथे आले तर शेठला समोर बसवेल आणि ड्रायव्हरला माझ्याजवळ बसवेल, म्हणजे शेठचा पारा (घमंड) उतरून जाईल ! आणि जर पंतप्रधान आले तर मी उठून त्यांचे स्वागत करेल आणि त्यांना आसन ग्रहण करायला सांगेल, त्यांच्या सोबतचा व्यवहार चुकणार नाही. त्यांना तर विनयपूर्वक उच्च आसनावर बसवेल, आणि त्यांना जर माझ्याकडून ज्ञान ग्रहण करायचे असेल तर त्यांना माझ्या समोर खाली बसवेल आणि तसे नसेल तर वर बसवेल. लोकमान्य असेल त्यास व्यवहार म्हटले आहे आणि जे मोक्षमान्य असेल त्यास निश्चय म्हटले आहे, म्हणून सर्वसामान्यांशी वागताना सर्व सामान्य व्यवहारानेच वागावे लागते. पंतप्रधान आले आणि मी उठलो नाही तर तो त्यांचा अपमान होईल. त्यांना दुःख होईल आणि त्याची जबाबदारी आमच्यावर येईल.
१७२
प्रश्नकर्ता : जे मोठे आहेत त्यांना पूज्य मानले पाहिजे ?
दादाश्री : मोठे म्हणजे वयाने मोठे असे नाही, तरीदेखील जर आजीबाई मोठ्या असतील तर त्यांच्याशी विनयपूर्वक वागावे आणि जे ज्ञानवृद्ध (ज्ञानाने मोठे) असतील त्यांना पूज्य मानावे.
सत्संगातून आम्ही घरी वेळेवर जातो. जर मी रात्री बारा वाजता दरवाजा ठोठावला तर ते कसे दिसेल ? घरचे लोक तोंडावर सांगतील की, 'तुम्ही कधीही या चालेल.' पण त्यांचे मन त्यांना सोडणार नाही ना? मन तर वेगवेगळ्या गोष्टी दाखवत राहील. आपण त्यांना सहजही दुःख कसे देऊ शकतो ? हा तर नियम म्हटला जातो आणि नियम तर पाळायलाच हवा. त्याचप्रमाणे रात्री दोन वाजता उठून जर कोणी रियलची (आत्म्याची) भक्ती केली तर कोणी काही बोलेल का? नाही, कोणीच विचारणार नाही.