Book Title: Life Without Conflict Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 191
________________ क्लेश रहित जीवन आई-वडिलांच्या नात्याचाही तिरस्कार करतो अशा व्यवहाराला धर्म कसे म्हणता येईल ? अरे, मनातल्या मनात दिलेली शिवी किंवा अंधारात गुप्तपणे केलेली कृत्ये, या गोष्टी म्हणजे भयंकर अपराध आहेत ! त्याला वाटते की, 'मला कोण पाहणारा आहे ? आणि कोणाला हे कळणार आहे ?' अरे, हे काही पोपाबाईचे राज्य नाही ! हा तर खूप मोठा अपराध आहे! या सगळ्यांना अंधारातील चुकाच त्रास देतात ! १७६ व्यवहार आदर्श असायला हवा. या व्यवहारात जास्त खोलवर गेलात, तर कषाय निर्माण होतात. हा संसार तर एक होडीसारखा आहे, या होडीत चहा-नाश्ता वगैरे सर्व करायचे पण हे मात्र लक्षात ठेवायचे की, होडीतून आपल्याला किनाऱ्यावर पोहचायचे आहे. म्हणून या गोष्टी नीट समजून घ्या. 'ज्ञानीपुरुषांकडून' हे सर्व फक्त समजूनच घ्यायचे आहे. करायचे काहीच नाही! आणि जो समजून सामावला तो झाला वीतराग !! -जय सच्चिदानंद

Loading...

Page Navigation
1 ... 189 190 191 192