Book Title: Life Without Conflict Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust
Catalog link: https://jainqq.org/explore/034319/1

JAIN EDUCATION INTERNATIONAL FOR PRIVATE AND PERSONAL USE ONLY
Page #1 -------------------------------------------------------------------------- ________________ दादा भगवान कथित क्लेश रहित जीवन Marathi ज्ञानी पुरुषांजवळ जीवन जगण्याच्या इतक्या सुंदर कला असतात की त्या सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्त करतात. Page #2 -------------------------------------------------------------------------- ________________ दादा भगवान कथित 光 क्लेश रहित जीवन मूळ गुजराती संकलन : डॉ. नीरूबहन अमीन अनुवाद : महात्मागण Page #3 -------------------------------------------------------------------------- ________________ प्रकाशक : श्री अजित सी. पटेल दादा भगवान आराधना ट्रस्ट, दादा दर्शन, 5, ममतापार्क सोसायटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे, उस्मानपुरा, अहमदाबाद - 380014, गुजरात. फोन - (079) 39830100 © All Rights reserved - Shri Deepakbhai Desai Trimandir, Simandhar City, Ahmedabad-Kalol Highway, Adalaj, Dist.-Gandhinagar-382421, Gujarat, India. No part of this book may be used or reproduced in any manner whatsoever without written permission from the holder of the copyrights. प्रथम आवृत्तिः २००० नोव्हेंबर २०१८ भाव मूल्य : ‘परम विनय' आणि 'मी काहीच जाणत नाही', हा भाव! द्रव्य मूल्य : ४० रुपये मुद्रक : अंबा ऑफसेट B-99, इलेक्ट्रॉनिक्स GIDC, क-6 रोड, सेक्टर-25, गांधीनगर-382044 फोन : (079) 39830341 Page #4 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र Mad नमो अरिहंताणं नमो सिद्वार्ण नमो आयरियाण नमो उवज्झायाणं नमो लोए सव्वसाहूणं एसो पंच नारो, सव्व पावप्पणासणी मंगलाणं च सव्वेसिं, पढर्म हवाइ मंगलम् १ ॐ नमो भगवते वासुदेवाय २ ॐ नमः शिवाय ३ जय सच्चिदानंद Page #5 -------------------------------------------------------------------------- ________________ दादा भगवान कोण? । ___ जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनवर अलोट गर्दी होती. रेल्वेच्या प्लेटफॉर्म नंबर तीनच्या बाकावर बसलेल्या श्री अंबालाल मूळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरुपात कित्येक जन्मांपासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले 'दादा भगवान' संपूर्णपणे प्रकट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भुत आश्चर्य! एका तासात विश्वदर्शन लाभले! मी कोण? भगवंत कोण? जग कोण चालवत आहे ? कर्म म्हणजे काय? मुक्ती कशाला म्हणतात? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांची रहस्ये संपूर्णपणे प्रकट झाली. अशाप्रकारे निसर्गाने विश्वाला प्रदान केले एक अद्वितीय, संपूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातच्या चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय करणारे आणि तरीही पूर्ण वीतराग पुरुष. ___ त्यांना प्राप्ती झाली तशी ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञानाची प्राप्ती करवित असत, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोगाद्वारे. त्याला अक्रम (क्रमविरहीत) मार्ग म्हटले जाते. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढणे! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग! शॉर्ट कट! ते स्वतः प्रत्येकाला 'दादा भगवान कोण?' याबद्दलची फोड करून देताना म्हणायचे की, "हे दिसतात ते 'दादा भगवान' नाहीत. हे तर 'ए.एम. पटेल' आहेत. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रकट झाले ते दादा भगवान आहेत. दादा भगवान तर 'चौदालोक'चे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत ! तुमच्यात अव्यक्त रुपात आहेत आणि 'येथे' माझ्या आत संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत! माझ्या आत प्रकट झालेले 'दादा भगवान' यांना मी पण नमस्कार करतो." व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. या सिद्धांताने त्यांनी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. संपूर्ण जीवनात त्यांनी कधीही, कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत, उलट स्वतःच्या व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवित असत. Page #6 -------------------------------------------------------------------------- ________________ आत्मज्ञान प्राप्तीची प्रत्यक्ष लींक मी तर, काही लोकांना माझ्या हातून सिद्धी प्रदान करणार आहे. नंतर कोणीतरी हवा की नको! नंतर लोकांना मार्ग तर हवाच ना? __- दादाश्री परम पूज्य दादाश्री गावोगावी, देशविदेश परिभ्रमण करून मुमुक्षूना सत्संग आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करवित होते. दादाश्रींनी आपल्या हयातीतच पूज्य डॉ. नीरूबहन अमीन (नीरूमा) यांना आत्मज्ञान प्राप्त करवून देण्याची ज्ञानसिद्धी प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलयानंतर नीरूमा त्यांच्याप्रमाणेच मुमुक्षूना सत्संग व आत्मज्ञान प्राप्ती निमित्त भावाने करवित असत. पूज्य दीपकभाई देसाई यांना दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धी प्रदान केली होती. पू. नीरूमांच्या उपस्थितीतच त्यांच्याच आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कित्येक ठिकाणी जाऊन मुमुहूंना आत्मज्ञान प्राप्ती करवित असत, हे कार्य नीरूमांच्या देहविलयानंतर आजसुद्धा चालूच आहे. या आत्मज्ञान प्राप्तीनंतर हजारो मुमुक्षु या संसारात राहून, सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असताना सुद्धा मुक्त राहून आत्मरमणतेचा अनुभव घेत आहेत. पुस्तकात मुद्रित वाणी मोक्षार्थीला मार्गदर्शनासाठी अत्यंत उपयोगी सिद्ध होईल, परंतु मोक्षप्राप्तीसाठी आत्मज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे. अक्रम मार्गाने आत्मज्ञानप्राप्तीचा मार्ग आजसुद्धा चालुच आहे. जसा प्रज्वलित दिवाच दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित करू शकतो, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष आत्मज्ञानींकडून आत्मज्ञान प्राप्त करूनच स्वतःचा आत्मा जागृत होऊ शकतो. Page #7 -------------------------------------------------------------------------- ________________ निवेदन परम पूज्य ‘दादा भगवान' यांच्या प्रश्नोत्तरी सत्संगात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांच्या श्रीमुखातून अध्यात्म आणि व्यवहार ज्ञानासंबंधी जी वाणी निघाली, ती रेकॉर्ड करून, संकलन व संपादन करून पुस्तकांच्या रुपात प्रकाशित केली जात आहे. त्याच साक्षात सरस्वतीचे अद्भूत संकलन ह्या पुस्तकात झाले आहे, जे आम्हा सर्वांसाठी वरदानरुप ठरेल. प्रस्तुत अनुवादाची वाक्यरचना मराठी व्याकरणाच्या मापदंडावर कदाचित खरी ठरणार नाही, परंतु दादाश्रींच्या गुजराती वाणीचे शब्दशः मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणे करून वाचकांना असा अनुभव व्हावा की दादाजींचीच वाणी ऐकली जात आहे. पण तरीसुद्धा दादाश्रींच्या आत्मज्ञानाचे अचूक आशय, जसे आहे तसे तर तुम्हाला गुजराती भाषेतच अवगत होईल. ज्यांना ज्ञानाचा गहन अर्थ समजून घ्यायचा असेल, ज्ञानाचे खरे मर्म जाणायचे असेल, त्यांनी या हेतूने गुजराती भाषा शिकावी अशी आमची नम्र विनंती आहे. अनुवादातील त्रूटींसाठी आपली क्षमा प्रार्थितो. वाचकांना... * ह्या पुस्तकातील मुद्रित पाठ्यसामग्री मूळत: 'क्लेश रहित जीवन' या गुजराती पुस्तकाचे मराठी अनुवाद आहे. जिथे-जिथे 'चंदुभाऊ' या नावाचा उल्लेख केला आहे, तिथे वाचकांनी स्वतःचे नाव समजून वाचन करावे. - पुस्तकातील कोणतीही गोष्ट जर तुम्हाला समजली नाही, तर प्रत्यक्ष सत्संगात येऊन त्याचे समाधान मिळवावे अशी नम्र विनंती. दादाश्रींच्या श्रीमुखातून निघालेले काही गुजराती शब्द जसेच्या तसे 'इटालिक्स' मध्ये ठेवले आहेत, कारण त्या शब्दांसाठी मराठीमध्ये तसेच कोणतेही शब्द उपलब्ध नाहीत की ज्यामुळे त्याचा अर्थ पूर्णपणे समजता येईल. पण तरीही त्या शब्दाचे समानार्थी शब्द () कंसात लिहिलेले आहेत. Page #8 -------------------------------------------------------------------------- ________________ व्यवहार आणि धर्म शिकविले जगाला __ एक पुस्तक व्यवहार ज्ञानाचे तयार करा. लोकांचा व्यवहार जरी सुधारला ना, तरी फार झाले. आणि माझे शब्द आहेत तेव्हा त्यांचे मन परिवर्तन होईल. शब्द माझेच ठेवा. शब्दात बदल करु नका. वचनबळ असलेले शब्द आहेत. मालकी नसलेले शब्द आहेत. शब्दांची सुव्यवस्थित मांडणी तुम्ही करा. माझे हे जे व्यवहारीक ज्ञान आहे ना, ते तर ऑल ऑवर वर्ल्डमध्ये प्रत्येकाला उपयोगी पडेल. संपूर्ण मनुष्यजातिला उपयोगी पडेल. आमचा व्यवहार सर्वोच्य प्रकारचा होता. तो व्यवहार पण शिकवतो आणि धर्म पण शिकवतो. स्थूलवाल्याला स्थूल आणि सूक्ष्मवाल्याला सूक्ष्म, परंतु प्रत्येकालाच उपयोगी पडेल. म्हणून असे काही करा की प्रत्येकाला मदतरुप होईल. लोकांना मदत होईल अशी बरीच पुस्तके मी वाचली पण त्यात काही भले होईल असे नव्हते. थोडीफार मदत होऊ शकते परंतु जीवन सुधारतील असे तर नसतातच ना! कारण ते तर डॉक्टर ऑफ माईन्ड, मनाचे डॉक्टर असतील तरच होईल! तर, आई एम द फुल डॉक्टर ऑफ माईन्ड. - दादाश्री Page #9 -------------------------------------------------------------------------- ________________ 3 क्रोध ; i (दादा भगवान फाउन्डेशनची प्रकाशित पुस्तके) मराठी भोगतो त्याची चूक १६. मृत्युवेळी, आधी आणि नंतर २. एडजस्ट एवरीव्हेर १७. सेवा-परोपकार ३. जे घडले तोच न्याय १८. दान ४. संघर्ष टाळा १९. त्रिमंत्र मी कोण आहे? २०. वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी २१. चमत्कार चिंता २२. सत्य-असत्याचे रहस्य प्रतिक्रमण २३. वाणी, व्यवहारात ९. भावना सुधारे जन्मोजन्म २४. पैशांचा व्यवहार १०. कर्माचे विज्ञान २५. क्लेश रहित जीवन ११. पाप-पुण्य २६. निजदोष दर्शनाने...निर्दोष! १२. आई-वडील आणि मुलांचा व्यवहार २७. प्रेम १३. पति-पत्नीचा दिव्य व्यवहार १४. समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य २८. गुरू-शिष्य १५. मानव धर्म २९. अहिंसा हिन्दी १. ज्ञानी पुरुष की पहचान २०. प्रेम सर्व दुःखों से मुक्ति २१. माता-पिता और बच्चों का व्यवहार कर्म का सिद्धांत २२. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य आत्मबोध २३. दान मैं कौन हूँ? २४. मानव धर्म वर्तमान तीर्थकर श्री सीमंधर... २५. सेवा-परोपकार भुगते उसी की भूल २६. मृत्यु समय, पहले और पश्चात एडजस्ट एवरीव्हेयर २७. निजदोष दर्शन से... निर्दोष टकराव टालिए २८. पति-पत्नी का दिव्य व्यवहार १०. हुआ सो न्याय ९. क्लेश रहित जीवन ११. चिंता गुरु-शिष्य क्रोध ३१. अहिंसा १३. प्रतिक्रमण ३२. सत्य-असत्य के रहस्य १४. दादा भगवान कौन? ३३. चमत्कार १५. पैसों का व्यवहार ३४. पाप-पुण्य १६. अंत:करण का स्वरूप ३५. वाणी, व्यवहार में... १७. जगत कर्ता कौन? ३६. कर्म का विज्ञान १८. त्रिमंत्र ३७. आप्तवाणी - १ से ९ और १३ (पूर्वार्ध-उत्तरार्ध) १९. भावना से सुधरे जन्मोजन्म ३८. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य (पूर्वार्ध-उत्तरार्ध) दादा भगवान फाउन्डेशन द्वारे गुजराती आणि इंग्रजी भाषेत सुद्धा बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहे। वेबसाइट www.dadabhagwan.org वर सुद्धा आपण ही सगळी पुस्तके प्राप्त करू शकता। प्रत्येक महिन्यात हिन्दी, गुजराती आणि अंग्रेजी भाषेत दादावाणी मेगेझीन प्रकाशित करीत आहे। 3 ; mm m our m mm m m m Page #10 -------------------------------------------------------------------------- ________________ संपादकीय जीवन तर सगळेच जगतात, पण खऱ्या अर्थाने जीवन जगणे त्यास म्हटले जाईल की जे जीवन क्लेश रहित असेल! सध्याच्या या कलियुगात घरोघरी सकाळच्या चहा-नाश्त्याची सुरुवातच क्लेशाने होते. मग उरलेले दिवसभरातील क्लेशाचेच जेवण आणि येता-जाता चघळत राहणे याबद्दल काय बोलावे? अरे, सतयुग द्वापर युग आणि त्रेता युगात देखील मोठमोठ्या पुरुषांच्या जीवनातही क्लेश होतच असत. पांडव सात्विक होते परंतु त्यांचे संपूर्ण आयुष्य कौरवांशी लढाई कशी करावी याची व्युहरचना करण्यातच गेले! प्रभू श्रीरामचंद्रांना सुद्धा वनवास सोसावा लागला आणि मग सीताहरणापासून ते थेट अश्वमेध यज्ञापर्यंतचा हा सर्व काळ संघर्षमयच गेला. तथापि आध्यात्मिक समज असल्यामुळे ते या साऱ्या प्रसंगातून समताभावाने पार पडले. तेव्हा ही त्यांची खूप मोठी सिद्धी म्हणावी लागेल! _हे जीवन क्लेशमय बनते याचे मुख्य कारण अज्ञानताच आहे. 'तुझ्या सर्व दुःखांचे मूळ कारण तू स्वत:च आहेस!' परम पूज्य दादाश्रींचे हे विधान सर्व दुःखांच्या मूळ कारणाचे सखोल विश्लेषण करते. इतके सुस्पष्ट यापूर्वी कोणालाच समजले नव्हते! जीवन नैया कुठल्या गावी न्यायची आहे हे निश्चित केल्याशिवाय, दिशा जाणल्याशिवाय ती चालवतच राहिलो तर मुक्कामावर कसे पोहोचू? होडी चालवून वल्ही वल्हवून आपले हात पाय थकून जातील आणि अखेरीस आपण समुद्रात बुडून जाऊ! म्हणून जीवनाचे ध्येय ठरविणे अत्यंत आवश्यक आहे. ध्येय ठरविल्याशिवाय आयुष्य व्यतीत करणे म्हणजे पट्टा न लावता इंजिन चालविण्यासारखे आहे ! जर अंतिम ध्येय हवे असेल तर ते मोक्ष प्राप्तीचेच आहे आणि मधले ध्येय हवे असेल तर जीवन सुखमय नसले तरी चालेल पण क्लेशमय तर नसावेच. Page #11 -------------------------------------------------------------------------- ________________ दररोज सकाळी किमान पाच वेळा आपण हृदयापासून प्रार्थना केली पाहिजे की ‘प्राप्त मन, वचन, कायेने या जगातील कुठल्याही जीवाला किंचितमात्रही दु:ख न होवो, न होवो,न होवो!' अशी प्रार्थना करून देखील चुकून कुणाला दुःख दिले गेले तर त्यासाठी हृदयपूर्वक पश्चाताप करुन प्रतिक्रमण-प्रत्याख्यान करुन झालेली चूक धुवून टाकल्याने जीवन निश्चितच शांतीपूर्वक व्यतीत होईल. घरातील आई-वडील आणि मुले यांच्यामधील कटकटीचा अंत योग्य समजमुळेच येईल. यात मुख्य आई-वडिलांनीच समजून घ्यायचे आहे. पराकोटीचा मोह, ममता आणि आसक्तीमुळे मार पडल्याशिवाय राहत नाही आणि शेवटी स्व-परचे अहितही झाल्याशिवाय राहत नाही. मुलांसंबधीची कर्तव्ये आपण पार पाडावी. भावनेच्या आहारी जाऊन अति लाड करणे आणि परिणामी यातना भोगणे टाळले पाहिजे, हिंदोळ्यावर झुलायचे आणि पडायचेही नाही, अशा प्रकारे. परम पूज्य दादाश्रींनी आई-वडील आणि मुलांच्या व्यवहाराची खूप सखोल समज दोघांच्याही मनःस्थितीला चांगल्या प्रकारे समजून उघड केली आहे. ज्यामुळे लाखो लोकांचे जीवन सुधारले आहे ! पती-पत्नीचे एकमेकांवर अतिशय प्रेम असूनही दोघांच्या जीवनात सतत क्लेश बघायला मिळते, पती-पत्नी दोघेही परस्परांच्या हूंफ (आधार,मायेची ऊब) ने इतके घट्ट बांधलेले आहेत की आपसात कितीही भांडण-तंटे होत असले तरी ते पती-पत्नी या नात्याने आयुष्यभर एकत्र राहतात. पती-पत्नीचे आदर्श संबंध कसे असावेत याचे सुरेख मार्गदर्शन दादाश्रींनी अगदी हसत-हसवत केले आहे. ___ सासू-सुनेचा व्यवहार, धंद्यात शेठ-नोकर किंवा व्यापारी-व्यापारी किंवा भागीदारांसोबतच्या व्यवहार सुद्धा आपण क्लेश रहित कसा करू शकतो, यासाठी उत्तम मार्गदर्शन केले आहे. फक्त आत्मा-आत्मा करून व्यवहाराकडे संपूर्ण दुर्लक्ष करून पुढे Page #12 -------------------------------------------------------------------------- ________________ जाणारे साधक कधीही ज्ञानीपद प्राप्त करू शकत नाहीत. कारण अशा ज्ञानाला वांझोटे ज्ञान म्हटले जाते. खरे ज्ञानी जसे की परम पूज्य दादाश्रींनी स्वतः निश्चय आणि व्यवहार या दोन्ही पंखांना समांतर ठेवून मोक्ष गगनात विहार केला आहे आणि लाखो लोकांनाही करविला आहे. तसेच व्यवहार ज्ञान आणि आत्मज्ञानाची सर्वोत्कृष्ट समज देऊन लोकांना जागृत केले आहे. प्रस्तुत पुस्तकात जीवन जगण्याची कला, जी परम पूज्य दादाश्रींच्या श्रीमुखातून निघालेल्या बोधकलेला संक्षिप्त रुपात संकलित करण्यात आले आहे. सुज्ञ वाचकांनी अधिक विस्तारपूर्वक जाणण्यासाठी तसेच प्रत्येक व्यक्तीसोबत होणाऱ्या व्यवहारच्या सोल्युशनसाठी दादाश्रींचे मोठे ग्रंथ मिळवून अधिक सखोल समज प्राप्त करणे गरजेचे आहे. आईवडील आणि मुलांचा व्यवहार, पती- पत्नीचा दिव्य व्यवहार, वाणीचा व्यवहार, पैशांचा व्यवहार इत्यादी व्यवहार ज्ञानाविषयी असलेल्या दादाश्रींच्या ग्रंथाचे आराधन करून क्लेशरहित जीवन जगू शकतो. - डॉ. नीरूबहन अमीनचे जय सच्चिदानंद. 11 Page #13 -------------------------------------------------------------------------- ________________ अनुक्रमणिका १. जीवन जगण्याची कला ढवळाढवळ नाही, 'एडजेस्ट'... ३७ अशा आयुष्याला काय अर्थ? १ दुसऱ्यांना सुधारण्यासाठी 'बोलणे'... ४० पण ती कला कोण शिकवणार?! २'रिलेटिव्ह समजून वरपांगी राहावे ४२ समज कशी? की दुःखमय जीवन... ४ सल्ला द्यावा पण अनिवार्यपणे असा शौकची गरजच काय आहे? ७ आता, या जन्मात तर सांभाळून घ्यावे ४४ हित कशात? हे निश्चित करावे लागत ९ नाती खरी की ओढवून घेतलेली... ४५ आणि अशा व्यवस्थेमुळे सुख लाभत १२ ...मग योग्य व्यवहार कोणता? वैरभाव मिटेल आणि आनंदही वाटेल १४ कर्तव्यात नाटकीय रहा इतकी चैन, तरी उपभोगत नाहीं १६ मुलांबरोबर 'ग्लास विथ केअर' संसार सहजपणे चालतो, तिथे... १७ घर, एक बाग २. योग उपयोग परोपकारासाठी त्यात मूर्छित होण्यासारखे आहेच... जीवनात हीच दोन कार्ये महत्त्वाची १९ ... व्यवहार नॉर्मोलीटीपूर्वक असावा अशी आशा तर बाळगूच नका परोपकाराने पुण्याचे उपार्जन १९ । 'मैत्री ती सुद्धा एक 'एडजस्टमेन्ट' ५५ परोपकाराच्या परिणामाने लाभच २१ 'आता खऱ्या धर्माचा उदय । ३. वास्तवात दुःख आहे? ___ संस्कार प्राप्तीसाठी, तसे चारित्र्य हवे ५७ 'राईट बिलिफ' तिथे दुःख नाहीं २४ ...म्हणून सदभावनांकडे वळा ५७ दुःख केव्हा म्हणता येईल? ५. समजदारीने शोभेल गृहसंसार पेमेन्ट चुकवताना समभाव ठेवावा २६ । ...अवश्य करण्यायोग्य 'प्रोजेक्ट' २० मतभेदात समाधान कशा प्रकारे ...फक्त भावनाच करायची . ...म्हणून संघर्ष टाळा सहन? नाही, समाधान आणा ४. फॅमिली ओर्गेनायझेशन हिशोब चुकता झाला की नवीन... हे कसले 'आयुष्य'? ३२ 'न्याय स्वरूप,' तिथे उपाय तप ६६ असे संस्कार घडविणे शोभते का? ३३ सर्वात उत्तम एडजस्ट एव्हरीवेर ६७ प्रेमाने वागा-मुले सुधरतीलच ३४ घरातले वर्चस्व सोडावेच लागेल ना? ६९ ...नाही तर मौन धरून ‘पाहत' राहा ३५ रिअॅक्शनरी प्रयत्नच करुच नये ७० ...स्वत:लाच सुधारण्याची गरज ३७ नाही तर प्रार्थनेचे ‘एडजस्टमेन्ट' ७१ 12 Page #14 -------------------------------------------------------------------------- ________________ ज्ञानीकडून 'एडजस्टमेन्ट' शिका ७२ काहीतरी समजावे तर लागेलच ना? १०६ आश्रित असलेल्याला छळणे, घोर... ७३ रिलेटिव्हमध्ये तर जोडणे शिका १०८ 'सायन्स' समजून घेण्यासारखे ७४ ते सुधारलेले कुठपर्यंत टिकेल? १०९ जो भोगतो त्याचीच चूक ७६ एडजस्ट झालात, तरीही सुधारेल ११० नवरा-बायको ७७ सुधारण्यापेक्षा सुधरण्याची गरज ११० भांडण करा, पण बागेत ७८ सुधारण्याचा अधिकार कोणाला १११ हा असा कसा मोह? ७९ व्यवहार निभवा एडजस्ट होऊन ११२ ...अशा पद्धतीनेही क्लेश टाळला । ७९ नाही तर व्यवहारिक अडचणी... ११५ मतभेद होण्यापूर्वीच,सावधानी ८१ 'काऊन्टरपुली'- एडजस्टमेन्टची... ११६ क्लेशरहित घर जणू देऊळच ८३ वाईट बोलण्यामुळे भांडण वाढले ११८ पापाचा पैसा, क्लेश करवितो ८४ अहो! व्यवहाराचा अर्थच... ११८ प्रयोग तर करून पाहा ८५ ...आणि सम्यक् म्हटल्याने भांडण... ११९ धर्म केला (!) तरी पण क्लेश? ८५ टकोर, अहंकारपूर्वक नसावी १२० तरी पण आपण सुलट करावे ८६ अबोला धरून तर ताण वाढतो १२१ शब्द बदलून मतभेद टाळला ८७ प्रकृती स्वभावानुसार एडजस्टमेन्ट... १२२ ...ही तर कशी फसवणूक? ८९ सरळ वागल्यानेही प्रश्न सुटतात १२३ आरोप, किती दुःखदायी ९१ ...समोरच्याचे समाधान करा ना १२४ आदळ-आपट याला तुम्हीच जबाबदार ९१ भांडण, दररोज कसे परवडणार? १२५ प्रकृती ओळखून, सावध राहावे ९३ 'भांडणमुक्त' होण्यासारखे १२६ व्यवहार येत नसेल तर दोष कोणाचा? ९३ सूडाचे बीज हेच भांडणाचे कारण १२७ व्यवहाराला याप्रकारे समजून घ्या ९५ ज्ञानामुळे वैर भावनेचे बीज नष्ट होते १२७ 'मार' दिलात तर बदला घेईल ९९ जसा अभिप्राय तसा परिणाम १२८ तक्रार नाही, तोडगा काढा १०० ही सद्विचारणा, किती छान १२८ सुख घेण्यात फसवणूक वाढली १०१ संशय, भांडणाचे एक कारण १३० अशा पद्धतीने लग्न ठरते १०२ अशा वाणीला निभावून घ्या. १३० जग सूड घेतेच १०३ ममतेचे वेढे उलगडावे कसे? १३१ कॉमनसेन्सने सोल्युशन येते १०४ सगळीकडेच फसवणूक ! कुठे... १३१ रिलेटिव्ह शेवटी धोकाच आहे,असे... १०६ पोलम्पोल कुठपर्यंत झाकाल?! १३३ __ 13 Page #15 -------------------------------------------------------------------------- ________________ १५५ १५५ १५६ १४० फसवणूक अशी वाढत गेली! १३४ प्रामाणिकता, देवाचे लायसन्स ...त्याला तर लटकता सलाम १३५ ...नफा-तोट्यात, हर्ष-शोक... गुन्हा एका तासाचा, दंड... १३६ व्यापारात हिताहित वेडा अहंकार, तर भांडण-तंटे... १३७ व्याज घेण्यात काही हरकत? १५६ अशी भाषा कधीच उच्चारु नये १३८ संसार निभावण्याचे संस्कार-कुठे? १३९ काटकसर तर नोबल ठेवा १५७ यात प्रेम कुठे उरले? ७. वरिष्ठांचा व्यवहार नॉर्मालिटी, शिकण्यासारखी १४१ अंडरहेन्डची तर रक्षा करावी १५८ शक्ती किती कमी झाल्या १४२ सत्तेचा दुरुपयोग १५९ चुकांमुळेच चुका करणारे भेटतात १४३ . आपण सर्व निसर्गाचे 'गेस्ट' शक्ती विकसित करणारे हवेत १४४ १६१ प्रतिक्रमणाने सगळे हिशोब मिटतील १४४ निसर्ग, जन्मापासूनच हितकारक ...तेव्हा संसाराचा अस्त होईल १४५ पण ढवळाढवळ करून दुःख... १६२ 'ज्ञानी' सोडवतात संसार जाळ्यातून १४७ ...तरीही निसर्ग सदैव तुमच्या... १६५ अशा भावनेने सोडवणारे मिळतातच! १४७ ९. मनुष्यपणाची किंमत ६. व्यापार, धर्मासकट किंमत तर सिन्सियारीटी व... १६७ आयुष्य कशासाठी खर्च झाले? १५० 'इनसिन्सियारीटी' ने सुद्धा मोक्ष १६८ विचार करा, चिंता नाही १५० १०. आदर्श व्यवहार कर्जफेडीच्या बाबतीत दानत साफ... १५१ अखेर, व्यवहार आदर्श हवाच ...जोखीम ओळखून निर्भय राहावे १५२ शुद्ध व्यवहार : सद्व्यवहार ग्राहकांचे पण नियम आहेत १५३ आदर्श व्यवहाराने मोक्ष प्राप्ती १७० १७३ १७४ Page #16 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन [१] जीवन जगण्याची कला अशा आयुष्याला काय अर्थ? या आयुष्याचा हेतू काय असेल, हे तुम्हाला समजते का? काही तरी हेतू असेलच ना? आधी बालपण मग म्हातारपण आणि नंतर तिरडी निघते. जेव्हा तिरडी निघते तेव्हा दिलेले नाव परत घेतले जाते, येथे जन्माला आले की लगेच नाव दिले जाते ते व्यवहार चालविण्यासाठी! जसे नाटकातील नटाला भर्तुहरी नाव दिले जाते ना? नाटक संपले की नाव पण संपले. याचप्रकारे व्यवहार चालविण्यासाठी नाव देतात आणि त्या नावावर बंगला, गाडी, पैसे ठेवतात आणि जेव्हा अंत्ययात्रा निघते तेव्हा मात्र हे सगळे जप्त केले जाते. लोक आयुष्य जगतात आणि मग एक दिवस मरतात, अर्थात या सगळ्या अवस्था आहेत. आता या जीवनाचा हेतू मौज-मजा करणे असेल की मग परोपकार करण्यासाठी असेल? किंवा मग लग्न करून संसार थाटणे हा हेतू असेल? लग्न तर अनिवार्य असते. एखाद्यासाठी लग्न अनिवार्य नसेल तर लग्न होत नाही. पण सर्व सामान्यपणे लग्न तर होतातच ना?! नाव कमावणे हा आयुष्याचा हेतू आहे का? पूर्वीच्या काळी सीता, अनुसूया अशा सती होऊन गेल्या. त्यांचे खूप नाव झाले! पण तरीही नाव तर इथल्या इथेच राहणार आहे. मग सोबत काय घेऊन जायचे? तर तुम्ही केलेला गुंता! Page #17 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन तुम्हाला मोक्षाला जाण्याची इच्छा असेल तर जा, आणि नसेल तर नका जाऊ, पण इथे तुम्ही केलेले सर्व गुंते सोडवून जा. इथे तर प्रत्येक प्रकारचे खुलासे होतात. वकील तर फक्त व्यवहारिक अडचणींवरील सल्ले देतात तरी देखील फी आकारतात! पण हा तर अमूल्य खुलासा, याचे मोलच होऊ शकत नाही ना! जीवनात खूप गुंतागुंत आहे. फक्त तुम्हालाच आहे असे नाही, सगळ्यांनाच आहे. 'द वर्ल्ड इज द पजल इट सेल्फ' हे 'जग' स्वतःच एक कोडे झाले आहे. __धर्म तर नंतर करायचा आहे, परंतु तत्पूर्वी जीवन जगण्याची कला समजून घ्या आणि लग्न करण्याआधी बाप होण्यासाठी योग्यतापत्र मिळवा. एक इंजिन आणले, त्यात पेट्रोल टाकले आणि सतत चालवत राहिलो पण हे असे मिनिंगलेस जीवन काय कामाचे? जीवन तर हेतूसहित असले पाहिजे. हे तर इंजिन चालतच राहते, चालतच राहते, असे निरर्थक चालता कामा नये. इंजिनला पट्टा जोडला तर काही दळले तरी जाईल. पण इथे तर पूर्ण आयुष्य संपत येते तरीही काही दळले जात नाही. आणि वरून पुढील जन्माचे गुन्हे (कर्म) बांधून घेतात. संपूर्ण आयुष्यच फॅक्चर झाले आहे. कशासाठी जगत आहोत याचे भानच उरलेले नाही की मी मनुष्यसार काढण्यासाठी जगत आहे! मनुष्यसार म्हणजे काय? तर म्हणे, पुढील जन्मी ज्या गतीत जायचे असेल ती गती मिळवणे किंवा मोक्षाला जायचे असेल तर मोक्षाला जाता येणे! या अशा मनुष्यसाराचे कोणाला भानच नाही, म्हणून तर निरर्थक भटकत राहतात. पण ती कला कोण शिकवणार?! आज जगाला हिताहीतचे भानच नाही, कित्येकांना संसारातील हिताहितचे भान असते, कारण कित्येकांनी ते बुद्धीच्या आधारावर ठरवलेले असते पण ते सांसारिक भान म्हटले जाते की मी संसारात कशाप्रकारे सुखी होऊ शकेल? खरे पाहिले तर हे सुद्धा 'करेक्ट' नाही. Page #18 -------------------------------------------------------------------------- ________________ जीवन जगण्याची कला 'करेक्टनेस' तर केव्हा म्हटली जाते की जेव्हा जीवन जगण्याची कला शिकला असेल. कोणी वकील झाला तरी देखील त्याला जीवन जगण्याची कला आली नाही. मग कोणी डॉक्टर झाला पण तरीही जीवन जगण्याची कला जमली नाही. तुम्ही 'आर्टिस्ट' ची कला शिकली किंवा अशीच एखादी दुसरी कुठली कला शिकली पण एवढ्याने तुम्हाला जीवन जगण्याची कला आली असे म्हणता येणार नाही. जीवन जगण्याची कला तर, एखादा मनुष्य अगदी आनंदाने चांगल्या प्रकारे जीवन जगत असेल अशा मनुष्याला आपण विचारले की तुम्ही इतक्या आनंदाने कसे काय जीवन जगता, मलाही असे काही शिकवा. मी कसे वागू की ही कला मला अवगत होईल ? यासाठी कलावंत हवा, याचा गुरु असायला हवा, पण याची तर कोणाला पर्वाच नाही. जीवन जगण्याच्या कलेची गोष्टच उडवून दिली आहे ना! आमच्याजवळ जो कोणी राहील त्याला ही कला अवगत होईल. पण तरी जगात कुणाजवळच ही कला नाही असे आपण म्हणू शकत नाही. पण जर जीवन जगण्याची कला 'कम्प्लीट' शिकलेली असेल तर लाईफ इजी ( जीवन सोपे) बनते पण तरी धर्म सुद्धा सोबत पाहिजेच. जीवन जगण्याच्या कलेत धर्म ही मुख्य वस्तू आहे. आणि धर्मात सुद्धा इतर काही नाही, मोक्षधर्माचीही गोष्ट नाही, फक्त भगवंताच्या आज्ञारुपी धर्माचे पालन करायचे. महावीर भगवंत किंवा कृष्ण भगवंत किंवा तुम्ही ज्या भगवंताला मानत असाल त्यांची आज्ञा काय सांगू इच्छिते ते समजून त्याचे पालन करा. आता सगळ्या आज्ञा पालन करू शकत नसाल तर जितक्या पाळता येईल तितक्या पाळा. आता आज्ञेत असेल की, 'ब्रम्हचर्य पाळा' आणि तुम्ही लग्न केलेत तर ते विरोधाभास म्हटले जाईल. खऱ्या अर्थाने ते तुम्हाला असे सांगत नाहीत की, तुम्ही असे विरोधाभासाने वागा. ते तर असे सांगू इच्छितात की तुला आमच्या जितक्या आज्ञा पाळता येईल तितक्या पाळ. आपणास दोन आज्ञा पाळण्याचे जमले नाही म्हणून काय बाकीच्या सर्व आज्ञा पाळणे सोडून द्यायचे ? तुम्हाला काय वाटते? समजा, दोन आज्ञा पाळता येत नाहीत पण दुसऱ्या दोन आज्ञा पाळल्या तरी खूप झाले. ३ Page #19 -------------------------------------------------------------------------- ________________ म क्लेश रहित जीवन लोकांना व्यवहार धर्म पण इतका उच्च प्रतीचा मिळाला हवा की त्यामुळे लोकांना जीवन जगण्याची कला येणे सहज शक्य होईल. जीवन जगण्याची कला येणे यालाच व्यवहारधर्म म्हटले आहे. ही कला काही तप, त्याग केल्याने येत नाही, अपचन झाले तर उपवास वगैरे जरुर करा. ज्याला जीवन जगण्याची कला जमली त्याला संपूर्ण व्यवहारधर्म समजला आणि निश्चय धर्म तर डेव्हलप होऊन आला असाल तेव्हा प्राप्त होते आणि या अक्रम मार्गात तर निश्चय धर्म ज्ञानींच्या कृपेमुळेच प्राप्त होत असते! 'ज्ञानीपुरुषां' जवळ तर अनंत ज्ञानकला असतात आणि अनंत प्रकारच्या बोधकलाही असतात! त्या कला इतक्या सुंदर असतात की त्या आपल्याला सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त करतात. समज कशी? की दुःखमय जीवन जगलो 'हे' ज्ञानच असे आहे की, जे सर्व सुलट (सरळ) करते, आणि जगातील लोक तर असे आहेत की आपण सुलट टाकले असेल तरीही त्यास उलट करतील. कारण समजच चुकीची आहे. चुकीची समज असल्यामुळे ते चुकीचे करतात, नाही तर या हिंदुस्तानात कुठेच दुःख नाही. ही जी काही दु:खं आहेत ती सर्व चुकीच्या समजुतीमुळेच आहेत आणि लोक विनाकारण सरकारला दोष देतात, देवाला दोष देतात की तुम्ही आम्हाला दुःखं देता! लोक तर फक्त दोष देण्याचेच धंदे शिकले आहेत. समजा आता जर कोणी चुकून ढेकूण मारण्याचे औषध प्यायले तर ते औषध त्याला सोडेल का? प्रश्नकर्ता : नाही सोडणार दादाश्री : का बरे? त्याने तर चुकून प्यायले होते ना? त्याने काही जाणून बुझून प्यायलेले नव्हते, मग का नाही सोडणार? प्रश्नकर्ता : नाही. औषधाचा परिणाम होणारच. दादाश्री : मग आता त्याला कोणी मारले? तर ते ढेकूण मारण्याचे Page #20 -------------------------------------------------------------------------- ________________ जीवन जगण्याची कला औषधानेच त्याला मारले, देव मारत नाही. हे दुःख देणे किंवा दुसरी एखादी गोष्ट करणे, हे असे देव करत नाही. पुद्गल (जे पुरण आणि गलन होते)च दुःख देते. हे ढेकूण मारण्याचे औषध सुद्धा पुद्गलच आहे ना? तुम्हाला याचा अनुभव होतो की नाही? या काळातील जीव पूर्वविराधक वृत्तीवाले आहेत, पूर्वविराधक म्हटले जातात. पूर्वीच्या काळातील लोक तर खाण्याचे-पिण्याचे नसले, कपडे-लत्ते नसले तरीही चालवून घेत असत आणि आता तर कशाचीच कमी नाही, सगळी रेलचेल आहे तरी पण भांडणच भांडण! त्यातही नवऱ्याला 'सेल्स टॅक्स', 'इन्कम टॅक्सच्या' कटकटी. म्हणून तिथल्या साहेबांना नवरा घाबरणार आणि घरी बाईसाहेबांना विचारले की, तुम्ही कशाला घाबरतात? तेव्हा ती म्हणेल की 'माझा नवरा खूप तापट आहे.' जीवनाला आवश्यक असणाऱ्या चार गोष्टी मिळाल्या असतील आणि तरीही ते कुरकुर करतात अशा सर्वांना मूर्ख, फुलीश म्हटले जाते. वेळेवर खायला मिळते की नाही मिळत? मग ते कसेही असो, तूप लावलेले किंवा बिन तुपाचे असो पण मिळते ना? वेळेवर चहा मिळतो की नाही? मग एकदा असो किंवा दोनदा असो, चहा मिळतो की नाही मिळत? आणि कपडे मिळतात की नाही मिळत? शर्ट-पॅन्ट, थंडीत घालण्यासाठी स्वेटर वगैरे मिळतात की नाही मिळत. राहण्यासाठी निवारा आहे की नाही? एवढ्या चार गोष्टी मिळून देखील कुरकूरत असतील अशा सगळ्यांना तुरुंगातच टाकायला हवे! एवढे असूनही एखाद्याची तक्रार असेल अशा व्यक्तीने लग्न करून घेतले पाहिजे. लग्नासंबंधी तक्रार असेल तर त्याला तुरुंगात टाकत नाही. वय झाले असेल त्याला लग्नासाठी मनाई केली जात नाही. या चार वस्तूंसोबत लग्नाचीही आवश्यकता आहे. पण लग्न करून देखील कित्येक जण लग्न मोडतात आणि नंतर एकटे राहतात आणि दु:खांना आमंत्रण देतात. झालेल्या लग्नाला मोडतात, कसली ही माणसं? या चार-पाच गोष्टी नसतील तर आपण समजू शकतो की या भाऊंना थोडीशी अडचण आहे आणि Page #21 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन यासही दुःख नाही म्हणत, अडचण म्हणतात. हे तर संपूर्ण दिवस दुःखातच घालवतात. मनुष्य दिवसभर नवनवीन तरंग (कल्पना) करत राहतो. निरनिराळे तरंग करत राहतो! एका व्यक्तीचा चेहरा थोडासा हिटलरसारखा होता. त्याचे नाक जरासे हिटलरसारखे होते. तो मनात असे मानू लागला की, आपण हिटलरसारखे आहोत! अरे वेडपट! कुठे हिटलर आणि कुठे तू? स्वतःला काय मानून बसलास? हिटलरने तर फक्त आरोळी जरी मारली तरी पूर्ण जग हादरून जायचे! आता अशा लोकांच्या कल्पनांचा अंत कसा येईल! ___म्हणजे वस्तूंची काही गरज नाही, हे तर अज्ञानतेचे दु:ख आहे. आम्ही 'स्वरूप ज्ञान' देतो त्यानंतर दुःख राहत नाही. आमच्या पाच आज्ञेत कुठे राहिले जात नाही तेवढेच तुम्ही पाहायचे! तुम्हाला खाणेपिणे सगळे वेळेच्यावेळी मिळत जाईल आणि ती पुन्हा 'व्यवस्थित शक्ती' आहे. दाढी जर आपोआप उगवते मग तसेच खाणे-पिणेही नाही का मिळणार? या दाढीची इच्छा नाही तरी पण ती वाढतेच ना! आता तुम्हाला जास्त वस्तूंची गरज नाही ना? जास्त वस्तूंचा किती त्रास होतो! तुम्हाला ‘स्वरूप ज्ञान' मिळण्यापूर्वी निरनिराळे तरंग येत होते ना? तरंगांना ओळखतात ना तुम्ही? प्रश्नकर्ता : हो, तरंग येत होते. दादाश्री : मनात निरनिराळे तरंग येतच असतात, या तरंगांना देवाने आकाश कुसुम म्हटले आहे. आकाश कुसुम कसे होते आणि कसे नव्हते? यासारखी गोष्ट आहे ! सगळेजण तरंग आणि अनंग या दोन्हीमध्येच गुंतलेले आहेत. असे सरळ थोबाडीत मारीत नाही, सरळ थोबाडीत मारणे हे पद्धतशीरचे म्हटले जाईल. पण मनातल्या मनात एकसारखे 'मी थोबाडीत मारेन, मी थोबाडीत मारेन' याप्रकारे अनंग थोबाडीत मारत राहतात. हे जग तरंगी भूतांमध्ये तडफडत राहते. असे झाले तर असे होईल आणि तसे झाले तर तसे होईल, सतत चालूच. Page #22 -------------------------------------------------------------------------- ________________ जीवन जगण्याची कला __ असा शौकची गरजच काय आहे? संपूर्ण जग अनावश्यक वस्तूंचा परिग्रह (संग्रह) करण्यामध्येच गुंतलेले आहे. 'आवश्यक वस्तूंना देवाने परिग्रह म्हटले नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्याला नेमके काय आवश्यक आहे ते ठरवायला हवे. या शरीराला मुख्यत्वे कसली गरज आहे? तर मुख्य गरज हवेची. ती तर त्याला क्षणोक्षणी हवी तेवढी मुबलक आणि मोफत मिळते. नंतर पाण्याची गरज आहे. ते पण त्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळतच राहते. त्यानंतर गरज आहे अन्नाची. भूक लागते म्हणजे काय? तर आग. ही आग विझविण्यासाठी काय हवे? तेव्हा हे लोक म्हणतात श्रीखंड आणि बासुंदीच हवी आहे! अरे नाही, जे जवळ असेल ते टाक ना आत, म्हणजे भुकेची आग विझेल. कढी खिचडी टाकली तरीही विझेल. मग सेकंडरी स्टेजवर कोणाची गरज आहे? घालायला कपडे आणि राहायला निवारा पाहिजे. जगण्यासाठी 'मानाची' गरज आहे का? नाही. पण हा तर मानासाठी हापापलेला असतो आणि त्यातच मूर्छित होऊन जगतो. हे सर्व 'ज्ञानी' पुरुषांकडून समजून घेतले पाहिजे ना? एक दिवस जर नळामधून साखर घातलेले गोड पाणी यायला लागले तर एका दिवसातच लोकांना वीट येईल, अरे! एका दिवसातच कंटाळलात? तर म्हणेल 'हो, मला तर साधे पाणीच हवे आहे' एखादी गोष्ट जेव्हा मिळेनाशी होते तेव्हाच त्या गोष्टीची किंमत कळते. लोक फॅन्टा-कोकाकोलाच्या मागे असतात. अरे तुला खरोखर कसली गरज आहे ते आधी समजून घे ना! तुला शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि रात्री खिचडी मिळाली तर शरीर काही तक्रार करणार आहे का? नाही. म्हणून खरे काय आवश्यक आहे ते प्रथम निश्चित करा. तेव्हा लोक तर एखाद्या विशिष्ट प्रकारच्या आईस्क्रीमलाच शोधत बसतील! कबीर साहेबांनी काय म्हटले आहे? _ 'तेरा वेरी कोई नही, तेरा वेरी फेल!' (तुझा शत्रू कोणीही नाही, अनावश्यक भौतिकवाद, चंगळवाद हाच तुझा शत्रू) Page #23 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन अनावश्यक वस्तूंसाठी विनाकारण पळत राहतो, यालाच 'फेल' म्हटले जाते. तू हिंदुस्तानात राहतो आणि अंघोळीला पाणी मागितले तर आम्ही त्याला 'फेल' म्हणणार नाही. " 'अपने फेल मिटा दे, फिर गली-गली में फिर. ' (अनावश्यक वस्तूंचा संग्रह सोडून दे, मग खुशाल इकडे-तिकडे फिर) या देहासाठी काय आवश्यक आहे ? शुद्ध दूध, शुद्ध तूप. पण ह्या शुद्ध वस्तू वापरणार नाहीत आणि पोटात कचरा भरत राहतील. या फेलची काय गरज? हे लोक डोक्याला काय लावतात बरे ? शाम्पू. पाण्यासारखा दिसतो पण धड साबणही नाही असे काहीतरी डोक्याला लावणार. या अतिशहाण्यांनी असे शोध लावले की जे फेल नव्हते तेही फेल झाले ! त्यामुळे अंतरिक सुख कमी झाले ! भगवंताने काय सांगितले होते की, बाह्यसुख आणि अंतरसुख यांच्यात पाच-दहा टक्क्यांचा फरक असेल तर चालेल, पण इतका नव्वद टक्क्यांचा फरक असेल तर ते चालणार नाही. एवढा मोठा फरक असेल तर ते फेलच होणार ! मरावेच लागेल. तसे याच्याने काही मरत नाही पण सहन करावे लागते. अनावश्यक गोष्टींच्या ज्या गरजा वाढवल्या आहेत त्या तर फक्त फेलच आहेत. एक तास बाजार बंद झाला तरी लोक अस्वस्थ होतात ! अरे, तुला असे काय हवे आहे की ज्यामुळे तुला एवढी बैचेनी होत आहे ? तर म्हणे, मला आईस्क्रीम हवे आहे, सिगारेट हवी आहे! म्हणजे हे तर फेलच (अनावश्यक गोष्टीच ) वाढविल्या ना? आत सुख नाही म्हणून लोक बाहेर शोधत राहतात. लोकांच्या आत जे अंतरिक सुख शिल्लक होते तेही आज संपून गेले आहे. अंतरसुखाचा बॅलेन्स संपवू नका. वाटेल तशी उधळपट्टी करून जवळ शिल्लक असलेले वापरून टाकले. तेव्हा मग अंतरिक सुखाचे संतुलन कसे राहील? अस्सल जगणे चांगले की नक्कल करणे चांगले ? आजकालची मुले एकमेकांची नक्कल करतात पण आपल्याला याची काय गरज? हे फॉरेनचे लोक आपली नक्कल Page #24 -------------------------------------------------------------------------- ________________ जीवन जगण्याची कला करतात पण इथे थोडेसे विदेशी 'हिप्पी' लोक काय आले तर लगेच लोकांनी त्यांची नक्कल सुरु केली! याला काय जगणे म्हणायचे? 'गुळ मिळत नाही, साखर मिळत नाही' यासाठी लोक आरडाओरडा करतात. खाण्याच्या वस्तूंसाठी एवढा आरडाओरडा का करावा? खाण्याच्या वस्तू तर तुच्छ् अगदी (साध्या) गोष्टी आहेत. पोट आहे म्हटल्यावर खाण्याचे मिळेलच. दात आहेत तेवढे अन्नाचे घास तर मिळतीलच. दात पण किती प्रकारचे आहेत! चिरण्याचे, फाडण्याचे, चावण्याचे, सगळे वेगवेगळे. हे डोळे, किती छान आहेत? करोड रुपये दिले तरी असे डोळे मिळतील का? नाही मिळणार. अरे, लाखो रुपये असतील तरी देखील हा दुर्दैवी म्हणेल की, 'मी दुःखी आहे.' स्वतःजवळ एवढ्या किमती वस्तू आहेत तरीही त्याची किंमत (महत्त्व) समजत नाही. फक्त डोळ्यांची किंमत समजून घे तरी तुला कळेल की तू किती सुखी आहेस.हे दात सुद्धा कधी ना कधी पडणारच आहेत, पण हल्ली तर कृत्रिम दात बसवून त्यांना पहिल्यासारखे बनवतात, पण ते काय चांगले दिसतात? भुतासारखे दिसतात. निसर्गाला पुन्हा नवीन दात द्यायचे असते तर दिले नसते का? लहान मुलांना नवीन दात देतोच ना? __ या शरीराला गहू खाऊ घाला, डाळ खाऊ घाला, तरीही शेवटी तिरडीच! सर्वांचीच तिरडी निघते! शेवटी तर तिरडीच निघणार आहे. तिरडी म्हणजे निसर्गाची जप्ती. सगळे काही इथेच टाकून जायचे, आणि सोबत काय घेऊन जायचे? तर घरातल्यांसोबतची, गिहाईकांसोबतची, व्यापाऱ्यांसोबतची गुंतागुंत! भगवंताने तर बजावून सांगितले आहे की, 'अरे मानवा! तू समज, समज, समज. पुन्हा मनुष्य जन्म मिळणे महादुर्लभ आहे.' या आजकालच्या काळात जीवन जगण्याची कला उरलीच नाही. मोक्षाचा मार्ग तर सोडा पण आनंदाने जीवन जगता तर यायला हवे ना? हित कशात? हे निश्चित करावे लागते आमच्याजवळ तर व्यवहार जागृती निरंतर असते! माझ्याकडून Page #25 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन कुठलीच घड्याळाची कंपनी, रेडियोची कंपनी पैसे घेऊन गेलेली नाही. आम्ही अशा गोष्टी खरेदीच केल्या नाही. या सगळ्या गोष्टींचा उपयोगच काय? निरर्थक गोष्टी आहेत. ज्या घड्याळाने मला त्रास दिला, ज्याला बघताच धास्ती वाटते, त्या घड्याळाचा काय उपयोग? काही मुलांना वडील दिसताचक्षणी अस्वस्थ व्हायला होते. तो अभ्यास करीत नसेल, पुस्तक एका बाजूला ठेवून खेळत असेल आणि अचानक त्याला वडील दिसले तर त्याला वडिलांची भीती वाटते, चीड यायला लागते. तसेच घड्याळाकडे बघून घाबरायला होत असेल तर नको ते घड्याळ. आणि हे रेडियो, टीव्ही वगैरे हे सर्व तर प्रत्यक्ष वेडेपणा आहे, प्रत्यक्ष 'मॅडनेस' आहे. प्रश्नकर्ता : रेडियो तर घरोघरी आहेत. दादाश्री : ती वेगळी गोष्ट आहे. जिथे ज्ञानच नाही मग तिथे काय होणार? यालाच मोह म्हणतात ना? मोह म्हणजे काय? गरज नसलेल्या वस्तू आणणे आणि गरज असलेल्या वस्तूंमध्ये चालढकल करणे म्हणजे मोह. हे कसे आहे ते सांगतो. कोणी साखरेच्या पाकात कांदा बुडवून दिला तर तो घेऊन येतो. अरे, तुला कांदा खायचा आहे की पाक खायचा आहे, हे आधी ठरव. कांदा म्हणजे फक्त कांदाच खायला पाहिजे. नाही तर कांदा खाण्याचा फायदाच काय? हाच सगळा मूर्खपणा आहे ? स्वतःचा निर्णय नाही, समज नाही आणि कसले भानही नाही! एखाद्याला साखरेच्या पाकात कांदा बुडवून खाताना पाहिले असेल म्हणून स्वतःही खातो! कांदा अशी वस्तू आहे की त्यास साखरेच्या पाकात टाकले म्हणजे तो वाया जातो. म्हणजेच लोक बिलकुल अडाणी आहेत. कोणत्याच गोष्टीचे भानच नाही. निव्वळ बेभानपणा आहे. स्वतःविषयी मनात बाळगतो की, 'मी विशेष आहे' आणि आपण त्याला तू विशेष नाहीस असे कसे म्हणू शकतो? हे आदिवासी लोक सुद्धा स्वत:ला 'विशेष' समजतात . कारण त्याला असे वाटते की, मी तर या दोन गायी आणि या दोन बैलांचा उपरी (मालक) आहे! आणि नाही तरी तो या चार Page #26 -------------------------------------------------------------------------- ________________ जीवन जगण्याची कला जणांचा मालकच म्हटला जातो ना ? मनात येईल तेव्हा तो त्यांना मारू शकतो, तो अधिकार आहे त्याला. आणि जरी कोणाचा मालक नसला तरी शेवटी बायकोचा मालक तर असतोच. जिथे विवेकबुद्धी नाही, चांगले-वाईट, योग्य-अयोग्य याचा सारासारचे विचार करण्याची शक्तीच नाही, त्याला आपण काय सांगणार ? मोक्षाची गोष्ट तर जाऊ द्या, पण संसारिक हिताहीतचे सुद्धा भान नाही. ११ संसारात काय सांगितले आहे की, रेशमी चादर फुकट मिळत असेल तरी ती आणून अंथरू नका आणि कॉटनची चादर विकत जरी मिळत असेल तरी ती आणा. आता तुम्ही विचारले यात काय फायदा ? तर म्हणे, अशी फुकट आणण्याची सवय लागली असेल आणि मग जेव्हा फुकट मिळत नाही तेव्हा खूप त्रास होतो. म्हणून अशीच सवय ठेवा की नेहमी मिळू शकेल. म्हणून कॉटनची चादरच विकत आणा. नाही तर एकदाची जर फुकट आणण्याची सवय पडली तर हाल होतील. हे संपूर्ण जगच असे झाले आहे की, उपयोग नावापुरता सुद्धा नाही. मोठमोठ्या आचार्य महाराजांना सांगितले की, 'साहेब तुम्ही आज या चार गाद्यांवर झोपा.' तर त्यांना महाउपाधी वाटेल, रात्रभर झोपच लागणार नाही ! कारण त्यांना चटईवर झोपायची सवय झाली आहे ना! त्यांना चटईवर झोपायची सवय झालेली आहे तर काहींना चार-चार गाद्यांशिवाय झोप लागत नाही. देवाला तर दोन्ही गोष्टी मान्य नाहीत. साधू लोकांचे तप आणि गृहस्थाचे विलासी जीवन या दोन्ही गोष्टी देवाला मंजूर नाहीत. देव तर म्हणतो की जर तुमचे उपयोगपूर्वक (ज्ञान जागृतीपूर्वक) असेल तर ते खरे. उपयोगपूर्वक नसेल आणि अशीच सवय लावून घेतली असेल तर निरर्थक म्हटले जाईल. या सर्व गोष्टी समजून घ्याव्यात की या वाटेने गेलो तर असे होईल आणि त्या वाटेने गेलो तर तसे होईल. नंतर (आपण ) ठरवायचे की आपल्याला कोणत्या वाटेने जायचे आहे. समजत नसेल तर दादांना विचारायचे, मग 'दादा' तुम्हाला सांगतिल की हे तीन रस्ते धोकादायक Page #27 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन आहेत आणि हा चौथा रस्ता सुरक्षित आहे. म्हणून आमचा आशीर्वाद घेऊन त्या रस्त्याने जा. आणि अशा व्यवस्थेमुळे सुख लाभते एक व्यक्ती मला म्हणाली की, मला काही समजतच नाही. मला काहीतरी आशीर्वाद द्या. तेव्हा त्याच्या डोक्यावर हात ठेवून मी म्हणालो, 'जा, आजपासून तू सुखाचे दुकान उघड.' आणि आज तुझ्याजवळ जे दुकान आहे ते रिकामे कर.' सुखाचे दुकान म्हणजे काय? सकाळी उठल्यापासून दुसऱ्यांना सुख द्यायचे. दुसरा कुठलाच व्यापार करायचा नाही. त्या माणसाला माझी गोष्ट एकदम नीट समजली. त्याने तर त्याप्रमाणे वागायला सुरुवात केली. म्हणून त्याला खूप आनंद झाला. जेव्हा तुम्ही सुखाचे दुकान उघडाल तेव्हा तुमच्याही वाट्याला सुख येईल आणि इतरांच्याही वाट्याला सुखच येईल. जर तुमचे मिठाईचे दुकान असेल तर जिलबी विकत घेण्यासाठी दुसऱ्यांच्या दुकानात जाण्याची गरज पडेल का? जेव्हा खावीशी वाटली तेव्हा खाऊ शकाल. दुकानच मिठाईचे असेल मग काय? म्हणून तू सुखाचेच दुकान उघड. म्हणजे मग कसली उपाधीच नाही. ___तुम्हाला जे दुकान उघडायचे असेल ते उघडू शकता. जर दररोजसाठी उघडू शकत नसाल तर आठवड्यातून एक दिवस रविवारच्या दिवशी तरी उघडा! आज रविवार आहे, 'दादांनी' सांगितले आहे की सुखाचे दुकान उघड म्हणून.' तुम्हाला सुख घेणारे गिहाईक भेटतीलच. 'व्यवस्थितशक्ती' चा नियमच असा आहे की गिहाईक गोळा करूनच देईल. तू जसे नक्की केले असेल त्यानुसार गिहाईक पाठवून देते. ___ज्याला जे आवडत असेल त्याने त्याचे दुकान टाकावे. कित्येक तर लोकांना डिवचत राहतात. त्यातून त्यांना काय मिळते? एखाद्याला मिठाईची आवड असेल तर तो कसले दुकान टाकेल? मिठाईचेच ना. लोकांना कशाची आवड आहे ? तर सुखाची. म्हणून सुखाचेच दुकान Page #28 -------------------------------------------------------------------------- ________________ जीवन जगण्याची कला टाक, ज्यामुळे लोकांनाही सुख मिळेल आणि घरच्या लोकांना पण सुख मिळू शकेल. खा, प्या आणि मजा करा. येणाऱ्या (भविष्यातील) दुःखांचे फोटो पाडू नका. फक्त नावच ऐकले असेल की मगनभाई येणार आहेत. अजून तर आलेही नाहीत, फक्त पत्रच आले आहे तेव्हापासूनच त्याचे फोटो पाडण्याची (कल्पना करण्याची) सुरुवात होऊन जाते. हे ' दादा' तर — ज्ञानी पुरुष ' त्यांचे दुकान कसे चालत असेल? संपूर्ण दिवस! या 'दादांचे' तर सुखाचे दुकान. मग त्यात कोणी दगड फेकला असेल तरीही त्याला गुलाबजाम खाऊ घालतील. समोरच्याला थोडेच माहीत आहे की, हे सुखाचे दुकान आहे म्हणून इथे दगड मारू नये? त्यामुळे त्याच्या मनात येईल तिथे तो दगड मारतो. 'आपल्याला कुणालाही दुःख द्यायचे नाही' असे निश्चित केले तरी दुःख देणारा तर दुःख देऊनच जाईल ना? तेव्हा तू काय करशील? बघ, मी तुला एक युक्ती सांगतो. आठवड्यातून एक दिवस तू 'पोस्ट ऑफिस' बंद ठेवायचे. त्या दिवशी कोणाचीही मनीऑर्डर स्वीकारायची नाही आणि कुणाला मनीऑर्डर करायची पण नाही. जर कोणाची मनीऑर्डर आली तर बाजूला ठेवायची आणि सांगायचे की, आज पोस्ट ऑफिस बंद आहे, उद्या बोलूया. आमचे पोस्ट ऑफिस तर कायम बंदच असते. या दिवाळीच्या दिवशी लोक का चांगले वागतात? कारण त्यांची बिलिफ (मान्यता) बदलते म्हणून. ते नक्की करतात की आज दिवाळी आहे आणि आजचा दिवस आनंदात घालवायचा आहे असे निश्चत करतात म्हणून त्यांची बिलिफ बदलते त्यामुळे ते आनंदात राहतात. 'आपण' मालक आहोत म्हणून आपण ठरवू शकतो. समजा तू निश्चित केले की आज मला सगळ्यांशी चांगलेच वागायचे आहे तर तू निश्चितच चांगले वागू शकशील. आठवड्यातून एक दिवस आपण नियमात राहायचे. एक दिवस पोस्ट ऑफिस बंद ठेवायचे. मग खुशाल लोक ओरडू देत की आज पोस्ट ऑफिस बंद का? Page #29 -------------------------------------------------------------------------- ________________ १४ क्लेश रहित जीवन वैरभाव मिटेल आणि आनंदही वाटेल या जगातील कोणत्याही जीवाला किंचितमात्रही दुःख न देण्याची भावना असेल, तर तीच खरी कमाई. दररोज सकाळी अशी भावना करावी. कोणी शिवी दिली, तुम्हाला ते आवडत नसेल तरी पण ती जमा करा, तपास करण्यास जाऊ नका की मी कधी बरे शिवी दिली होती ? आपण लगेच ती जमा करावी म्हणजे हिशोब पूर्ण होईल. लोक तर काय करतात की समोरच्याने एक शिवी दिली तर त्याला चार शिव्या ऐकवतात ! देवाने काय म्हटले आहे की, जे तुला आवडते ते दुसऱ्यास दे आणि जे आवडत नाही ते दुसऱ्यासही देऊ नकोस. एखादा मनुष्य म्हणाला की 'तुम्ही खूप चांगले आहात' तेव्हा आपण सुद्धा म्हणायचे की, भाऊ साहेब, तुम्ही पण खूप चांगले आहात.' अशा चांगल्या गोष्टी उधार दिल्या तर चालतील. 4 हा संसार हिशोब चुकते करण्याचा कारखाना आहे. वैरभावनेचा बदला तर कधी सासूच्या रुपात, सुनेच्या रुपात, मुलाच्या रुपात, शेवटी बैलाच्या रुपात का होईना पण चुकवावाच लागेल. जसे बाराशे रुपये देऊन बैल विकत घेतला आणि दुसऱ्याच दिवशी तो बैल मेला ! जग हे असे आहे!! अनंत जन्म वैरभावनेतच गेले! हे जग वैरभावानेच टिकून राहिले आहे! हे हिंदू लोक घरातल्या लोकांशी वैर बांधतात आणि या मुस्लिमांच्या बाबतीत पाहिले तर ते कधी घरातल्या लोकांशी वैर बांधत नाहीत. बाहेरच्या लोकांशी भांडण करून येतील. ते तर ओळखतात की ज्यांच्यासोबत रात्रंदिवस याच खोलीत एकत्र राहायचे आहे मग त्यांच्यासोबत भांडण करून कसे चालेल ? खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची कला काय आहे की, ‘संसारात कुणाशीही वैर न बांधता सुटून जाणे.' हे साधू संन्याशी सुद्धा संसारातून पळूनच जातात ना ? पळून जाण्यात अर्थ नाही. ही जीवनाची लढाई आहे. जन्मापासूनच लढाई चालू ! तिथे लोक मौजमजेच्या मागेच लागले आहेत. Page #30 -------------------------------------------------------------------------- ________________ जीवन जगण्याची कला घरातील सर्वांशी, शेजाऱ्यांशी, ऑफिसमध्ये सगळ्यांशीच समभावे निकाल करायचा. समजा ताटात जर नावडते जेवण आले तरी ते चिडचिड न करता समभावे त्याचा निकाल करा. कोणाला त्रास न देता, जे ताटात येईल ते निमूटपणे खाऊन घ्यावे. जे काही घडते तो संयोग आहे आणि भगवंताने सांगितले आहे की, जर तू संयोगाला धक्का मारशील तर शेवटी तो धक्का तुलाच लागेल ! म्हणून आमच्या ताटात नावडणारे पदार्थ जरी वाढले असतील तरी आम्ही त्यातले दोन पदार्थ खातोच. कारण नाही खाल्ले तर दोघांशीही भांडण केल्यासारखे होईल. एक म्हणजे ज्याने बनवून वाढले त्याच्याशी, त्याचा तिरस्कार होईल त्याला दुःख होईल. आणि दुसरे म्हणजे खाण्याच्या पदार्थाशी (अन्नाशी), ते ताटातील अन्न म्हणेल की मी काय गुन्हा केला ? मी तुझ्याजवळ आलो तर तू माझा अपमान का करतोस? तुला जेवढे जमेल तेवढे खा पण माझा अपमान करू नकोस. तेव्हा आपण अन्नाचा मान राखायला नको का ? आम्हाला नावडते मिळाले तरी आम्ही त्याचा मान राखतो. कारण काहीही सहजासहजी मिळत नसते आणि मिळते तेव्हा योग्य आदर केलाच पाहिजे. कोणी काही खायला दिले त्यास आपण जर नावे ठेवली तर सुख वाढेल का कमी होईल ? १५ प्रश्नकर्ता : कमी होईल. दादाश्री : ज्यामुळे सुख कमी होते असा व्यापार तर करणार नाही ना? सुख कमी होईल असा कुठलाच आपण व्यापार करता कामा नये. माझ्या ताटात पुष्कळ वेळा नावडत्या भाज्या असल्या तरीही मी त्या खातो आणि उलट म्हणतो आजची भाजी खूप छान झाली आहे. प्रश्नकर्ता : यास मनधरणी केली असे नाही का म्हटले जाणार ? आवडत नसेल तरीही आवडते असे म्हणणे म्हणजे मनाची खोटी समजूत घालणे नाही का ? दादाश्री : असे बिल्कुल नाही. एकतर आवडते म्हटले की ती Page #31 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन भाजी आपल्याकडून खाल्ली जाईल आणि आवडत नाही म्हटल्यावर भाजीला आणि भाजी बनवणारीला राग येईल. त्याचबरोबर घरातील मुलांना काय वाटेल की यांची नेहमीचीच कटकट, कायम असेच करत असतात. म्हणजे घरातली मुलेही आपली अब्रू (!)पाहतात. ___ आमच्या घरी दादांना काय आवडते आणि काय आवडत नाही हे कुणालाच माहित नाही. स्वयंपाक बनवणे हे काय बनवणाऱ्याच्या हाताचा खेळ आहे ? ते तर खाणाऱ्याच्या 'व्यवस्थित' च्या हिशोबानुसार ताटात येते. त्यात उगीच लुडबुड कशाला करायची? इतकी चैन, तरी उपभोगत नाही जेव्हा आपण हॉटेलमध्ये खातो तेव्हा पोट बिघडते, पोटात मुरड पडते. वारंवार हॉटेलमध्ये खाल्यावर हळूहळू आम एकत्र होतो आणि एकीकडे जमा होतो. नंतर जेव्हा त्याचा परिपाक होतो तेव्हा पोटात मुरड पडते आणि पोट पिळून निघते. मुरड पडते ना, तो तर कित्येक वर्षानंतर परिपाक होत असतो. जेव्हा मला असा अनुभव आला तेव्हापासून मी सगळ्यांना हेच सांगतो की, हॉटेलचे खाणे टाळा. एकदा आम्ही मिठाईच्या दुकानात गेलो होतो. त्या मिठाई बनवणाऱ्याच्या अंगातून घाम गळत होता, कचरा पडत होता! आजकाल तर घरात जेवण बनवतात तेही शुद्ध-स्वच्छ नसते. कणिक मळतात तेव्हा हात नीट धुतलेले नसतात. नखात मळ भरलेला असतो. आजकाल नखे कापत नाहीत ना? इथे कित्येक असे येतात ज्यांची लांब नखे असतात त्यांना मला सांगावे लागते की, ताई यात तुमचा काही फायदा आहे का? फायदा असेल तर मग असू द्या. तुम्हाला ड्रॉइंगचे काम करायचे असेल तर मग लांब नखे राहू द्या. तेव्हा त्या म्हणतात की असे काही नाही. उद्या नखे कापून येते. या लोकांना काही सेन्सच (समजच) नाही. नखे वाढवतात, आणि कानाला रेडीयो लावून फिरतात! स्वत:चे सुख कशात आहे याचे भान नाही, आणि स्वत:चे भान तरी कुठे आहे? लोकांकडून जितके मिळाले तितकेच भान त्यांना असते. Page #32 -------------------------------------------------------------------------- ________________ जीवन जगण्याची कला बाहेर उपभोगण्यासाठी कितीतरी एषआरामाच्या गोष्टी आहेत! या लाख रुपयांच्या डबलडेकर बसमध्ये आपण आरामात बसून इथून चर्चगेटपर्यंत जाऊ शकतो. शिवाय त्यातल्या गाद्या तर किती मऊ! आपल्या घरी पण इतक्या सुंदर गाद्या नसतात! आता इतके चांगले पुण्यकर्म आहे तरी पण उपभोगता येत नाही. नाही तर हिंदुस्तानातील लोकांच्या नशिबात लाख रुपयांची बस कुठून येणार? जेव्हा या मोटारीतून जातात तेव्हा धूळ उडते का? नाही. रस्त्यावर धूळच नसते. चालतात तरी पायाला धूळ लागत नाही, अरे पूर्वी बादशाहांच्या काळातही धुळीचे रस्ते होते. ते बाहेरून येत असत तेव्हा धुळीने माखलेले असत! आणि आजकालच्या पिढीला तर बादशाहपेक्षाही जास्त सुखसुविधा आहे पण उपभोगताच येत नाही ना. छान बसमध्ये बसला असेल तरी डोक्यात दुसरेच चक्कर चालू असते! संसार सहजपणे चालतो, तिथे... खरे म्हणजे दु:ख नसतेच आणि जे आहे ते अज्ञानतेचेच दुःख आहे. या जगात किती जीव आहेत? असंख्य जीव आहेत! पण कोणाचीही तक्रार नाही की आमच्याकडे दुष्काळ पडला आहे म्हणून! आणि हे मूर्ख लोक प्रत्येक वर्षी तक्रार करीत राहतात! या समुद्रात कोणी प्राणी उपासमारीने मेला असे घडते का कधी? हे कावळे वगैरे उपासमारीने मरतात का? नाही. ते उपासमारीमुळे मरत नाहीत. ते कुठे टक्कर झाल्याने, एक्सिडन्ट झाल्याने किंवा आयुष्यकर्म पूर्ण झाले असेल तर मरतात. कोणी कावळा दुःखी दिसला का? उपासमारीने कृश झालेला दुबळा कावळा तुम्ही पाहिला आहे का कधी? मग या कुत्र्यांना झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात? ते तर आरामशीर कुठेही झोपतात. फक्त हा करंटा मनुष्यप्राणीच झोपेच्या वीस वीस गोळ्या खातो. झोप तर निसर्गाची देणगी आहे. झोपेत तर खूप आनंद वाटतो! हे डॉक्टर तर बेशुद्ध होण्याच्या गोळ्या देतात. गोळ्या खाऊन बेशुद्ध होणे हे दारू पिण्यासारखेच आहे. Page #33 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन ब्लडप्रेशर झालेला कावळा पाहिला का तुम्ही? एक हा मनुष्य नावाचा प्राणीच फक्त दुःखी आहे. फक्त मनुष्यालाच कॉलेजची गरज आहे. या चिमण्या किती सुंदर घरटी बांधतात, त्यांना कोणी शिकवले? संसार चालविणे आपोआपच येते. हो, फक्त स्वरूपज्ञान प्राप्तकरण्यासाठीच पुरुषार्थ करण्याची गरज आहे. संसार चालविण्यासाठी कसलीच गरज नाही. मनुष्यच फक्त अतिशहाणा आहे. या पशु-पक्ष्यांना काय बायकामुले नसतात? त्यांना लग्न लावायला लागते का? फक्त माणसांनाच जणू बायका-मुले असतात. मनुष्यच लग्न लावण्याच्या मागे लागलेले आहेत, पैसे कमवण्याच्या मागे लागले आहेत. अरे! आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी मेहनत कर ना! इतर कशाच्याही मागे मेहनत-मजुरी करण्यासारखे नाही. आत्तापर्यंत जे काही केले ते दुःख साजरी करण्यासारखेच केले. या मुलांना चोरी करायचे कोण शिकवते? हे सगळे बीजरूपाने त्यांना मिळालेले आहे. या कडूनिंबाचे प्रत्येक पान कडू का आहे? कारण त्याच्या बीजातच कडवटपणा आहे. फक्त हा मनुष्यच सदैव दुःखी असतो; पण त्यात त्याचा दोष नाही. कारण चौथ्या आऱ्यापर्यंत सुख होते आणि हा तर पाचवा आरा (कालचक्राचा बारावा भाग) आहे. या आयचे नावच आहे दुषमकाळ ! म्हणून प्रचंड दुःख सोसून देखील समता उत्पन्न होत नाही. या काळाचे नावच दुषम. मग या दुषमकाळात सुषमकाळ शोधणे हे चुकीचे नाही का? Page #34 -------------------------------------------------------------------------- ________________ [२] योग उपयोग परोपकारासाठी जीवनात हीच दोन कार्ये महत्त्वाची मनुष्यजन्म कशासाठी आहे? स्वत:वर असलेले हे कायमचे बंधन तोडण्यासाठी आहे. 'एब्सोल्युट' होण्यासाठी आहे. आणि हे 'एब्सोल्युट' होण्याचे ज्ञान जर तुला प्राप्त झाले नाही तर तू दुसऱ्यांसाठी जगणे शिक. या दोनच गोष्टी करण्यासाठी हिंदुस्तानात जन्म झाला आहे; पण ही दोन कामे लोक करतात का? लोकांनी तर भेसळ करून मनुष्यजातीतून जनावरगतीत जाण्याची कला शोधून काढली आहे ! ___ परोपकाराने पुण्याचे उपार्जन जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत केवळ पुण्यच मित्रासारखे काम करते आणि पाप हे शत्रूसारखे काम करते. तर आता तुम्हाला शत्रू हवा आहे की मित्र हवा आहे ? हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवायचे. तसेच मित्राचे संयोग कशाने जुळतील ते विचारा आणि शत्रूचे संयोग कशाने टळेल ते पण विचारा. जर शत्रू पसंत असेल तर तो कसा मिळवावा असे विचारलेत, तर त्यास आम्ही सांगू की वाटेल तेवढे कर्ज करून तूप पी, कुठेही भटक आणि जमेल तेवढी मौजमजा कर, मग पुढे काय होईल ते नंतर बघू आणि पुण्यरुपी मित्र हवा असेल तर आम्ही सांगू, की या झाडापासून काही शिक. कोणतेही झाड स्वत:चे फळ स्वतः खाते का? किंवा कोणतेही गुलाबाचे रोप स्वत:चे फूल स्वतः खाऊन टाकत असेल का? थोडे तरी खात असेल ना? जेव्हा आपण तिथे नसू, तेव्हा रात्री खात असेल, नाही का? खाते की नाही? Page #35 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन प्रश्नकर्ता : नाही खात. दादाश्री : ही झाडे-झुडपे ती तर मनुष्यांना फळ देण्यासाठी मनुष्यांच्या सेवेत आहेत. आता त्यात झाडांना काय मिळते? तर त्यांची ऊर्ध्वगती होत असते आणि त्यांची मदत घेऊन माणसं पुढे विकास करतात! समजा, तुम्ही एक आंबा खाल्ला, त्यात त्या आंब्याच्या झाडाचे काय गेले? आणि तुम्हाला काय मिळाले? तुम्ही आंबा खाल्ला म्हणून तुम्हाला आनंद मिळाला. त्यामुळे तुमची जी वृत्ती बदलली, तिची किंमत अध्यात्म्यात शंभर रुपये मिळवल्यासारखी आहे. झाडाचा आंबा खाल्लात म्हणून त्यातले पाच टक्के तुमच्या वाट्यातून त्या आंब्याच्या झाडाला जातील आणि पंच्याण्णव टक्के तुमच्या वाट्याला येतील. म्हणजे ते झाड तुमच्या वाट्यातील पाच टक्के घेतात आणि बिचारे ऊर्ध्वगतीला जातात आणि तुमची पण अधोगती होत नाही, तुम्ही पण पुढे जाता. म्हणून ही झाडे म्हणतात 'आमचे सगळेकाही तुम्ही उपभोगा, प्रत्येक प्रकारची फळे-फूले उपभोगा.' __म्हणून जर हा संसार तुम्हाला आवडत असेल, पसंत असेल, संसारिक वस्तूंची इच्छा असेल, सांसारिक विषयांचीच ओढ असेल तर फक्त एवढेच करा 'योग, उपयोग आणि परोपकारय' योग म्हणजे मन-वचन-काया यांचा योग आणि उपयोग म्हणजे बुद्धीचा उपयोग करणे मनाचा उपयोग करणे, चित्ताचा उपयोग करणे. या सगळ्यांचा दुसऱ्यांसाठी उपयोग करणे. समजा दुसऱ्यांसाठी खर्च नाही केला तरी आपले लोक शेवटी घरच्यांसाठी तरी वापरतातच ना! या कुत्रीला कशामुळे खायला मिळते? कारण त्या पिल्लांच्या आत भगवंत विराजमान आहेत आणि त्या पिल्लांची ती सेवा करते त्यामुळे तिला सर्व काही मिळते. या आधारावरच सगळा संसार चालत आहे. या झाडांना जेवण कुठून मिळते? या झाडांनी काही पुरुषार्थ केला आहे ? ते तर बिलकूल 'इमोशनल' नाहीत. 'इमोशनल' होतात का कधी? ते कधीही मागे-पुढे होत नाहीत. Page #36 -------------------------------------------------------------------------- ________________ योग उपयोग परोपकारासाठी त्यांना कधी असे वाटतच नाही की चला एका मैलावर विश्वामित्री नदी आहे, मग तिथे जाऊन पाणी पिऊन येऊ. २१ परोपकाराच्या परिणामाने लाभच प्रश्नकर्ता : या संसारात सत्कृत्ये कशाला म्हणावी ? त्याची व्याख्या देता येईल का ? दादाश्री : हो, चांगली कृत्ये तर सगळी झाडे पण करतात आणि ती अगदी चांगली कृत्येच करतात पण ते स्वतः कर्ता भावात नसतात. या झाडांमध्ये जीव असतो. ती सर्व स्वतःची फळे दुसऱ्यांना देतात. तुम्ही पण तुमची फळे दुसऱ्यांना देऊन टाका, तुम्हाला तुमची फळे मिळत राहतील. तुम्हाला जी फळे उत्पन्न होतात, शारीरिक फळे, मानसिक फळे वाचिक फळे ती सर्व लोकांना मोफत देत राहा. तर तुम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळत राहील. तुमच्या जीवन उपयोगी गरजांमध्ये किंचित देखील अडचण येणार नाही. मात्र जेव्हा ती फळे तुम्ही स्वतःच खाऊन घ्याल तेव्हा अडचण येईल. जर आंब्याच्या झाडाने स्वत:ची फळे स्वत:च खाल्ली तर झाडाचा मालक काय करेल ? तो ते झाड कापूनच टाकेल ना? लोक अशीच स्वतःची फळे स्वतःच खातात. इतकेच नाही तर वरून 'फी' सुद्धा मागतात! एक अर्ज लिहायचे बावीस रुपये मागतात ! ज्या देशात ‘फ्री ऑफ कॉस्ट' (मोफत) वकिली करत होते, इतकेच नाही तर आपल्या घरी नेऊन जेवायला घालून वकिली करत तिथे आता ही परिस्थिती झाली आहे. जर गावामध्ये भांडण झाले असेल तर नगरशेठ (सरपंच) त्या दोन्ही भांडणाऱ्यांना म्हणायचा 'चंदुलाल भाऊ, आज साडे दहा वाजता तुम्ही आमच्या घरी या आणि नगिनदास भाऊ, तुम्ही पण साडे दहा वाजता या.' आणि नगिनदासच्या ऐवजी कोणी मजूर असेल किंवा कोणी शेतकरी असेल की जे भांडत असतील त्यांना घरी यायला सांगायचा. दोघांना आपल्या शेजारी बसवून त्यांचात तडजोड करून दोघांना सहमत करायचा. ज्याचे पैसे चुकवायचे असतील त्याला थोडी Page #37 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन रोख रक्कम देऊन बाकीचे पैसे हफ्त्याने मिळतील अशी व्यवस्था करायचा. आणि मग दोघांना म्हणायचा (मिटले ना भांडण) चला आता माझ्याबरोबर जेवायला बसा. दोघांना जेवायला घालून मग घरी पाठवायचा; आहेत का आता असे वकील? म्हणून जरा समजा, आणि काळानुसार वागा. जर तुम्ही स्वतःचा उपयोग स्वतःसाठी करत राहिलात तर मृत्यूच्यावेळी दु:खाखेरीज काहीही मिळणार नाही. प्राण निघणार नाही! आणि बंगला, गाडी सोडून जायची इच्छा होणार नाही! जर हे आयुष्य परोपकारासाठी घालविले तर तुम्हाला काहीही कमी पडणार नाही, कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होतील. आणि विनाकारण उड्या मारत राहिलात तर एकही इच्छा पूर्ण होणार नाही. कारण ती पध्दत तुम्हाला अस्वस्थ करून झोप येऊ देणार नाही. या शेठ लोकांना झोपच लागत नाही, तीन-तीन, चार-चार दिवस झोप लागत नाही. कारण त्यांनी ज्याची त्याची लुटमारच केली आहे. प्रश्नकर्ता : परोपकारी मनुष्याने लोकांच्या भल्यासाठी जरी सांगितले तरी लोक ते ऐकायला तयारच नसतात, अशा वेळी काय करायचे? दादाश्री : असे आहे, की परोपकार करणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीची समज (अक्कल) बघत असेल तर ती वकिली म्हटली जाईल. म्हणून समोरच्याला किती समज आहे ते बघायचे नसते. हे आंब्याचे झाड आंबे देते. मग ते झाड स्वत:चे किती आंबे खात असेल? प्रश्नकर्ता : एकही नाही. दादाश्री : मग ते सारे आंबे कोणासाठी आहेत? प्रश्नकर्ता : दुसऱ्यांसाठी दादाश्री : हं...मग ते आंब्याचे झाड असे बघते का की, हे आंबे Page #38 -------------------------------------------------------------------------- ________________ योग उपयोग परोपकारासाठी खाणारे चांगले आहेत की वाईट आहते म्हणून? जो येईल आणि घेऊन जाईल त्याचे ते आंबे, माझे नाही. परोपकारी जीवन तर ते झाड जगत आहे. __ प्रश्नकर्ता : पण जो अपकार करतो, त्यालाच जर दोष देत असतील, तरीही उपकार करावेत का? दादाश्री : हो, तेच तर पाहायचे आहे. अपकार करणाऱ्यावर (कृतघ्न व्यक्तीवर) जो उपकार करतो तोच खरा माणूस. अशी समज लोक कुठून आणतील? अशी समज जर आली तर तुमचे कामच (कल्याणच) झाले! परोपकारी असणे ही खूप मोठी उच्च स्थिती आहे, हेच साऱ्या मनुष्य जीवनाचे ध्येय आहे. आणि हिंदुस्तानात दुसरे ध्येय, अंतिम ध्येय मोक्षप्राप्तीचे आहे. प्रश्नकर्ता : परोपकाराबरोबर 'इगोईजम' असतो का? दादाश्री : परोपकार करतो त्याचा अहंकार नॉर्मलच असतो, वास्तविक 'इगोईजम' असतो. पण जो कोर्टात दिडशे रुपये घेऊन दुसऱ्याचे काम करत असेल त्याचा 'इगोईजम' खूप वाढलेला असतो. अर्थात जो 'इगोईजम' वाढायला नको, तो 'इगोईजम' खूप वाढतो. ___ या जगाचा नैसर्गिक नियम काय आहे की तुम्ही तुमची फळे जर दुसऱ्याला दिलीत तर निसर्ग तुम्हाला सांभाळून घेईल. हेच गुह्य सायन्स (गूढ विज्ञान) आहे. हा परोक्ष धर्म आहे. नंतर प्रत्यक्ष धर्म येतो, आणि शेवटी आत्मधर्म येतो. मनुष्यजन्माचा हिशोब एवढाच आहे. अर्क (सार) एवढाच आहे की मन-वचन-कायेचा उपयोग दुसऱ्यांसाठी करा. Page #39 -------------------------------------------------------------------------- ________________ [३] वास्तवात दुःख आहे? 'राईट बिलिफ' तिथे दुःख नाही प्रश्नकर्ता : दादा दुःखाविषयी काहीतरी सांगा. हे दुःख कशातून उत्पन्न होते? दादाश्री : जर तुम्ही आत्मा असाल तर आत्म्याला कधीही दुःख होत नाही. आणि जर तुम्ही चंदुलाल असाल तर दुःख आहे. तुम्ही आत्मा असाल तर दुःख होणारच नाही, उलट जे दुःख असेल तेही संपून जाईल. 'मी' चंदुलाल आहे ही 'रॉग बिलिफ' (चुकीची मान्यता) आहे. ही माझी आई आहे, हे माझे वडील आहेत, हे माझे काका आहेत किंवा मी एक्स्पोर्ट-इम्पोर्ट चा व्यापारी आहे, या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या 'रॉग बिलिफ्स' आहेत. या सगळ्या 'रॉग बिलिफमुळे' दुःख उत्पन्न होते. जर 'रॉग बिलिफ' निघन गेली आणि त्या जागी 'राईट बिलिफ' बसली तर जगात काही दुःख राहणारच नाही. आणि तुमच्या सारख्या (खात्या-पित्या सुखी घरच्या) लोकांना दु:ख नसते. हे सगळे तर योग्य समज नसल्यामुळे होणारे दुःख आहे. दुःख केव्हा म्हणता येईल? । दुःख कशाला म्हणतात? या शरीराला भूक लागली आणि मग आठ तास, बारा तास खायला मिळाले नाही, तर त्याला दुःख मानले जाते. तहान लागल्यानंतर दोन-तीन तास पाणी नाही मिळाले तर तेही दुःखासमान आहे. संडास लागल्यावर जर संडासला जाऊ दिले नाही तर Page #40 -------------------------------------------------------------------------- ________________ वास्तवात दु:ख आहे ? त्याला दु:ख वाटेल की नाही? संडासाहून जास्त अवघड मुतारीची गोष्ट आहे. या मुताऱ्या सगळ्या बंद केल्या, तर सगळे लोक आरडाओरडा करतील. लघवी रोखणे खूप मोठे दुःख आहे. या सगळ्या दुःखांना दुःखं म्हणता येईल. प्रश्नकर्ता : हे सगळे ठीक आहे पण सध्या जर जगात पाहिले तर दहापैकी नऊ लोकांना दुःख आहे. दादाश्री : दहापैकी नऊ नाही, तर हजारामागे फक्त दोन लोक सुखी असतील, त्यांना थोडीफार शांती असते. बाकीचे सर्व तर रात्रंदिवस जळतच राहतात. रताळे भट्टीत ठेवले, तर ते किती बाजूंनी भाजतात? प्रश्नकर्ता : हे जे कायमचे दुःख आहे त्यामधून फायदा कसा घेता येईल? दादाश्री : या दुःखांवर जर विचार करायला लागलात तर दुःख आहे असे जाणवणार नाही. दुःखाचे जर यथार्थ प्रतिक्रमण कराल तर दुःख आहे असे वाटणार नाही. लोकांनी सरसकट हे दुःख आहे, ते दुःख आहे असे विचार न करताच बोलायला सुरुवात केली आहे. असे समजा, तुमच्याकडे खूप जुना सोफासेट आहे. आणि तुमच्या मित्राच्या घरी सोफासेटच नाही म्हणून तो आजच दुकानातून नवीन फॅशनचा सोफासेट घेऊन आला. तुमची बायको तो सोफा पाहून आली आणि घरी आल्यावर तुम्हाला ती म्हणाली की, 'तुमच्या मित्राकडे किती सुंदर सोफासेट आहे. आणि आपला सोफा तर किती खराब झाला आहे.' तर हे असे दुःख तयार झाले!!! घरात दुःख नव्हते, दुसऱ्यांचा सोफासेट पाहायला गेलात आणि स्वत:च्या घरात दुःख घेऊन आलात! तुम्ही बंगला बांधला नसेल आणि तुमच्या मित्राने बंगला बांधला. तुमची बायको तिथे गेली आणि तो बंगला पाहून ती म्हणाली, 'तुमच्या Page #41 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन मित्राने किती छान बंगला बांधला आहे.' आणि आपण तर बिन बंगल्याचे आहोत! हे असे दुःख आले!!! म्हणजे हे अशाप्रकारे दुःखांना आमंत्रण दिले जाते! मी न्यायाधीश झालो तर सगळ्यांना सुखी करून शिक्षा करेल. कुणाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायची संधी आली तर मी त्याला 'पाच वर्षापेक्षा कमी शिक्षा होऊ शकत नाही' असे सांगेन. जर वकिलाने कमी करण्याची विनंती केली तर प्रथम चार वर्ष, मग तीन वर्ष, नंतर दोन वर्ष, असे कमी करत-करत शेवटी सहा महिन्यांची शिक्षा देईल. त्यामुळे तो व्यक्ती जेलमध्ये तर जाईल, पण सुखी होईल. मनात खुश होईल की, पाच वर्षाची शिक्षा सहा महिन्यातच पूर्ण झाली. म्हणजे हे मान्यतेचेच दुःख आहे. जर त्याला पहिल्यापासूनच सहा महिने जेलमध्ये जावे लागले असे सांगितले तर त्याला ती खूप मोठी शिक्षा वाटली असती. पेमेन्ट चुकवताना समभाव ठेवावा हे तुम्हाला गादीवर बसल्यासारखे सुख आहे पण ते उपभोगताच येत नसेल तर काय करणार? हे म्हणजे ऐंशी रुपये किलोच्या बासमती तांदुळात रेती टाकण्यासारखे आहे ! जर दुःख आले तर माणसाला सांगता यायला पाहिजे ना की, 'इथे का आला आहेस? मी दादाजींचा आहे. तुला इथे यायची गरज नाही. तू दुसरीकडे जा. इथे का म्हणून आला आहेस? तुझा पत्ता चुकला आहे.' तुम्ही एवढे म्हणालात तर ते दुःख निघून जाईल. ही तर तुम्ही संपूर्ण अहिंसाच केली (!) दुःख आले तर काय त्याला येऊ द्यायचे? त्याला सरळ हाकलून लावायचे. यात अहिंसा तुटत नाही (हिंसा होत नाही) दुःखांचा अपमान केला तर ते निघून जातात. तुम्ही दुःखांचा देखील अपमान करत नाही. एवढे अहिंसक होण्याची गरज नाही. प्रश्नकर्ता : दुःखाला विनंती करून ते जाणार नाही का? दादाश्री : नाही. दुःखाला विनंती करायची नाही. विनंती करून Page #42 -------------------------------------------------------------------------- ________________ वास्तवात दुःख आहे ? ऐकणाऱ्यापैकी ते नाहीत. त्याच्यावर डोळे वटारावेच लागतील. ते नपुसंक जातीचे आहे. त्या जातीचा स्वभावच तसा आहे. त्याच्याशी लाडीगोडी कराल तर त्याला आनंदच होईल. टाळ्या वाजवील आणि सारखा आपल्या जवळ-जवळ येत राहील. 'वारस अहो महावीरना, शुरवीरता रेलावजो, कायर बनो ना कोई दी, कष्टो सदा कंपावजो.' ('तुम्ही महावीरांचे वारस आहात, तुमच्याकडून शौर्य प्रकट होऊ दे, भित्रे कधीही होऊ नका, कष्टांनाच नेहमी घाबरवा.') तुम्ही घरी बसला आहात आणि कष्ट (दुःख) आले तर ते तुम्हाला पाहन थरथर कापले पाहिजे आणि त्यास वाटले पाहिजे की आपण इथे कुठे फसलो! आपण घर चुकलो असे वाटते? दुःख आपले मालक नाहीत, ते तर आपले नोकर आहेत. जर कष्ट तुम्हाला पाहून घाबरत नसतील तर तुम्ही दादांचे कसे? कष्टाला म्हणावे की 'तुम्ही दोनच का आलात? पाच मिळून या. 'आता तुमचे सगळेच पेमेन्ट चुकते करून देऊ.' तुम्हाला जर कोणी शिव्या दिल्या तर आपले ज्ञान त्याला काय सांगते? तो तर 'तुला' ओळखतच नाही. उलट 'तूच' 'त्याला' सांगायचे की, 'बाबा, माझ्याकडूनच काही चुक झाली असेल म्हणूनच त्याने शिव्या दिल्या. म्हणून शांत रहा.' एवढे केले की तुझे पेमेन्ट चुकते झाले! हे लोक कष्ट आले म्हणजे आरडओरड करून सोडतात, अरेरे, 'मी मेलो!' असेही बोलतात. मरायचे तर एकदाच असते. हे तर शंभर वेळा 'मी मेलो, मेलो' असे म्हणतात! अरे, तू तर जिवंत आहेस मग 'मी मेलो' असे कसे म्हणतोस? मेल्यानंतर म्हण की 'मी मेलो म्हणन.' जिवंत माणूस कधी मरतो का? 'मी मेलो' हे वाक्य संपूर्ण आयुष्यात एकदाही बोलण्यासारखे नाही. खरोखर दुःख कशास म्हणतात, हे नीट समजून ओळखायला हवे. Page #43 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन ह्या मुलाला मी मारले तरीही तो रडत नाही, उलट तो हसतो, त्याचे काय कारण? आणि तुम्ही त्याला फक्त एक टपली जरी मारली तरी तो रडायला लागेल, याचे काय कारण? त्याला लागले म्हणून? नाही त्याला लागल्याचे दुःख नाही, त्याचा अपमान केला हे त्याचे दुःख आहे. यास आपण दुःख म्हणूच कसे शकतो? दुःख तर कशास म्हटले जाईल की, खायला मिळत नाही, संडासला जायला मिळत नाही, लघवीला जाता येत नाही. अशा गोष्टींना दुःख म्हणता येईल. आता तर सरकारने घरोघरी संडास बांधून दिले आहेत, पूर्वी तर लोकांना लोटा घेऊन जंगलात जावे लागत होते. आता तर बेडरूममधून निघालात की लगेच संडास! पूर्वी श्रीमंत ठाकूरानांही नव्हत्या इतक्या सुखसोयी आजच्या सर्व सामान्य लोकांना उपलब्ध आहेत. पूर्वी ठाकूराला देखील संडासला जाण्यासाठी लोटा घेऊन जावे लागत असे! त्याने जुलाबाचे औषध घेतले असेल तर त्यालाही पळावे लागत! आता असे नाही, तरी लोक असे झाले, नी तसे झाले ,असे ओरडत असतात. अरे पण काय झाले ते तर बोल. हा पडला, तो पडला, काय पडले? विनाकारण कशाला आरडओरड करतात? ही जी दु:खं आहेत ती सर्व चुकीच्या समजुतीमुळे आहे. जर योग्य समज फीट केली तर दुःखासारखे काहीही नाही. जर तुमच्या पायाला काही लागले, काही इजा झाली असेल तर तपास करा की माझ्यासारखे दुःख लोकांना आहे की नाही? इस्पितळात जाऊन पाहिले तर समजेल की ओहोहो! खरे दुःख तर इथेच आहेत. माझ्या पायाला किरकोळ इजा झाली आणि मी विनाकारण दुःख मानून घेत आहे. अशी तपासणी करायलाच हवी ना? तपास केल्याशिवाय दुःख मानले तर काय होईल? तुमच्यासारख्या पुण्यवंत लोकांना दुःख असूच कसे शकते? तुम्ही पुण्यवंतांच्या घरी जन्मला आला आहात. थोड्याशा मेहनतीनेच तुम्हाला खायला-प्यायला मिळून जाते. Page #44 -------------------------------------------------------------------------- ________________ वास्तवात दुःख आहे? प्रश्नकर्ता : सगळ्यांनाच आपापले दु:ख मोठे वाटते ना? दादाश्री : ते तर स्वत:च निर्माण केलेले दुःख आहे, त्यामुळे तुम्ही त्यास जेवढे मोठे कराल तेवढे ते मोठे होईल. चाळीस पट केलेत तर चाळीस पट होईल! ...अवश्य करण्यायोग्य 'प्रोजेक्ट' आयुष्य कसे जगावे हेच या लोकांना कळत नाही, 'जगावे कसे' याची चावीच ते हरवून बसले आहेत. चावी पूर्णपणे हरवली होती; पण आता इंग्रज आल्यामुळे परत थोडे चांगले घडू लागले आहे. इंग्रज आल्यामुळे यांचे कट्टर संस्कार थोडे शिथिल होऊ लागले आहेत, म्हणून ते आता दुसऱ्यांच्या व्यवहारात ढवळाढवळ करत नाहीत, आणि आता तर ते कष्ट करू लागले आहेत, पूर्वी फक्त ढवळाढवळच करत असत. हे लोक उगीचच मार खात राहतात. या जगात तुमचा कोणीही मालक नाही. तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहात. तुमचा प्रोजेक्ट सुद्धा स्वतंत्र आहे, पण तुमचा प्रोजेक्ट असा असायला हवा की कोणत्याही जीवाला तुमच्याकडून किंचितमात्र पण दु:ख होणार नाही. तुमचे प्रोजेक्ट प्रचंड मोठे करा. संपूर्ण जग सामावू शकेल एवढे करा. प्रश्नकर्ता : असे शक्य आहे का? दादाश्री : माझा (प्रोजेक्ट) खूप मोठा आहे. कुठल्याही जीवाला दुःख होऊ नये असे मी वागतो. प्रश्नकर्ता : पण दुसऱ्यांना हे करणे शक्य नाही ना? दादाश्री : जरी शक्य नसले, पण याचा अर्थ असा नाही की सगळ्या जीवांना दुःख देऊनच आपला प्रोजेक्ट (ध्येय) पूर्ण करावा. कुणालाही कमीत कमी दुःख होईल असा काही तरी नियम Page #45 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन तुम्ही करू शकता ना? असा प्रोजेक्ट तर करु शकता ना. जे बिलकुल असंभवच आहे असे करायला मी तुम्हाला सांगतच नाही. ...फक्त भावनाच करायची प्रश्नकर्ता : कुणालाच दुःख नाही, मग आम्ही जेव्हा दुसऱ्यांना दुःख देतो तेव्हा त्यांना का दुःख होते? दादाश्री : त्यांच्या मान्यतेतून अजून दुःख गेले नाही. तुम्ही मला थोबाडीत माराल तर मला दु:ख होणार नाही पण दुसऱ्यांना मारले तर त्याला दु:ख होईलच, कारण मारल्याने दुःख होते, असे त्याच्या मान्यतेत आहे. 'रॉग बिलिफ' अजूनपर्यंत गेलेली नाही. 'कोणी मला मुस्कुटात मारली तर मला दु:ख होते,' त्याचप्रमाणे समोरच्यालाही दुःख होत असेल, या पातळीवरून विचार केला पाहिजे. कुणाला मुस्कुटात मारताना मनात हा विचार आला पाहिजे की, मला मुस्कटात मारले तर मला कसे वाटेल? आपण कुणाकडून दहा हजार रुपये उसने आणले, पण दुर्दैवाने आपले दिवस फिरले तर मनात विचार येतील की, 'पैसे परत केले नाही तर त्यांना काय फरक पडणार आहे!' अशा वेळी न्यायपूर्वक विचार केला पाहिजे की 'माझ्याकडून कोणी पैसे घेतले आणि परत केले नाहीत तर मला कसे वाटेल?' असे झाले तर मला खूप दुःख होईल, त्याचप्रमाणे समोरच्यालाही दुःख होईल. म्हणून मलाही त्याचे पैसे परत करायचेच आहेत, असा निश्चय केला पाहिजे आणि असा निश्चय केला तर तुम्ही पैसे परत करू शकाल. प्रश्नकर्ता : मनात असा विचार येतो की त्याच्याजवळ तर दहा करोड रुपये आहेत मग आपण त्याला दहा हजार रुपये परत केले नाहीत तर त्याला काही अडचण येणार नाही. दादाश्री : त्याला अडचण येणार नाही असे तुम्हाला खुशाल Page #46 -------------------------------------------------------------------------- ________________ वास्तवात दुःख आहे ? वाटते, परंतु प्रत्यक्षात तसे नाही. तो करोडपती असला तरी स्वत:च्या मुलासाठी एक रुपयाची वस्तू घेताना सुद्धा खूप विचार करून करून घेतो. कोणत्याही करोडपतीच्या घरी तुम्हाला असे उघड्यावर पैसे पडलेले आढळले का? प्रत्येकाला पैसा प्राणाइतकाच प्रिय असतो. आपल्या मनात सतत असा भाव असायला हवा की माझ्या मन-वचन-कायेने या जगातील कुठल्याही जीवाला किंचितमात्र पण दुःख न होवो. प्रश्नकर्ता : पण सर्वसामान्य माणसाला असे वर्तन करणे फार कठीण आहे ना? दादाश्री : मी तुम्हाला आजपासूनच असे आचरण करा असे म्हणत नाही. केवळ भावनाच करायला सांगत आहे. भावना म्हणजे तुमचा निश्चय. Page #47 -------------------------------------------------------------------------- ________________ [४] फॅमिली ओर्गेनायझेशन हे कसले 'आयुष्य'? फॅमिली ओर्गेनायझेशन (कुटंब व्यवस्था) चे काही ज्ञान आहे का तुमच्याजवळ? आपल्या भारतात 'कुटुंब कसे चालवावे' याचे ज्ञान फार कमी आहे. विदेशात तर ते फॅमिली वगैरे काही मानतच नाहीत. जेम्स वीस वर्षाचा झाला म्हणजे त्याचे आई-वडील विलियम आणि मेरी जेम्सला म्हणतील की तू तुझे बघ आणि आम्ही दोघे पोपट आणि पोपटीन आमचे बघून घेऊ! (तू वेगळा आणि आम्ही दोघे वेगळे ) त्यांना कुटुंब व्यवस्था सांभाळायची जास्त सवयच नाही. त्यांच्या कुटुंबात सरळ स्पष्ट बोलून टाकतात. मेरी आणि विलियमचे पटले नाही तर लगेच घटस्फोट घेऊन मोकळे होतात! आपल्या इथे आजून लगेच डायवोर्सच्या निर्णयापर्यंत पोहोचत नाही. आपल्या इथे तर कायम सोबतच राहायचे. रोज भांडण करायचे आणि परत त्याच खोलीत झोपायचे! जीवन जगण्याचा हा (योग्य) मार्ग नाही. याला फॅमिली लाईफ (कौटुंबिक जीवन) म्हणत नाही. अरे! आपल्या इथल्या म्हाताऱ्या आजींना जीवन जगण्याचा मार्ग विचारला तर त्या सांगतील की, 'आरामशीर खा, प्या, घाई कसली आहे ?' माणसाच्या प्राथमिक गरजा कोणत्या आहेत, आधी त्या नीट ओळखून घ्याव्यात. त्या सोडल्या तर बाकी सर्व अनावश्यक गोष्टी आहेत. या अनावश्यक गोष्टीच माणसाच्या जीवनात अडचणी आणतात. आणि मग झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात! Page #48 -------------------------------------------------------------------------- ________________ फॅमिली ओर्गेनायझेशन घरात भांडणे का होतात? मुलांशी वादविवाद का होतो? हे सगळे जाणून घायला नको का? मुलगा उलट उत्तर देत असेल? आणि यावर उपचार म्हणून डॉक्टरला विचारले तर डॉक्टर तरी काय सांगणार? अरे, घरी डॉक्टरचीच बायको डॉक्टरचे ऐकत नाही ना! हे तर आयुष्यभर कापसाचे सर्वेक्षण करतो, तर कोणी लवंगाचे सर्वेक्षण करतो, असे काही ना काही सर्वेक्षण चालूच असते; परंतु आतील सर्वेक्षण मात्र कोणी कधी करत नाही! शेठ घरात तुमचा सुगंध दरवळतो का? प्रश्नकर्ता : सुगंध दरवळतो म्हणजे काय? दादाश्री : तुमच्या घरात तुम्ही सर्वांना खुश ठेऊ शकता का? घरात भांडण-तंटे होत नाहीत ना? प्रश्नकर्ता : भांडण तर होतच असते, रोजच होते. दादाश्री : अरे, असे कसे तुम्ही शेठजी? बायकोला सुख दिले नाही, मुलांना सुख दिले नाही, अरे स्वत:ला देखील सुखी ठेऊ शकला नाही! तुम्हाला मोक्षाला जायचे असेल तर मला तुमच्यावर रागवावेच लागेल. आणि तुम्हाला देवगतीत जायचे असेल तर दुसरा सरळ रस्ता पण मी तुम्हाला दाखवीन. मग मी तुम्हाला 'या शेठजी या, या' असे म्हणेल. मला दोन्ही भाषा बोलता येतात. ही अशी भ्रांतीची भाषा मी काही विसरलेलो नाही. पूर्वी 'तुन्डे तुन्डे मतिर्भिन्ना' होती म्हणजे, कुटुंबाकुटुंबात मतभेद असत; पण आज तर घरातल्या घरात एकमेकांशी कलह असतात! कुटुंबे गेली आणि व्यक्ती उरल्या! संसाराच्या हिताहीतचे कोणाला भानच नाही. असे संस्कार घडविणे शोभते का? आई-वडील म्हणून कसे वागावे याचेही भान नाही. एक भाऊ Page #49 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन होते त्यांनी त्यांच्या बायकोला हाक मारली, 'अरे बाळाची आई कुठे गेली ?' मग बाळाची आई आतून बोलते 'काय काम आहे ?' तेव्हा भाऊ म्हणतात ‘इकडे ये, लवकर ये, लवकर ये, बघ, तुझ्या बाळाला ! कसा पराक्रम करतोय ते बघ तरी !! बाळाने पाय उंच करून माझ्या खिशातून कसे दहा रुपये काढले ! कसा हुशार झाला आहे बाळ !' ३४ अरे मूर्खा, असा कसा रे तू निपजलास ! बाप झाला आहेस! लाज नाही का वाटत? या बाळाला कसले प्रोत्साहन मिळाले ते समजले का तुला ? मुलाला वाटेल की आपण खरोखर खूप मोठा पराक्रम केला ! कौतुक करण्यासारखे केले! हे असे शोभते का ? काही तरी नियम हवेत का नकोत? या हिंदुस्तानाचे मनुष्यपण असे लूटले गेले तर शोभेल का ? काय बोलले तर मुलाला चांगले उत्तेजन मिळेल आणि काय बोलले तर त्याचे नुकसान होईल, हे तुम्हाला समजायला नको का ? 'अनटेस्टेड फादर' आणि ‘अनटेस्टेड मदर' आहात. बाप मुळा आणि आई गाजर, तर मग सांगा मुले कशी असतील ? सफरचंद थोडेच बनतील ? ! प्रेमाने वागा - मुले सुधरतीलच एक बाप त्याच्या मुलाला काहीतरी टाकून बोलला, मग मुलगा खूप चिडला, आणि बापाला म्हणू लागला, 'तुमचे आणि माझे जमणार नाही.' तेव्हा बाप मुलाला म्हणाला, 'मी तुला अजिबात खराब बोललेलो नाही, तू एवढा कशाला चिडतोस ? तेव्हा मी त्या बापाला म्हणालो, आता कशाला मलमपट्टी करतोस ? प्रथम तू त्याला चिडण्यासारखे बोललासच का? कोणालाही डिवचू नका. ही पिकलेली फळे आहेत. नाजूक आहेत. म्हणून काही बोलूच नका. 'मेरी भी चूप आणि तेरी भी चूप. खा-प्या आणि मजा करा. , प्रश्नकर्ता : ही मुले वाईट मार्गाला गेलीत तर त्यांना योग्य मार्गाला आणावे हे आई-वडिलांचे कर्तव्य नाही का ? Page #50 -------------------------------------------------------------------------- ________________ फॅमिली ओर्गेनायझेशन दादाश्री : बरोबर आहे, पण आई-वडिलांसारखे वागून तसे बोलले पाहिजे, पण आजकाल आई-वडील आहेतच कुठे? प्रश्नकर्ता : आई-वडील कुणाला म्हणायचे? दादाश्री : आई-वडील त्यांना म्हणायचे की जरी मुलगा वाईट मार्गावर गेला असेल तरी सुद्धा, एखाद दिवशी आई-वडील त्याला म्हणतील, 'बेटा, हे आपल्याला शोभत नाही, हे तू काय केलेस?' त्यावर लगेच दुसऱ्या दिवसापासून तो सगळे वाईट मार्ग बंद करुन टाकेल! असे प्रेमच कुठे आहे? हे तर प्रेम नसलेले आई-वडील! हे जग प्रेमानेच वश होते. आजच्या आई-वडिलांना मुलांवर किती प्रेम आहे? तर गुलाबाच्या रोपट्यावर माळीला जेवढे प्रेम असते तेवढे! त्यांना आई-वडील कसे म्हणायचे? 'अनसर्टीफाईड फादर आणि अनसर्टीफाईड मदर'! मग मुलाची काय अवस्था होईल? खरे तर प्रथम टेस्टिंग करवून, 'सर्टीफिकेट' मिळवल्यानंतरच लग्नाची परवानगी दिली पाहिजे. जसे परीक्षेत पास झाल्याशिवाय, सर्टीफिकेट मिळवल्याशिवाय 'गवनॅमेन्टमध्ये' सुद्धा नोकरी देत नाही. तर मग इथेही सर्टीफिकेट मिळवल्याशिवाय लग्न कसे करू शकतो? ही आई आणि वडील बनण्याची जबाबदारी देशाच्या पंतप्रधानाच्या जबाबदारीपेक्षाही मोठी आहे. पंतप्रधानापेक्षाही सुद्धा उच्च पद आहे. प्रश्नकर्ता : 'सर्टीफाईड' आई-वडील यांची व्याख्या काय? दादाश्री : ‘अनसर्टीफाईड' आई-वडील म्हणजे स्वतःची मुले स्वतःच्या म्हणण्यानुसार वागत नाही, स्वतःची मुले स्वत:च्या आईवडिलांचा आदर करीत नाहीत, हैराण करतात! अशा आई-वडिलांना 'अनसर्टीफाईड' असेच बोलावे लागेल ना! ...नाही तर मौन धरून ‘पाहत' राहा एक सिंधी भाऊ आले होते, ते सांगत होते की, 'माझा एक मुलगा असे करतो आणि दुसरा मुलगा तसे करतो, त्यांना कसे सुधारता Page #51 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन येईल?' मी म्हणालो, 'तुम्ही अशी मुले का आणलीत? निवडून निवडून चांगली मुले का नाही आणलीत?' सगळे हापूस आंबे सारखेच दिसतात, तरी पण आपण निवडून आणतो ना? पण तुम्ही दोन आंबट आणलेत, दोन खराब आणलेत, दोन बेचव आणलेत, आणि दोन गोड आणलेत. आता या आंब्याचा रस चांगला लागेल का? मागाहून भांडण-तंटा करण्यात काय अर्थ आहे? आंबट आंबे आणलेत, मग आंबटला आंबट ओळखणे म्हणजे ज्ञान. चवीला आंबट आहेत ते फक्त पाहत राहायचे. तसेच या प्रकृतीला (स्वभावाला) पाहत राहायचे आहे. कोणाच्याही हातात काही सत्ता नाही. प्रत्येक अवस्था मात्र नैसर्गिक रचना आहे. यात कोणाचे काही चालत नाही, काहीही बदलत नाही, आणि पुन्हा हे 'व्यवस्थित आहे. प्रश्नकर्ता : मारल्याने मुले सुधारतात का? दादाश्री : कधीच सुधारत नाही, मारून कधीही सुधारत नाही. या मशीनला मारून पाहा बरे! ती तुटून जाईल. तसेच या मुलांच्या बाबतीत आहे. वरवर सुधारलेले वाटतात पण आतून तुटतात (निराश होतात.) दुसऱ्यांना एन्करेज (प्रेरित) करता येत नसेल तर मग मौन राहा ना, चुपचाप चहा प्या ना! सगळ्यांचे चेहरे पाहत राहा, हे दोन पुतळे भांडत आहेत त्यांना पाहत राहा. कारण हे आपल्या ताब्यात नाही. आपण फक्त यांना जाणणारेच आहोत. ___ ज्याला हा संसार वाढवायचा असेल त्याने संसारात भांडण-तंटे करावे, सर्व काही करावे. ज्याला मोक्षाला जायचे असेल त्याला एवढेच सांगतो की,' जे काय घडत आहे' त्यास फक्त 'पाहात' राहा. ___या जगात रागावून, काहीही सुधरणार नाही, उलट मनात अहंकार करतो की मी खूप रागवलो. रागावल्यानंतर पाहिले तर समोरच्यात काहीही बदल झालेला नसतो. पितळ पितळच राहील आणि कांसे कांसेच राहील. पितळाला मारत राहिलात तर ते काळे पडल्याशिवाय राहील का? Page #52 -------------------------------------------------------------------------- ________________ फॅमिली ओर्गेनायझेशन ३७ नाही. काय कारण? कारण त्याचा गुणधर्मच काळे पडणे हा आहे. म्हणून मौनच राहायचे. चित्रपटातील एखादे नावडते दृश्य आले तर आपण चित्रपटगृहातील पडदा फाडतो का? नाही ते दृश्य पण बघायचे. सगळेच सिन्स आवडतील असे थोडेच असते? काही जण तर थियेटरमध्ये बसून ओरडतात. 'अरे, तो मारून टाकेल, तो मारून टाकेल!' जणू हे सगळे दयेचे पुतळेच आलेत! हे सर्व तर पाहायचे आहे. खा, प्या, बघा आणि मजा करा!! ...स्वतःलाच सुधारण्याची गरज प्रश्नकर्ता : काही मुले शिक्षकांना उलटून बोलतात, ती कधी सुधारतील? दादाश्री : जो चुकांचे परिणाम भोगतो त्याचीच चूक. या गरुंचीच योग्यता नसेल म्हणून शिष्य उलटून बोलतात. ही मुले तर समजदारच आहेत; पण गुरु आणि आई-वडीलच चक्रम आहेत! आणि मोठी म्हातारी माणसे जुन्या गोष्टींना चिकटून बसतात, मग मुले उलटून बोलणारच ना? आजकालच्या आई-वडिलांचे चारित्र्यबळ कमी झाले आहे म्हणून मुले अशी वागतात. आचार, विचार, आणि उच्चार यात जर सकारात्मक बदल घडवता आले तर तुम्ही परमात्मा बनू शकता आणि नकारात्मक बदल घडले तर तुम्ही राक्षसही बनू शकता. लोक समोरच्याला सुधारण्याच्या प्रयत्नात सगळेच मोडून टाकतात. आधी स्वतः सुधरेल तर दुसऱ्यालाही सुधारू शकेल. पण स्वतःला सुधारल्याशिवाय समोरची व्यक्ती कशी सुधरेल? म्हणून प्रथम आपली बाग सांभाळा मग दुसऱ्यांच्या बागा बघायला जा. स्वतःची बाग सांभाळली तर फळे-फुले मिळतील. ढवळाढवळ नाही, 'एडजेस्ट' होण्यासारखे आहे संसाराचा अर्थच समसरण मार्ग, त्यामुळे त्यात सतत परिवर्तन होत Page #53 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन असतात; पण ही जुनी म्हातारी माणसे परंपरांना चिकटून बसतात. अरे, जगाबरोबर बदलत रहा, नाही तर मार खाऊन मरशील! जगाबरोबर एडजस्ट होता आलेच पाहिजे. मी चोराबरोबर, खिसेकापूबरोबर, सगळ्यांबरोबर एडजस्ट होऊ शकतो. चोराशी मी बोललो तर त्यालाही जाणवते की हे करुणामय आहेत. मी चोराला 'तू चुकीचा आहेस' असे म्हणत नाही. कारण तो त्याचा दृष्टीकोन आहे. लोक त्याला नालायक म्हणून शिव्या देतात. तेव्हा हे वकील लोक काय खोटारडे नाहीत ? साफ खोटी केस असेल तरी मी जिंकून देईन असे म्हणतात, मग ते लबाड नाहीत का ? तुम्ही चोराला धूर्त म्हणता, मग या खोट्याचे खरे करणाऱ्यांवर विश्वास का ठेवायचा ? तरी सुद्धा त्यांचे पण चालतेच ना ? म्हणून आम्ही कोणालाही चुकीचे म्हणत नाही. तो त्याच्या दृष्टीकोनातून बरोबरच आहे. पण आम्ही त्याला खरी गोष्ट समजावून सांगतो की, तू चोरी करतोस त्याचे फळ तुला काय मिळेल. ३८ ही म्हातारी माणसे घरात आली की म्हणणार, ‘हे लोखंडाचे कपाट ? हा रेडियो ? हे असेच का ? हे तसेच का ? अशी प्रत्येक गोष्टींवर टिप्पणी करणार? अरे, एखाद्या तरुणाशी मैत्री कर. हे जग तर सतत बदलतच राहणार. त्याशिवाय हे कसे जगू शकतील? काहीतरी नवीन पाहिले की मोह होतो. नवीन नसेल तर जगतील कसे ? अशा नव्या गोष्टी अनंत आल्या आणि अनंत गेल्या. त्यात तुम्ही ढवळाढवळ करायची नसते. जे तुम्हाला आवडत नसेल ते करू नका. हे आईस्क्रीम तुम्हाला आवडत नसेल तर नका खाऊ. ते थोडेच तुमच्या मागे लागले आहे, 'मला खा, मला खा म्हणून. ' तुम्हाला नाही खायचे तर नका खाऊ. ही म्हातारी तर त्याचा तिरस्कार करतात. हे जे काही मतभेद होतात ते नव्या पिढीला समजून न घेतल्यामुळेच होतात. नवीन पिढी त्यांच्या पिढीनुसारच वागणार. मोह म्हणजे नवीन नवीन गोष्टी उत्पन्न होतात आणि नवीन नवीन दिसत राहते. आम्ही लहानपणापासूनच बुद्धीने खूप विचार करून समजून घेतले की हे जग उलट होत आहे की सुलट होत आहे, आणि Page #54 -------------------------------------------------------------------------- ________________ फॅमिली ओर्गनायझेशन हे पण लक्षात आले होते की, जगाला बदलण्याची सत्ता कोणाच्याही हातात नाही. म्हणून आम्ही काय सांगत असतो की, जमान्याप्रमाणे एडजेस्ट व्हा! मुलगा नवीन टोपी घालून आला तर त्याला असे म्हणू नये की ही कसली टोपी घेऊन आलास? तर त्याला म्हणावे की 'वाह!' किती छान टोपी, कुठून आणलीस? कितीला आणलीस? खूप स्वस्त मिळाली? अशाप्रकारे एडजेस्ट व्हा. ही मुले दिवसभर कानाला रेडियो लावून बसत नाहीत का? कारण त्या बिचाऱ्यांच्या जीवनात हा नवीन रस उदयास आला आहे. हे यांचे नवीन डेव्हलपमेंट आहे. जर तो 'डेवलप' (प्रगतशील) झालेला असता तर कानाला रेडियो लावून फिरला नसता. एकदा बघितल्या नंतर त्याने त्याला परत हातच लावला नसता. नवीन वस्तू एकदा बघायची असते, त्याचा कायम अनुभव घेण्याची गरज नसते. ही तर त्याला कानाची नवीनच इंद्रिय मिळाली आहे. म्हणून दिवसभर रेडियो ऐकत राहतो! आता त्याची मनुष्यजन्माची सुरुवात झाली आहे. मनुष्यगतीत हजारो वेळा आलेला मनुष्य असे काही करणार नाही. प्रश्नकर्ता : मुले सारखी बाहेर फिरत राहतात. दादाश्री : मुले काही तुमच्याशी बांधलेली नाहीत. सर्वजण आपापल्या बंधनात आहेत. तुम्ही त्यांना एवढेच म्हणायचे की, 'वेळेवर ये' मग तो जेव्हा येईल ते 'व्यवस्थित.' व्यवहार सगळाच करा, पण कषाय रहित करा. व्यवहार कषाय रहित झाला तर मोक्ष, आणि कषाय सहित व्यवहार तर संसार. प्रश्नकर्ता : माझा पुतण्या रोज नऊ वाजता उठतो आणि त्यामुळे काही काम होत नाही. दादाश्री : आपण त्याला पांघरून म्हणावे की आरामशीर झोप भाऊ. त्याची प्रकृती वेगळी आहे म्हणून तो उशीरा उठतो. पण काम Page #55 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन जास्त करतो. आणि काही मूर्ख पहाटे चार वाजता उठतात तरी काही काम करत नाहीत. मी सुद्धा प्रत्येक कामात उशीर करायचो. शाळेत जाताना सुद्धा शाळेतील घंटा वाजल्यानंतर घरून निघायचो आणि रोज गुरुजींचे बोलणे खायचो! आता गुरुजींना काय माहित की माझी प्रकृती कशी आहे ? प्रत्येकाचे (इंजिन) 'रस्टन' वेगळे, आणि 'पिस्टन' ही वेगवेगळे असते. प्रश्नकर्ता : पण उशीरा उठण्यात शिस्त राहत नाही ना? दादाश्री : तो उशीरा उठतो म्हणून तुम्ही जी कटकट करतात तीच खरी शिस्त नाही. तुम्ही कटकट करणे बंद करा. तुम्हाला ज्या-ज्या शक्ती हव्या आहेत त्या या दादांजवळ रोज शंभर वेळा मागा, सर्व मिळतील. आता या भाऊला समजले म्हणून त्यांनी माझ्या आज्ञांचे पालन करणे सुरु केले आणि घरातील सगळ्यांनीच पुतण्याला बोलणे बंद केले. परिणाम असा झाला की, आठवड्याभरातच पुतण्या सात वाजता उठू लागला आणि घरात सगळ्यांपेक्षा जास्त चांगले काम करू लागला! दुसऱ्यांना सुधारण्यासाठी 'बोलणे' बंद करा आजकालच्या काळात कमी बोलण्यासारखे उत्तम काहीच नाही. या काळात मनुष्याचे बोल हे दगड मारण्यासारखे निघत असतात, प्रत्येकाचे बोल तसेच असतात. म्हणून 'बोलणे' कमी करणे चांगले. कोणाला काहीही सांगण्यासारखे नाही. सांगितल्याने उलट जास्त बिघडते. आपण त्याला सांगितले की, गाडीवर जा, तर तो उशीरा जाईल. आणि जर काहीच सांगितले नाही तर वेळेवर जाईल. आपण नसलो तरी सर्व काही चालूच राहणार आहे. हा तर स्वतःचा खोटा अहंकारच आहे. ज्या दिवसापासून तुम्ही मुलांवर ओरडणे बंद कराल त्या दिवसापासून मुले सुधारू लागतील. तुमचे बोल चांगले निघत नाहीत म्हणून समोरच्याला द्वेषभाव होतो. तुमचे शब्द तो स्वीकारत नाही, उलट ते बोल परत Page #56 -------------------------------------------------------------------------- ________________ फॅमिली ओर्गेनायझेशन तुमच्याकडे येतात. तुम्ही मुलांना खायचे, प्यायचे बनवून द्या आणि तुमचे कर्तव्य पार पाडा. दुसरे काही सांगण्यासारखे नाही. सांगून फायदा नाही असा निष्कर्ष काढला आहे का तुम्ही? मुलं मोठी झाली आहेत, ती काय आता शिडी वरुन खाली पडतात? तुम्ही तुमचा 'आत्मधर्म' का म्हणून विसरता? या मुलांशी तर रिलेटिव्ह धर्म आहे. तिथे डोकेफोड करण्यात काही अर्थ नाही. भांडण करण्याऐवजी मौन बाळगलेले जास्त चांगले. भांडण केल्याने तर स्वतःचेही बिघडते आणि दुसऱ्यांचेही बिघडते. प्रश्नकर्ता : मुलांना आपली जबाबदारी समजत नाही. दादाश्री : जबाबदारी 'व्यवस्थित शक्तीची' आहे. तो तर त्याची जबाबदारी समजलेलाच आहे. त्याला समजावून सांगणे तुम्हाला जमत नाही म्हणून गडबड होते. समोरच्याला आपले म्हणणे पटले तर आपले सांगितलेले कामाचे. इथे तर आई-वडीलच वेड्यासारखे वागतात मग मुले पण वेडेपणा करणारच ना? प्रश्नकर्ता : मुले उद्धट बोलतात. दादाश्री : हो, पण तुम्ही ते कसे बंद कराल? तुम्ही सुद्धा तुमच्या बाजूने तसे बोलणे बंद केले तर सगळ्यांचे चांगले होईल. एकदा जर मनात फुट पडली, मन कलुषीत झाले की मग त्याची लिंक चालू होते. नंतर मनात त्यांच्याविषयी अभिप्राय बनून जातो की ही व्यक्ती अशीच आहे. अशा वेळी आपण मौन (गप्प) राहून समोरच्याचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे. फक्त बडबड केल्याने कुणाचे काही सुधरत नाही. सुधारण्याचे सामर्थ्य तर केवळ ज्ञानी पुरुषांच्या वाणीतच आहे. मुलांसाठी तर आई-वडिलांची जोखीमदारी आहे. तुम्ही बोलले नाही तर नाही का चालणार? चालणार. म्हणूनच भगवंतानी म्हटले आहे की जिवंत असून सुद्धा मेलेल्याप्रमाणे वागा. बिघडलेल्याचे मन तोडू नये. बिघडलेल्याला सुधारु शकतो. बिघडलेल्याला सुधारणे हे तर आई-वडिलांची जोली ज्ञानी पुरुष बोलले नाही तर ना Page #57 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन आमचे काम आहे, तुम्ही ते करू नका. तुम्ही आमच्या आज्ञेनुसार वागा. हे तर जो स्वतः सुधारलेला असेल तोच दुसऱ्यांना सुधारू शकतो. जो स्वतःच सुधारलेला नसेल तो दुसऱ्यांना काय सुधरणार? मुलांना सुधारायचे असेल तर आमच्या आज्ञेनुसार वागा. घरात सहा महिने मौन बाळगा. मुलांनी विचारले तरच बोला आणि तरी देखील त्यांना सांगून ठेवा की मला नाही विचारले तर उत्तम. आणि मुलांबद्दल उलटसुलट विचार आले तर ताबोडतोब प्रतिक्रमण करून टाकावे. 'रिलेटिव्ह समजून वरपांगी राहावे मुलांना तर नऊ महिने पोटात ठेवायचे, मग लहान असे प्रर्यंत त्यांना चालवायचे, फिरवायचे, नंतर सोडून द्यायचे, या गायी-म्हशी देखील त्यांच्या वासरांना सोडून देतात ना? मुलांना पाच वर्षापर्यंत टोकावे लागते. नंतर टोकणेही बंद करा आणि वीस वर्षानंतर त्याची बायकोच त्याला सुधारेल. मग आपल्याला सुधारण्याची गरजही नाही. मुलांबरोबर वरवरचा व्यवहार करा. खरे पाहिले कोणीच कोणाचे नाही. या देहाच्या आधारे मुले आपली आहेत असे वाटते.हा देह जळून जाईल तेव्हा सोबत येतो का कोणी? माझा-माझा म्हणून छातीशी कवटाळतात त्यांना तर खूप सोसावे लागते. अतिशय भावूक विचार कामात येत नाहीत. मुले तर व्यवहाराच्या आधाराने आहेत. मुलाला दुखले, भाजले तर जरूर उपचार करावा पण त्यासाठी रडण्याची काय गरज आहे? सावत्र मुलांना मांडीवर घेऊन दूध पाजतात का? नाही. मग तसे ठेवा. हे 'कलियुग' आहे. सर्व रिलेटिव्ह संबंध आहेत. 'रिलेटिव्ह' ला रिलेटिव्हच्याच जागेवर ठेवा 'रियल' मध्ये आणू नका. जर 'रियल' संबंध असता तर मुलाला म्हटले असते की, 'तू जोपर्यंत सुधारत नाहीस तोपर्यंत वेगळा रहा.' Page #58 -------------------------------------------------------------------------- ________________ फॅमिली ओर्गेनायझेशन ___ परंतु हा तर रिलेटिव्ह संबंध आहे म्हणून 'एडजस्ट एव्हरीव्हेर.' तुम्ही दुसऱ्यांना सुधारण्यासाठी आलेले नाहीत, तुम्ही तर कर्माच्या तावडीतून सुटण्यासाठी आला आहात. सुधारण्यापेक्षा तर त्याच्यासाठी चांगली भावना करा. बाकी, कोणी कोणाला सुधारू शकत नाही. ज्ञानी पुरुष स्वतः सुधारलेले असतात तेच फक्त दुसऱ्यांना सुधारू शकतात. म्हणून त्यांच्याकडे घेऊन जा. मुले का बिघडतात? तर त्यांना सतत डिवचल्यामुळे. संपूर्ण जगाचे कामच डिवचल्यामुळे बिघडले आहे. या कुत्र्याला देखील डिवचले तर तो चावेल, लचका तोडेल. म्हणून लोक कुत्र्याला डिवचत नाहीत. मग मनुष्यांना डिवचाल तर काय होईल? ते पण चावतीलच. म्हणून कोणाला डिवचू नका. या आमच्या एक-एक शब्दात अनंत-अनंत शास्त्र सामावलेली आहेत! हे समजून घेतले आणि त्याप्रमाणे सरळ झालात तर तुमचे कल्याणच होऊन जाईल! एकावतारी होऊ शकाल असे हे अदभूत 'विज्ञान' आहे! लाखो जन्म कमी होऊन जातील!! या विज्ञानामुळे राग समाप्त होईल आणि द्वेषही समाप्त होतील आणि वीतराग होता येईल. अगुरु-लघु स्वभाववाले व्हाल, म्हणून या विज्ञानापासून जेवढा लाभ घ्याल, तेवढा कमीच. सल्ला द्यावा पण अनिवार्यपणे माझ्यासारखे 'अबुध' झालात तर कल्याणच झाले समजा. बुद्धी वापरली म्हणून परत संसार उभा झाला. घरातील लोक विचारतील तेव्हाच उत्तर द्या, आणि त्यावेळी देखील मनात वाटले पाहिजे की यांनी काही विचारले नाही तर खूप बरे होईल. असा नवस धरावा. कारण त्यांनी विचारले नाही तर बुद्धीचा वापर करावा लागणार नाही. असे आहे, की आपले जुने संस्कार आता संपुष्टात आलेले आहेत. हा दुषमकाळ सगळीकडे जबरदस्त व्यापलेला आहे. याच्या प्रभावाने आपले सर्व संस्कार संपुष्टात आले आहेत. माणसांना कोणाला समजावून सांगताच येत Page #59 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४ क्लेश रहित जीवन नाही. वडिलांनी मुलास काही सांगितले तर मुलगा म्हणतो की, 'मला तुमच्या सल्याची' गरज नाही. मग सल्ला देणारा कसा आणि घेणारा कसा? कशाकशा प्रकारचे लोक एकत्र आले आहेत?! हे लोक तुमचे म्हणणे का ऐकत नाहीत? कारण तुमचे म्हणणे खरे नाही म्हणून. खरे असेल तर ऐकतीलच ना? लोक असे का सांगतात? आसक्तीमुळे असे सांगतात. या आसक्तीमुळे तर लोक स्वतःचे पुढील जन्म बिघडवून घेतात. आता, या जन्मात तर सांभाळून घ्यावे 'व्यवस्थित शक्ती' सगळे चालवित असते, त्यामुळे बोलण्यासारखे काहीच नाही. 'स्वत:चा धर्म' करून घेण्यासारखा आहे. या पूर्वी तर असेच समजत होते की, 'आपणच चालवित आहोत' म्हणून आपल्यालाच (भांडण) मिटवावे लागेल. आता तर आपल्याला चालवायचे नाही ना? आता तर हा (स्वतः) सुद्धा भोवरा आणि तो सुद्धा भोवरा. मग सोड ना सगळी भानगड! ग्लास फुटो, कढी सांडो किंवा बायको मुलाला रागवत असो, असे होत असल्यावर देखील तुम्ही कुशी बदलून तसेच पडून रहा. तुम्ही पाहिलेत तर बायको म्हणेल की, तुम्हाला दिसत असून गप्प का बसला आहात? आणि नाही तर हातात माळ घेऊन माळ जपत रहा, मग बायकोला वाटेल की ते तर मंत्रजाप करीत आहेत. अरे, सोडा ना. आपले काय देणेघेणे? स्मशानात जायचे नसेल तर मग कटकट करा! अर्थात काहीही बोलण्यासारखे नाही. या गायी, म्हशी सुद्धा त्यांच्या वासरांजवळ त्यांच्या पद्धतीने थोडेसेच भो-भो करतात, जास्त बोलत नाहीत! आणि फक्त हा एक मनुष्यच शेवटपर्यंत बडबड करत राहतो. जे बोलतात ते मूर्ख म्हटले जातात, पूर्ण घराला बरबाद करून टाकतात. याचा अंत कधी येणार? अनंत जन्म संसारात भटकले. नाही स्वत:चे भले केले, नाही दुसऱ्यांचे भले केले. जो माणूस स्वत:चे भले करू शकतो तोच दुसऱ्याचेही भले करू शकतो. Page #60 -------------------------------------------------------------------------- ________________ फॅमिली ओर्गेनायझेशन नाती खरी की ओढवून घेतलेली पीडा? मुलगा आजारी असेल तर उपचार वगैरे अवश्य करा; पण सर्व वरवर. आपल्या मुलांना कसे समजावे? तर सावत्र समजावे. मुलांना आपली मुलं म्हणता आणि मुलगा सुद्धा माझी आई आहे असे म्हणेल, पण आतून फार मोठा संबंध नाही. म्हणून या काळात सगळी नाती सावत्र आहेत असेच समजा, नाही तर मेलात म्हणून समजा. मुले कुणाला मोक्षाला नेणार नाहीत. जर तुम्ही समंजस झालात तर मुलेही समंजस होतील. मुलांचे अति लाड करणे चांगले आहे का? हे लाड-कौतुक तर गोळीबार करतात. या लाड-कौतुकाचे रुपांतर द्वेषामध्ये होते. नाईलाजास्तव करावे लागेल असे प्रेम करावे. त्यांच्यासमोर 'तू प्रिय आहेस' असे म्हणावे पण आतून ही जाणीव कायम ठेवावी की ही वरवरची गोष्ट आहे, बळजबरीने करावी लागलेली आहे. ही नाती खरी नाहीत. मुलांबराबरचे खरे नाते केव्हा कळते की जेव्हा तुम्ही त्याला तासभर मारले, शिव्या दिल्या, तेव्हा त्याचे तुमच्यावर किती प्रेम आहे ते कळेल. तो तुमचा खरा मुलगा असेल तर मार खाऊन देखील तो तुमचे पाय धरेल आणि म्हणेल, 'बाबा, मला मारून तुमचे हात खूप दुखले असतील!' असा म्हणणारा मुलगा असेल तर मात्र खरे नाते ठेवा. पण हे तर तासभर मुलांना रागावले तर उलट वडिलांनाच मारायला धावतील! मोहामुळे ही आसक्ती होत आहे. 'रियल' मुलगा कोणास म्हटले जाईल की जो बाप मेल्यानंतर मुलगाही स्मशानात जाऊन म्हणेल, की 'आता मला जगण्याची इच्छाच उरली नाही. मला ही मरायचे आहे.' तुमच्या मुंबईत बाप मेल्यानंतर एखादा मुलगा जातो का बापासोबत? ही सगळी स्वत:हून ओढवून घेतलेली पीडा आहे. मुलगा असे म्हणतच नाही की सगळे माझ्यासाठी खर्च करा. पण बापच सगळे मुलावर उधळतो. ही बापाचीच चूक आहे. तुम्हाला वडिलांची सगळी कर्तव्य पार पाडायची आहेत. योग्य ती सगळीच कर्तव्य पार पाडायची Page #61 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन आहेत. एका बापाने मुलाला इतके कवटाळले की मुलगा बापाला चावला ! कोणीही आत्मा कोणाचा पिता किंवा पुत्र होऊ शकतच नाही. या कलियुगात तर जास्त करून मागणारे घेणेदारच मुलाच्या रुपात आलेली असतात! आपण गिऱ्हाईकाला म्हटले की, मला तुमच्याशिवाय करमत नाही, तुमच्याशिवाय करमत नाही, तर गिऱ्हाईक काय करेल ? तुम्हाला मारेल. ही सगळी रिलेटिव्ह नाती आहेत, यातूनच कषाय ( क्रोध - मानमाया-लोभ) उत्पन्न होतात. या राग कषायातूनच द्वेष कषाय उत्पन्न होतो. जास्त उड्या मारण्याची गरजच नाही. खीर उतू गेली तर चुलीतून लाकूड बाहेर काढावे लागते. तसेच हे आहे. ४६ ... मग योग्य व्यवहार कोणता ? प्रश्नकर्ता : मुलांच्या बाबतीत योग्य काय आणि अयोग्य काय ते समजत नाही. दादाश्री : जेव्हा आपण स्वतःहून देत सुटतो तोच अतिशहाणपणा आहे. पाच वर्षाचा होईपर्यंत ते ठीक आहे. मग पुढे मुलगा म्हणेल की, 'पप्पा मला फीसाठी पैसे द्या' तेव्हा त्याला सांगा, 'पैसे नळातून येत नाहीत. दोन दिवस अगोदर सांगायला हवे होतेस. मला उधार आणावे लागतील.' असे सांगून दुसऱ्या दिवशी पैसे द्यावे. मुलांना असे वाटू लागते की, नळाला पाणी येते तसे बाबा पैसे देतात. म्हणून मुलांशी असे संबंध ठेवा की नाती तर टिकतील पण मुलगा डोक्यावर बसणार नाही, बिघडणार नाही. सध्या तर मुलांचे इतके जास्त लाड करतात की ती बिघडतात. जास्त लाड करायची काय गरज? या बकरीवर प्रेम वाटते का ? बकरीत आणि मुलात काय फरक आहे ? दोघांतही आत्मा आहे. जास्त लाड पण नाही आणि अगदी निःस्पृह पण होऊ नये. मुलांला सांगावे की काही अडचण असेल तर सांग जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत काही अडचण असेल तर जरूर सांग. अडचण असेल तरच, एरवी नाही. हे तर मुलाच्या खिश्यातून पैसे पडले तर वडील ओरडतात, 'अरे चंदू, अरे चंदू !' तुम्ही Page #62 -------------------------------------------------------------------------- ________________ फॅमिली ओर्गेनायझेशन ४७ कशाला ओरडतात? तो विचारेल तेव्हा सांगा. तुम्ही यात कशाला गोंधळ घालता? तुम्ही नसाल तेव्हा कोण पाहणार आहे? सगळे 'व्यवस्थित शक्तीच्या' ताब्यात आहे. विनाकारण ढवळाढवळ करीत राहता. शौचाला जाणे सुद्धा 'व्यवस्थित शक्तीच्या' ताब्यात आहे आणि तुमचे तुमच्यापाशी आहे. स्वत:च्या स्वरुपात स्वतः असेल तिथे पुरुषार्थ आहे, आणि स्वत:ची स्वसत्ता आहे. या पुद्गलमध्ये काही पुरुषार्थच नाही. पुद्गल प्रकृतीच्या ताब्यात आहे. मुलांचा अहंकार जागृत झाला मग त्यांना बोलण्यात काही अर्थ नाही, आणि तुम्ही कशाला बोलायचे? ठोकर लागल्यावर स्वतःच शिकेल. मुलगा पाच वर्षाचा होईपर्यंत त्याला सांगण्याची सूट आहे. पाच ते सोळा वर्षापर्यंतच्या मुलांना कारणास्तव दोन थोबाडीत द्याव्या पण लागतात. पण एकदा का वीस वर्षाचा तरुण झाला की त्याचे नाव पण घेऊ शकत नाही, त्याला एक अक्षर सुद्धा बोलू शकत नाही. तो मोठा गुन्हा होईल. मग तो बंदुकीची गोळी सुद्धा झाडेल. प्रश्नकर्ता : हे 'अनसर्टिफाईड' 'फादर' आणि 'मदर' (अपात्र आई-वडील) आहेत म्हणून हे 'कोडे' उभे झाले आहे का? दादाश्री : हो, नाहीतर मुले अशी होणारच नाहीत. तुम्ही सांगाल तशीच ती वागतील. आई-वडिलांमध्येच काही दम नाही. जमीन खराब आहे, बी खराब आहे म्हणून माल पण खराब आहे! आणि असे असून यांना वाटते की आपला मुलगा महावीरांसारखा होईल. महावीरांसारखा मुलगा कसे बरे होऊ शकेल? महावीरांची आई कशी असेल!! वडील एक वेळ कमी पात्र असतील तरी चालेल पण आई, ती तर कशी अशावी! प्रश्नकर्ता : मुलांना घडविण्यासाठी, त्यांच्यावर संस्कार घडविण्यासाठी आपण काही विचारच करायचा नाही का? दादाश्री : विचार करण्यास काही हरकत नाही. Page #63 -------------------------------------------------------------------------- ________________ ४८ क्लेश रहित जीवन प्रश्नकर्ता : अभ्यास तर शाळेत होतो; पण संस्कार घडविण्याचे काय? दादाश्री : घडवायचे काम सोनाराकडे सोपवा. त्यात जे प्रवीण (कुशल) असतील त्यांच्याकडे त्यांना सोपवा. मुलगा पंधरा वर्षाचा होईपर्यंत तुम्ही त्याला सांगू शकता. तोपर्यंत तुम्ही जसे आहात तसा त्याला बनवा. त्यानंतर त्याची बायकोच त्याला घडवील. घडवता येत नसेल तरीही लोक घडवतच राहतात ना?! म्हणून घडण चांगली होत नाही. मूर्ती चांगली होत नाही. नाक अडीच इंचाचे हवे तिथे साडे चार इंचाचे होते. मग बायको येईल ती त्याचे नाक कापून बरोबर अडीच इंचाचे करेल. नंतर तो पण तिचे नाक कापेल आणि म्हणेल, · ये आता, बघतो तूला.' कर्तव्यात नाटकीय रहा हे नाटक आहे ! नाटकातील पत्नी-मुलांना कायमची स्वत:ची मानाल तर चालेल का? हो, नाटकात बोलतात तसे बोलण्यास हरकत नाही.' हा माझा मोठा मुलगा, शतायू होवो.' पण सर्व वरवर, 'सुपरफ्लुअस', नाटकीय. या सगळ्यांना खरे (स्वतःचे) मानले त्याचेच प्रतिक्रमण करावे लागतात. जर खरे मानले नसते तर प्रतिक्रमण करावेच लागले नसते. जिथे खरे मानू लागतो तिथे राग-व्देष सुरु होतात, आणि प्रतिक्रमण केल्यानेच मोक्ष मिळतो. या दादांनी दाखवले त्या आलोचनाप्रतिक्रमण-प्रत्याख्यानानेच मोक्ष आहे. __ हा संसार तर 'तायफा' (फजिती) आहे, मोठी चेष्टाच आहे. तासभर जर मुलांशी भांडण केले तर मुलगा काय म्हणेल? 'तुम्ही इथे राहाणार असाल तर मी इथे राहाणार नाही.' त्यावर जर बाप म्हणाला, 'मी तुला माझी संपत्ती देणार नाही.' तेव्हा मुलगा म्हणेल, 'तुम्ही कोण आले मला न देणारे?' ते मारून-ठोकून घेतील असे आहेत. अरे कोर्टात एक मुलगा वकिलांना म्हणाला, 'माझ्या वडिलांचे नाक कापले जाईल Page #64 -------------------------------------------------------------------------- ________________ फॅमिली ओर्गेनायझेशन असे काही तरी करा.' मी तुम्हाला तीनशे रुपये जास्त देईन.' वडील मुलाला म्हणाला, 'तू असा निघशील असे मला माहित असते तर तुला जन्मतःच मारून टाकले असते! तेव्हा मुलगा म्हणाला की, 'तुम्ही मला मारले नाही हेही आश्चर्यच आहे ना!!' असेच नाटक घडायचे होते मग कसे मारील?! अशी नाटके तर अनंत प्रकारची घडलेली आहेत. अरे! ऐकताच कानाचे पडदे फाटतील!! अरे, याहीपेक्षा त-हेत-हेचे असंख्य किस्से या जगात घडलेले आहेत, म्हणून जगापासून सावध राहा. आता 'स्वत:च्या' देशाकडे वळा. स्वदेशात परता. परदेशात तर भूतेच भुते आहेत. जाल तिथे भुते! _कुत्री पिल्लांना दूध पाजते ते तिचे कर्तव्य आहे, ती काय काय उपकार करत नाही, म्हशीच्या रेडकूने दोन दिवस दूध प्यायले नाही तर म्हशीला खूप वेदना होते. हे तर स्वत:च्या गरजेने दूध पाजतात. बाप मुलांना मोठे करतो तेही स्वत:च्या गरजेनेच. त्यात नवीन काय केले? ते तर कर्तव्य आहे. मुलांबरोबर 'ग्लास विथ केअर' प्रश्नकर्ता : दादा घरात मुले-मुली ऐकत नाहीत. मी खूप रागावतो तरी पण काहीच परिणाम होत नाही. दादाश्री : या रेल्वेच्या पार्सल्सवर लेबल लावलेले तुम्ही पाहिले आहेत का? 'ग्लास हॅन्डल विथ केअर' (काच आहे, सांभाळा) असे लिहिलेले असते ना? तसेच घरात पण 'ग्लास हॅन्डल विथ केअर' वागावे. आता काच असेल आणि त्याला तुम्ही हातोड्याने मारत राहिले तर काय होईल? त्याच प्रमाणे घरातील माणसांना काचेप्रमाणे सांभाळले पाहिजे. तुम्हाला त्या बंडलवर (काचेच्या वस्तूंवर) कितीही चीड आली तरी तुम्ही त्यास खाली फेकाल का? लगेच वाचाल की, 'ग्लास हॅन्डल विथ केअर'! घरी काय होत असते की, काही झाले तर लगेच तुम्ही मुलींवर ओरडता की, 'अशी कशी पर्स हरवली, कुठे गेली होतीस? लक्ष Page #65 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन कुठे होते तुझे ?' असे तुम्ही हातोडे मारता. हे 'ग्लास हॅन्डल विथ केअर' समजून घेतले तर स्वरूपज्ञान दिले नसेल तरीही समजू शकेल. ५० या जगाला सुधारण्याचा रस्ताच प्रेम आहे. जग ज्याला प्रेम म्हणते ते प्रेम नाही, ती तर आसक्ती आहे. या मुलीवर प्रेम करता; पण जेव्हा तिच्या हातून ग्लास फुटतो तेव्हा प्रेम राहते का ? तेव्हा तर तुम्ही चिडता म्हणून ती आसक्ती आहे. मुले-मुली आहेत त्यांच्याशी तुम्हाला पालका प्रमाणे, ट्रस्टीप्रमाणे राहायचे आहे. त्यांच्या लग्नाची चिंता करण्याचे कारण नाही. घरात जे काही घडते त्याला 'करेक्ट' आहे असे म्हणा. 'इनकरेक्ट' म्हणाल तर काहीही फायदा होणार नाही. चुकीचे पाहणाऱ्यांना संताप होईल. ज्याचा एकुलता एक मुलगा मेला असेल त्याला करेक्ट आहे असे म्हणू नये. तिथे तुम्ही 'खूप वाईट झाले ' असे म्हणा. असा दिखावा करावा लागेल. नाटक करावे लागेल. बाकी आतून तर करेक्ट आहे असे समजून चालावे. काचेचा ग्लास जोपर्यंत हातात आहे तोपर्यंत ग्लास आहे ! नंतर तो निसटला आणि फुटला तर करेक्ट आहे असे म्हणावे. मुलीला सांगावे 'जरा जपून चालत जा, परंतु आत करेक्ट आहे असेच म्हणावे. ' रागीट वाणी निघाली नाही तर समोरच्याला टोचत नाही. फक्त क्रोधाने तोंडावर बोलणे यालाच क्रोध म्हटले जात नाही, तर आतल्या आत कुढणे तोही क्रोधच आहे. आणि सहन करणे हे तर दुप्पट क्रोध आहे. सहन करणे म्हणजे दाबत राहणे, हे तर जेव्हा स्पिंग उसळेल तेव्हा समजेल. सहन कशाला करायचे ? त्याचे समाधान तर ज्ञानाने करावे. उंदराने मिशा कुरतडल्या ते 'पाहायचे' आणि 'जाणायचे' त्यात रडारड कशासाठी ? हे जग पाहण्यासाठी आणि जाणण्यासाठी आहे ! घर, एक बाग एक भाऊ मला म्हणाला की, 'दादा, घरात माझी बायको असे करते, तसे करते.' त्यावर मी त्याला म्हणालो, 'बायकोला विचारा ती Page #66 -------------------------------------------------------------------------- ________________ फॅमिली ओर्गेनायझेशन काय म्हणते?' ती म्हणते की 'माझा नवरा एकदम बेकार आहे. बिनअकली आहे.' मग आता यात तुम्ही स्वतःसाठी एकतर्फी न्याय कशाला शोधता? तेव्हा तो भाऊ म्हणाला की, 'माझे पूर्ण घर बिघडले आहे. मुले बिघडली आहेत, बायको बिघडली आहे.' मी म्हणालो, 'काहीही बिघडलेले नाही. तुम्हाला ते बघता येत नाही. तुम्हाला तुमचे घर बघणे जमले पाहिजे.' तुमचे घर तर एक बाग आहे. सतयुग, व्दापारयुग आणि त्रेतायुगातील घरे शेतासारखी असत. एखाद्या शेतात फक्त गुलाब, एखाद्या शेतात फक्त चमेली, एखाद्या शेतात फक्त मोगरा असे होते. आता या कलियुगात शेत उरली नाहीत, फक्त बागा आहेत. म्हणजे (बागेत) एक गुलाब, एक मोगरा, एक चमेली! आता घरात तुम्ही वडीलधारी गुलाब आहात आणि घरातील सर्वांना गुलाब करू इच्छिता. तुम्ही दुसऱ्या फुलांना म्हणता की 'तू माझ्यासारखा नाहीस, तू तर पांढरा आहेस. तुला पांढरे फूल का आले? गुलाबी फूल आण. अशाप्रकारे समोरच्याला टोचून बोलत राहतात! अरे, फुलाला पाहायला (ओळखायला) तर शिका.तुम्हाला फक्त एवढेच जाणून घ्यायचे आहे के समोरच्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे? कुठल्या प्रकारचे फूल आहे. फळे-फुले येईपर्यंत रोपट्याला पाहत राहायचे की हे रोपटे कसले आहे? मला तर काटे आहेत याला नाहीत. माझे गुलाबाचे रोपटे आहे, याचे गुलाबाचे नाही. मग फूल आल्यावर आपल्याला कळेल की, 'ओहोहो! हा तर मोगरा आहे!' मग त्याच्याबरोबर मोगऱ्याप्रमाणे वागणूक ठेवावी. चमेली असेल तर चमेलीप्रमाणे वागावे, समोरच्याच्या प्रकृतीस्वभावानुसार वागणूक ठेवावी. पूर्वीच्या काळी वडिलधाऱ्यांच्या मतानुसार मुलांना, सुनांना वागावे लागे. आता कलियुगात निरनिराळी प्रकृती (स्वभाव), तेव्हा कुणाचे एकमेकांशी जुळत नाही, म्हणून या काळात तर घरातील सगळ्यांची प्रकृती ओळखून एडजस्ट होऊन राहता आले पाहिजे. एडजस्ट होणे जमले नाही तर नाती बिघडतील. म्हणून बागेला सांभाळा आणि माळी व्हा. बायकोचा प्रकृतीस्वभाव वेगळा असेल, मुलांचा, मुलींचा सगळ्यांचाच प्रकृतीस्वभाव वेगवेगळा असतो. प्रत्येकाच्या प्रकृतीस्वभावाचा Page #67 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन लाभ घ्या. हे तर रिलेटिव्ह (आधारित) संबंध आहेत, बायको सुद्धा रिलेटिव्ह आहे! अरे, हा देहच रिलेटिव्ह आहे ना! रिलेटिव्ह म्हणजे यांचाशी नीट वागला नाहीत तर ते तुम्हाला सोडून जातील! कुणालाही सुधारण्याची शक्ती या काळात संपलेली आहे. म्हणून सुधारण्याची आशा सोडूनच द्या. कारण (तुमच्यात) मन,वचन,कायेची एकात्मवृत्ती असेल तरच तुमच्याकडून समोरचा सुधरू शकेल. जसे मनात असेल तसेच वाणीत निघेल आणि तसेच वागणुकीत असेल तरच समोरचा सुधरेल. आता हे राहिलेले नाही. घरात प्रत्येकासोबत असा व्यवहार ठेवा की ज्यामुळे सगळ्यांशी नॉर्मल (सुरळीत) संबंध राहू शकतील. ___ त्यात मूर्च्छित होण्यासारखे आहेच काय? मुले 'आजोबा, आजोबा' असे म्हणतात तेव्हा आजोबा आतून खुश होतात! अरे, मुले 'आजोबा, आजोबा' म्हणणार नाहीत तर काय 'मामा, मामा' म्हणणार ?! ही मुले 'आजोबा, आजोबा' म्हणतात पण मनात समजून असतात की आजोबा म्हणजे जे थोड्या दिवसानंतर मरणार आहेत. जे आंबे आता बेकार झाले आहेत, फेकायाच्या लायाकीचे झाले आहेत त्यांचे नाव आजोबा! आणि आजोबा आतल्या आत खुश होतात की मी आजोबा झालो! असे हे जग आहे! अरे, पप्पांनाच मुलगा जर गोड, बोबड्या भाषेत म्हणाला की, 'पप्पाजी चला, आई चहा प्यायला बोलवते.' तेव्हा तो पप्पा आतून इतका खुश होतो, इतका गद्गद होतो की विचारु नका! एक तर बोबडे बोल, गोड बोल, त्यातही जर पप्पाजी म्हटले... म्हणजे तिथे तर मोठा पंतप्रधान असेल त्यांची पण काही किंमत नाही. तो मनातल्या मनात असे मानून बसतो की या जगात माझ्याशिवाय दुसरा कोणी पप्पाच नाही. अरे मुर्खा, ही कुत्री, मांजरे, गाढवे सुद्धा त्यांच्या पिल्लांचे पप्पाच आहे ना? कोण पप्पा होत नाही? ही सगळी भांडणे त्यामुळेच तर आहेत ना? समजूनउमजून कोणी पप्पा बनला नाही, असे चारित्र्य जर कोणाच्या उदयात Page #68 -------------------------------------------------------------------------- ________________ फॅमिली ओर्गेनायझेशन आले असेल त्याला तर ओवाळले पाहिजे. नाहीतर सगळे बाप बनतातच ना? ऑफिसमध्ये साहेबाने फटकारले आणि घरी मुलगा पप्पा पप्पा करत आला तर पप्पा सगळे विसरून खुश होतो कारण ही पण एक प्रकारची दारूच आहे, ती सगळे विसरवून टाकते ! ५३ एकही मुलबाळ नसेल आणि जर मूल जन्माला आले तर ते खूप हसवते, बापाला खूप आनंद देते. जेव्हा तेच मुल सोडून जाते तेव्हा तितकेच दु:खही देते. म्हणून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जे आले आहेत ते जाणारही, मग तेव्हा काय - काय होईल ? म्हणून आजपासूनच हसायचे नाही, म्हणजे नंतर कसली भानगडच नाही ना ! नाही तर कोणत्या जन्मात मुले नव्हती ? कुत्रे, मांजरे सगळ्याच ठिकाणी पिल्ले, पिल्ले आणि पिल्लांनाच कवटाळून धरले ना ! या मांजरीच्याही मुली असतातच ना ! व्यवहार नॉर्मोलीटीपूर्वक असावा म्हणून प्रत्येकात नॉर्मालीटी आणा. एका डोळ्यात प्रेम आणि एका डोळ्यात सक्ती ठेवा. सक्तीने समोरच्याला जास्त दुःख होत नाही. क्रोध केल्याने फार नुकसान होते. सक्ती म्हणजे क्रोध नाही पण फुत्कार. आम्ही पण धंद्यावर जातो तेव्हा फुत्कार मारतो, 'तुम्ही असे का करता? काम का करत नाही ?' व्यवहारात ज्या ठिकाणी जो भाव असायला हवा तो भाव उत्पन्न होत नसेल तर तो व्यवहार बिघडेल. एक माणूस माझ्याजवळ आला, तो बँकेचा मॅनेजर होता. तो मला म्हणाला की, 'मी माझ्या घरी बायकोला आणि मुलाला एक अक्षर देखील बोलत नाही. मी एकदम शांत राहतो.' त्यावर मी त्यांना म्हणालो, 'तुम्ही अगदी शेवटच्या प्रकारचे बेकार मनुष्य आहात. या जगात तुम्ही काहीच कामाचे नाहीत.' त्या माणसाला मनात असे वाटत होते की, मी असे सांगेल तर दादा मला खूप मोठे बक्षीस देतील. अरे मूर्खा, याचे काय बक्षीस दिले जाते ? मुलगा काही चुकीचे करीत असेल त्यावेळी त्याला Page #69 -------------------------------------------------------------------------- ________________ ५४ क्लेश रहित जीवन 'असे का केलेस? आता असे होता कामा नये' असे वरवर नाटकीय बोललेच पाहिजे. नाहीतर मुलाला असेच वाटेल की आपण जे काही करीत आहोत ते योग्यच करीत आहोत. कारण बापाला ते मान्य आहे. वेळप्रसंगी त्यांना टोकले नाही म्हणून तर तुमची मुले तुमच्या डोक्यावर बसली आहेत. बोलायचे सर्व परंतु नाटकीय! मुलांना रात्री जवळ बसवून शांतपणे समजवावे, चर्चा करावी. घरातील सगळेच कानेकोपरे साफ करावे लागतील ना? मुलांना थोडेसेच हलवण्याची गरज असते. तसे संस्कार तर असतातच पण थोडे कडक व्हावे लागते. त्यांना असे हलवण्यात काही गुन्हा आहे का? प्रश्नकर्ता : दादा, माझा मुलगा पंधराशे रुपये कमावतो. मी रिटायर्ड (सेवानिवृत्त) आहे, मी त्याच्यासोबत राहतो. तर आता मुलगा आणि सून मला सारखे टोकत राहतात की, 'तुम्ही असे का करतात? बाहेर का जाता?' म्हणून मी आता त्यांना सांगूनच टाकणार की, मी घर सोडून जातो. दादाश्री : तुम्हाला खायला-प्यायला नीट देतात ना? प्रश्नकर्ता : हो दादा. दादाश्री : तर मग घर सोडून जातो असे अजिबात बोलू नका. जर असे बोलून सुद्धा तुम्ही जाऊ शकला नाहीत, तर तुमचे शब्द तुम्हालाच गिळावे लागतील. प्रश्नकर्ता : म्हणजे मग मी त्यांना काहीच सांगू नको का? । दादाश्री : फार तेव्हा हळूवारपणे त्यांना एवढेच सांगावे की, 'तुम्ही असे केलेत तर बरे होईल, मग ऐकणे न ऐकणे हे तुमच्या मर्जीची गोष्ट आहे.' तुमची चापट समोरच्याला लागेल अशी असेल आणि त्यामुळे त्याच्यात काही परिवर्तन येत असेल तर काही बोला. पण जर पोकळ चापट मारली तर तो उलट जास्त उद्धटपणा करेल. त्यापेक्षा न मारणे हेच उत्तम (न बोलणेच बरे.) Page #70 -------------------------------------------------------------------------- ________________ फॅमिली ओर्गेनायझेशन घरात चार मुले असतील त्यापैकी दोघांची काहीच चूक नसेल तरीही बाप त्यांना रागवत असेल आणि ती दुसरी दोन मुले की जे नेहमीच चुका करतात त्यांना काहीच बोलत नसेल. असे सर्व घडते ते पूर्वीच्या रूटकॉजमुळे आहे. अशी आशा तर बाळगूच नका प्रश्नकर्ता : मुलांना चिरंजीव का म्हणत असतील? दादाश्री : चिरंजीव लिहिले नाही तर दुसरे शब्द घुसतील. आपला मुलगा मोठा व्हावा, सुखी व्हावा आपल्या मृत्युपूर्वी तो सुखी असलेला पाहावा, अशी भावना असते ना? तरी देखील मनात कुठेतरी अशी आशा असतेच की, म्हातारपणी त्याने माझी सेवा करावी. हे आंब्याचे रोपटे कशासाठी लावतात? आंबे खाण्यासाठी. पण आजकालची मुले, ही आंब्याची झाडे कशी आहेत? त्यांना दोनच आंबे येतील आणि बापाकडून दुसरे दोन आंबे मागतील. म्हणून (मुलांकडून) आशा-अपेक्षा ठेवूच नका. एक गृहस्थ मला म्हणाले की माझा मुलगा मला सांगतो की 'तुम्हाला दर महिन्याला शंभर रुपये पाठवू का?' तेव्हा ते भाऊ म्हणाले 'मी तर त्याला सरळ सांगितले की, 'बेटा मला तुझ्या बासमती तांदुळाची गरज नाही, माझ्या इथे बाजरी पिकते त्याने माझे पोट भरते. हा (घेण्याचा) नवीन व्यवहार कशाला सुरु करू? जे आहे त्यात मी संतुष्ट आहे.' मैत्री ती सुद्धा एक 'एडजस्टमेन्ट' प्रश्नकर्ता : मुलांना पाहुणे समजायचे का? दादाश्री : पाहुणे समजण्याची गरज नाही. या मुलांना सुधारण्याचा हा एक मार्ग आहे, त्यांच्याशी मैत्री करा. आम्ही तर लहानपणापासूनच हा मार्ग निवडला होता. म्हणून माझी एवढ्याशा छोट्या मुलांबरोबर पण मैत्री आणि पंच्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याशी पण मैत्री! मुलांशी मैत्रीचा Page #71 -------------------------------------------------------------------------- ________________ ५६ क्लेश रहित जीवन व्यवहार करायला हवा. मुले प्रेम शोधतात पण ते त्यांना मिळत नाही. म्हणून त्यांच्या अडचणी तेच जाणतात. ते सांगूही शकत नाही आणि सहनही होत नाही. आजच्या तरुणांसाठीचा मार्ग आमच्याजवळ आहे. या जहाजाची दिशा कुठे फिरवावी, याचा मार्ग आम्हाला आतूनच सापडतो. माझ्याजवळ असे प्रेम उत्पन्न झाले आहे की जे वाढतही नाही आणि कमीही होत नाही. जे वाढते, कमी होते त्यास आसक्ती म्हटली जाते. जे कमी-अधिक होत नाही ते परमात्म प्रेम आहे. या प्रेमाने कुठलाही व्यक्ती वश होऊन जातो. मला कोणालाही वश करायचे नाही, तरी देखील प्रेमामुळे प्रत्येकजण आपोआपच वश होतो. आम्ही तर निमित्त आहोत. आता खऱ्या धर्माचा उदय प्रश्नकर्ता : या नव्या पिढीतून धर्माचा लोप का होत चालला आहे? दादाश्री : धर्माचा लोप तर झालेलाच आहे, लोप (नाश) व्हायचे काहीच शिल्लक राहिलेले नाही. आता परत धर्माचा उदय होऊ लागला आहे. जेव्हा एकीकडे लोप होऊ लागतो त्याचवेळी दुसरीकडे उदयाची सुरुवात होत असते. जसे या समुद्राची ओहोटी पूर्ण होते आणि अर्ध्या तासात भरतीला सुरुवात होते. त्याचप्रमाणे हे जग चालत राहते, भरती ओहोटीच्या नियमाप्रमाणे. धर्माशिवाय तर मनुष्य जगुच शकत नाही. धर्माशिवाय मनुष्याला दुसऱ्या कशाचा आधार आहे ? ही मुले तर आरशासारखी आहेत. मुलांवरून समजते की 'आपल्यात किती चुका आहेत!' बाप रात्रभर झोपत नाही आणि मुलगा आरामशीर झोपतो, यात बापाची चूक आहे. मी बापाला म्हटले, 'यात तुझीच चूक आहे.' मागील जन्मात तूच मुलाला डोक्यावर चढवले होतेस, बिघडवले होतेस, आणि ते देखील स्वत:च्या फायद्यासाठी. म्हणजे हे समजण्यासारखे आहे. या अशा अनसर्टिफाईड फादर आणि अनसर्टिफाईड मदरच्या पोटी ही मुले जन्मलेली आहेत, त्यात ते काय करतील? वीस Page #72 -------------------------------------------------------------------------- ________________ फॅमिली ओर्गेनायझेशन पंचवीस वर्षाचा झाला की बाप होऊन जातो. अजूनपर्यंत तर त्याचाच बाप त्याच्यावर ओरडत असतो! तो तर रामभरोसे बाप बनतो. मग यात मुलाचा काय दोष? ही मुले आमच्याजवळ सगळ्या चुका मान्य करतात, चोरी केली असे तर तेही मान्य करतात. आलोचना तर जे अद्वितीय, अजोड असतील तिथेच केली जाते. हिंदुस्तानाचे अदभुत स्टेजमध्ये परिवर्तन होणार ! ५७ संस्कार प्राप्तीसाठी, तसे चारित्र्य हवे प्रश्नकर्ता : दादा. घरात शांततामय वातावरण राहील आणि आध्यात्मिक प्रगतीही करू शकू असे काही करून द्या. दादाश्री : फक्त घरातच शांतता राहील एवढेच नाही; पण मुले सुद्धा आपले बघून अधिक संस्कारी होतील. हे तर आई - वडिलांचे वेड्यासारखे वागणे पाहूनच मुलेही वेडी झाली आहेत. कारण आईवडिलांचेच आचार, विचार, पद्धतशीर नाहीत. नवरा - बायको जर स्वत:च्या मुलांच्या उपस्थितीत येडेचाळे करीत असतील तर मुले बिघडणार नाहीत तर काय होणार ? मुलांवर कसे संस्कार पडतील ? काही मर्यादा तर असायला हवी ? या निखाऱ्याचे तेज कसे असते ? लहान मुले सुद्धा या निखाऱ्यांना घाबरतात ना ? आई - वडिलांचेच मन विचलित झालेले आहे. वाटेल तसे, समोरच्याचे मन दुखावले जाईल असे ते बोलतात, म्हणून मुले बिघडतात. तुम्ही असे बोलता की नवऱ्याला दुःख होते आणि नवरा असे बोलतो की तुम्हाला दुःख होते. असे हे सर्व 'पझल' (कोडे) तयार झाले आहे. हिंदुस्तानात असे होत नसते, पण या कलियुगाचा हा परिणाम आहे, म्हणून असेच असते. त्यातही हे एक आश्चर्यकारक विज्ञान उदयास आले आहे. हे विज्ञान जो प्राप्त करेल त्याचे कल्याण होईल !! ...म्हणून सदभावनांकडे वळा प्रश्नकर्ता : मुले वाकडी वागतात अशा वेळी काय करावे ? Page #73 -------------------------------------------------------------------------- ________________ ५८ क्लेश रहित जीवन दादाश्री : मुले वेडी-वाकडी वागतात, तेव्हा देखील तुम्ही फक्त पाहत राहा आणि जाणत राहा. मनात त्यांच्या (कल्याणाची) भावना करा. आणि परमेश्वराजवळ प्रार्थना करा की त्यांच्यावर कृपा करा. ___ आपण तर जे घडले तोच न्याय म्हणावे. जो भोगतो त्याची चूक आहे. जे घडले तेच बरोबर म्हणून चालतात तर समाधान होईल, भगवंत म्हणाले की 'तू स्वतः सुधर म्हणजे तुझ्या हजेरीने सर्व सुधारेल' लहान मुला-मुलींना समजवावे की सकाळी अंघोळ वगैरे करून सूर्यपूजा करावी आणि थोडक्यात बोलावे की मला आणि साऱ्या जगाला सद्बुद्धी द्या, जगाचे कल्याण करा. एवढे बोलले तरी त्यांना संस्कार मिळाले असे म्हटले जाईल. आणि आई-वडीलही त्यांच्या कर्मबंधनातून सुटतील. हे सर्व कर्तव्यच आहे. आई-बापाने पाच हजाराचे कर्ज करून मुलाला शिकवले असेल तरी सुद्धा एखाद्या दिवशी मुलगा उद्धटपणे वागला तेव्हा आई-वडिलांना त्याला आम्ही (कर्ज करून) तुला शिकवले अशी उपकाराची भाषा बोलून दाखवू नये. ते तर तुम्ही 'ड्युटी बाऊन्ड' होते, तुमचे कर्तव्यच होते, कर्तव्य होते म्हणूनच केले. आपण फक्त आपले कर्तव्य करत राहावे. Page #74 -------------------------------------------------------------------------- ________________ [५] समजदारीने शोभेल गृहसंसार मतभेदात समाधान कशा प्रकारे काळ विचित्र येऊ राहिला आहे. वादळा पाठोपाठ वादळे येणार आहे! म्हणून सावध राहा. जशी वाऱ्याची वादळे येतात ना तशी निसर्गाची वादळे येणार आहेत. मनुष्याच्या डोक्यावर महासंकटे आहेत. रताळे जसे भट्टीत भाजले जाते त्याचप्रमाणे लोक भाजली जात आहेत ! कशाच्या आधारावर जगत आहोत, याचे स्वतःला भान नाही. स्वतःवर असलेला आत्मविश्वास पण उडाला आहे! तेव्हा आता काय होईल ? घरात बायकोशी मतभेद होतात ते दूर करता येत नाहीत. मुलांशी वाद होतात त्याचेही समाधान करता येत नाही आणि आतल्या आत गोंधळत राहतो. प्रश्नकर्ता : नवरा तर असेच म्हणतो ना की, बायकोनेच तडजोड करावी, मी नाही करणार ! दादाश्री : हं..., म्हणजे 'लिमिट' संपली. बायको तडजोड करू शकते आणि नवरा करू शकत नाही म्हणजे नवऱ्याची 'लिमिट' संपली. खरा पुरुष असेल तो तर असे बोलेले की ज्यामुळे बायको खुश होईल. आणि असे करून गाडी पुढे चालवत राहील. आणि तुम्ही तर पंधरापंधरा दिवसापर्यंत, महिनाभर गाडी उभी करून ठेवता. असे नाही चालणार. जोपर्यंत समोरच्याच्या मनाचे समाधान होत नाही तोपर्यंत तुम्हाला अडचण राहणार. म्हणून त्याचे समाधान करावे. प्रश्नकर्ता : समोरच्याचे समाधान झाले असे कशावरून म्हटले Page #75 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन जाईल? एकवेळी समोरच्याचे समाधान झालेही, पण त्यात त्याचे अहित असेल तर ? ६० दादाश्री : ते तुम्ही पाहू नका. समोरच्याचे अहित असेल ते तर त्याचे त्यालाच पाहायचे आहे. तुम्हाला समोरच्याचे हित पाहायचे, पण त्याचे हित पाहण्याची शक्ती आहे का तुमच्यात ? तुम्ही तुमचेच हित ओळखू शकत नाही मग दुसऱ्याचे हित कसे ओळखणार ? प्रत्येकजण आपापल्या क्षमतेप्रमाणे हित पहातात, तेवढे हित पाहावे. पण समोरच्याचे हित पाहता-पाहता संघर्ष निर्माण होईल असे होता कामा नये. प्रश्नकर्ता : समोरच्याचे समाधान करण्याचा आपण प्रयत्न करू पण त्याचा परिणाम काही वेगळाच होणार आहे अशी आपल्याला खात्री असेल तर मग काय करावे ? दादाश्री : परिणाम काहीही येवो, पण तुम्ही समोरच्या व्यक्तीचे समाधान करायचे आहे हा भाव निश्चित ठेवायचा. 'समभावे निकाल' करायचा आहे असे नक्की करा, मग निकाल होणार की नाही होणार याचा विचार आधीपासून करू नये. आणि निकाल निश्चित होणारच ! आज नाहीतर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी. खूपच चिकट असेल तर दोन वर्ष, तीन वर्ष किंवा पाच वर्षही लागतील. बायकोचे ऋणानुबंध खूप गाढ (चिकट असतात) तिथे थोडा जास्त वेळ लागतो. हे सगळे आपल्यासोबतच असतात, तिथे निकाल हळूहळू होतो. पण आपण ठरवले आहे की, कधी ना कधी आपल्याला समभावे निकाल करायचाच आहे म्हणून त्याचा निकाल होईलच, त्याचा अंत येईलच. जिथे चिकट ऋणानुबंध असतात तिथे फार जागृत राहावे लागते, अगदी छोटासा साप असला तरी देखील सतत सावध राहावे लागते. बेसावध राहिलो तर समाधान होणार नाही. समोरची व्यक्ती बोलली आणि तुम्ही सुद्धा बोललात, बोलण्यातही हरकत नाही, पण बोलण्यामागे 'समभावे निकाल करायचा आहे' असा तुमचा निश्चय आहे, म्हणून द्वेष राहत नाही. बोलले Page #76 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार ६१ जाणे हा पुद्गल स्वभाव आहे आणि द्वेष ठेवणे यामागे तुमचा आधार आहे. म्हणून आपल्याला तर समभावे निकाल करायचा आहे असा ठाम निश्चय करून काम करीत राहायचे मग हिशोब चुकता होणारच. मागणाऱ्याला आज नाही देऊ शकलो तर उद्या देऊ. होळी आल्यावर देऊ, नाही तर दिवाळी आल्यावर देऊ. पण मागणारा घेऊनच जाईल. या जगातील लोक हिशोब चुकवल्यानंतर तिरडी वर जातात. या जन्माचे हिशोब कसेही करून चुकते करतात पण या जन्मात नवीन बांधतात ते वेगळे. आता आपण नवीन (हिशोब) बांधत नाही आणि जुने आहेत ते या जन्मात चुकते होणारच. सगळे हिशोब संपले म्हणून भाऊ चालले तिरडीवर! आणि जिथे हिशोब अपूर्ण राहिले असतील तिथे आणखी काही दिवस जास्त राहावे लागेल. या जन्माचे सगळे हिशोब या शरीराच्या माध्यमाने चुकतेच होऊन जाणार. आणि या जन्मात जितका गुंता केला असेल तो सोबत घेऊन जातो, मग पुढील जन्मात नव्याने हिशोब सुरु होतो. ...म्हणून संघर्ष टाळा म्हणून कोणत्याही परिस्थितीत संघर्ष टाळा. या संघर्षामुळे या जन्माचे तर बिघडवतातच परंतु पुढील जन्माचे सुद्धा बिघडवतात! जो या जन्माचे बिघडवतो तो पुढच्या जन्माचे बिघडवल्याशिवाय राहत नाही! ज्याचा हा जन्म सुधरतो त्याचा पुढचा जन्म सुद्धा सुधरतो. या जन्मात जर आपल्याला कोणत्याच प्रकारची अडचण आली नाही तर समजावे की पुढील जन्मासाठी पण काहीच अडचणी नाही. आणि इथे केलेल्या सर्व अडचणी पुढच्या जन्मात सोबतच येणार आहेत. प्रश्नकर्ता : संघर्षाचा सामना संघर्षाने केला तर काय होते? दादाश्री : डोके फुटते! एक माणूस मला संसार पार करण्याचा मार्ग विचारत होता. त्यास मी सांगितले की, 'संघर्ष टाळ.' त्याने मला विचारले की, 'संघर्ष म्हणजे काय' तेव्हा मी म्हणालो की आपण सरळ Page #77 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन चालत असू आणि रस्त्यात खांब आला तर आपण त्या खांबाला वळून चालले पाहिजे की, त्या खांबाला धडक दिली पाहिजे?' तो म्हणाला की 'नाही! धडक दिली तर डोके फुटेल.' प्रश्नकर्ता : वाटेत जर दगड पडलेला असेल तर आपण काय करायला हवे? तर दगडाला फिरून जायला हवे. रस्त्यात जर म्हशीचा भाऊ (रेडा) आडवा आला तर तुम्ही काय कराल? म्हशीच्या भावाला ओळखतात ना तुम्ही? तो समोरून येत असेल तर त्याच्यापासून लांब जावे लागेल नाही तर शिंगे मारून आपले डोकं फोडून टाकेल. त्याचप्रमाणे जर अशा प्रकारचा मनुष्य येत असेल तर लांबून जावे लागते. असेच संघार्षाचेही आहे. एखादा मनुष्य आपल्यावर रागावण्यासाठी आला, त्याचे शब्द तोफांच्या गोळ्यासारखे निघत असतील, तेव्हा आपण समजून घ्यायला हवे की, आपल्याला संघर्ष टाळायचा आहे. ध्यानी मनी नसताना जर अचानकच आपल्या मनावर काही परिणाम होऊ लागला तर अशा वेळेस आपण हे समजावे की, समोरच्याच्या मनाचा परिणाम आपल्यावर झाला आहे. म्हणून आपण तिथून निघून जावे. हे सगळे संघर्ष आहेत. हे जसजसे तुम्ही समजू लागाल तसतसे तुम्ही संघर्ष टाळू शकाल, संघर्ष टाळल्याने मोक्ष प्राप्त होतो! हे जग एक संघर्षच आहे. स्पंदन स्वरूप आहे. १९५१ साली मी एका 'व्यक्तीला हे एक सूत्र दिले होते. संघर्ष टाळ' असे त्याला सांगितले होते आणि अशाप्रकारे त्याला समजावले होते. म्हणजे मी शास्त्र वाचत होतो तेव्हा तो येऊन मला म्हणाला की, 'दादा, मला काहीतरी द्या.' तो माझ्या इथे नोकरी करत होता, तेव्हा मी त्याला म्हणालो, 'तुला काय देणार? तू तर आख्या जगाशी, सगळ्यांशीच भांडण करून येतोस, मारामारी करून येतोस. रेल्वेत सुद्धा दोन हात करून येतोस, असे तर पैशाला पाण्यासारखे खर्च करतोस, आणि रेल्वेत जे नियमानुसार पैसे भरायला हवे ते भरत नाहीस आणि वरून त्यांच्याशी भांडण करतोस.' हे सर्व मला माहित होते म्हणून मी त्याला म्हणालो की तू संघर्ष टाळ. तुला इतर काही शिकण्याची गरज नाही. तो आज सुद्धा Page #78 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार पाळत आहे. आता जरी तुम्ही त्याच्याशी संघर्ष करण्याच्या कितीही नव्या-नव्या पद्धती शोधून काढल्या, तहेतहेच्या शिव्या दिल्या तरीही तो संघर्ष न करता तिथून निसटून जाईल. म्हणजे संघर्ष टाळा, संघर्षानेच हे जग टिकून आहे. यालाच भगवंताने 'जग वैरभावाने निर्माण झाले' असे म्हटले आहे. प्रत्येक मनुष्य, फक्त मनुष्यच नव्हे तर प्रत्येक जीव वैर बांधत असतो. प्रमाणापेक्षा जास्त झाले म्हणजे वैर बांधल्याशिवाय राहतच नाही. मग तो साप असो, विंचू असो, बैल असो की रेडा असो कुणीही असो पण शेवटी वैर बांधतोच. कारण प्रत्येकात आत्मा आहे. आत्मशक्ती प्रत्येकात सारखीच आहे. कारण या पुद्गलच्या निर्बळतेमुळे सहन करावे लागते. पण सहन करण्याबरोबर तो वैर बांधल्याशिवाय राहत नाही. किंबहुना तो पुढच्या जन्मी या वैराचा बदलाही घेतो! सहन? नाही, समाधान आणा प्रश्नकर्ता : दादा, संघर्ष टाळायचे तुम्ही जे सांगितले याचा अर्थ सहन करणे असाच झाला ना? दादाश्री : संघर्ष टाळायचा म्हणजे सहन करणे नव्हे. सहन कराल तर किती करू शकाल? सहन करणे आणि स्प्रिंग दाबणे हे दोन्ही सारखेच आहे. स्प्रिंग दाबून ठेवलेली किती दिवस राहील?! म्हणून सहन करण्याचे शिकूच नका, गोष्टीवर तोडगा आणण्याचे शिका. अज्ञान दशेत सहनच करण्याचे असते. नंतर एक दिवस स्प्रिंग इतकी जोरात उसळते की सर्व उध्वस्त करुन टाकते. निसर्गाचा नियमच हा असा आहे. कुणामुळे आपल्याला सहन करावे लागेल असा जगाचा नियमच नाही. दुसऱ्यांमुळे आपल्याला जे काही सहन करावे लागते तो खरोखर तर आपलाच हिशोब आहे, पण आपल्याला हे समजत नाही की हा Page #79 -------------------------------------------------------------------------- ________________ ६४ क्लेश रहित जीवन कुठला आणि कोणत्या खात्याच्या माल आहे ? म्हणून आपल्याला असे वाटते की या व्यक्तीने नवीन माल द्यायला सुरुवात केली. नवीन कोणी देतच नाही, आपण पूर्वी दिलेलाच परत येतो. आपल्या या ज्ञानात सहन करण्याचे नसतेच. ज्ञानाने खुलासा करून घ्यावा की समोरचा 'शुद्धात्मा' आहे. हे जे काही दुःख आले आहे ते माझ्याच पूर्वकर्माच्या उदयामुळे आले आहे. समोरची व्यक्ती तर मात्र निमित्त आहे. मग हे ज्ञान आपसूकच आपल्याला कोडे सोडवून देते. प्रश्नकर्ता : याचा अर्थ असाच झाला ना की आपण आतल्या आत मनाचे समाधान करुन घ्यायचे की आपण पूर्वी पाठवलेलाच माल पुन्हा परत आला आहे असेच ना? दादाश्री : तो स्वतः शुद्धात्मा आहे आणि ती त्याची प्रकृती आहे. प्रकृती फळ देत आहे. आपण शुद्धात्मा आहोत, तो पण शुद्धात्मा आहे. आता या दोघांची वायर कुठे जोडली जाते? तुमची प्रकृती, आणि त्याची प्रकृती, दोन्ही समोरासमोर सर्व हिशोब चुकवतात. यात तुमच्या प्रकृतीच्या कर्माचा उदय आहे म्हणून तो तुम्हाला काहीतरी देत आहे. म्हणून तुम्ही असे म्हणा की हा आपल्याच कर्माचा उदय आहे आणि यात समोरचा निमित्त आहे, तो परत करून गेला म्हणून आपला हिशोब मिटला. जिथे हे सोल्युशन असेल तर मग तिथे मग सहन करण्याचे राहतच नाही ना? सहन केल्याने काय होईल? असे स्पष्टीकरण केले नाही तर एके दिवस ती स्प्रिंग जोरात उसळेल. स्प्रिंग उडताना पाहिली आहे का? माझी स्प्रिंग खूप उडत होती. मी खूप दिवस सहन करायचो आणि ज्या दिवशी ती स्प्रिंग उसळली की सगळे तोडफोड करून टाकायचो. हे सर्व अज्ञानदशेत होत असे, याची मला जाणीव आहे. ते माझ्या लक्षात आहे. म्हणूनच मी सांगतो ना की सहन करण्याचे शिकू नका. सहन करायचे तर अज्ञान दशेत असते. आपल्या इथे तर विश्लेषण करुन द्यायचे की याचा परिणाम काय, याचे कारण काय हे आपल्या हिशोब खात्यात Page #80 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार पद्धतशीरपणे पाहून द्यायचे. कोणतीही वस्तू आपल्या खात्याच्या बाहेरची नसते. हिशोब चुकता झाला की नवीन कॉजेस पडलीत? प्रश्नकर्ता : नवीन दणेघणे होऊ नये हे कसे होऊ शकेल? दादाश्री : नवीन देणेघेणे कशास म्हणतात? तर कॉजेस-कारणे, यांना नवीन देणेघेणे म्हणतात. घडत आहे तो सर्व परिणाम आहे आणि कारणे अदृश्य आहेत (ती दिसत नाहीत) इंद्रियांद्वारे कॉजेस दिसत नाहीत, पण दिसतात ते सर्व परिणामच आहेत. म्हणून तुम्ही हे समजले पाहिजे की हिशोब पूर्ण झाला. नवीन जे होत असते ते आत होत असते, ते आत्ता दिसणार नाही, ते तर जेव्हा परिणाम येईल तेव्हा दिसेल. आत्ता कच्च्या हिशोबात लिहिले जात आहे नंतर ते पक्क्या हिशोबात नोंदविले जाईल. प्रश्नकर्ता : मागील पक्क्या हिशोबात नोंद झालेले ते आता उदयात येते का? दादाश्री : हो. प्रश्नकर्ता : हा जो संघर्ष होतो तो 'व्यवस्थित शक्तीच्या' आधारामुळेच होतो ना? दादाश्री : हो. हा संघर्ष होतो तो 'व्यवस्थित शक्तीच्या' आधारामुळेच होत असतो, पण असे केव्हा म्हणायचे? तर संघर्ष झाल्यानंतर. आपल्याला संघर्षात पडायचे नाही असा आपला निश्चय असतो. समोर खांब दिसला तेव्हा आपण समजतो की रस्त्यात खांब येणार आहे, वळन जावे लागेल. घडक टाळायची आहे. आणि तरी देखील घडकलो, तेव्हा आपण म्हणू शकतो की 'व्यवस्थित' आहे. आधीच आपण 'व्यवस्थित' आहे असे मानून चाललो तर तो 'व्यवस्थित शक्तीचा' दुरुपयोग म्हटला जाईल. Page #81 -------------------------------------------------------------------------- ________________ ६६ क्लेश रहित जीवन 'न्याय स्वरूप, ' तिथे उपाय तप प्रश्नकर्ता : संघर्ष टाळायचा, समताभावे निकाल करायचा, अशी आपली वृत्ती (इच्छा) असेल, तरी सुद्धा समोरचा मनुष्य आपल्याला हैराण करत असेल, अपमान करत असेल मग अशावेळी आपण काय करावे ? दादाश्री : काहीच नाही. हा आपला हिशोब आहे म्हणून त्याचा समभावे निकाल करायचा आहे असा तुम्ही निश्चय करा. तुम्हाला तुमच्या नियमातच राहायचे आणि तुमच्या परिने प्रश्न सोडवत राहायचे. प्रश्नकर्ता : समोरच्या व्यक्तीने माझा अपमान केला आणि मला अपमान वाटला, याचे कारण माझा अहंकार आहे ? दादाश्री : खरे तर, समोरचा अपमान करतो तेव्हा तो तुमचा अहंकार विरघळवत असतो. आणि तो सुद्धा ड्रामेटिक अहंकार. जितका एक्सेस अहंकार असतो तोच विरघळतो, त्यात काय बिघडेल ? ही कर्म आपल्याला सुटू देत नाहीत. आपण तर लहान मुल समोर असले तरी म्हटले पाहिजे 'ये बाबा, आता सुटका कर. ' तुमच्यावर कोणी अन्याय केला आणि तुम्हाला असे वाटले की माझ्यावर हा अन्याय का केला तर तुमचे कर्म बांधले जाईल. कारण तुमच्या चुकीमुळे समोरच्याला तुमच्यावर अन्याय करावा लागत आहे. आता बुद्धीला हे कसे काय समजणार ? त्यामुळे सगळे लोक भांडणत बसतात. भगवंताच्या भाषेत कोणी न्याय पण करत नाही आणि अन्याय पण करत नाही, योग्य तेच करतात. आता या लोकांची बुद्धी इथपर्यंत कशी पोहोचेल? घरातील मतभेद कमी होतील, भानगडी कमी होतील, आजूबाजूच्या लोकांना आपल्याविषयी प्रेम वाटेल तर आपण समजू की ज्ञान समजले म्हणून. नाही तर ज्ञान समजलेले नाही. ज्ञान सांगते की, तू न्याय शोधत राहिलास तर तू मूर्ख आहेस ! म्हणून त्याच्यावर उपाय आहे तप ! Page #82 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार कोणी तुमच्यावर अन्याय केला असेल तर भगवंताच्या भाषेत ते करेक्ट आहे आणि संसारी भाषेत त्यास चुकीचे केले असे म्हणतील.. हे जग पूर्णपणे न्यायस्वरूप आहे. ही काही नुसती थाप नाही. एक मच्छर देखील तुम्हाला विनाकारण स्पर्श करू शकेल असे होत नाही. मच्छर चावला म्हणजे यामागे काही कारण आहे. नाही तर एक स्पंदन सुद्धा तुम्हाला विनाकारण स्पर्श करू शकत नाही. तुम्ही पूर्ण स्वतंत्र आहात. तुमच्या आड कोणीही येऊ शकत नाही. प्रश्नकर्ता : संघर्षात मौन ठेवणे हितकारी आहे की नाही? दादाश्री : मौन तर खरोखर खूप हितकारी आहे. प्रश्नकर्ता : पण दादाजी बाहेर मौन असेल पण आत तर आकाशतांडव चालत असेल त्याचे काय? दादाश्री : असे मौन काहीच कामाचे नाही. मौन तर सर्वात प्रथम मनाचे असले पाहिजे. सर्वात उत्तम एडजस्ट एव्हरीवेर प्रश्नकर्ता : जीवनात स्वभाव जुळत नाहीत म्हणूनच संघर्ष होतात ना? दादाश्री : संघर्ष होणे, याचेच नाव संसार आहे! प्रश्नकर्ता : संघर्ष होण्याचे कारण काय? दादाश्री : अज्ञानता. प्रश्नकर्ता : फक्त शेठजींबरोबरच संघर्ष होतो असे नाही, तर सगळ्यांशीच होत असतो, त्याचे काय? दादाश्री : हो, सगळ्यांशीच होतो. अरे, या भिंतीबरोबरही होतो. प्रश्नकर्ता : त्यावर उपाय काय? Page #83 -------------------------------------------------------------------------- ________________ ६८ क्लेश रहित जीवन दादाश्री : आम्ही समजावतो त्यानंतर या भिंतीबरोबर सुद्धा संघर्ष होणार नाही. या भिंतीवर आपटतात त्यात कोणाचा दोष? ज्याला लागले त्याचा दोष. त्यात भिंतीला काय देणेघेणे? चिकट मातीत तुमचा पाय सरकला तर चूक तुमचीच. चिकट माती तर फक्त निमित्त आहे. तुम्ही निमित्त समजून मातीत पायाची बोटे रुतवून घ्यावी. चिकट माती तर असतेच आणि घसरवणे हा तर तिचा स्वभावच आहे. प्रश्नकर्ता : पण भांडण होण्याचे कारण काय? एकमेकांचे स्वभाव जुळत नाही म्हणून? दादाश्री : अज्ञानता आहे म्हणून. संसार त्यासच म्हताले जाते ज्यात कोणाशीच कोणाचा स्वभाव जुळत नाही. हे ज्ञानच त्यावर एकमात्र उपाय आहे, ‘एडजस्ट एव्हरीवेर' कोणी तुला मारले तरीही तुला त्याच्याशीही एडजस्ट होऊन जायचे. प्रश्नकर्ता : बायकोशी बऱ्याचदा भांडणे होतात. अगदी वीट येतो. दादाश्री : नुसता वीट येतो असे नाही, कित्येक तर समुद्रात जाऊन जीव देतात, दारू पिऊन येतात. सर्वात मोठे दुःख कशाचे आहे? तर 'डीसएडजस्टमेन्ट' चे. तिथे 'एडजस्ट एव्हरीवेर' केले तर काय वाईट आहे. प्रश्नकर्ता : यासाठी तर पुरुषार्थ हवा. दादाश्री : पुरुषार्थाची गरज नाही. फक्त माझी आज्ञाच पाळायची की, 'दादांनी' एडजस्ट एव्हरीवेर असे सांगितले आहे. मग एडजस्ट होता येईल. बायको म्हणाली की 'तुम्ही चोर आहात.' तर म्हणायचे की, 'यु आर करेक्ट' आणि थोड्यावेळाने म्हणाली की, 'नाही, तुम्ही चोरी केली नाही.' तेव्हा सुद्धा म्हणा की 'यु आर करेक्ट.' ब्रम्हदेवाचा एक दिवस म्हणजे आपले संपूर्ण आयुष्य! Page #84 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार ब्रम्हदेवाच्या एका दिवसाइतकेच जगायचे आहे, मग कशाला एवढा वैताग? ब्रम्हदेवाच्या शंभर वर्षाएवढे जगायचे असेल तर आपण समजू शकतो की ठीक आहे, मग आपण कशाला एडजस्ट व्हायचे? खटला चालव असे सांगू. पण ज्याला संसार चक्रातून लवकर सुटायचे असेल, त्याला काय करावे लागेल? एडजस्ट व्हायचे की मग खटला चालव असे सांगायचे? आपल्याला तर एकच दिवस काढायचा आहे, आणि लवकर आवरते घ्यायचे आहे. जे काम लवकर संपवायचे असेल मग त्यासाठी काय करावे लागेल? 'एडजस्ट' होऊन थोडक्यात मिटवायचे, नाहीतर ते लांबतच जाईल. हो की नाही? बायकोशी भांडलात तर रात्री झोप लागेल का? आणि सकाळी नाश्ता पण चांगला मिळत नाही. आम्ही या संसाराचे खूप सूक्ष्म संशोधन केले आहे. अगदी अंतिम प्रकारचे संशोधन करून या सर्व गोष्टी सांगत आहोत! व्यवहारात कसे वागावे हे पण सांगतो आणि मोक्षला जाण्यासाठी काय करावे तेही सांगतो. तुमच्या अडचणी कमी कशा होतील हे समजावणे हाच आमचा उद्देश आहे. घरातले वर्चस्व सोडावेच लागेल ना? घरात आपण आपले चलन (वर्चस्व,सत्ता) ठेवू नये. जो मनुष्य वर्चस्व ठेवतो त्याला भटकावे लागते. आम्ही पण हीराबां (दादाश्रींच्या पत्नी) ना सांगितलेले होते की आम्ही खोटे नाणे आहोत. आम्हाला भटकलेले परवडणार नाही ना! न चालणाऱ्या नाण्याने काय करावे? त्याने देवाजवळ बसून राहायचे. घरात तुमचे वर्चस्व गाजवायला जाल तर संघर्ष होईल ना? आपण तर आता समभावे निकाल करायचा. घरात बायकोसोबत फ्रेंड (मित्रा) सारखे राहायचे. ती तुमची फ्रेंड आणि तुम्ही तिचे फ्रेंड! इथे कसल्या नोंदी ठेवायच्या नाही की सत्ता तुझी होती की त्याची होती! म्युनिसिपालिटीत पण नोंद होत नाही आणि देवाकडेही नोंद होत नाही. Page #85 -------------------------------------------------------------------------- ________________ ७० क्लेश रहित जीवन तुम्हाला नाश्त्याशी काम आहे की सत्तेशी काम आहे? म्हणून चांगला नाश्ता कशाप्रकारे मिळेल तेवढेच बघा. म्युनिसिपालिटीवाले जर नोंद करत असतील की घरात कोणाची सत्ता आहे तर मी पण एडजस्ट झालो नसतो, पण वास्तवात अशी नोंद कोणीच करत नाही! तुमचे पाय दुखत असतील आणि बायको तुमचे पाय चेपत असेल आणि त्यावेळी कोणी आले आणि हे पाहून म्हणाले की, ओहोहो! तुमची तर घरात चांगलीच सत्ता आहे. तेव्हा तुम्ही म्हटले पाहिजे की, 'छे, छे, सत्ता तर तिचीच आहे.' आणि तुम्ही जर असे म्हटले की हो, माझीच सत्ता आहे, तर ती पाय चेपायचे सोडून देईल. त्यापेक्षा तुम्ही म्हणा की, नाही, घरात तीचीच सत्ता आहे. प्रश्नकर्ता : यास मस्का लावले असे नाही का म्हणता येणार? दादाश्री : नाही, याला स्ट्रेट वे (सरळ रस्ता) म्हटला जातो, आणि दुसरे सगळे आडवळणाचे रस्ते म्हटले जातील. या दुषमकाळात सुखी होण्यासाठी मी जो रस्ता सांगतो तो वेगळा रस्ता आहे. मी या काळासाठी सांगत आहे. आपण आपला नाश्ता का बरे बिघडवायचा? सकाळचा नाश्ता बिघडेल, दुपारचे जेवण बिघडेल, पूर्ण दिवस बिघडेल!! रिअॅक्शनरी प्रयत्नच करुच नये प्रश्नकर्ता : सकाळी झालेले भांडण दुपारी विसरूनही जातो आणि संध्याकाळी पुन्हा नवीन भांडण होते. दादाश्री : भांडण कुठल्या शक्तीमुळे होते ते आम्ही जाणतो. ती वेडेवाकडे बोलते त्यात कोणती शक्ती काम करत आहे. तेही आमच्या लक्षात येते. बोलून पुन्हा एडजस्ट, होतो, हे सर्व ज्ञानाने समजेल असे आहे, तरी देखील जगात वावरताना एडजस्ट व्हायचे. कारण प्रत्येक गोष्ट 'अंत येणारी' असते. आणि कदाचित ते दीर्घ काळापर्यंत टिकली तर तुम्ही त्यात मदत करत नाही, उलट जास्त नुकसान करता. तुमचे स्वतःचेही Page #86 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार ७१ नुकसान करता आणि समोरच्याचेही नुकसान होते! त्याला कोण सुधारू शकेल? जो स्वतः सुधरलेला असतो तोच सुधारू शकेल? स्वत:च धड नाही तो दुसऱ्याला काय सुधारणार? प्रश्नकर्ता : आपण सुधरलो असू तर दुसऱ्याला सुधारू शकतो ना? दादाश्री : हो सुधारू शकतो. प्रश्नकर्ता : सुधारलेल्याची व्याख्या काय? दादाश्री : तुम्ही समोरच्या व्यक्तीला रागावले तरीही तुमच्या रागावण्यात समोरच्याला प्रेम वाटेल. तुम्ही त्याला खडसावले तरीही तुमच्याविषयी त्याला प्रेमच वाटेल की, ओहोहो! माझ्या वडिलांचे माझ्यावर किती प्रेम आहे ! रागवा, पण प्रेमाने रागावले तर तो सुधरेल. या कॉलेजमध्ये प्रोफेसर विद्यार्थ्यांना रागवू लागले तर विद्यार्थी प्रोफेसरांना देखील मारतील! समोरचा सुधारावा यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, पण जे प्रयत्न 'रिअॅक्शनरी' असतील असे प्रयत्न करु नये. आपल्या रागावल्यामुळे त्याला दुःख होत असेल तर त्यास प्रयत्न म्हणत नाही. प्रयत्न आत केले पाहिजे, सूक्ष्म रितीने! स्थूल रितीने प्रयत्न करणे आपल्याला जमत नसेल तर सूक्ष्म रितीने प्रयत्न करावा. जास्त रागावल्याने बिघडत असेल तर थोडक्यात सांगावे की, 'आपल्याला हे शोभत नाही.' बस, एवढेच सांगून गप्प बसावे. सांगावे तर लागते पण सांगण्याचीही एक पद्धत असते. नाही तर प्रार्थनेचे 'एडजस्टमेन्ट' प्रश्नकर्ता : समोरच्याला समजावण्यासाठी मी पुरुषार्थ केला मग त्याला समजेल किंवा नाही समजेल तो त्याचा पुरुषार्थ म्हणायचा का? दादाश्री : त्याला समजावण्याचा प्रयत्न करणे एवढीच तुमची Page #87 -------------------------------------------------------------------------- ________________ ७२ क्लेश रहित जीवन जबाबदारी. त्याला समजले नाही तर तुम्ही काय करणार ? त्याला उपाय नाही. तुम्ही फक्त एवढेच म्हणा की, 'हे दादा भगवान! याला सद्बुद्धी द्या.' एवढे तुम्हाला म्हणावे लागेल. त्याला तुम्ही अधांतरी सोडू शकत नाही, ही काही नुसती थाप नाही. हे दादांचे एडजस्टमेन्टचे विज्ञान आहे, आश्चर्यकारक एडजस्टमेन्ट आहे हे. आणि जिथे तुम्ही एडजस्ट होत नाही तिथे तुम्हाला ते समजून येईलच ना ? डीसएडजस्टमेन्ट म्हणजेच मूर्खपणा. कारण त्याला वाटते की माझा नवरेपणा मी सोडणार नाही, आणि माझेच वर्चस्व राहिले पाहिजे! मग आयुष्यभर उपाशी मरशील आणि एक दिवशी ताटात विष पडण्याची वेळ येईल! सहज चालत आहे, त्यास चालू दे ना ! हे तर कलियुग आहे ! वातावरणच कसे झाले आहे !! म्हणून बायको जर म्हणाली की, 'तुम्ही नालायक आहात.' तर म्हणावे 'खूप छान. ' प्रश्नकर्ता : माझी बायको मला नालायक म्हणाली, की डोक्याचा पारा चढतो. दादाश्री : मग तुम्ही कोणता उपाय कराल ? तू डबल नालायक आहेस असे म्हणणार का ? त्यामुळे तुमची नालायकी पुसली गेली का? तुमच्यावर एक शिक्का मारला म्हणून काय तुम्ही दोन शिक्के मारायचे ? मग नाश्ता बिघडेल आणि पूर्ण दिवसही बिघडेल. प्रश्नकर्ता : एडजस्टमेन्टची जी गोष्ट आहे, त्यामागील भाव काय आहे ? मग कुठे पोहोचायचे आहे ? दादाश्री : भाव शांतीचा आहे, शांती मिळवणे हा हेतू आहे. वाटू नये यासाठी एक युक्ती आहे. अशांती ज्ञानीकडून 'एडजस्टमेन्ट' शिका एक भाऊ होते. ते रात्री दोन वाजता बाहेरून काय - काय कारनामे करून येत असतील त्याचे वर्णन करण्यासारखे नाही. तुम्हीच समजून Page #88 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार ,, घ्या. मग घरातल्या सगळ्यांनी निश्चय केला की एक तर याला घरातच घेऊ नये किंवा चांगली खरडपट्टी काढावी. काय करावे यातले ? सगळ्यांनी त्याला आजमावले. मोठा भाऊ सांगायला गेला तेव्हा तो मोठ्या भावाला म्हणाला की, 'तुम्हाला मारल्याशिवाय सोडणार नाही. नंतर घरातील सगळेजण मला विचारायला आले की, 'आम्ही काय करावे ? हा तर असे बोलतो. ' तेव्हा मी त्यांना सांगितले की, कुणी त्याला एक अक्षरही बोलू नका. तुम्ही बोलाल तर तो जास्त उर्मट होईल, आणि घरात घेतले नाही तर तो बंडखोर होईल, बाहेर तमाशा करेल. त्याला वाटेल तेव्हा येऊ दे आणि जायचे तेव्हा जाऊ दे. तुम्ही त्याला बरोबर पण म्हणायचे नाही आणि चुकीचे पण म्हणायचे नाही. त्याच्यावर राग पण ठेवायचा नाही आणि द्वेषपण करायचा नाही. समता ठेवायची, करुणा ठेवायची. असे केल्यावर तीन - चार वर्षांनी तो भाऊ सुधारला ! आज तर तो धंद्यात खूप मदत करतो. जगात कोणी निरुपयोगी नाही, पण काम करवून घेता आले पाहिजे. सगळेच परमात्मा आहेत. आणि प्रत्येकजण वेगवेगळे काम सांभाळत आहे, म्हणून कुणाबद्दल नापसंत भाव ठेऊ नका. ७३ आश्रित असलेल्याला छळणे, घोर अन्याय प्रश्नकर्ता : माझ्या बायकोशी माझे अजिबात जमत नाही. कितीही निर्दोष गोष्ट केली, माझे खरे असले तरीही ती उलटच अर्थ काढते. बाहेरचा जीवनसंघर्ष तर चालू आहे, पण या व्यक्तीसंघर्षांचे काय करणार ? दादाश्री : असे आहे, की मनुष्य आपल्या हाताखालील माणसांना इतका छळतो, की काही बाकीच ठेवत नाही. एकदा का स्वतःच्या हाताखाली कोणी माणूस सापडला, मग ती स्त्री असो की पुरुष असो, स्वतःच्या सत्तेत आलेल्या माणसावर अधिकार गाजवून त्याला छळण्यात काहीच बाकी ठेवत नाही. Page #89 -------------------------------------------------------------------------- ________________ ७४ क्लेश रहित जीवन घराच्या माणसांशी कधीही भांडू नये. तिथेच जर राहायचे आहे मग भांडण-तंटे कशासाठी? दुसऱ्यांना त्रास देऊन स्वत: कधीही सुखी होऊ शकत नाही, आणि आपल्याला तर दुसऱ्यांना सुख देऊन सुखी व्हायचे आहे. आपण घरात सुख दिले तरच आपल्याला सुख मिळेल आणि चहापाणी पण चांगले बनवून देतील नाहीतर चहा-पाणी सुद्धा नीट देणार नाहीत. कमजोर नवरा बायकोवर शूरवीर. ज्यांचे रक्षण करायला पाहिजे त्यांचे भक्षण कसे करू शकतो! जो आपल्या आश्रित आहे त्याचे रक्षण करायला हवे, हेच सर्वोच्च ध्येय असले पाहिजे. त्याच्याकडून गुन्हा झाला असेल तरीदेखील त्याचे रक्षण करायला पाहिजे. हे पाकिस्तानचे सैनिक आता आपल्या इथे (भारतात) कैदेत आहेत तरीही त्यांचे रक्षण केले जाते ना! मग हे तर आपल्या घरातलेच आहेत ना! हे तर बाहेरच्यांसमोर मांजरीसारखे होतात, तिथे भांडण करत नाहीत आणि घराच्यांवरच शूरता दाखवतात! स्वत:च्या हाताखालच्या माणसांना तुडवत राहतात आणि वरिष्ठांना साहेब, साहेब करतात. पोलीसवाल्याने धमकावले तर त्याला 'साहेब, साहेब' म्हणेल आणि घरी बायको खरे बोलत असेल तरी त्याला सहन होणार नाही आणि तिच्यावर ओरडेल. 'माझ्या चहाच्या कपात मुंगी कुठून आली?' असे ओरडून घरच्यांना दरडावतो आणि पोलीसवाल्या समोर थरथरतो आता यास तर घोर अन्याय म्हटला जाईल. आपल्याला हे शोभत नाही. बायको तर स्वतःची भागीदार म्हटली जाते. तिच्याशीही भांडण? घरात असे क्लेश होत असतील तर काही मार्ग काढावा लागतो, समजवावे लागते. घरातच राहायचे मग क्लेश कशाला? 'सायन्स' समजून घेण्यासारखे प्रश्नकर्ता : आपली क्लेश करायची इच्छा नसेल पण समोरून कोणी भांडायला येत असेल तर काय करावे? त्यात एक जागृत असेल आणि दुसरा क्लेश करत असेल अशा परिस्थितीत भांडण तर होणारच ना? Page #90 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार दादाश्री : या भिंतीबरोबर भांडायचे ठरवले तर किती वेळ भांडू शकाल? या भिंतीवर कधी डोके आपटले गेले तर आपण त्या भिंतीचे काय करणार? डोके आपटले गेले म्हणजे आपले भिंतीशी भांडण झाले, मग काय भिंतीला मारायचे का? त्याचप्रमाणे जे सतत भांडायला पुढे असतात ते सगळे भिंतीसमानच आहेत! म्हणून त्यांच्यात दोष पाहून काय फायदा? आपण स्वतःहूनच समजून घेतले पाहिजे की हे सगळे भिंतीसारखेच आहेत, एकदा हे सगळे समजले की मग कसलीच अडचण नाही. प्रश्नकर्ता : आपण मौन (गप्प) राहिलो तर समोरच्यावर त्याचा उलटाच परिणाम होतो, त्याला असे वाटते की याचाच दोष आहे म्हणून तो जास्त भांडण करतो. दादाश्री : तुमची अशी गैरसमजूत आहे की, मी मौन राहिलो म्हणून हे असे झाले. रात्री बाथरुमला जायला तुम्ही उठलात आणि अंधारात भिंतीवर डोके आपटले तर ते तुम्ही गप्प राहिल्यामुळे झाले का? मौन राहा किंवा बोला त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. याचा काहीच संबंध नाही. आपण मौन राहिल्याने समोरच्यावर काही परिणाम होतो असेही नाही किंवा आपल्या बोलल्याने समोरच्यावर काही परिणाम होतो असेही नाही. 'ओन्ली सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स' मात्र वैज्ञानिक संयोगिक पुरावा आहे. कोणाची कसलीही सत्ता नाही. अजिबात सत्ता नाही, असे हे जग आहे. यात कोणी काय करणार आहे? या भिंतीला जर सत्ता असती तर यालाही सत्ता राहिली असती! आपल्याला या भिंतीशी भांडायची सत्ता आहे का? मग समोरच्यावर ओरडण्यात काय अर्थ? त्याच्या हातात सत्ताच नाही ना! म्हणून तुम्ही भिंतीसारखे व्हा ना! तुम्ही बायकोला टोक-टोक करता तेव्हा तिच्या आत असलेला देव (शुद्धात्मा) नोंद करतो की हा मला नेहमी त्रास देतो! Page #91 -------------------------------------------------------------------------- ________________ ७६ क्लेश रहित जीवन जेव्हा ती तुम्हाला त्रास देईल तेव्हा तुम्ही भिंतीसारखे व्हा. म्हणजे तुमच्या आतील देव तुम्हाला 'मदत' करेल. __ जो भोगतो त्याचीच चूक प्रश्नकर्ता : कित्येकजण असे असतात की, आपण त्यांच्याशी कितीही चांगले वागलो तरीही ते आपल्याला समजून घेत नाहीत. दादाश्री : ते समजून घेत नसतील तर त्यात आपलीच चूक आहे की आपल्याला समजून घेणारा का नाही भेटला! याच्याशीच आपली गाठ का पडली? जेव्हा-जेव्हा आपल्याला काही दुःख भोगावे लागते ते सर्व आपल्याच चुकांचा परिणाम आहे. प्रश्नकर्ता : म्हणजे आमची कर्मच अशी आहेत असे समजावे का? दादाश्री : हो नक्कीच. आपल्या चुकीशिवाय आपल्याला भोगावे लागणारच नाही. या जगात कोणीही असे नाही की जो आपल्याला, किंचितमात्र देखील दुःख देऊ शकेल आणि दुःख देणारा आहे तर ती आपलीच चूक आहे. तत्त्वाचा दोष नाही, तो तर केवळ निमित्त आहे. म्हणून जो भोगतो त्याची चूक. कुणी नवरा-बायको दोघेजण आपापसात खूप भांडत असतील, नंतर थोड्या वेळाने दोघेही झोपायला गेल्यानंतर चुपचाप बघायला गेलो तर बायको गाढ झोपलेली असते आणि नवरा मात्र या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत पडलेला असतो, म्हणून आपण समजावे की सगळी नवऱ्याचीच चूक आहे, बायकोला तर काही त्रास झालेला दिसत नाही. ज्याची चूक असेल तोच भोगतो. आणि त्यावेळी जर असे आढळले की भाऊ निवांतपणे झोपलेले आहेत आणि बायको अस्वस्थपणे जागीच आहे, तर समजावे की चूक बायकोचीच आहे. 'भोगतो त्याची चूक.' Page #92 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार ওও हे विज्ञान तर खूप मोठे 'सायन्स' आहे. मी जे सांगतो ते फार सूक्ष्म सायन्स आहे. संपूर्ण जग निमित्ताचाच चावा घेतो. नवरा-बायको हे जग खूप मोठे, विशाल आहे; परंतु हे जग स्वत:च्या खोलीत आहे इतकेच मानून घेतले आहे. आणि तिथेही जर जग मानत असेल तरीही ठीक. पण तिथेही बायको सोबत लढाई करतो! अरे, हे काय तुझे पाकिस्तान नाही? हेच नवरा-बायको जेव्हा शेजाऱ्यांशी भांडत असतील तेव्हा दोघेही एकजूट होतात. शेजाऱ्याला म्हणतील की, 'तुम्ही असे आहात आणि तुम्ही तसे आहात.' आपल्याला वाटते की नवरा-बायकोच्या जोडीत किती अभेदता आहे, यांना तर नमस्कार करावा अशी जोडी आहे. नंतर घरात बघितले तर बायकोकडून चहात साखर थोडी कमी पडली असेल तर नवरा म्हणेल की, 'तुला किती वेळा सांगायचे साखर जरा जास्त टाकत जा पण तुझे डोके जाग्यावर असेल तर ना?' अरे, पण तुझे डोके तरी कुठे जाग्यावर आहे ? कसला रे असा माणूस तू? जिच्यासोबत आयुष्य खपवायचे तिच्याशीच भांडायचे? तुमचा कुणाशी मतभेद होतो का? प्रश्नकर्ता : हो, होतो, बऱ्याचदा होतो. दादाश्री : बायकोबरोबर मतभेद होतो का? प्रश्नकर्ता : हो बऱ्याचदा होतो. दादाश्री : बायकोबरोबर देखील मतभेद होतो? तिथेही एकता नसेल मग कुठे असणार? एकता म्हणजे काय, की कधीही मतभेद होत नाहीत. या एका व्यक्तीच्या बाबतीत निश्चय केला पाहिजे की तुमच्यात आणि माझ्यात मतभेद होता कामा नये. अशी एकता असायलाच हवी. अशी एकता केली आहे का तुम्ही? Page #93 -------------------------------------------------------------------------- ________________ ७८ क्लेश रहित जीवन प्रश्नकर्ता : असा तर कधी विचारच केला नाही. प्रथमच असा विचार करत आहे. दादाश्री : हो, असा विचारच केला पाहिजे ना? भगवंत किती विचार करून करून मोक्षाला गेले! मतभेद आवडतात का? प्रश्नकर्ता : नाही. दादाश्री : जेव्हा मतभेद होतात तेव्हा भांडणे होतात, चिंता होते. मतभेदामुळे असे होत असेल तर मनभेदामुळे काय होत असेल. मनभेद होतात तेव्हा घटस्फोट घेतात आणि तनभेद झाले की अंत्ययात्रा निघते! भांडण करा, पण बागेत तुम्हाला भांडण करायचे असेल तर बाहेर जाऊन भांडण करा. भांडायचे असेल त्या दिवशी बागेत जा आणि तिथे खूप भांडून घरी या. पण घरात, 'आपल्या खोलीत भांडायचे नाही.' असा नियम बनवा. एखाद्या दिवशी आपला भांडण करण्याचा मूड झालाच तर बायकोला सांगावे की, चला आज आपण बागेत जाऊ, तिथे खूप खाऊ-पिऊ आणि मग तिथेच खूप भांड्या. लोक आपले भांडण थांबवण्यासाठी येतील असे भांडण करावे. पण घरात भांडू नका. जिथे भांडण-तंटे असतात तिथे भगवंत राहत नाही. तिथून निघून जातात. भगवंतानी काय म्हटले आहे? भक्तांच्या इथे क्लेश नसावे. परोक्ष भक्ती करणाऱ्यांना भक्त म्हटले आणि प्रत्यक्ष भक्ती करणाऱ्यांना भगवंतानी 'ज्ञानी ' म्हटले, तिथे क्लेश होऊच कसा शकतो? तिथे तर समाधी अवस्था असते! ___ म्हणून कधी भांडावेसे वाटले तर पतीदेवाला म्हणा की, 'चला, आपण बागेत जाऊ या.' मुले कोणाला तरी सोपवून द्यावीत. पतीदेवाला आधीच सांगून ठेवा की, मी तुम्हाला भरलोकांमध्ये दोन थोबाडीत मारीन तेव्हा तुम्ही हसा. लोकांना आपली गंमत पाहू द्या! लोक तर अब्रू नोंदणारे, ते समजतील की कधी यांची अब्रू गेली नव्हती ती आज गेली. कोणाचीही अब्रू असते का? हे तर बिचारे झाकून-झाकून अब्रू ठेवतात! Page #94 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार ७९ हा असा कसा मोह ? अब्रू तर त्यास म्हटली जाईल की नागडा फिरला तरीही सुंदर दिसेल! हे तर कपडे घालतात तरी सुंदर दिसत नाही. जाकेट, कोट घालतो, टाय बांधतो तरी बैलासारखा दिसतो! स्वतःला काय समजतात कोण जाणे ?! दुसऱ्या कोणाला विचारतही नाही. बायकोलाही विचारत नाही की, मी नेकटाय घातल्यावर कसा दिसतो म्हणून ! आरशात पाहून स्वत:च ठरवतो की, 'मी खूप छान दिसतो, खूप छान दिसतो' आरशात पाहून केसांच्या पट्टया पाडत जातो! स्त्रिया पण आरशात बघून कुंकू लावतात आणि नखरे करत असतात! ही कसली पद्धत ? ! हे कसले जीवन ? ! स्वतः भगवंत असून हा कसला मूर्खपणा ! स्वतः भगवंत स्वरूप आहे. कानात हिऱ्यांच्या कुड्या घालतात पण ते स्वतःला दिसतात का ? हे तर लोकांनी हिरे बघावेत म्हणून घालतात. संसाराच्या जाळ्यात अडकलेले आहेत तरीही हिरे दाखवित फिरतात !, अरे, जाळ्यात फसलेल्या माणसाला कसली आली आहे हौस ? झपाट्याने निपटारा करा ना! नवरा सांगत असेल तर नवऱ्याला चांगले वाटण्यासाठी घाला. नवऱ्याने दोन हजारांचे कानातले आणले असेल पण पस्तीस हजाराचे बिल दाखवले तर बायको खुश! कानातले घातलेले डूल स्वतः ला तर दिसत नाहीत. मी शेठाणीला विचारले की कानात घातलेल्या कुड्या रात्री झोपल्यावर झोपेत सुद्धा दिसतात का ? हे तर फक्त मानलेले सुख आहे, चुकीच्या मान्यता आहेत, म्हणून अंतर शांती मिळत नाही. भारतीय नारी कोणाला म्हणतात ? घरात दोन हजारांची साडी असेल तर ती नेसते. हे तर नवरा-बायको बाजारात फिरायला गेले की दुकानातील हजाराची साडी बायकोच्या मनात ठसते. मग त्या साडीसाठी घरी आल्यावर तोंड फुगवून फिरते आणि नवऱ्याशी भांडत बसते. तिला भारतीय नारी कसे म्हणू शकतो ? ... अशा पद्धतीनेही क्लेश टाळला हिंदू लोक तर मुळचेच क्लेशी ( भांडखोर ) स्वभावाचे म्हणूनच Page #95 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन म्हणतात हिंदू लोकांचे संपूर्ण आयुष्य भांडणातच संपून जाते; पण मुसलमान असे पक्के की ते बाहेर भांडून येतील पण घरात बायकोशी भांडत नाहीत. आता कित्येक मुस्लिम देखील हिंदुच्या सहवासात राहून बिघडले आहेत. पण या बाबतीत मला हिंदूंपेक्षा मुस्लीम जास्त समजदार वाटले. अरे कित्येक मुसलमान तर बायकोला झोपळ्यावर झोके देखील देतात. आमचा कॉन्ट्रॅक्टचा धंदा, म्हणून आमचे मुसलमानांच्या घरी जाण्याचेही होत असे, आम्ही त्यांच्या घरातील चहाही प्यायचो! आम्ही कुणाशीही भेदभाव करीत नाही. एक दिवस मी मुसलमानाच्या घरी गेलो होतो, तेव्हा मियाँसाहेब बायकोला झोके देऊ लागले ! म्हणून मी त्यांना विचारले की, 'तुम्ही तिचे असे लाड केलेत तर ती तुमच्या डोक्यावर नाही का बसणार? त्यावर ते म्हणाले ती कशी डोक्यावर बसेल? तिच्याजवळ काही हत्यार नाही. मी म्हटले की, आमच्या हिंदु लोकांना तर भीती वाटते की असे केल्याने जर बायको डोक्यावर बसली तर काय करायचे? म्हणून आमचे लोक बायकोला झोके वगैरे घालत नाही. तेव्हा मियाँभाई म्हणाले, 'मी झोके का घालतो ते माहीत आहे का? माझ्याकडे दोनच खोल्या आहेत, माझा काही बंगला नाही, फक्त या दोनच खोल्या त्यात जर बायकोशी भांडलो तर मी कुठे झोपणार?' माझी सारी रात्र बिघडेल. म्हणून मी बाहेर सगळ्याशी भांडून येतो पण बायकोशी भांडत नाही. बीबी मियांना विचारते, ‘सकाळी मटण आणायचे सांगितले होते ना मग का आणले नाही? तेव्हा मियाँभाई रोख उत्तर देतो की, 'उद्या आणेल.' मग दुसऱ्या दिवशी सांगतो आज तर नक्कीच आणेल. तरीही संध्याकाळी रिकाम्या हाती येतो, तेव्ही मग बायको खूप चिडते, पण मियाँसाहेब तर फार हुशार, तो म्हणतो 'यार मेरी हालत मै जानता हूं!' असे काहीतरी बोलून बायकोला खुश करतो. पण भांडत नाही! आणि आपले लोक काय म्हणतील? 'तू कोण माझ्यावर दडपण करणारी?' 'जा, मी नाही आणणार.' अरे, असे बोलू नये. उलट तुझेच बळ कमी होते. तू असे बोलतो म्हणून तूच दडपणा खाली आहेस. अरे, ती तुला कशी दडपणाखाली आणू शकते? ती बोलते तेव्हा शांत राहायचे, पण Page #96 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार निर्बळ लोक खूप चिडखोर असतात. म्हणून तो चिडेल तेव्हा तू शांत राहून त्याची 'रेकॉर्ड' (बोलणे) ऐक. ___ ज्या घरात भांडणे होत नाहीत ते घर उत्तम. अरे! जरी भांडण झाले पण ते मिटवता आले तरीही उत्तम म्हटले जाईल! एखाद्या दिवशी जेवणाची चव बिघडली तर मियाँभाई चिडतील आणि बायकोला बोलतील की, 'तू अशी आहेस, तू तशीच आहेस;' पण हे ऐकून बायको जर चिडली तर स्वतः मात्र चूप बसेल, तो समजतो की आपण आणखी काही बोललो तर विस्फोट होईल. म्हणून तोही गप्प आणि तीही गप्प! आणि हिंदू लोक तर अशा परिस्थितीत विस्फोट करूनच राहतील! आमच्याकडे प्रत्येकाची टोपी वेगळी, वाण्याची वेगळी, दक्षिणात्यांची वेगळी, गुजरातींची वेगळी, सोनारांची वेगळी, ब्राम्हणांची वेगळी, प्रत्येकाचीच टोपी वेगळी. प्रत्येकाचा आपापला धर्म. प्रत्येकाचाच 'व्हयू पॉइंट' वेगळा, म्हणून आपापसात जमतच नाही. पण भांडण न केलेलेच बरे. मतभेद होण्यापूर्वीच,सावधानी आपल्या मनात कलुषित भाव राहिलेलेच नसतील मग त्यामुळे सामोराच्याच्याही मनात कलुषित भाव राहत नाही. आपण चिडलो नाही म्हणजे तेही शांत बसतात, भिंतीसारखे होऊन जावे, म्हणजे ऐकू येणार नाही, आज पन्नास वर्षे झाले पण आमचे कधीही मतभेद झाले नाहीत. हीराबां (दादाश्रींच्या पत्नी) च्या हातून तूप सांडत असेल तरीही मी फक्त पाहातच राहायचो. आम्हाला त्यावेळी ज्ञान हजर राहते की त्या तूप सांडणारच नाहीत. ___मी जरी म्हटले की सांडा तरीदेखील सांडणार नाहीत. मुद्दामहून कोणी तूप सांडेल का बरे ? नाही. तरी पण तूप सांडते, ते पहाण्यासारखे आहे म्हणून आपण पाहावे! आम्हाला तर मतभेद होण्यापूर्वीच ज्ञान ऑन द-मोमेंट (त्या क्षणी) हजर राहते. Page #97 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन 'मेरी हालत मै ही जानता हूँ' बोलले की मग बायको खुश होऊन जाते. आणि आपले लोक तर हालत वगैरे काही सांगतच नाहीत. ' अरे, पण तू सांग ना, की तुझी हालत चांगली नाही म्हणून. म्हणजे खुश राहायचे.' ८२ सगळ्यांच्या उपस्थितीत, सूर्यनारायणाच्या साक्षीने, भटजीच्या साक्षीने लग्न केले तेव्हा भटजी म्हणाले होते की, 'शुभ मंगल सावधान' मग तुला सावधान सुद्धा होता आले नाही ? वेळेनुसार सावध झाले पाहिजे. ब्राम्हण म्हणतो, 'शुभ मंगल सावधान' याचा अर्थ ब्राम्हणच समजतो, लग्न करणारा कुठे समजतो ? ! सावधानचा अर्थ काय ? की 'बायको संतापली तेव्हा तू शांत राहायचे, सावध व्हायचे. आता दोघांत भांडण झाले तर तेव्हा शेजारचे भांडण बघायला येतील की नाही ? मग तमाशा होणार की नाही होणार ? भांडल्यानंतर पुन्हा कधीच सोबत राहायचे नसेल तर भांडा. अरे, वाटणीच करून टाका! तेव्हा म्हणे, 'नाही, दुसरीकडे कुठे जाणार ! ' जर पुन्हा एकत्रच राहायचे आहे मग कशाकरिता भांडतात?! आपण सावध व्हायला नको का ? स्त्री जात अशी आहे की, ती बदलणार नाही, म्हणून आपल्यालाच बदलावे लागेल. ती सहज प्रकृती आहे, ती ऐकून घेईल अशी नाही. बायको चिडली आणि म्हणाली, 'की मी तुमचे जेवणाचे ताट आणणार नाही, तुम्हीच इकडे जेवायला या. आता तुमची तब्येत चांगली झाली आहे तुम्ही चालते-फिरते झाला आहात. असे तर तुम्ही हिंडताफिरता, लोकांशी गप्पा मारता, बिड्या पिता आणि टाईम झाला की वरून आयते हातात ताट मागता. मी नाही येणार!' तेव्हा आपण हळूवार म्हणावे, 'तुम्ही ताट वाढा, मी तिकडे येतो, ' 'मी येणार नाही' असे म्हण्यायच्या अगोदरच तुम्ही सांगा, ताट वाढा मी तिकडे येतोय. माझीच चूक झाली. असे वागाल तर रात्र शांततेत जाईल, नाहीतर रात्र बिघडेल. नवरा तणतणत तिकडे झोपेल आणि बायको इकडे चरफडत राहील. दोघांनाही झोप लागणार नाही. सकाळी पुन्हा चहा-नाश्ता होईल तेव्हा चहाचा कप जोरात Page #98 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार आपटून ठेवेल आणि कुरकुर करेल की नाही? बायको सुद्धा लगेच समजून जाते की कुरकुर करत आहे म्हणून. हे क्लेशमय जीवन आहे. । क्लेशरहित घर जणू देऊळच जिथे क्लेश असतो तिथे भगवंत वास करीत नाही, म्हणून आपण भगवंताला सांगावे, ‘साहेब तुम्ही मंदिरातच राहा, माझ्या घरी येऊ नका! आम्ही पुष्कळ मंदिरे बांधू, पण घरी येऊ नका! जिथे क्लेश नसतो तिथे भगवंताचा वास नक्कीच असतो, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि क्लेशाला आपण बुद्धी आणि योग्य समज वापरुन मीटवू शकतो. मतभेद टळू शकतील इतकी जागृती प्रकृती गुणानेही येऊ शकते. इतकी बुद्धी पण येऊ शकेल असे आहे. 'जाणले' त्यास म्हणतात की ज्यामुळे कुणाशीही मतभेद होत नाहीत. मती पोहोचत नाही म्हणून मतभेद होतात. मती पूर्णपणे पोहोचली तर मतभेद होणार नाही, मतभेद म्हणजे संघर्ष, तोच कमकुवतपणा आहे. काही भानगड झाली तर चित्त थोडा वेळ स्थिर ठेवा आणि शांतपणे विचार करा म्हणजे तुम्हाला आतूनच सुचेल. क्लेश झाला म्हणजे देव निघून जाणार की नाही? प्रश्नकर्ता : निघून जातील. दादाश्री : काही लोकांच्या घरातून देव कधीच जात नाही पण भांडणे होऊ लागली तर म्हणतात, 'चला आता निघूया, आपल्याला इथे जमणार नाही.' क्लेशमय घरात राहायला मला आवडणार नाही म्हणून मग देरासरात आणि मंदिरात जातात. या मंदिरात देखील क्लेश करतात. मुकुट, दागिने घेऊन जातात तेव्हा देव म्हणतात की आता इथूनही निघूया. देवांना सुद्धा या सगळ्यांचा वीट आला आहे. इंग्रजांच्या वेळी म्हणत असत ना की, 'देव गया डुंगरे, पीर गया मक्के.' Page #99 -------------------------------------------------------------------------- ________________ ८४ क्लेश रहित जीवन (देवी-देवता गेले डोंगरावर आणि पीर गेलेत मक्का.) घरात आपण क्लेशरहित जीवन जगले पाहिजे. एवढे कौशल्य तरी आपल्याला जमले पाहिजे. दुसरे काही जमले नाही तर त्याला समजावले पाहिजे की, 'आपण भांडलो तर देव आपल्या घरातून निघून जातील. म्हणून तू ठरव की आपल्याला भांडण करायचे नाही.' आणि आपणही ठाम ठरवायचे की यापुढे भांडायचे नाही. ठरवल्यानंतर भांडण झाले तर समजायचे की हे आपल्या हातात नव्हते. म्हणून तो आपल्याशी भांडण करत असेल तरी आपण चादर पांघरून झोपून जावे, मग तोही थोड्या वेळाने झोपून जाईल. आणि आपण जर प्रत्युत्तर देत राहिलो तर काय होईल? पापाचा पैसा, क्लेश करवितो मुंबईत एका उच्च संस्कारी कुटुंबातील बाईंना मी विचारले की, तुमच्या घरी क्लेश-भांडण वगैरे काही होत नाहीत ना? तेव्हा त्या बाई म्हणाल्या, दररोज सकाळी क्लेशाचाच नाश्ता असतो!' मी म्हणालो 'मग तुमच्या नाश्त्याचे पैसे वाचले, नाही का?' त्या म्हणाल्या नाही, 'तरी सुद्धा ब्रेड घ्यायचा, ब्रेडवर लोणी लावत जायचे,' म्हणजे भांडण पण चालू आणि नाश्ता पण चालूच! अरे, असली कसली रे माणसं तुम्ही? प्रश्नकर्ता : कित्येक लोकांच्या घरी लक्ष्मीच तशा प्रकारची असेल म्हणून भांडणं होत असतील? दादाश्री : हो या लक्ष्मीमुळेच असे होते. लक्ष्मी जर निर्मळ असेल तर नेहमी सगळे चांगले राहते, मन चांगले राहते. ही अनिष्ट लक्ष्मी घरात घुसली आहे, त्यामुळे घरात भांडणे होतात. आम्ही लहानपणीच निश्चित केले होते की, शक्य तोपर्यंत खोटी लक्ष्मी घरात घुसुच द्यायची नाही, आणि जरी संयोगानुसार खोटी लक्ष्मी घरात घुसलीच तर तिला धंद्यात राहू द्यावी, घरात प्रवेश करू द्यायचे नाही. ते आज सहासष्ठ वर्षे झाली पण खोट्या लक्ष्मीला घरात शिरु दिलेले नाही आणि त्यामुळे घरात कधी Page #100 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार भांडण पण झाले नाही. घरात पण असे ठरवले होते की, एवढ्याच पैशाने घर चालवायचे, धंद्यात जरी लाखो रुपये कमावले, पण हे पटेल (स्वतः दादाश्री) सर्विस करायला गेले तर किती पगार मिळेल? फार तर सहाशेसातशे रुपये मिळतील. धंदा तो तर पुण्याचा खेळ आहे. मला नोकरीत मिळाले असते तेवढेच पैसे घर-खर्चासाठी वापरायचे, बाकी पैसे धंद्यातच वापरायचे. इन्कमटॅक्सवाल्याचे पत्र आले तर तुम्हाला सांगता आले पाहिजे की 'बँकेत पैसे आहेत ते भरून टाका. कधी कोणता अँटेक येईल ते सांगता येत नाही. सगळे पैसे खर्च करून टाकले असतील आणि इन्कमटॅक्सचा अँटेक आला तर आपल्याला हार्ट अटेक येईल! सगळीकडे अँटेक घुसले आहेत ना? याला जीवन कसे म्हणायचे? तुम्हाला काय वाटते? चूक आहे असे वाटते की नाही? तर ती चूकच आपल्याला दुरुस्त करायची आहे. प्रयोग तर करून पाहा भांडण करायचे नाही असे ठरवा ना! तीन दिवसांसाठी तरी ठरवून पाहा! प्रयोग करण्यास काय हरकत आहे. तीन दिवसांचा उपास करतात ना तब्येत्तीसाठी? तसेच हे पण ठरवून तर पाहा. आपण घरात सगळ्यांनी मिळून निश्चित करा की, 'दादाश्री जी गोष्ट करीत होते, ती गोष्ट मला आवडली आहे. म्हणून आजपासून आपले भांडण-तंटे बंद.' मग बघा. धर्म केला (!) तरी पण क्लेश? जिथे क्लेश नाही तिथे यथार्थ जैन, यथार्थ वैष्णव, यथार्थ शिव धर्म आहे. जिथे धर्माची यथार्थता आहे तिथे क्लेश होत नाही. पण घरोघरी क्लेश आहेत, मग धर्म कुठे गेलेत? संसार चालवण्यासाठी ज्या धर्माची आवश्यकता आहे, की काय केल्याने क्लेश होणार नाही, एवढेच जरी जमले तरीदेखील धर्म प्राप्त केला असे म्हटले जाईल. Page #101 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन क्लेश रहित जीवन जगणे हाच (खरा) धर्म आहे. हिंदुस्तानात, इथे या संसारातच स्वतःचे घर स्वर्गासारखे झाले तरच मोक्षाची गोष्ट करावी, नाही तर मोक्षाबद्दल बोलूच नये, अगदीच स्वर्ग नाही पण स्वर्गाच्या जवळपासचे तरी झाले पाहिजे ना? क्लेशरहित झाले पाहिजे, म्हणून शास्त्रकार म्हणतात की 'जिथे किंचितमात्र क्लेश आहे तिथे धर्म नाही.' जेलमध्ये राहावे लागले तरी 'डिप्रेशन' नाही आणि राजवाड्यात राहावे लागले तरी ‘एलिवेशन' नाही, असे असले पाहिजे. क्लेश रहित जीवन झाले म्हणजे मोक्षाच्या जवळपास आला, म्हणून तो या जन्मात सुखी होणारच. मोक्ष प्रत्येकालाच हवा आहे. कारण बंधन कुणालाही आवडत नाही. परंतु क्लेश रहित झालो तर समजावे की आत्ता आपल्या मोक्षाचे स्टेशन जवळ आले आहे. तरी पण आपण सुलट करावे एका वाणी गृहस्थाला मी विचारले, 'तुमच्या घरात भांडणे होतात का?' तेव्हा तो म्हणाला, 'खूप होतात.' मी विचारले, मग त्यावर तू काय उपाय करतोस?' तेव्हा तो वाणी म्हणाला, 'सर्व प्रथम तर मी घराचे दरवाजे बंद करतो.' मी विचारले, 'सर्व प्रथम दरवाजे बंद करण्यामागचा हेतू काय?' त्यावर तो वाणी म्हणाला, 'भांडण बघून लोक घरात घुसले तर उलट भांडण वाढतील. घरात भांडल्यानंतर वातावरण आपोआप शांत होते.' याची बुद्धी बरोबर आहे, मला हे पटले. एवढी जरी समजदारीची गोष्ट असेल तर ती आपण स्वीकारावी. एखादा भोळा माणूस तर दरवाजा बंद असेल तर उलट त्याला आणखी उघडून येईल. आणि लोकांना म्हणेल, 'या, पाहा आमच्या घरी हे असे आहे! अरे! हे तर तू जास्त तमाशा केलास!' मारामारी करतात त्यात दुसऱ्या कोणाची जबाबदारी नाही, आपली स्वतःचीच जबाबदारी आहे. याला तर स्वत:लाच वेगळे करावे लागते! जर तुम्ही खरोखर हुशार व्यक्ती असाल तर लोक कितीही उलट Page #102 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार टाकत राहिले (त्रास देत राहिले) त्याला तुम्ही सुलट करत राहिलात तर प्रश्न सुटले. उलट करणे हाच लोकांचा स्वभाव आहे. तू समकिती असशील तर लोक उलटे करीत असतील तरी तू सुलट करत राहा. आपण चुकूनही उलट करू नये. बाकी, जग तर रात्रभर नळाला चालू ठेवून मडक्याला पालथे करून ठेवेल असे आहे ! स्वतःचेच सर्वस्व बिघडवत आहे. त्याला असेच वाटते की, मी लोकांचे बिघडवत आहे. लोकांचे बिघडवू शकेल असा कोणी नाहीच मुळी, असा कोणी जन्माला आलेलाच नाही. हिंदुस्तानात कोणाची प्रकृती (स्वभाव) ओळखता येतच नाही, इथे तर देव सुद्धा गोंधळून जातील! 'फॉरेन मध्ये' तर एक दिवस बायकोशी एकनिष्ठ राहिला तर आयुष्यभर एकनिष्ठ राहिल. आणि इथे तर प्रकृतीचे दिवसभर निरीक्षण केले तरी निष्कर्ष काढता येणार नाही. इथे तर कर्माच्या उदयामुळे नुकसान होत असते, नाही तर हे लोक नुकसान करून घेतील असे आहेत का ? अरे, मेले तरी नुकसान होऊ देणार नाही. आत्म्याला थोडा वेळ बाजूला बसवतील आणि मग मरतील. काय ? ८७ शब्द बदलून मतभेद टाळला दादाश्री : जेवताना मतभेद होतात का ? प्रश्नकर्ता : मतभेद तर होणारच ना ! दादाश्री : का? लग्न करतेवेळी असा करार केला होता की प्रश्नकर्ता : नाही. दादाश्री : त्यावेळी तर असा करार केला होता की, समय वर्ते सावधान (शुभ मंगल सावधान) घरात बायकोसोबत 'तुमचे आणि आमचे' अशी वाणी निघता कामा नये. वाणी विभक्त असायला नको, वाणी अविभक्त असायला हवी. आपण संयुक्त कुटुंबातले ना ? Page #103 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन आमचे हिराबा बरोबर कधीही मतभेद झाला नाही, कधीच बोलण्यात 'माझे-तुझे' झाले नाही. पण एकदा आमच्यात मतभेद झाला होता. त्यांच्या भावाच्या मोठ्या मुलीचे लग्न होते म्हणून त्यांनी मला विचारले की, 'लग्नात त्यांना काय भेटवस्तू देऊया?' तेव्हा मी त्यांना सांगितले की, तुम्हाला जे योग्य वाटेल ते, पण घरात जी चांदीची भांडी आहेत ते द्या ना! नवीन बनवू नका.' हे ऐकून त्या म्हणाल्या की, 'तुमच्या आजोळी मामाच्या मुलींचे लग्न होतात तेव्हा तर चांदीचे मोठमोठे ताट बनवून देता!' त्यांनी जेव्हा 'माझे आणि तुमचे' असे शब्द म्हटले त्याचवेळी मी समजून गेलो की, आज आपली अब्रू गेली! आम्ही दोघे एक, मग माझे आणि तुमचे कशाला? हे माझ्या लक्षात येताच मी लगेच पलटलो. मला जे सांगायचे होते त्यात मी पूर्णतः पलटून गेलो. मी त्यांना म्हणालो, 'माझा सांगण्याचा अर्थ असा नव्हता. तुम्ही ही चांदीची भांडी द्या आणि वरून पाचशे एक रुपये द्या, त्यांना उपयोगी पडतील.' त्या म्हणाल्या, 'हं...एवढे पैसे देतात का? तुम्ही अगदी भोळेचे आहात, ज्याला त्याला देतच राहता.' मी म्हणालो, 'खरोखर, मला काही समजतच नाही.' बघा, माझ्या घरातही कसा मतभेद पडत होता, पण मी शब्दांना पलटवून कसे मतभेद होताना थांबवले! शेवटी मतभेद होऊ दिला नाही. मागील तीस-पस्तीस वर्षांपासून आमच्यात किंचितही मतभेद झाला नाही. 'बा' सुद्धा देवीसारख्या आहेत! कुठल्याही परिस्थितीत आम्ही मतभेद होऊच दिले नाहीत. मतभेद होण्याआधीच आम्ही समजून जातो की, असे फिरून जायला हवे आणि तुम्हाला तर फक्त डाव्या आणि उजव्या या दोन बाजूनेच फिरवायचे माहित आहे की, एकतर या बाजूने आटे घट्ट बसतील किंवा त्या बाजूने घट्ट बसतील. आम्हाला तर सत्तर लाख प्रकारचे आटे फिरवता येतात. शेवटी गाडी रुळावर आणतो. मतभेद कधीच होऊ देत नाही. आपल्या सत्संगात जवळपास वीस हजार माणसं आणि चार एक हजार महात्मा आहेत पण आमचे कोणाशी एकसुद्धा मतभेद नाही. मी कोणाशीही परकेपणा मानला नाही! Page #104 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार जिथे मतभेद आहे तिथे अंशज्ञान आहे आणि जिथे मतभेदच नाही तिथे विज्ञान आहे. जिथे विज्ञान आहे तिथे सर्वांश ज्ञान आहे. सेंटरमध्ये (केंद्रस्थानी) बसलो तर मतभेदच उरत नाही. तेव्हाच मोक्ष (संभव) होतो. पण डिग्रीवर बसलो आणि 'आमचे-तुमचे' होत असेल तर मोक्ष होऊ शकत नाही. निष्पक्षपाती असेल त्याचा मोक्ष होतो. समकितीची ओळख काय? तर म्हणे, घरातील सगळेजण उलट करीत असतील तरीही त्याला सुलट करून टाकतो. प्रत्येक बाबतीत सुलट करणे ही समकितीची निशाणी आहे. एवढेच ओळखायचे आहे की ही 'मशिनरी' कशी आहे, त्याचा फ्यूज उडाला तर त्यास कसा बसवावा. समोरच्या व्यक्तीच्या प्रकृतीस्वभावाला एडजस्ट होता आले पाहिजे. आम्हाला तर समोरच्याचा फ्यूज उडाला असेल तरी एडजस्ट होता येते. पण समोरच्याचे एडजस्टमेन्ट तुटले तर काय होईल? फ्यूज गेला मग तो भिंतीवर आपटतो. पण वायर तुटत नाही. मग जर कोणी फ्यूज बसवून दिला तर पुन्हा पूर्ववत होतो, नाहीतर तोपर्यंत गोंधळतो. ___ संसार आहे म्हणून घाव तर पडणारच ना? आणि बाईसाहेब पण म्हणतील की आत घाव भरुन निघणार नाही. पण मग संसारात पडल्यानंतर पुन्हा घाव भरुन निघतो. मूर्छितपणा आहे ना! मोहामुळे मूर्छितपणा आहे. मोहामुळे घाव भरून निघतात. जर घाव भरुन निघाले नसते तर वैराग्यच आले असते ना?! मोह कशास म्हणतात? तर खूप अनुभव झाले असतील तरी पुन्हा सगळे विसरतो. घटस्फोट घेतेवेळी निश्चित करतो की आता पुन्हा कोणत्याही स्त्रीशी लग्न करणार नाही, तरी देखील पुन्हा धाडस करतो! ....ही तर कशी फसवणूक? लग्न केले नाही तर जगाचा समतोल कसा राहील? कर ना लग्न. खुशाल लग्न करा. 'दादांना' त्याची हरकत नाही पण हरकत अज्ञानतेची Page #105 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन आहे. आम्ही काय सांगू इच्छितो की, सर्वकाही करा, पण वास्तविकता काय आहे ते आधी नीट समजून घ्या. ! भरत राजा तेराशे राण्यांसोबत आयुष्यभर राहिले आणि त्याच जन्मात मोक्षाला गेले! तेराशे राण्यासोबत!!! म्हणून हकीगत समजून घेण्याची गरज आहे. समजून संसार करा, संन्याशी होण्याची गरज नाही. जर हे समजले नाही तर संन्याशी होऊन एका कोपऱ्यात पडून राहा. संन्याशी तर, संसारात ज्याचे स्त्रीसोबत जमत नाही तोच संन्याशी बनतो. आणि स्त्रीपासून दूर राहू शकतो की नाही, अशी शक्ती प्राप्त करण्याची ती एक कसरत आहे. संसार तर टेस्ट एक्झामिनेशन आहे. तिथे टेस्टेड व्हायचे आहे. लोखंड सुद्धा टेस्टेड झाल्याशिवाय चालत नाही, मग मोक्षात अनटेस्टेड चालू शकेल का? ___ म्हणून मूर्छित होण्यासारखे हे जग नाही. मुर्छमुळे हे जग असे दिसते आणि मार खात-खात माणूस मरतो. भरत राजाला तेराशे राण्या होत्या, त्याची अवस्था काय होत असेल? इथे घरात एकच राणी असते तरीही ती तुमची सारखी फजिती करत असते, मग तेराशे राण्यांबरोबर कसे काय निभावणार? अरे, एका राणीचे मन जिंकायचे असेल तरी खूप कठीण जाते! जिंकूच शकत नाही. कारण की मतभेद झाले की पुन्हा बसलेले विस्कटते! भरत राजाला तर तेराशे राण्यांबरोबर निभावयाचे होते. राणीवासातून नुसता फेरफटका मारला तरी पन्नास राण्यांची तोंडे फुगलेली असणार! अरे, कित्येक तर राजाला मारुन टाकण्याच्या तयारीत असत. मनात विचार करत असत की निवडक राण्याच त्यांच्या आवडत्या आणि आम्ही मात्र परक्या! म्हणून काहीतरी मार्ग काढायला हवा. राजाला मारण्यासाठी काहीतरी करायला हवे, आणि तेही त्या राण्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी! त्यांचा द्वेष राजावर नव्हता पण त्या राण्यांवर होता. पण असे करताना राजा तर मरेलच आणि तू सुद्धा विधवा होशील त्याचे Page #106 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार काय? तेव्हा म्हणे की, 'मी विधवा झाली तरी चालेल, पण तिला विधवा करेल तेव्हाच मी खरी!' आम्हाला हे सगळे आजही तादृश्य दिसते, या भरत राजाच्या राणीचे आम्हाला तादृश्य दिसते. त्या दिवशी कसे तोंड फुगलेले असेल. आतून राजा किती संकटात अडकलेला असेल, राजाच्या मनात कशी चिंता उद्भवत असेल, ते सगळेकाही तादृश्य दिसते! एका राणीचे लग्न जर तेराशे राजांबरोबर झाले असेल तर त्या राजांची तोंडे कधी फुगणार नाहीत! कारण पुरुषांना तोंड फुगवता येतच नाही ना. आरोप, किती दुःखदायी सगळे काही तयार आहे, पण उपभोगता येत नाही. उपभोगण्याची रीत माहीत नाही. मुंबईतील शेठ लोक मोठ्या टेबलावर जेवायला बसतात पण जेवण झाल्यावर 'तू असे केलेस, तू तसे केलेस, विनाकारण तू माझा जीव जाळतेस.' विनाकारण कोणी जीव जाळतो का? नियमानुसारच जाळतो, विनाकारण कोणी जाळतच नाही. या लाकडाला लोक जाळतात पण लाकडाच्या कपाटाला कोणी जाळतो का? जे जाळायचे असेल तेच जाळतात. तरी असे आरोप चालू असतात. कोणत्याही गोष्टीचे भानच नाही. मनुष्यपण बेभान झालेले आहे. नाहीतर घरात असे आरोप करायचे असतात का? पूर्वीच्या काळी लोक कधीही एकमेकांवर असे आरोप करत नसत. आरोप करण्यासारखी वेळ आली तरी करत नसत त्यांच्या मनात जाणीव असायची की, आरोप केले तर समोरच्याला किती दुःख होईल आणि कलियुगात तर केव्हा माझ्या कचाट्यात येईल याचीच वाट पाहत असतात. घरात मतभेद का असावेत? आदळ-आपट याला तुम्हीच जबाबदार प्रश्नकर्ता : मतभेद व्हायचे कारण काय? दादाश्री : भयंकर अज्ञान! त्याला संसारात जीवन जगणे जमत Page #107 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन नाही, मुलीचे बाप होणे जमत नाही. बायकोचा नवरा होणे जमत नाही. जीवन जगण्याची कलाच माहीत नाही. सुख हाताशी असताना देखील सुखाचा उपभोग घेऊ शकत नाही. प्रश्नकर्ता : पण घरात भांडी तर वाजतीलच ना? दादाश्री : रोज-रोज भांडी वाजली (भांडणं झाली) तर कसे चालेल? पण हे तर त्याला समज नसल्यामुळे होत असते. जो जागृत असेल त्याला तर एक जरी मतभेद झाला तरी रात्रभर झोप लागत नाही! या भांड्यांना (माणसांना) तर स्पंदन आहेत. म्हणून रात्री झोपता-झोपता देखील ही स्पंदने चालूच असतात की, 'हा तर असाच आहे, वाकडाच आहे, उलट्या डोक्याचा आहे, नालायक आहे, याला हाकलून लावण्यासारखे आहे !' आणि त्या भांड्यांना अशी काही स्पंदने होतात का? आपले लोक समजल्याशिवायच हो ला हो करतात, आणि म्हणतात की दोन भांडी एकत्र आली की वाजतीलच! अरे, मूर्खा वाजायला आपण काय भांडी आहोत? या दादांना कधी कोणी वाजताना (भांडताना) पाहिलेले नाही! स्वप्नात देखील असे आले नसेल!! वाजण्याचे कारणच काय? हे सर्व पूर्णपणे आपल्या स्वत:च्या जोखीमदारीवर आहे, चहा लवकर मिळाला नसेल तर आपण टेबलावर रागाने तीनदा जोराने हात आपटतो, ती जबाबदारी कोणाची? यापेक्षा आपण बावळटासारखे बसून राहायचे. चहा मिळाला तर ठीक, नाही तर असेच ऑफिसला जाऊ! त्यात काय चुकीचे? चहाचीही काही वेळ तर असेलच ना? हे जग नियमाच्या बाहेर तर नसेलच ना? म्हणून आम्ही सांगितले की व्यवस्थित'! वेळ झाली की चहा आपोआप मिळेल, तुम्हाला टेबल ठोकण्याची गरज पडणार नाही. तुम्ही स्पंदने पाठवली नाही तरी स्वतःहून मिळेल, आणि स्पंदन उभे केलेत तरीही मिळेल. पण स्पंदन केल्यामुळे तुमच्या बायकोच्या हिशोबवहीत हे नोंदले जाईल की, त्यादिवशी तुम्ही असे टेबल ठोकले होते! Page #108 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार प्रकृती ओळखून, सावध राहावे पुरुष प्रसंग विसरून जातात पण स्त्रिया मात्र आयुष्यभर त्या प्रसंगाची मनात नोंद करून ठेवतात. पुरुष भोळे असतात, मोठ्या मनाचे असतात, सरळ असतात, ते बिचारे सगळे विसरून जातात. स्त्रिया तर बोलून सुद्धा दाखवतात की, 'त्या दिवशी तुम्ही मला असे बोलले होते, ते माझ्या काळजात कोरले गेले आहे.' अरे, वीस वर्ष होऊन गेली, अजूनही ती नोंद ताजीच!! मुलगा वीस वर्षाचा होऊन गेला, लग्न करण्याएवढा झाला तरीही ती गोष्ट जपून ठेवलीस?! सगळ्या वस्तू सडतात पण यांची वस्तू मात्र सडली नाही! स्त्रीला जर आपण काही (दुःख) दिले असेल तर ती अस्सल जागी जपून ठेवते, काळज्याच्या आत, म्हणून काही देऊच नका. चुकूनदेखील (दुःख) देण्यासारखे नाहीच, सावध राहण्यासारखे आहे. म्हणून शास्त्रात सुद्धा लिहिलेले आहे की, 'रमा रमाडवी सहेली छे, विफरे महामुश्केल' (स्त्रीला खेळवणे सोपे आहे पण एकदाची का ती संतापली मग तिला सांभाळणे महा कठीण आहे!) ती संतापली तर काय कल्पना करेल ते सांगू शकत नाही. म्हणून स्त्रीचा वारंवार अपमान करू नका. भाजी गार का? आमटीची फोडणी बरोबर नाही, अशी कटकट कशाला करतोस? वर्षातून एखाद्या दिवशी एखादा शब्द असेल तर ठीक आहे. हे तर दररोजच! 'भाभो भारमा तो बहु लाजमा.' सासरा मान-मर्यादेत तर सून पण सासऱ्याचा आदर राखते. आपण आपल्या मान-मर्यादेत राहायला हवे. आमटी चांगली झाली नसेल, भाजी गार झाली असेल, तर ते नियमाच्या आधारे आहे. आणि फारच झाले तर कधीतरी हळुवारपणे सांगावे की, 'ही भाजी रोज गरम असते, तेव्हा खूप छान लागते.' अशा पद्धतीने सांगितले तर तिला आपल्या सांगण्यामागचा हेतूसमजेल. व्यवहार येत नसेल तर दोष कोणाचा? अठराशे रुपयांची घोडी घेतली, मग भाऊ घोडीवर बसतो. Page #109 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन घोडीवर बसता येत नाही, आणि वरुन घोडीची खोडी काढतो म्हणून घोडी उधळते, कारण तिला तशी सवयच नसते ना! आणि तेव्हा तो बावळट खाली पडतो! पण मग तो भाऊ लोकांना काय सांगतो की, 'घोडीने मला खाली पाडले.' मग ती घोडी स्वतःचा न्याय कोणाला सांगायला जाईल? घोडी वर बसणे तुला जमत नाही त्यात तुझा दोष की घोडीचा? आणि तो बसताच घोडी सुद्धा समजून जाते की, हा तर जंगली प्राणी बसला, याला बसता येत नाही! त्याचप्रमाणे या हिंदुस्तानी स्त्रिया म्हणजे आर्यनारी, त्यांच्याशी जुळवून घेता आले नाही मग त्या पाडणारच ना? एकदा का नवरा बायकोच्या विरोधात गेला तर त्याचा प्रभावच राहत नाही. आपला संसार चांगल्या प्रकारे चालत असेल, मुले चांगल्या पद्धतीने शिकत असतील, काहीच भानगड नसेल तरीही तुम्हाला बायकोच्या चुका दिसल्या आणि विनाकारण बायकोला रागावले म्हणजे बायकोला तुमच्या अकलेचा अंदाज येऊन जातो की याच्यात काही बरकत नाही. ९४ जर तुमचा प्रभाव नसेल, पण तुम्ही घोडीला प्रेमाने कुरवाळले तरीही तिचे प्रेम तुम्हाला मिळेल. प्रथम प्रभाव पडला पाहिजे. बायकोच्या काही चुका तुम्ही सहन केल्या तर तिच्यावर प्रभाव पडतो. आणि चूक नसताना देखील चुका काढत राहिलात तर काय होईल? काही पुरुष स्त्रियांच्या बाबतीत तक्रार करीत राहतात, त्या सर्व चुकीच्या तक्रारी असतात. काही साहेब असे असतात की ऑफिसातील कर्मचाऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करतात. तेव्हा सगळ्या कर्मचाऱ्यांना कळून चुकते की साहेबात काही दम नाही. पण काय करतील ! पुण्याच्या जोरावर तो बाँस झालेला आहे. घरात बायकोशी पंधरा-पंधरा दिवस भांडण चालू असते ! साहेबांना विचारले, 'का असे ?' तर म्हणेल की, 'तिला अक्कलच नाही.' आणि हा तर खूप अक्कलवाला ! विकायला झाल तर चार आणे सुद्धा कोणी देणार नाही ! साहेबाच्या बायकोला विचारले तर ती म्हणेल की, 'जाऊ द्या ना त्यांच्या बद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. त्यांच्यात काही दमच नाही !' Page #110 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार स्त्रियांचा अपमान झाला तर त्या आयुष्यभर विसरत नाही थेट 'तिरडी' निघेपर्यंत त्या आठवणी ताज्याच असतात! त्या आठवणी जर विसरता आल्या असत्या तर हे जग केव्हाच संपुष्टात आले असते! पण असा विसर पडत नाही, म्हणून सावध राहा. प्रत्येक काम सावधानीपूर्वक करण्यासारखे आहे! 'स्त्रीचारित्र्य' म्हटले जाते ना? ते समजेल असे नाही. तरी पण स्त्रिया देवी सुद्धा आहेत! असे आहे की, तुम्ही त्यांना देवीच्या रूपाने पाहिले तर तुम्ही देवता व्हाल. बाकी तुम्ही तर कोंबड्यासारखे राहता, हत्ती आणि कोंबड्यासारखे! बघा, हत्तीभाऊ आलेत आणि कोंबडेभाऊ आलेत! लोकांना राम व्हायची इच्छा नाही आणि घरात सीताजींना शोधतात! अरे वेड्या, राम तर तुला नोकरीतही ठेवणार नाही. यात पुरुषांचाही दोष नाही. तुम्हाला स्त्रियांसोबत 'डीलिंग' (व्यवहार) करता येत नाही. तुम्हा व्यापाऱ्यांना गिहाईकांसोबत डीलिंग करता आले नाही तर गिहाईक तुमच्याकडे येणार नाहीत. म्हणून आपले लोक म्हणतात की सेल्समन चांगला ठेवा. चांगला, देखणा, हुशार 'सेल्समन' असेल तर लोक थोडे जास्त पैसे द्यायलाही तयार होतात. अशाप्रकारे आपल्याला स्त्रीसोबत डीलिंग करता आले पाहिजे. स्त्रीला एका डोळ्याने देवी प्रमाणे पाहा आणि दुसऱ्या डोळ्याने तिचे स्त्रीचारित्र्य पाहा. एका डोळ्यात प्रेम आणि दुसऱ्या डोळ्यात सक्ती ठेवली तरच समतुलन राहील. फक्त देवी म्हणून पाहाल आणि आरती करत बसाल तर ती चुकीच्या मार्गावर चालेल, म्हणून समतुलन ठेवा. व्यवहाराला याप्रकारे समजून घ्या पुरुषांनी स्त्रियांच्या बाबतीत हात घालू नये आणि स्त्रियांनी पुरुषांच्या बाबतीत हात घालू नये. प्रत्येकाने आपापल्या डिपार्टमेंटमध्ये राहावे. Page #111 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन प्रश्नकर्ता : स्त्रीचे डिपार्टमेंट कोणते? पुरुषांनी स्त्रियांच्या कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये हात घालू नये? दादाश्री : असे आहे, स्वयंपाक काय करावा, घर कसे चालवावे, ते सर्व स्त्रीचे डिपार्टमेंट आहे. ती गहू कुठून आणते, कुठून आणत नाही ते तुम्हाला जाणून घ्यायची काय गरज? ती स्वत:हून सांगत असेल की गहू आणण्यात मला अडचण येत आहे तर वेगळी गोष्ट पण ती काही विचारत नसेल, रेशनचे काही सांगत नसेल, मग आपल्याला त्या डिपार्टमेंटमध्ये ढवळाढवळ करण्याची गरजच काय? आज खीर बनव, आज जिलबी बनव, हे सुद्धा आपल्याला सांगण्याची काय गरज? वेळ येईल तेव्हा ती बनवेल. तिचे ते स्वतंत्र डिपार्टमेंट! एखाद्या वेळेस खूपच इच्छा झाली तर म्हणावे की 'आज लाडू बनव' असे सांगण्यास मी मनाई करत नाही, पण दुसरे वेडेवाकडे बोलणे, विनाकारण आरडओरडा करणे, कढी खारट झाली, खारट झाली, हा सर्व मूर्खपणा आहे. ही रेल्वेलाईन चालते, त्यात किती सारे कार्य पार पाडले जातात! किती ठिकाणांहून नोंदी येतात, संदेश येतात, हे सगळे 'डिपार्टमेंट' वेगळे आहेत. आता त्यात सुद्धा त्रूटी तर राहतातच ना? तसेच बायकोच्याही डिपार्टमेंटमध्ये कधीतरी त्रूटी राहते. आपण जर त्यांच्या चुका काढायला गेलो तर त्या पण आपल्या चुका काढतील. तुम्ही असे करत नाही, तसे करत नाही. असे पत्र आले आणि त्यावेळी तुम्ही असे केले. म्हणजे ती सूड घेते. मी तुमच्या चुका काढल्या तर तुम्ही पण माझ्या चुका काढण्यासाठी तयारच असता! तेव्हा शहाणा माणूस घरच्या गोष्टीत ढवळाढवळ करीत नाही. त्याला पुरुष म्हणायचे. नाहीतर तो बायकांसारखा असतो. कित्येक माणसे तर स्वयंपाक घरात जाऊन तिखटाचा डबा उघडून पाहतील आणि म्हणतील की दोन महिन्यांपूर्वीच तिखट आणले होते आणि एवढ्यात संपले पण? अरे, तिखट बघत बसलास तर तू यातून केव्हा पार पडशील? ज्याचे हे डिपार्टमेंट (काम) आहे तिला काळजी नसेल का? कारण वस्तू तर वापरलीही जाते आणि आणलीही जाते. पण Page #112 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार हा विनाकारण ढवळाढवळ करतो! मग बायकोही समजून जाते की याचे डोके खिकसले आहे. नवरा कसा आहे हे ती लगेच जोखते. घोडीला जसे समजते की घोडेस्वार कसा आहे, तसेच बायकोही नवऱ्याचा स्वभाव ओळखते. त्यापेक्षा 'भाभो भारमा तो बहु लाजमा' (नवरा मान मर्यादेत राहिला तर बायकोही मर्यादेत राहील) नियम आणि मार्यादेनेच व्यवहार शोभेल. मर्यादा ओलांडू नका आणि निर्मळ राहा. प्रश्नकर्ता : स्त्रियांशी पुरुषांच्या कोणत्या गोष्टीत हस्तक्षेप करु नये? दादाश्री : पुरुषांच्या कोणत्याच गोष्टीत हस्तक्षेप करू नये. दुकानात किती माल आणला? किती विकला गेला? आज यायला उशीरा का झाले? मग नवऱ्याला सांगावे लागते की, 'आज नऊची गाडी चुकलो.' तेव्हा बायको म्हणेल, 'अशी कशी चुकली? कुठे फिरत होतात?' मग नवरा चिडतो. त्याच्या मनात येते की देवाने जरी असे विचारले असते तरी मी दोन दिल्या असता. पण आत्ता इथे तो काय करेल? नवराबायको असेच कारण नसताना एक-दुसऱ्याच्या कामात दखल देतात. म्हणजे उत्तम बासमती तांदुळाचा भात बनवायचा आणि त्यात खडे टाकून खायचा! त्यात काय स्वाद येईल? नवरा-बायकोने एकमेकांना मदत केली पाहिजे. नवरा जर काळजीत असेल तर ती काळजी कशी दूर होईल अशा तहेने बायकोने बोलायला हवे. तसेच नवऱ्याने पण बायकोची अडचण होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. नवऱ्याने बायकोला समजून घ्यायला हवे की घरात तिला मुले किती हैराण करत असतील! घरात काही तुटले-फुटले तर नवऱ्याने घरात आरडाओरडा करता कामा नये. तरीही कित्येक नवऱ्यांची ओरड असते की गेल्या वर्षी मी इतक्या छान डझनभर कप-बशा आणल्या होत्या त्या सगळ्या त कसे का फोडून टाकल्यास? सगळी नासाडी केली. मग त्या बायकोला वाटते की, मी काय मुद्दाम फोडल्या? मला काय त्या खायच्या होत्या? फुटल्या तर फुटल्या, त्यात मी काय करू? असे म्हणेल. आता तिथेही भांडण. जिथे Page #113 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन काही घेणेही नाही आणि देणेही नाही. जिथे भांडायचे काही कारणच नाही तिथेही भांडायचे?! आमच्यात आणि हिराबांमध्ये कधीच मतभेद झाले नाहीत. आम्ही त्यांच्या कोणत्याही गोष्टीत कधीच हस्तक्षेप करीत नाही. त्यांच्या हातून पैसे पडले, आम्ही ते पाहिले तरी आम्ही त्यांना असे म्हणणार नाही की, 'तुमचे पैसे पडले.' तुम्ही ते पाहिले की नाही? घराच्या कोणत्याही गोष्टीत आम्ही हस्तक्षेप करीत नव्हतो. त्या पण आमच्या गोष्टीत हस्तक्षेप करायच्या नाही. आम्ही किती वाजता उठतो, किती वाजता अंघोळ करतो, केव्हा येतो, केव्हा जातो, अशा आमच्या कुठल्याही बाबतीत त्या आम्हाला कधीच विचारात नाही. आणि जर एखाद्या दिवशी त्यांनी आम्हाला सांगितले की, 'आज लवकर अंघोळ करा.' तर आम्ही लगेच धोतर मागवून अंघोळीला जायचो. अरे, आम्ही स्वतःच टॉवेल घेऊन अंघोळीला जायचो कारण आम्हाला कळत असे की, 'लाल झेंडा' दाखवित आहे तेव्हा काही तरी कारण असेल, म्हणूनच त्या लवकर अंघोळ करण्यासाठी सांगत आहे, असे आम्ही समजून घ्यायचो. म्हणून तुम्हीही व्यवहाराबद्दल थोडेसे समजून घ्या ना की, कुणालाही कुणात दखल करण्यासारखे नाही. फौजदाराने पकडले तर तुम्ही तो सांगेल तसे कराल ना? बसवेल तिथे बसाल ना! तुम्हाला समजले की आपण इथे आपले चालणार नाही, इथे आहोत तोपर्यंत झझंट आहे, तसेच हा संसार सुद्धा फौजदारीसारखाच आहे. म्हणून इथेही सरळ वागले पाहिजे. घरी जेवण मिळते की मिळत नाही? प्रश्नकर्ता : मिळते. दादाश्री : हवे ते जेवण मिळते, खाट अंथरून देते मग आणखी काय? आणि जर खाट अंथरून दिली नाही तर आपण अंथरून घ्यावी आपणहून तोडगा काढावा. शांतीपूर्वक सगळे समजावून सांगावे लागते. Page #114 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार तुमच्या संसाराच्या हिताहितची गोष्ट काय गीतेत लिहिलेली असेल? ती तर तुम्हालाच समजून घ्यावी लागेल ना? हसबंड' म्हणजे 'वाईफचीही' 'वाईफ!' (पती म्हणजे पत्नीची पण पत्नी)लोक तर नवरेपणा गाजवायला जाता! अरे, पत्नी कधी पती होणार आहे काय?! पती म्हणजे पत्नीचीही पत्नी. आपल्या घरात जोरात आवाज निघता कामा नये. हा काय 'लाऊड स्पीकर' आहे का? हा तर इथे इतक्या जोरात ओरडतो की गल्लीच्या टोकापर्यंत ऐकू जाते! घरात 'गेस्ट' (पाहुण्या) प्रमाणे राहा. आम्ही पण घरात गेस्ट प्रमाणेच राहतो. तुम्ही निसर्गाचे पाहुणे आहात इथे जर तुम्हाला सुख वाटले नाही मग सासरी तरी कसे सुख वाटेल? 'मार' दिलात तर बदला घेईल प्रश्नकर्ता : दादा, जेव्हा माझा राग अनावर होतो तेव्हा कित्येक वेळा माझा हात बायकोवर उठतो. दादाश्री : बायकोला कधीही मारू नये. जोपर्यंत तुमचे शरीर मजबूत असेल तोपर्यंत ती ऐकून घेईल पण नंतर ती तुम्हाला जुमानणार नाही. स्त्री आणि मन या दोघांना मारणे हे संसारात भटकण्याचे दोन साधन आहेत, या दोघांना मारूच नये. त्यांच्याकडून समजावून काम करवून घ्यावे लागते. माझा एक मित्र होता, जेव्हा जेव्हा मी भेटत असे तेव्हा तो मला बायकोला मारताना दिसत असे, तिचे थोडे जर चुकले की तो मारायचा. नंतर मी त्याला एकांतात समजावून सांगितले की हे जे तू तिला मारतोस पण ती नक्की त्याची नोंद ठेवेल. तू नोंद ठेवणार नाहीस पण ती मात्र मनात नोंदून ठेवेल. अरे, ही तुझी लहान-लहान मुले, जेव्हा तू तिला मारतो तेव्हा ती तुझ्याकडे एकटक बघत असतात. तेही लक्षात ठेवतील आणि मोठी झाल्यावर ती मुले आणि त्यांची आई, दोघे मिळून तुझा सूड घेतील. कधी? जेव्हा तुमची गात्रे ढिली पडतील तेव्हा. म्हणून बायकोला Page #115 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन कधीच मारु नये. मारल्याने तर उलट तुम्हालाच खूप नुकसान होत असते, खूप अंतराय निर्माण होतात. १०० आश्रित कोणाला म्हणतात ? खुंटीला बांधलेली गाय असेल तिला मारले तर ती कुठे जाईल ? घरातील माणसे तर खुंटीला बांधल्यासारखे आहेत त्यांना मारले तर आपणच नालायक म्हटले जाऊ. त्यांना सोड आणि मग मार, तेव्हा ते तुलाच मारतील किंवा पळून जातील. बांधलेल्यांना मारणे हे शुरवीरांचे काम कसे म्हणू शकतो ? हे तर भित्र्यांचे काम म्हटले जाईल. घरातील माणसांना तर किंचितही दुःख देता कामा नये. ज्याच्यात समजदारी नसेल तेच घरच्यांना दुःख देतात. तक्रार नाही, तोडगा काढा प्रश्नकर्ता : दादा, माझी तक्रार कोण ऐकेल ? दादाश्री : तू तक्रार करशील तर तूच गुन्हेगार ठरशील. मी तर जो तक्रार करायला येतो त्यालाच गुन्हेगार मानतो. तुला तक्रार करण्याची वेळच का आली? तक्रार करणारे बहुतेक गुन्हेगारच असतात. स्वतः गुन्हेगार असेल तर तक्रार करायला येईल. तू तक्रार करशील तर तू तक्रारदार बनशील आणि समोरचा आरोपी बनेल. म्हणून त्याच्या (समोरच्याच्या) दृष्टीत तू आरोपी ठरशील. म्हणून कुणाविरुद्ध तक्रार करू नये. प्रश्नकर्ता : मग मी काय करायला हवे ? दादाश्री : 'ते' चुकीचे वाटले तर मनात म्हणावे की, ते खूप सज्जन आहेत, तूच चुकीची आहेस. अशाप्रकारे आपल्याकडून गुणाकार झाला असेल तर भागाकार करावा आणि भागाकार झाला असेल तर गुणाकार करावा. हे गुणाकार, भागाकार करायला का शिकवतो ? तर संसारातून तोडगा सुटण्यासाठी. Page #116 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार १०१ तो भागाकार करत असेल तर आपण गुणाकार करावा म्हणजे रक्कम उडून जाईल. समोरच्या माणसाने मला असे केले, तसे केले हाच अपराध आहे. रस्त्यात जाताना जर भिंतीशी टक्कर झाली तर का रागवत नाही? झाडाला 'जड' का म्हटले आहे? जी आदळतात ती सगळी हिरवी झाडेच आहेत ! गायीचा पाय आपल्या पायावर पडला तर आपण तिला काही बोलतो का? असेच याही लोकांचे आहे. 'ज्ञानी पुरुष । सगळ्यांना कशामुळे माफ करतात? ते जाणतात की या बिचाऱ्यांना काही समजत नाही, झाडासारखे आहेत. आणि समजदार व्यक्तीला तर सांगावेच लागत नाही, तो तर लगेच प्रतिक्रमण करुन घेतो. समोरच्याचा दोष बघूच नये, त्यामुळे तर आपला संसार बिघडून जातो. स्वत:चेच दोष पाहत राहावेत. आपल्याच कर्माच्या उदयाचे हे फळ आहे ! म्हणून आणखी काही जास्त संगण्याची गरजच राहिली नाही ना? सगळे एकमेकांना दोष देतात की 'तुम्ही असे आहात. 'तुम्ही तसे आहात.' आणि एकत्र बसून टेबलावर जेवतात. अशाप्रकारे आत वैर बांधले जाते. या वैरमुळे जग टिकून राहिले आहे. म्हणून आम्ही सांगितलेले आहे की, 'समभावे निकाल करा.' त्यामुळे वैर संपते. सुख घेण्यात फसवणूक वाढली संसारी मिठाईत काय आहे? अशी कोणती मिठाई आहे का की जी थोडा वेळ तरी टिकते? जास्त खाल्ली तर अजीर्ण होते, कमी खाल्ली तर (खाण्याची) लालूच उत्पन्न होत राहते. जास्त खाल्ली तर आत त्रास होतो. सुख असे पाहिजे की त्यापासून कसलाच त्रास होता कामा नये. पाहा ना, या दादांना, यांच्याकडे आहेच ना असे सनातन सुख! सुख मिळावे म्हणून लोक लग्न करतात. पण उलट त्यामुळे जास्त फसगत झाल्यासारखे वाटते. मला कोणी मदत करणारा मिळावा. Page #117 -------------------------------------------------------------------------- ________________ १०२ क्लेश रहित जीवन संसार चांगला चालेल असा कोणी सहकारी मिळेल म्हणून लोक लग्न करतात ना? संसार तसा आकर्षक वाटतो पण संसारात पडल्यावर अशी कुचंबणा होते की त्यातून बाहेर पडता येत नाही. संसार म्हणजे लाकडाचा लाडू, जो खातो तोही पस्तावतो आणि जो खात नाही तोही पस्तावतो.' लग्न करून पश्चाताप होतो, पण पश्चातापातून ज्ञान मिळते. अनुभवातूनच ज्ञान मिळायला हवे ना? नुसते पुस्तक वाचल्याने अनुभवज्ञान थोडेच मिळते? पुस्तक वाचल्याने काय वैराग्य येते? वैराग्य तर पश्चाताप झाल्यानतंरच येतो. अशा पद्धतीने लग्न ठरते एका मुलीला लग्न करायचेच नव्हते. तिच्या घरचे लोक तिला माझ्याकडे घेऊन आले. मी तिला समजावून सांगितले की लग्न करण्यावाचून पर्याय नाही आणि लग्न केल्यानंतर पश्चाताप केल्याशिवाय पण पर्याय नाही. म्हणून तुझे रडगाणे थांबव आता आणि मी सांगतो त्याप्रमाणे लग्न कर. जसा मिळेल तसा, पण नवरा पण नवरा तर हवा. मग लोक तुझ्याकडे बघून बोट दाखवू शकणार नाही ना! आणि कशाच्या आधारावर नवरा मिळतो (संबंध जुळते) हे पण मी तिला समजावून सांगितले. तिला ते समजले, आणि माझ्या सांगण्याप्रमाणे मग तिने लग्न केले. तिला मुलगा जरा दिसायला देखणा नाही वाटला पण तरीही तिने सांगितले की, 'मला दादाजींनी सांगितले आहे म्हणून मी लग्न करणार.' त्या मुलीला लग्नापूर्वीच 'ज्ञान' दिले आणि नंतर तिने माझा एकही शब्द ओलांडला नाही, आणि आता ती एकदम सुखी आहे. मुले मुलगी पसंत करताना खूप नखरे करतात. खूप उंच आहे, खूप ठेंगणी आहे, खूप जाडी आहे, खूप बारीक आहे, थोडी काळी आहे, अरे चक्रम, ही काय म्हैस आहे ? मुलांना जर समजवा की लग्न करण्याची Page #118 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार १०३ काय पद्धत असते? तू जाऊन मुलीला पाहून ये आणि तिला पाहून तुला आकर्षण वाटले तर तुझे लग्न निश्चित आहे असे समज आणि आकर्षण नाही वाटले तर मग गोष्ट तिथेच थांबवावी. जग सूड घेतेच एक मुलगा मुलगी पाहताना 'तू अशी फिर, तू तशी फिर' असे त्या मुलीला सांगत होता! मी त्याला खूप खाणकावले. मी म्हणालो, 'तुझी आई सुद्धा कधीतरी सून झाली होती. कसा माणूस आहेस तू?' स्त्रियांचा एवढा घोर अपमान ! सध्या मुलींची संख्या वाढली आहे म्हणून स्त्रियांचा एवढा अपमान होत आहे. पूर्वी तर या बावळटांचा अपमान होत असे, त्याचाच हा आता बदला घेतला जात आहे. यापूर्वी चारशे, पाचशे मूर्ख राजे रांगेत उभे राहत आणि एक राजकुमारी वरमाला घेऊन निघत असे आणि हे बावळट (आपल्याला वरमाला घालावी म्हणून) मान वाकवून उभे राहत असत राजकुमारी सरळ पुढे निघून गेली की आपमानाने आतल्या आत जळत असे. किती घोर अपमान! जळो, हे लग्न करण्याचे!! त्यापेक्षा तर लग्न नाही केलेलेच उत्तम!! आणि आजकाल तर या मुली सुद्धा मुलांना सांगू लागल्या आहेत की, 'जरा असे गोल फिरून दाखवा बरं? मला नीट बघू द्या तुम्ही कसे दिसता?' बघा आता, तुम्हीच असे बघण्याची सिस्टम काढली त्यामुळे तुमची ही अवस्था झाली ना? यापेक्षा सिस्टम काढली नसती तर त्यात काय वाईट? आपणच हे लफडे काढले म्हणून आपल्यालाच ते भोवले. ___ या काळातच, मागील पाचएक हजार वर्षांपासूनच पुरुष कन्या आणायला जातात. त्यापूर्वी तर वडील स्वयंवर रचत असत.त्यात शंभर बावळट आलेले असत! मुलगी त्यातल्या एका बावळटला पास करत असे! असे पास होऊन लग्न करण्यापेक्षा लग्न न करणेच चांगले. हे सर्व मूर्ख एका रांगेत उभे राहत, त्यांच्या समोरून ती कन्या वरमाला घेऊन चालत असे. सगळ्यांच्या मनात खूप आशा असायच्या की आता Page #119 -------------------------------------------------------------------------- ________________ १०४ क्लेश रहित जीवन माझ्याच गळ्यात वरमाला पडणार, म्हणून ते डोके झुकवून उभे राहत! अशाप्रकारे जर मुलगी आपल्याला पसंत करत असेल त्यापेक्षा तर जन्म न घेतलेलाच बरा! आज तेच मूर्ख स्त्रियांचा भयंकर अपमान करून वैर वसूल करत आहे ! मुली पाहायला जातात तेव्हा तिला सांगतात 'अशी फिर, तशी फिर' कॉमनसेन्सने सोल्युशन येते मी सगळ्यांनाच असे म्हणत नाही की तुम्ही सगळे मोक्षाला चला. मी तर असे म्हणतो की 'जीवन जगण्याची कला शिका.' लोकांकडून थोडेफार तर 'कॉमनसेन्स' शिका! तेव्हा शेठ लोक मला म्हणतात की आमच्यात तर कॉमनसेन्स आहे.' तेव्हा मी म्हणालो, 'कॉमनसेन्स असेल तर असे होणारच नाही. तुम्ही तर मूर्ख आहात.' शेठने विचारले कॉमनसेन्स म्हणजे काय? मी म्हणालो, 'कॉमनसेन्स म्हणजे एव्हरीव्हेअर एप्लीकेबलथियरीटीकली अॅज वेल अँज पॅक्टीकली.' कुलूप कसेही असो, गंज लागलेले असो किंवा कसेही असो, त्यात किल्ली घातली लगेच की उघडते, याला म्हणतात कॉमनसेन्स. तुमची कुलूपे उघडत नाहीत. तुम्ही सारखे भांडता आणि कुलूपे तोडता! अरे, तुम्ही तर कुलूपावर मोठा हातोडाच मारतात! तुमच्यात मतभेद होतात का? मतभेद म्हणजे काय? कुलूप उघडता आले नाही, कुलूप उघडण्यासाठी कॉमनसेन्स कुठून आणणार? मला असे सांगायचे आहे की, तुमच्याकडे पूर्णपणे तीनशे साठ डिग्रीचे कॉमनसेन्स नसेल हे मान्य आहे, पण चाळीस डिग्री, पन्नास डिग्रीचे असायला नको का? पण तसे लक्षात घेतले तर ना? जर कोणी शुभ विचार करण्यात गुंतला असेल तर त्याला त्या शुभ विचारांची आठवण येईल आणि तो जागृत होईल. शुभ विचारांचे बीज पडले की मग शुभ विचार करण्याचे सुरु होऊन जाते. पण हा शेठ संपूर्ण दिवस लक्ष्मीच्या आणि फक्त लक्ष्मीच्याच विचारात मग्न असतो! म्हणून मला शेठला Page #120 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार १०५ सांगावे लागते की, 'शेठ तुम्ही लक्ष्मीच्या मागे पडले आहात, घर पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे.' मुली गाडी घेऊन इकडे जातात, मुले तिकडे जातात आणि शेठानी पण इकडे-तिकडे फिरत असते. 'शेठ, तुम्ही तर चहूबाजूंनी लुटले गेले!' तेव्हा शेठने विचारले 'मग मी काय करु?' मी म्हणालो, 'नीट समजण्याचा प्रयत्न करा ना. जीवन कसे जगावे ते समजा. फक्त पैशांच्याच मागे धावू नका. तब्येतीची काळजी घ्या, नाही तर हार्टफेल होईल.' तब्येतीची काळजी, पैशांवर लक्ष, मुलांच्या संस्कारावर लक्ष, असे सगळेच कोपरे साफ करायचे असतात. (सगळ्यांवर लक्ष ठेवायचे) तुम्ही फक्त एकच कोपरा साफ करत राहता. आता बंगल्याचा जर एकच कोपरा झाडत करीत राहिलो आणि सगळ्या कोपऱ्यात केर साचलेला असेल तर कसे होईल? सगळेच कोने-कोपरे साफ करावे लागतात. असे कसे जगू शकाल? कॉमनसेन्स असलेला मनुष्य घरात कधी मतभेद होऊच देत नाही. पण हे कॉमनसेन्स कुठून आणणार? जर ज्ञानीपुरुषांजवळ बसाल, ज्ञानीपुरुषांची चरणसेवा कराल, तेव्हा कॉमनसेन्स उत्पन्न होईल. कॉमनसेन्सवाला घरात किंवा बाहेर कुठेही भांडण होऊ देत नाही. या मुंबईत मतभेदाशिवायची घरं किती आहेत? मतभेद होत असेल तिथे कॉमनसेन्स कसे म्हणता येईल. घरात बायको म्हणाली की, 'आत्ता दिवस आहे' आणि तुम्ही म्हणाल की 'नाही आत्ता रात्र आहे' असे म्हणून वाद सुरु केलात तर त्यातून बाहेर कसे पडणार? तुम्ही तिला सांगा की, 'मी तुला विनंती करतो की आत्ता रात्र आहे, जरा बाहेर जाऊन तपास कर ना.' तरीही ती म्हटली की, 'नाही, आत्ता दिवसच आहे.' तेव्हा तुम्ही सांगा, 'यु आर करेक्ट.' माझीच चुकी झाली. असे वागाल तर तुमची प्रगती होऊ शकेल. नाही तर या गोष्टींचा कधी अंतच येणार नाही. हे सगळे वाटसरू आहेत. बायको सुद्धा एक वाटसरूच आहे. Page #121 -------------------------------------------------------------------------- ________________ १०६ क्लेश रहित जीवन रिलेटिव्ह शेवटी धोकाच आहे, असे समजते सर्व नाती रिलेटिव्ह आहेत. यात कोणीच रियल नातेवाईक नाही. अरे हे शरीरच रिलेटिव्ह आहे ना! हा देहच धोकेबाज आहे, मग या देहाचे नातेवाईक किती असतील? या देहाला आपण रोज न्हाऊमाखु घालतो, खाऊ घालतो तरी पण पोटात दुखते तेव्हा आपण म्हटले की, 'मी तुझी रोज एवढी काळजी घेतो तर आज जरा शांत हो ना?' (नको दुखूस). असे म्हणून भागते का? एक क्षणवारही दुखण्याचे थांबत नाही, ते मग आपली अब्रूच काढते. अरे, या बत्तीस दातांमधील एकच दात दुखला ना तरी किंचाळायची वेळ येते. सारे घर भरेल एवढे तर आयुष्यभरात दातवण वापरले, रोजच दात घासत राहतो पण तरीही तोंड साफ होत नाही! ते जसेच्या तसेच. म्हणजे ही तर एक फसवणूकच आहे. एक तर मनुष्य जन्म मिळला आणि तोही हिंदुस्तानात जन्म मिळाला आहे, उच्च जातीत जन्म मिळाला आहे आणि तरी तुला मोक्षाचे काम काढता आले नाही, तर तू भटकलाच समज ! जा, तुझे सर्वच वाया गेले!! काहीतरी समजावे तर लागेलच ना? जरी मोक्षाची गरज सगळ्यांना नसेल, पण कॉमनसेन्सची गरज तर सगळ्यांनाच आहे ना. हे तर कॉमनसेन्स नसल्यामुळे घरचे खाऊन-पिऊन देखील भांडणे होतात. सगळे जण थोडेच काळाबाजार करतात? तरी पण संध्याकाळ होईपर्यंत घरातील तीन माणसांत तेहत्तीस मतभेद पडतात. यात कुठले सुख मिळते? नंतर दुराग्रही होऊन जगतात. असे स्वाभिमान नसलेले जीवन जगण्यात काय फायदा? मॅजिस्ट्रेट साहेब कोर्टात सात वर्षाची सजा ठोठावून घरी येतात पण घरातील केस मात्र पंधरा-पंधरा दिवसापासून पेंडिंग असते! घरात बायकोशी अबोला धरतात! आपण जर मॅजिस्ट्रेट साहेबांना विचारले, 'साहेब, असे का?' तेव्हा साहेब म्हणतील, 'बायकोच खूप खराब आहे. एकदम जंगली आहे.' आणि जर आपण त्यांच्या बाईसाहेबांना विचारले की, 'का हो, साहेब तर खूप चांगले Page #122 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार १०७ माणूस आहेत ना?'! हे ऐकून बाईसाहेब उत्तर देतील, जाऊ द्या हो, एकदम कुजका माणूस आहे. आता असे ऐकल्यावर लगेच आपल्या लक्षात येणार नाही का की हे जग पोकळ डोलारा आहे आहे ? इथे काहीच खरे नाही. बायकोने जर महागातली भाजी आणली तर भाजी बघून मूर्ख ओरडतो, 'एवढी महाग भाजी कोणी आणते का? हे ऐकून बायको म्हणेल, 'तुम्ही माझ्यावर का ओरडलात?' असे म्हणून बायाको दुप्पट जोराने ओरडते. यातून कसे सावरायचे? बायकोने जर महाग भाजी आणली असेल तर आपण तिला म्हणावे, छान केलेस, माझे धन्यभाग्य! नाही तर माझ्यासारख्या लोभी माणसाकडून इतकी महाग भाजी घेतली गेली नसती. आम्ही एका माणसाच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांच्या बायकोने दुरूनच चहाचा कप असा आपटून ठेवला. मी लगेच समजून गेलो की या दोघांमध्ये काहीतरी भानगड झाली आहे. मग मी त्या बाईला बोलावले आणि विचारले चहाचा कप असा आपटून का ठेवला? तेव्हा ती म्हणाली, 'छे,छे असे काहीच नाही.' मी तिला म्हटले की तुझ्या मनात काय आहे ते मला समजत आहे. तू माझ्याजवळ का लपवतेस? तू आपटून ठेवले त्यावरून तुझ्या नवऱ्याच्याही लक्षात आले की हकीगत काय आहे. शहाणी होऊन फक्त एवढे हे कपट सोडून दे, तुला जर सुखी व्हायचे असेल तर.' पुरुष बिचारे भोळे असतात आणि या स्त्रिया तर चाळीस वर्षांपूर्वी तुम्ही वीस-पंचवीस शिव्या दिल्या असतील त्या बोलून दाखवतील की तुम्ही तेव्हा मला अशा शिव्या दिल्या होत्या. म्हणून सांभाळून वागा. स्त्रियांकडून काम करवून घ्या. स्त्री तर तुमच्या काम करवूनच घेईल. पण तुम्हाला मात्र ते जमत नाही. बायकोला जर दीडशे रुपयांची साडी आणायची असेल तर Page #123 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन तिला पंचवीस रुपये जास्त द्या. ती ते सहा महिने तरी लक्षात ठेवेल. या साध्या साध्या गोष्टी समजून घ्या. जीवन जगणे ही एक कला आहे ! जीवन जगण्याची कला तर येत नाही आणि लग्न करायला निघतात. बिन सर्टिफिकेटचे पती बनायला निघाले, पती होण्यासाठीच्या पात्रतेचे सर्टिफिकेट असायला पाहिजे तेव्हाच बाप होण्याचा अधिकार प्राप्त होईल. हे तर योग्यता नसताना बाप बनतात आणि आजोबा पण बनतात ! असे कुठपर्यंत चालेल ? थोडेतरी समजायला हवे. रिलेटिव्हमध्ये तर जोडणे शिका १०८ ही सगळी नाती 'रिलेटिव्ह' आहेत. ही नाती जर खरी- रियल असती तर बायको जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत मी हट्ट सोडणार नाही, हा आग्रह ठीक आहे. पण हे तर 'रिलेटिव्ह' ! 'रिलेटिव्ह' म्हणजे तासभर जरी बायकोशी कडाक्याचे भांडण झाले तर दोघांच्या मनात 'घटस्फोट' घेण्याचा विचार येतो, नंतर त्या विचारबीजाचे झाड होते. तुम्हाला जर बायको हवी असेल तर ती जेव्हा जेव्हा फाडेल तेव्हा तेव्हा तुम्ही जोडत रहा. तरच हे ‘रिलेटिव्ह' संबंध टिकतील, नाही तर तुटतील. वडिलांबरोबर सुद्धा ‘रिलेटिव्ह' संबंध आहे. लोक तर 'रियल' संबंध मानून वडिलांबरोबर हट्ट करतात. वडील सुधरत नाहीत तोपर्यंत काय हट्ट धरून बसायचा ? अरे सोड रे बाबा, असे सुधारत - सुधारत तर म्हातारा मरून जाईल ! त्यापेक्षा त्याची सेवा कर ना, बिचारा वैर बांधून जाईल त्यापेक्षा त्याला निवांत मरू दे ना ! त्याची शिंगे त्यालाच जड. कोणाची वीस-वीस फुटांची लांब शिंगे असतात, त्याचे ओझे आपल्याला कशाला ? ! ज्याचे असतील त्याला ओझे ! तुम्हाला तुमची कर्तव्ये पार पाडायची आहेत. म्हणून दुराग्रह करू नका. ताबडतोब समस्यांचे समाधान करा. तरीही समोरची व्यक्ती जास्त भांडत असेल तर म्हणावे की, मी पहिल्यापासूनच अडाणी आहे, मला काहीच समजत नाही. असे बोलतात तर तो तुम्हाला सोडून देईल. Page #124 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार १०९ जमेल त्या मार्गाने स्वत:ची सुटका करून घ्या. आणि मनात असे अजिबात आणू नका की सगळे डोक्यावर चढून बसले तर काय होईल? ते काय चढून बसतील? चढून बसण्याची शक्ती कुणाजवळ नसते. हे सगळे भोवरे कर्माच्या उदयानुसार नाचतात! म्हणून जेम-तेम करून आजचा शुक्रवार क्लेशरहित काढा. कल की बात कल देख लेंगे. (उद्याचे उद्या बघू) दुसऱ्या दिवशी फटाका फुटला तर काहीही करुन त्यास झाका आणि आटोक्यात आणा. मग पुढचे पुढे पाहू. असे करून दिवस पार पाडावेत. ते सुधारलेले कुठपर्यंत टिकेल? प्रत्येक गोष्टीत आपण समोरच्याला एडजस्ट होत गेलो तर (जीवन जगणे) किती सोपे होऊन जाईल. शेवटी आपल्याला सोबत काय घेऊन जायचे आहे ? कोणी म्हणेल की, 'भाऊ, तिला सरळ करा.' अरे तू तिला सरळ करायला जाशील तर तू वाकडा होशील. म्हणून बायकोला सरळ करायला जाऊ नका, जशी आहे तशीच करेक्ट आहे. तुमचे तिच्याशी कायमचे नाते असले तर वेगळी गोष्ट आहे पण हे तर एका जन्मानंतर तुम्ही कुठे आणि ती कुठे, दोघेही विखुरले जाल. दोघांचा मृत्युकाळ वेगळा, दोघांचे कर्म वेगळे! काही देणे नाही आणि काही घेणे नाही! पुढील जन्मी ती कुठे जाईल ते कोणास ठाऊक? आपण तिला सुधारू आणि ती सुधारलेली पुढच्या जन्मी जाईल दुसऱ्याच्या वाट्याला! प्रश्नकर्ता : तिच्याबरोबर कर्मबंधन झाले असेल तर पुढच्या जन्मी तिच्याशी भेट होईलच ना? दादाश्री : भेट होईल, पण वेगळ्या प्रकारे भेट होईल. दुसऱ्या कुणाची तरी बायको होऊन तुमच्याशी गप्पा मारायला येईल. कर्माचे नियम तर आहेतच! हे तर काही ठावठिकाणाच नाही. कोणी एखादाच पुण्यवान मनुष्य असा असतो की जो काही जन्म सोबत राहातो. नेमिनाथ भगवत आणि राजुल नऊ जन्मांपर्यंत सोबतच होते ना! असे असेल तर Page #125 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन गोष्ट निराळी आहे. इथे तर पुढच्या जन्माचाच सांगता येत नाही. अरे, याच जन्मात सोडून जातात ना ! याला घटस्फोट म्हणतात ना ? याच जन्मात दोन नवरे करतील, तीन नवरे करतील ! ११० एडजस्ट झालात, तरीही सुधारेल म्हणून तुम्ही त्यांना सुधारायचे नाही. त्याही तुम्हाला सुधारणार नाही. जे मिळाले आहे ते सोन्याचे. कोणाचीही प्रकृती कधी सरळ होत नाही. कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहील. म्हणून आपण सावधपणाने वागावे. जशी आहे तशी भले असो, 'एडजस्ट एव्हरीव्हेअर ' रागावण्याच्या ठिकाणीही तुम्ही रागावले नाही तर बायको जास्त सरळ वागते. जो क्रोध करत नाही त्याचा दरारा खूप असतो. आम्ही कधी कोणाला ओरडत नाही. तरी आमचा त्यांना दरारा वाटतो. प्रश्नकर्ता : तर मग ती सरळ होते ? दादाश्री : मुळात सरळ करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. या कलियुगातील लोकांना पटत नाही, पण त्याशिवाय गत्यंतर नाही. प्रश्नकर्ता : पण हा खूप कठीण मार्ग आहे. दादाश्री : नाही, मुळीच नाही. हा मार्ग कठीण नाही उलट हाच मार्ग सोपा आहे. गायीचे शिंग गायीलाच जड. प्रश्नकर्ता : पण ती शिंग आपल्यालाही मारते ना ? दादाश्री : एखाद्या दिवशी आपल्याला लागेल. जसे गाय शिंगे मारायला आली तर तुम्ही सरकता ना, तसेच इथेही सरकून जावे! पण अडचण काय आहे ? तर माझे लग्न झालेले आहे आणि माझी बायको आहे? अरे, ती बायको नाहीच. हा नवराच नाही तर ती बायको कशी असेल? हा तर अडाणी लोकांचा खेळ आहे ! आता आर्यप्रजा राहिलीच कुठे ? Page #126 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार १११ सुधारण्यापेक्षा सुधरण्याची गरज प्रश्नकर्ता : स्वतःची चूक आहे असे समजून पत्नीला सुधारता येणार नाही का ? दादाश्री : दुसऱ्याला सुधारण्यासाठी स्वतःलाच सुधरण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या कोणाला सुधारु शकत नाही. जे दुसऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न करतात ते सगळे अहंकारी आहेत. स्वतः सुधरलो म्हणजे समोरचाही सुधरतो. मी असेही लोक पाहिले आहेत की, जे बाहेर दुसऱ्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतात पण घरात बायको पुढे त्यांची काहीच अब्रू नसते. आई समोरही अब्रू नसते. ही कशी माणसे आहेत ही ? आधी तू सुधर. मी याला सुधारेल, मी त्याला सुधारेल हा खोटा अहंकार आहे. अरे तूच धड नाहीस, तर तू दुसऱ्यांना काय सुधारणार ? प्रथम स्वतः शहाणे होण्याची गरज आहे. 'महावीर' होण्यासाठीच प्रयत्न करीत होते म्हणून त्यांचा आजही एवढा प्रभाव आहे! पंचवीसशे वर्षानंतर सुद्धा त्यांचा प्रभाव ओसरलेला नाही !!! आम्हीही कोणाला सुधारत नाही. सुधारण्याचा अधिकार कोणाला ? तुम्हाला दुसऱ्यांना सुधारण्याचा काय अधिकार आहे ? ज्याच्यात चैतन्य आहे त्याला सुधारण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? हे कपडे मळकट झाले तर त्यांना स्वच्छ करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. कारण तिथे समोरून कोणत्याही प्रकारचे रिॲक्शन (प्रतिक्रिया) येणार नाही परंतु ज्यात चैतन्य आहे ते तर रिअॅक्शन करणारे आहे, अशांना तुम्ही कसे काय सुधारणार? जिथे स्वतःचीच प्रकृती सुधरत नाही तिथे दुसऱ्यांची प्रकृती कशी सुधारणार ? स्वतःच एक भोवरा आहे. त्याचप्रमाणे इतर सर्वजण पण भोवरेच आहेत. कारण ते सर्व प्रकृतीच्या ताब्यात आहेत, ते अजून पुरुष झालेले नाहीत. पुरुष झाल्यानंतर 'पुरुषार्थ' उत्पन्न होतो. तो पुरुषार्थ तुम्ही अजून पाहिलेलाच नाही. Page #127 -------------------------------------------------------------------------- ________________ ११२ क्लेश रहित जीवन व्यवहार निभवा एडजस्ट होऊन प्रश्नकर्ता : संसारात राहायचे तर 'एडजस्टमेन्ट' एकतर्फी असायला नको ना? दादाश्री : व्यवहार त्यास म्हणता येईल की, आपले 'एडजस्टमेन्ट' पाहून शेजारीही म्हणतील की, सगळ्यांच्या घरी भांडणे होतात पण यांच्या घरी मात्र कधीही भांडण पाहिले नाही. असा व्यवहार सर्वात उत्तम म्हटला जाईल. ज्यांच्याशी जमत नाही तिथेच शक्ती विकसित करायची आहे, ज्यांच्याशी जमते तिथे तर शक्ती आहेच. जिथे जमत नाही तिथे तुमचा कमकुवतपणा आहे. माझे सगळ्यांबरोबर का जमते? तुम्ही जेवढे 'एडजस्टमेन्ट' घ्याल तेवढी तुमची शक्ती वाढेल आणि कमकुवतपणा कमी होत जाईल. सगळ्या गैरसमजुती जेव्हा दूर होतील, तेव्हाच खरी समज येईल. 'ज्ञानी' पुरुष तर, समोरचा जरी वाकडा वागत असेल तरीही त्याच्याशी 'एडजस्ट' होतात, 'ज्ञानी पुरुषांना' पाहून आपण सुद्धा तसे वागलो तर सगळ्या प्रकारच्या एडजस्टमेन्ट घ्यायला जमतील. या मागेच सायन्स काय सांगते की तुम्ही वीतराग व्हा. राग-द्वेष करू नका. ही तर आतमध्ये थोडीफार आसक्ती असते, त्यामुळे मार पडतो. अशा व्यवहारात जे एकपक्षी, नि:स्पृह झाले त्यांना वाकडे म्हणावे लागेल. आपल्याला गरज असेल तेव्हा समोरचा वाकडा वागत असेल तरी देखील त्याला समजावून पटवून वळवून घ्यावे लागते. स्टेशनवर सामान उचलण्यासाठी हमाल हवा असेल आणि तो पैशांसाठी वाद घालत असेल तर त्याला चार आणे जास्त देऊन सुद्धा पटवावे लागते, आणि तसे जर केले, नाही तर ती बॅग आपल्यालाच उचलावी लागेल ना? 'डोन्ट सी लॉझ, प्लीज सेटल' (कायदा पाहू नका, कृपया समाधान करा), समोरच्याला 'सेटलमेन्ट' (जुळवून) घ्यायला सांगायचे, की 'तुम्ही असे करा, तसे करा.' असे सर्व सांगायला वेळच कुठे असतो? Page #128 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार ११३ समोरच्या व्यक्तीच्या शंभर चुका असतील तरीही आपण आपली स्वत:चीच चूक आहे असे सांगून पुढे जायला हवे. या काळात 'कायदे' बघत बसायचे असते का? हे तर आत्ता शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले आहे. जिथे पाहावे तिथे पळापळ आणि धावाधाव! लोक गुरफटून गेले आहेत!! घरी जावे तर बायकोची तक्रार, मुले ओरडतात, नोकरीवर गेलो तर शेठ ओरडतो, गाडीत गेलो तर गर्दीत धक्के खावे लागतात! कुठेच शांती नाही. शांती तर पाहिजे ना? कोणी भांडू लागले तर आपल्याला त्याच्याबद्दल दया वाटली पाहिजे की, अरेरे! बिचारा किती त्रासला आहे! इतका त्रासलेला आहे की भांडत आहे ! त्रासतात, चिडतात ते सगळे कमजोर आहेत. प्रश्नकर्ता : कित्येक वेळा असे होते की, एकाचवेळी दोन व्यक्तींबरोबर एकाच गोष्टीसाठी एडजस्टमेंट घ्यायची असते तर अशा वेळी दोघांशी कसे एडजस्ट होऊ शकतो? दादाश्री : दोघांशीही एडजस्ट होता येईल. अरे सात माणसांशीही एडजस्टमेन्ट घ्यायची असेल तर घेऊ शकतो. एकाने विचारले, 'माझ्या कामाचे काय केले?' तेव्हा सांगावे हो भाऊ, तुझ्या म्हणण्याप्रमाणे करणार. दुसऱ्यालाही असेच सांगावे. 'तुम्ही म्हणाल तसे करू.' शेवटी 'व्यवस्थित शक्ती' च्या बाहेर काहीच घडणार नाही, म्हणून कुठल्याही परिस्थितीत भांडण उभेच करू नका. चांगले किंवा वाईट म्हटल्यामुळे ते आपल्याला भुतासारखे त्रास देतात. आपल्याला तर दोघांनाही एक समानच ठेवायचे आहे. एकास चांगले म्हटले म्हणून दुसरा खोटा ठरला मग तो त्रास देतो. पण दोन्हींचे मिश्रण केले म्हणजे मग त्याचा काहीच परिणाम होत नाही. 'एडजस्ट एव्हरीव्हेअर' या सूत्राचा आम्ही शोध लावला आहे. खरे म्हणत असेल त्याच्याशीही आणि खोटे म्हणत असेल त्याच्याशीही, दोघांशीही एडजस्ट व्हायचे. आम्हाला कोणी म्हटले की, 'तुम्हाला अक्कल नाही.' तर आम्ही Page #129 -------------------------------------------------------------------------- ________________ ११४ क्लेश रहित जीवन त्याच्याशी लगेच एडजस्ट होतो, आणि त्याला सांगतो, 'ती तर पहिल्यापासूनच नव्हती!' तू आता का बरे शोधायला आलास? तुला तर हे आज समजले, पण मला तर लहानपणापासून माहीत आहे. असे म्हटले म्हणजे वाद मिटला ना? मग तो पुन्हा आपल्याजवळ अक्कल काढायला येणारच नाही. असे केले नाही तर आपण 'आपल्या घरी' (मोक्षाला) केव्हा पोहोचू? आम्ही हा सरळ आणि सुलभ रस्ता दाखवित असतो. आणि अशी भांडणे काय रोज-रोज होतात? ते तर जेव्हा आपल्या कर्माचा उदय होतो तेव्हाच होतात, तेवढ्या पुरतीच 'एडजस्टमेन्ट' करायची असते. घरात जर बायकोशी भांडण झाले तर भांडण झाल्यावर बायकोला हॉटेलमध्ये नेऊन खाऊ-पिऊ घालून खुश करा. आता भांडणाचा तंत (अंश) देखील शिल्लक राहता कामा नये. एडजस्टमेन्टला आम्ही न्याय म्हणतो. आग्रह-दुराग्रह हे काही न्याय नाही. कोणत्याही प्रकारचा आग्रह धरणे म्हणजे न्याय नाही. आम्ही कशाचाही आग्रह धरून ठेवत नाही. ज्या पाण्याने मुग शिजतील त्या पाण्याने शिजवा, शेवटी गटारीच्या पाण्याने पण शिजवा!! वाटेत दरोडेखोर आले आणि त्यांच्याशी वाद घातला, 'डिसएडजस्ट' झालो तर प्राण गमवाल. त्याऐवजी आपण ठरवायचे की, त्याला 'एडजस्ट' होऊन प्रसंगाला तोंड द्यायचे आहे. त्याला विचारा की, 'बाबा रे, तुला काय हवे आहे? आम्ही तर यात्रेला निघालो आहोत.' अशाप्रकारे त्याला एडजस्ट होऊन जावे.' या बांद्राच्या खाडीतून दुर्गंध येतो म्हणून आपण त्या खाडीशी भांडायला जातो का?तशीच ही माणसेही दुर्गंध देतात मग काय त्यांना काही बोलायला हवे का? दुर्गंध देणाऱ्यांना खाडी (नाला) म्हणतात आणि सुगंध पसरवतात त्यांना बाग म्हणतात. जे-जे दुर्गंध देतात ते सगळे आपल्याला हेच सांगतात की, तुम्ही आमच्याप्रति वीतराग राहा. Page #130 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार ११५ असे 'एडजस्ट एव्हरीव्हेअर' झाला नाहीत तर तुम्हीवेडे व्हाल. समोरच्याला विनाकारण डिवचत राहतात म्हणूनच ते वेडे होतात. या कुत्र्याला एकदा डिवचले, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा डिवचले तोपर्यंत तो आपली अब्रू ठेवतो (गप्प बसतो) पण मग आपण पुन्हा पुन्हा डिवचत राहिलो तर शेवटी तोही चावतो. त्यालाही कळते की, हा मला रोजच विनाकारण त्रास देतो, हा तर नालायक माणूस आहे, निर्लज्ज आहे. ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. अजिबात वादविवाद करत बसू नका. एडजस्ट एव्हरीव्हेअर. नाही तर व्यवहारिक अडचणी अडकवतील प्रथम हा व्यवहार शिकायचा आहे. व्यवहाराची योग्य समज नसल्यामुळे तर लोकांना निरनिराळे त्रास सोसावे लागतात. प्रश्नकर्ता : तुम्ही सांगितलेल्या अध्यात्मसंबंधी गोष्टींबद्दल तर काही प्रश्नच नाही, परंतु व्यवहारासंबंधी ज्या गोष्टी तुम्ही सांगता त्या देखील अगदी टॉपच्या (उच्च पातळीच्या) आहेत. दादाश्री : असे आहे ना, की व्यवहारात टॉपचे समजल्याशिवाय कोणी मोक्षाला जाऊ शकले नाही, तुमच्याजवळ लाख मोलाचे आत्मज्ञान असेल पण व्यवहार ज्ञान समजल्याशिवाय कोणी कधी मोक्षात गेले नाहीत! कारण व्यवहारच आपल्याला सोडविणारा आहे ना? व्यवहाराने जर सोडले नाही तर तुम्ही काय कराल? तुम्ही 'शुद्धात्मा' आहातच पण व्यवहाराने तुम्हाला सोडले तर ना? तुम्ही तर व्यवहाराचा गुंता वाढवतच राहता. अरे! झपाट्याने निकाल लावा ना? या भाऊला सांगितले की, 'जा दुकानातून आईस्क्रीम घेऊन ये.' पण तो अर्ध्यावरून परत आला. आपण विचारले, 'का परत आलास?' तेव्हा तो म्हणेल की, 'रस्त्यात गाढव दिसले म्हणून!' अपशकून झाला!! आता त्याला असे चुकीचे ज्ञान असेल मग त्या चुकीच्या ज्ञानातून त्याला बाहेर काढायला हवे ना? त्याला समजवायला हवे की भाऊ, गाढवात Page #131 -------------------------------------------------------------------------- ________________ ११६ क्लेश रहित जीवन सुद्धा भगवंत बसलेले आहेत म्हणून अपशकून वगैरे काही होत नाही. तू गाढवाचा तिरस्कार करशील तर तो तिरस्कार गाढवाच्या आत बसलेल्या भगवंताला पोहोचतो, म्हणून त्याचा तुला भयंकर दोष लागतो. पुन्हा असे घडता कामा नये. अर्थात लोकांना असे चुकीचे ज्ञान झाले आहे त्यामुळे लोक 'एडजस्ट' होऊ शकत नाहीत. 'काऊन्टरपुली'- एडजस्टमेन्टची पध्दत प्रथम आपण आपले मत मांडू नये. समोरच्याला विचारावे की या बाबतीत तुझे काय मत आहे ? समोरचा माणूस आपल्या मताचा हट्ट धरून बसला असेल तर आम्ही आमचे मत सोडून देतो. आपण तर फक्त एवढेच बघायचे की कोणत्याही कारणाने समोरच्याला दुःख व्हायला नको. आपला अभिप्राय (मत) समोरच्यावर लादता कामा नये. समोरच्या व्यक्तीचा अभिप्राय आपण घ्यावा. आम्ही तर सर्वांचा अभिप्राय घेऊनच 'ज्ञानी' झालो आहोत. मी जर माझा अभिप्राय समोरच्यावर लादायला गेलो तर मीच कच्चा सिद्ध होईल. आपल्या अभिप्रायामुळे कोणालाही दुःख होता कामा नये. तुझे 'रिवोल्यूशन' (गती-समजशक्ती) अठराशे असतील आणि समोरच्याचे सहाशे असतील आणि तू तुझा अभिप्राय त्याच्यावर ठोकून बसवायला गेलास तर त्याचे इंजिन तुटून जाईल. त्याचे सगळे गियर बदलावे लागतील. प्रश्नकर्ता : 'रिवोल्यूशन' म्हणजे काय? दादाश्री : या विचारांचा जो वेग असतो तो प्रत्येकाचा वेगळा असतो. काही तरी घडले की मन एका मिनिटात तर किती साऱ्या गोष्टी दाखवून देते, त्याचे सर्व पर्याय एट-ए-टाइम, एकाच वेळी दाखवून देते. या मोठमोठ्या पंतप्रधानांचे एका मिनिटात बाराशे-बाराशे 'रिवोल्यूशन' फिरत असतात, तर आमचे पाच हजार असतात. महावीर भगवंतांचे तर लाख-लाख 'रिवोल्युशन' फिरत असत! हे मतभेद होण्याचे कारण काय? समजा तुमच्या बायकोचे शंभर Page #132 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार 'रिवोल्यूशन' आहेत आणि तुमचे पाचशे 'रिवोल्यूशन' आहेत आणि तुम्हाला (तिचे म्हणणे समजून घेण्यासाठी) मध्ये 'काऊन्टरपुली' टाकता आली नाही तर ठिणग्या उडणारच, भांडणे होणारच. अरे ! कित्येक वेळा 'इंजिन' सुद्धा तुटून जाते. 'रिवोल्यूशन' म्हणजे काय हे समजले का तुम्हाला ? तुम्ही एखाद्या मजुराशी बोलत असाल तर तुम्ही काय बोलत आहात ते त्याला कळणारच नाही. त्याचे रिवोल्यूशन पन्नास असतील आणि तुमचे पाचशे असतील, कोणाचे हजार असतील, तर कोणाचे बाराशे सुद्धा असतील. ज्याचे जसे 'डेवलपमेन्ट,' त्याप्रमाणे त्याचे रिवोल्यूशन असतात. मध्ये काऊन्टरपुली टाकून गती कमी केलीत तरच तुमचे बोलणे त्याला समजेल. काऊन्टरपुली म्हणजे (समोरच्याला समजेल अशा पद्धतीने) तुम्हाला मध्ये पट्टा टाकून तुमचे रिवोल्यूशन कमी करावे लागतील. मी प्रत्येकाशी बोलताना काऊन्टरपुली वापरतो. फक्त अहंकार काढून टाकल्याने भागत नाही. त्याखेरीज प्रत्येकाशी बोलताना काऊन्टरपुली पण वापरावी लागते. म्हणूनच माझे कोणाशीही मतभेद होत नाहीत. आमच्या लक्षात येते की, या माणसांचे एवढेच 'रिवोल्यूशन' आहेत. म्हणून मी त्याप्रमाणे काऊन्टरपुली टाकतो. आमचे तर लहान मुलाशी सुद्धा चांगले जमते. कारण आम्ही त्याच्याशी बोलताना रिवोल्यूशन चाळीसपर्यंत खाली आणतो. म्हणून आमचे बोलणे त्याला समजते, नाही तर ती मशीन तुटून जाईल. (त्याच्यावर ताण पडेल) ११७ प्रश्नकर्ता : समोरच्या व्यक्तीच्या लेव्हलवर आल्यानेच त्याच्याशी संवाद शक्य होतो, असेच ना ? दादाश्री : हो, त्याच्या रिवोल्यूशन वर आलात तरच संवाद साधला जाऊ शकतो. तुमच्याशी बोलत असताना आमचे रिवोल्यूशन कुठल्या कुठे जाऊन येतात! संपूर्ण वर्ल्डमध्ये फिरून येतात !! तुम्हाला काऊन्टरपुली टाकता येत नाही मग त्यात कमी रिवोल्यूशन असणाऱ्या इंजिनाचा काय दोष? तो तर तुमचाच दोष की तुम्हाला काउन्टरपुली टाकता आली नाही ! Page #133 -------------------------------------------------------------------------- ________________ ११८ क्लेश रहित जीवन वाईट बोलण्यामुळे भांडण वाढले प्रश्नकर्ता : नवऱ्याची भीती, भविष्याची भीती यामुळे 'एडजस्टमेन्ट' घेता येत नाही. तिथे मग 'आपण त्याला सुधारणारे कोण? हे लक्षात राहत नाही आणि समोरच्याला धमकी दिली जाते. दादाश्री : अशा वेळी 'व्यवस्थित शक्ती' चा उपयोग केला, 'व्यवस्थित शक्तीचे' ज्ञान समजून घेतले तर कुठलाच त्रास होणार नाही. मग काही विचारावेच लागणार नाही. नवरा येईल तेव्हा जेवणाचे ताट वाढून, बसायला पाट देऊन 'जेवायला चला!' असे सांगा. त्यांचा प्रकृती स्वभाव बदलणार नाही. तुम्ही लग्न करतेवेळी ज्या प्रकृतीला पाहून, पसंत करून लग्न केले ती प्रकृती शेवटपर्यंत निहाळायची. मग काय पहिल्याच दिवशी माहीत नव्हते का की, ही प्रकृती अशीच आहे म्हणून? त्याच दिवशी सोडून द्यायचे होते ना! का जास्त नादी लागलात? या कटकट करण्याने संसारात काहीच फायदा होत नाही, उलट नुकसानच होते. कीटकिट म्हणजे भांडण! म्हणूनच भगवंताने त्यास 'कषाय' म्हटले आहे. तुमच्या दोघांमध्ये जसजसे 'प्रॉब्लेम' वाढतील तसतसे तुम्ही दूर होत जाल. 'प्रॉब्लेम' सुटले म्हणजे दुरावा राहणार नाही. दुराव्यामुळे दुःखं आहेत. आणि अडचणी सगळ्यानांच येणार. फक्त तुम्हालाच आहे असे नाही. ज्यांनी ज्यांनी लग्न केले त्या सगळ्यांनाच 'प्रॉब्लेम' आहेत. कर्माचा उदय झाला की वाद निर्माण होतात, पण त्यावेळी जिभेने वाईट बोलणे बंद करा. जे बोलायचे ते पोटातच ठेवा. घरातही बोलू नका आणि बाहेरही बोलू नका. अहो! व्यवहाराचा अर्थच... प्रश्नकर्ता : प्रकृती (स्वभाव) सुधारता येत नाही पण व्यवहार तर सुधारता आला पाहिजे ना? Page #134 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार ११९ दादाश्री : व्यवहार तर लोकांना मुळी येतच नाही. व्यवहार जर लोकांना आला असता, अगदी अर्धा तासभर जरी आला असता तरी पुष्कळ झाले असते ! व्यवहाराला तर समजलेलेच नाही. व्यवहार म्हणजे काय? तर उपलक (वरवरचा)! व्यवहार म्हणजे सत्य नाही. लोकांनी तर व्यवहारालाच सत्य मानून घेतलेले आहे. व्यवहारात सत्य म्हणजे जे रिलेटिव्ह मध्ये सत्य आहे ते. इथल्या नोटा खऱ्या असोत की खोट्या त्या 'तिथल्या' स्टेशनवर चालत नाहीत. म्हणून सोडा ना ही झंझट. आपण आपले (मोक्षाचे) काम काढून घ्या. व्यवहार म्हणजे (मागील जन्मी) दिलेले परत घेणे. आता जर कुणी म्हटले की, 'चंदुलालला अक्कल नाही.' तर आपण समजावे की, आपण जे दिले होते तेच परत मिळाले! हे जर लक्षात आले तर त्यालाच व्यवहार म्हटले जाते. आजकाल कुणाला व्यवहार कळतच नाही. ज्याच्यासाठी व्यवहार, व्यवहारच आहे; त्याचा निश्चय, निश्चय आहे. ...आणि सम्यक् म्हटल्याने भांडण मिटते प्रश्नकर्ता : जर कोणी जाणूनबुजून वस्तू फेकून दिली, तर अशा प्रसंगी एडजस्टमेन्ट कशी करावी? दादाश्री : ही तर फक्त वस्तूच फेकली पण मुलाला जरी फेकले ना, तरी देखील आपण पाहत राहावे. बाप मुलाला फेकत असेल तरीही पाहत राहावे. नाही तर काय आपण नवऱ्याला फेकून द्यायचे? एकाला तर हॉस्पिटलमध्ये जावे लागेल मग दुसऱ्यालाही पाठवायचे का? आणि नंतर जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा तो मग तुम्हाला बदडणार, मग तीथेही हॉस्पिटलमध्ये! प्रश्नकर्ता : तर मग काहीच बोलायचे नाही का? दादाश्री : बोलायचे, पण सम्यक् बोलता येत असेल तर बोला. नाही तर कुत्र्यासारखे भूकंण्यात काय अर्थ ? म्हणून सम्यक् बोलावे. Page #135 -------------------------------------------------------------------------- ________________ १२० क्लेश रहित जीवन प्रश्नकर्ता : सम्यक् म्हणजे कशा प्रकारे ? दादाश्री : अहोहो! तुम्ही या मुलाला का फेकले? काय झाले?' तेव्हा तो म्हणेल की, 'मी काय मुद्दाम फेकेल? तो माझ्या हातातून निसटला म्हणून पडला.' प्रश्नकर्ता : पण हे तर ते खोटे बोलले ना? दादाश्री : ते खोटे बोलत आहेत हे बघण्याची तुम्हाला गरज नाही. खोटे बोलावे की खरे बोलावे ते त्याच्यावर अवलंबून आहे, ते आपल्या हातात नाही. तो त्याच्या मर्जीनुसार बोलेल. त्याला खोटे बोलायचे असेल किंवा तुम्हाला संपवायचे असेल ते त्याच्या नियंत्रणात आहे. रात्री त्याने तुमच्या माठात विष टाकले तर तुम्ही मरणारच ना?! म्हणून जे आपल्या ताब्यात नाही त्याचा विचार करायचा नाही. सम्यक् बोलता येत असेल तर ठीक आहे. सम्यकपणे विचारता आले तर ते कामाचे की, 'भाऊ असे करून तुम्हाला काय फायदा झाला?' मग तो स्वतःहून मान्य करेल. तुम्हाला सम्यक् बोलता येत नाही आणि तुम्ही त्याला पाच पटीने चिडून बोलू लागले तर तो दहा पटीने चिडून बोलेल. प्रश्नकर्ता : सम्यक् बोलता येत नसेल तर मग काय करायचे? दादाश्री : मौन राहावे आणि पाहत राहावे की 'क्या होता है?' चित्रपटात मुलांना फेकतात तेव्हा तुम्ही काय करता? बोलायचा अधिकार सगळ्यांनाच आहे पण भांडण वाढणार नाही अशा प्रकारे बोलण्याचा अधिकार आहे. ज्या बोलण्याने भांडण वाढेल असे बोलणे म्हणजे मूर्खपणा आहे. टकोर, अहंकारपूर्वक नसावी प्रश्नकर्ता : व्यवहारात जर कोणी चूक करीत असेल तर त्याला टोकावे लागते त्यामुळे त्याला दुःख होते, अशा वेळी कसे वागावे? Page #136 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार १२१ दादाश्री : व्यवहारात टोकावे लागते, पण ते अहंकारपूर्वक होत असते म्हणून नंतर त्याचे प्रतिक्रमण करायला हवे. प्रश्नकर्ता : टोकले नाही तर तो डोक्यावर बसेल, नाही का? दादाश्री : टोकावे तर लागते, पण टोकता आले पाहिजे. योग्य तहेने बोलता येत नाही, व्यवहार हाताळता येत नाही म्हणून अहंकारपूर्वक बोलले जाते. म्हणून लगेच त्याचे प्रतिक्रमण केले पाहिजे. तुम्ही समोरच्याला टोकता तेव्हा त्याला वाईट तर वाटते, पण तुम्ही त्याचे सतत प्रतिक्रमण करीत राहिले तर सहा महिन्यानंतर, बारा महिन्यानंतर तुमची वाणी अशी निघेल की त्याला गोड वाटू लागेल. आता तर टेस्टेड वाणी बोलली पाहिजे. अनटेस्टेड वाणी बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही अशा प्रकारे प्रतिक्रमण कराल तर काही जरी झाले तरी नंतर गोष्ट सरळ होईल. अबोला धरून तर ताण वाढतो प्रश्नकर्ता : अबोला धरून गोष्ट टाळल्याने प्रश्न मिटतो का? दादाश्री : नाही मिटत. तुम्हाला तो माणूस भेटेल तेव्हा 'तुम्ही कसे आहात? कसे चालले आहे ?' अशी विचारपूस करावी. तो जर भडकला तर तुम्ही शांत राहून समभावेने निकाल करावा. कधी ना कधी तर प्रश्न सोडवावाच लागेल ना? अबोला धरल्याने काय प्रश्न मिटला? ते प्रश्न मिटला नाही म्हणून तर अबोला धरावा लागला. अबोलपणा म्हणजे ओझे, जो प्रश्न लटकत पडला त्याचे ओझे. आपण त्याच्याकडे जाऊन त्याला विचारले पाहिजे की, 'जरा थांबा ना, माझे काही चुकले असेल तर मला सांगा. मी खूप वेळा चुकतो. तुम्ही तर फार हुशार आहात. शिकले-सवरलेले आहात म्हणून तुमच्याकडून चुका होणार नाहीत, पण मी अडाणी, कमी शिकलेलो म्हणून माझ्याकडून खूप चुका होतात.' असे स्वत:ला हिणवले म्हणजे तो खुश होईल. Page #137 -------------------------------------------------------------------------- ________________ १२२ क्लेश रहित जीवन प्रश्नकर्ता : असे करून देखील तो नरम झाला नाही तर मग काय करावे? दादाश्री : नरम पडला नाही तर आपण काय करणार? आपण तर सांगून मोकळे व्हायचे. आणखी काय करणार? कधी ना कधी तर तो नरम पडेलच. तुम्ही त्याला रागावून नरम करायला गेलात; पण त्यामुळे तो काही नरम पडणार नाही. आज नरम दिसेल पण तो मनात ते नोंद करून ठेवेल आणि जेव्हा-केव्हा तुम्ही नरम असाल तेव्हा तो सगळा वचपा काढून घेईल. म्हणजे जग हे वैर वसूल करणारे आहे. नियम असा आहे की, लोक मनात शत्रुत्व ठेवतात. मनात सूड घेण्याचे परमाणू साठवून ठेवतात. म्हणून समोरच्याशी शत्रुत्व वाढणार नाही अशा पध्दतीने तोडगा काढावा. प्रकृती स्वभावानुसार एडजस्टमेन्ट... प्रश्नकर्ता : आपण समोरच्याचा अबोला तोडण्यासाठी विनवले की, खरंच माझी चूक झाली, आता कृपया मला माफ कर. असे सांगून देखील तो अधिकच रागावला तर? काय करू? दादाश्री : मग तुम्ही बोलणे बंद करा. त्याला तुमचे समोपचाराचे वागणे हा तुमचा कमकुवतपणा वाटत असेल तर त्याची ती चुकीची समजूत आहे की 'बहुत नमे नादान.' अशा प्रसंगी दूर राहणेच चांगले. मग जे झाले ते बरोबर, असे समजून मोकळे व्हा. पण ज्या व्यक्ती सरळ स्वभावाच्या असतील त्यांच्या बाबतीत तरी प्रश्नांचे समाधान करा. आपल्या घरात कोण सरळ आहे आणि कोण वाकडे आहे इतके तर आपल्याला समजतेच ना? प्रश्नकर्ता : समोरची व्यक्ती सरळ स्वभावाची नसेल तर आपण त्याच्याबरोबरचे व्यवहार (संबंध) तोडायचे का? दादाश्री : नाही. संबंध तोडायचे नाहीत. संबंध तोडल्याने तुटत Page #138 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार १२३ नाही. तोडल्याने तुटेल असे शक्यही नाही. म्हणून आपण मौन राहावे. कधी ना कधी तो चिडेल तेव्हा आपला हिशोब पूर्ण होईल. आपण मौन बाळगल्याने तो कधीतरी चिडेल आणि स्वतःहून म्हणेल, 'तुम्ही माझ्याशी का बोलत नाही? किती दिवसांपासून मुके बनून फिरत आहात!' तो असा चिडला म्हणजे तुमचा हिशोब पूर्ण झाला, दुसरा काही मार्ग आहे का? हे तर वेगवेगळ्या प्रकारचे लोखंड असतात, आम्ही सगळ्यांना ओळखू शकतो. काही लोखंडाना चांगले तापवले तेव्हा ते वाकते. काही प्रकारच्या लोखंडाना भट्टीत तापवावे लागते आणि मग गरम-गरम असतानाच दोन हातोडे मारले की ते सरळ होतात. ही तर अशी तहेत-हेची लोखंडे आहेत! यात आत्मा हा आत्मा आहे, परमात्मा आहे आणि लोखंड हे लोखंड आहे. हे सर्व धातू आहेत. सरळ वागल्यानेही प्रश्न सुटतात प्रश्नकर्ता : घरात माझे कुठल्या गोष्टीवर लक्ष राहत नसेल आणि घरातील लोक मला लक्ष ठेवा, लक्ष ठेवा असे म्हणत असतील, तरी देखील लक्ष राहत नसेल तर अशा वेळी काय करावे? दादाश्री : काहीच नाही. घरातले जेव्हा आपल्याला 'लक्ष ठेवा, लक्ष ठेवा' असे म्हणतील तेव्हा 'हो ठेवतो' असे सांगावे. आपण लक्ष ठेवण्याचा निश्चिय करावा. तरी देखील लक्ष राहिले नाही आणि घरात कुत्रा घुसला तर म्हणा की 'माझे लक्ष राहतच नाही.' म्हणजे त्यावर काही उपाय तर करावा लागेल ना? आम्हाला पण जर कोणी लक्ष ठेवायला सांगितले तर आम्ही लक्ष ठेवतो, तरी देखील काही झालेच तर आम्ही सांगतो, की 'भाऊ, माझ्याकडून लक्ष राहू शकले नाही.' असे आहे की, आपण यांच्यापेक्षा वयाने मोठे आहोत असे जर मानले नाही तर मग काम होते. लहान मुलासारखी अवस्था ठेवली तर समभावाने निकाल चांगला होतो. आम्ही लहान मुलाप्रमाणे राहतो. म्हणून Page #139 -------------------------------------------------------------------------- ________________ १२४ क्लेश रहित जीवन आम्ही जसे असेल तसे सांगून टाकतो. असेही सांगतो आणि तसेही सांगतो, जास्त मोठेपणा कशाला मिरवायचा? ज्यांच्या जीवनात कसोटी येते ते पुण्यवान म्हटले जाते! म्हणून आग्रह न धरता समस्यांवर तोडगा काढा. तुम्ही स्वतःच तुमचा दोष सांगा. नाहीतर ते जेव्हा तुमचा दोष सांगत असतील तेव्हा तुम्ही खुश व्हा की, अरे वा! तुम्हाला आमचा दोष लक्षात आला। खूप छान झाले! तुम्ही एवढे हुशार आहात हे आम्हाला माहीतच नव्हते. ...समोरच्याचे समाधान करा ना आपल्यात काही चूक असेल तेव्हाच समोरचा आपल्याला सांगत असेल ना? म्हणून चुका संपवा. या जगात कुठलाही जीव कुठल्याही जीवाला त्रास देऊच शकत नाही इतके स्वतंत्र जग आहे, आणि आज जो त्रास होत आहे तो पूर्वी केलेल्या दोषांचा परिणाम आहे. म्हणून चुका संपवा म्हणजे हिशोब संपून जाईल. कोणी 'लाल झेंडा' दाखवत असेल तर समजून जावे की, यात आपली काही चूक आहे. म्हणून आपण त्यांना विचारावे की, 'भाऊ तू लाल झेंडा का दाखवित आहेस?' तेव्हा तो म्हणेल की, तुम्ही असे का केले होते?' तेव्हा त्याची माफी मागावी आणि म्हणावे की, 'आता तरी हिरवा झेंडा दाखवशिल ना?' तेव्हा तो हो म्हणेल. आम्हाला कोणी लाल झेंडा दाखवितच नाही. आम्ही तर सगळ्यांचे हिरवे झेंडे पाहतो नंतर पुढे चालतो. निघतेवेळी जर एखाद्याने लाल झेंडा दाखवला तर आम्ही त्याला विचारतो की, 'भाऊ तू का म्हणून मला लाल झेंडा दाखवत आहेस?' तेव्हा तो सांगेल की, 'तुम्ही तर अमुक तारखेला जाणार होता मग त्याआधीच का चालला?' तेव्हा आम्ही त्याला खुलासा करून सांगतो की, अचानक हे काम निघाले म्हणून नाईलाजाने जावे लागत आहे! मग तो आपणहूनच सांगेल की, 'तर मग तुम्ही नक्कीच जा, काही हरकत नाही.' Page #140 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार लोक तर तुझ्याच चुकांमुळेच तुला लाल झेंडा दाखवतात पण तू जर त्याचा खुलासा केलास तर लोक तुला जाऊ देतील. पण याला जर कोणी लाल झेंडा दाखवला तर हा मूर्ख बोंबाबोंब करून त्याला म्हणेल, 'जंगली, जंगली बिनअकली, तू मला लाल झेंडा का दाखवतोस?' असे करून त्याला दरडावतो. अरे, तू तर नवीन हिशोब सुरु केलास. कोणी जर लाल झेंडा दाखवत असेल तर ' देअर इज समथिंग राँग.' (तिथे नक्की काही चुकले आहे) विनाकारण कुणी लाल झेंडा दाखवत नाही. भांडण, दररोज कसे परवडणार ? दादाश्री : घरात भांडणे होतात ? प्रश्नकर्ता : हो जातो. १२५ दादाश्री : वरवर होतात की जोरदार होतात ? प्रश्नकर्ता : जोरदार पण होतात, पण दुसऱ्या दिवशी विसरून दादाश्री : विसरणार नाही तर काय करणार ? विसरून जाल तेव्हाच पुन्हा भांडता येईल ना ? आधीचेच विसरलेले नसेल तर पुन्हा कोण भांडण करेल ? मोठमोठ्या बंगल्यात राहतात, पाचच जण राहतात तरी भांडण करतात ! निसर्ग खाण्या-पिण्याचे सर्व देतो तरी हे भांडत राहतात. जिथे भांडणतंटे आहेत तिथे अंडरडेव्हलप (अविकसित) प्रजा आहे. सार काढता येत नाही म्हणून भांडणे होतात. जितके मनुष्य आहेत तितके वेगवेगळे धर्म आहेत. पण स्वतःच्या धर्माचे मंदिर कसे बांधावे ? धर्म तर सगळ्यांचेच वेगळे आहेत. उपाश्रयात सामायिक करतात ती सुद्धा प्रत्येकाची वेगळी-वेगळी असते. अरे, कित्येक लोक तर मागे बसून पुढच्यांना खडे मारीत असतात, ती पण त्यांची सामायिकच करतात ना ? यात धर्मही राहिलेला नाही आणि मर्मही Page #141 -------------------------------------------------------------------------- ________________ १२६ क्लेश रहित जीवन उरलेला नाही. फक्त धर्म जरी राहिला असता तरी घरात भांडणे झाली नसती. झाले तर महिन्यातून एखाद्या वेळीच झाले असते. अमावस्या महिन्यातून एकदाच येते ना! प्रश्नकर्ता : हो. दादाश्री : इथे तर तीसही दिवस अमावस्या. भांडण करण्यात काय मिळत असेल? प्रश्नकर्ता : फक्त नुकसानच होते. दादाश्री : तोटा होणारा व्यापार तर कुणी करतच नाही ना? कोणीच म्हणणार नाही की, तोटा होणारा धंदा करा! काहीतरी नफा मिळवतच असतील ना? प्रश्नकर्ता : भांडणातून आनंद मिळत असेल! दादाश्री : हा दुषमकाळ आहे म्हणून शांती राहत नाही, पोळलेला मनुष्य जेव्हा दुसऱ्याला पोळतो तेव्हाच त्याला शांती वाटते. कोणी आनंदात असेल तर त्याला ते आवडत नाही, म्हणून तिथे जाऊन काडी लावतो तेव्हाच त्याला शांती वाटते. असा जगाचा स्वभावच आहे. प्राण्यांमध्ये सुद्धा विवेक असतो, ते भांडत नाहीत. कुत्रे सुद्धा आपल्या परिसरातील कुत्र्यांशी भांडत नाहीत. जेव्हा बाहेरचा कुत्रा त्यांच्या परिसरात येतो तेव्हा ते सगळे मिळून त्याच्याशी भांडतात. तेव्हा ही मूर्ख माणसे तर आपापसातच लढतात. लोक अगदी विवेकशून्य झाले आहेत! 'भांडणमुक्त' होण्यासारखे प्रश्नकर्ता : मला भांडायचे नसेल, मी कधीच भांडत नाही तरीदेखील घरची माणसे समोरून भांडण उभे करत असतील, तर अशा परिस्थितीत काय करावे? दादाश्री : तुम्ही 'भांडणमुक्त' व्हायला हवे. भांडणमुक्त व्हाल तर Page #142 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार १२७ संसारात टिकू शकाल. आम्ही तुम्हाला भांडणमुक्त बनवून देऊ. भांडण करणारा सुद्धा कंटाळून जाईल, असे आपले स्वरूप असायला हवे. जगात कोणीच आपल्याला डिप्रेस करू शकणार नाही असे आपण बनायला हवे. आपण भांडणमुक्त झाल्यावर आता काही त्रासच नाही ना? लोकांना भांडायचे असेल, शिव्या द्यायच्या असतील तरीही हरकत नाही आणि तरी सुद्धा निर्लज्ज म्हटले जाणार नाही, उलट त्यामुळे जागृती खूप वाढेल. सूडाचे बीज हेच भांडणाचे कारण पूर्वी जी भांडणे झाली आहेत त्याच्यामुळे शत्रुत्व धरले जाते आणि तेच आज भांडणाच्या रुपात चुकते केले जाते. भांडण होते त्याचवेळी शत्रुत्वाचे बीज पडते, ते मग पुढच्या जन्मी उगवते. प्रश्नकर्ता : मग ते बीज कशाप्रकारे नष्ट करता येईल? दादाश्री : हळूहळू समताभावाने निकाल करत राहिलात तर नष्ट होईल. खूप खोलवर बीज पडले असेल तर वेळ लागेल. धीर धरावा लागतो. तुमचे कुणी काही घेऊन जात नाही. दोन टाईम खायला मिळते, कपडे मिळतात, मग आणखी काय हवे? जरी तुम्हाला घरात ठेवून बाहेरुन कुलूप लावून गेले पण तुम्हाला दोन वेळेचे जेवण मिळत आहे की नाही एवढेच बघायचे. तुम्हाला घरात कोंडून गेले तरी काही हरकत नाही, तुम्ही निवांत झोपा. मागील जन्मी असे काही वैर बांधले गेले की ज्यामुळे आपल्याला घरात कुलूप लावून कोंडून ठेवतात, ! वैर आणि तेही अज्ञानतेने बांधले गेलेले वैर! समजपूर्वकचे असेल तर आपण समजू शकू की हे समजपूर्वकचे आहे, म्हणून तोडगा निघू शकेल. पण जर समजपूर्वकचे नसेल तर तोडगा कसा निघू शकेल? मग आहे तसेच सोडून द्यायचे. ज्ञानामुळे वैर भावनेचे बीज नष्ट होते आता आपण सगळे वैरभाव सोडून द्यायवे. तुम्ही कधीतरी Page #143 -------------------------------------------------------------------------- ________________ १२८ क्लेश रहित जीवन आमच्याकडून 'स्वरूपज्ञान' प्राप्त करून घ्या. म्हणजे मग सारे वैर भाव मिटतील. अगदी याच जन्मात सगळे वैरभाव सोडून द्यायचे, आम्ही तुम्हाला मार्ग दाखवू. संसाराला कंटाळून लोक मरणाच्या वाट्याला का जातात? या बाह्य संकटांना तोंड देवू शकत नाहीत म्हणून. हे सर्व समजावे तर लागेल ना? कुठपर्यंत ताण-तणावाखाली पडून राहाल? हे तर किड्यामुंग्यांसारखे जीवन झालेले आहे. नुसती तडफड, तडफड! मनुष्यजन्मात आल्यावर तडफड का म्हणून? जो ब्रम्हांडाचा मालक म्हटला जातो त्याची ही अशी दैनावस्था! संपूर्ण जग तडफडत तरी आहे किंवा मूर्छित अवस्थेत तरी आहे. जगात या दोनच गोष्टी आहेत आणि तू ज्ञानघन आत्मा झालास म्हणजे यातून सुटला. जसा अभिप्राय तसा परिणाम प्रश्नकर्ता : ढोल वाजत असेल तर काही लोकांना चीड का येते? दादाश्री : कारण 'मला हे आवडत नाही' असे त्याने मानल आहे. ढोल वाजतेवेळी तुम्ही म्हणावे की, 'वाह!' ढोल किती छान वाजतो आहे !!!' असे म्हटले तर त्रास होणार नाही. 'ढोलाचा आवाज वाईट आहे' असा अभिप्राय दिला की, आतून सारी यंत्रणा बिघडून जाते. तेव्हा आपण नाटकीय भाषेत म्हणावे की, खूप छान ढोल वाजवला.' म्हणजे मग त्रास होत नाही. हे 'आत्मज्ञान' मिळाल्यामुळे आता आपण सगळी 'पेमेंट' चुकवू शकतो. कठीण परिस्थितीत हे ज्ञान खूप हितकारी आहे, ज्ञानाची ‘टेस्टिंग' होऊन जाते. ज्ञानाची रोज 'पॅक्टिस करायला गेलो तर त्याच्याने काही टेस्टिंग होत नाही. पण एकदा का कठीण प्रसंग आला तेव्हा मात्र टेस्टेड होऊन जाते! ही सद्विचारणा, किती छान आम्हाला तर एवढे माहीत आहे की, जर भांडण केल्यानंतर Page #144 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार 'बायकोशी' सगळे संबंध तोडायचे असतील तर गोष्ट वेगळी आहे, पण बायकोशी परत बोलायचे असेल तर मग मधली सर्व भाषा पूर्णपणे चुकीची आहे. आमच्या हे लक्षातच असते की, दोन तासानंतर पुन्हा बोलायचे आहे, म्हणून आम्ही किटकिट करत नाही. तुम्हाला जर तुमचे मत कायम ठेवायचे असेल तर गोष्ट वेगळी. तुमचे मत बदलणार नसेल तर मग तुम्ही जे केले ते बरोबर आहे. पुन्हा तिच्याबरोबर बसणारच नसाल तर ठीक आहे. परंतु उद्या परत तिच्यासोबत बसून जेवायचे असेल तर मग काल केलेल्या नाटकाचे काय ? हा विचार करायला नको का ? हे लोक तीळ भाजून पेरतात म्हणून केलेली सगळी मेहनत वाया जाते. भांडण होते तेव्हा हे लक्षात यायला हवे की, ही कर्मच आपल्याला नाचवतात. मग या नाचावर ज्ञानाचा उपयोग करून इलाज केला पाहिजे. प्रश्नकर्ता: दादा, हे तर भांडण करणाऱ्या दोघांनाही समजायला हवे ना ? दादाश्री : नाही, इथे तर 'सब सब की संभालो' तुम्ही फक्त तुमचे पाहायचे. तुम्ही सुधरले म्हणजे समोरचा आपोआप सुधारेल. ही तर सद्विचारणा आहे की काही वेळानंतर पुन्हा सोबतच बसायचे आहे मग भांडण कशासाठी? लग्न केले आहे तर मग भांडणं का ? तुम्ही काल काय झाले ते विसरता, पण आम्हाला तर 'ज्ञानात' सर्व हजरच असते. ही तर एक सद्विचारणा आहे म्हणून ज्याने आत्मज्ञान घेतले नसेल त्यालाही हे उपयोगी पडेल. अज्ञानामुळे वाटते की बायको डोक्यावर बसेल. कोणी आम्हाला कोणी विचारले तर आम्ही सांगू की, 'तू पण भोवरा आहेस आणि ती पण भोवरा आहे, मग ती डोक्यावर कशी बसेल? ते काय तिच्या हातात आहे ? ते तर 'व्यवस्थित शक्तीच्या ' ताब्यात आहे. आणि ती कुठे तुमच्या डोक्यावर चढून बसणार आहे ? तुम्ही जर नमते घेतले म्हणजे तिच्याही मनाला समाधान वाटेल की आता माझा नवरा माझ्या ताब्यात आहे ! तिलाही बरे वाटेल. १२९ Page #145 -------------------------------------------------------------------------- ________________ १३० क्लेश रहित जीवन संशय, भांडणाचे एक कारण घरात बहुतांशी भांडणे संशयावरून होत असतात. हे कसे आहे की, शंकेमुळे स्पंदन निर्माण होतात आणि या स्पंदनामुळे स्फोट होतो. आणि जर निःशंक राहिलात तर स्फोट आपोआप शांत होईल. नवराबायको दोघेही जर संशयी असतील तर मग स्फोट कसा विझेल. एकाला तरी नि:शंक व्हावेच लागेल. आई-वडिलांच्या भांडणामुळे मुलांचे संस्कार बिघडतात. मुलांवर वाईट संस्कार पडू नयेत यासाठी दोघांनी घरात समजदारीने वागले पाहिजे. हा संशय कोण दूर करेल? आपले ज्ञान तर मनुष्याला संपूर्ण निःशंक बनवेल असे आहे! आत्म्याच्या अनंत शक्ती आहेत!! अशा वाणीला निभावून घ्या. ही टीपॉय पायाला लागली तर आपण तिला दोष देत नाही, पण कोणी दुसऱ्याने मारले तर मात्र आपण त्याला गुन्हेगार मानतो. कुत्रा चावत नसेल फक्त भुंकतच असेल तर आपण त्याला चालवून घेतो ना! मग माणूस देखील हात न उगारता नुसता भुंकत असेल तर आपण ते निभावून घ्यायला नको का? भुंकणे म्हणजे बोलणे, 'टू स्पीक,' आणि 'बार्क' म्हणजे भुंकणे. 'माझी बायको सतत भुंकत असते' असे म्हणतात ना? हे वकील सुद्धा कोर्टात भुंकत असतात ना? आणि न्यायाधीश त्या दोघांचे भुंकणे ऐकत असतात! हे वकील निर्लेपतेने भुंकता ना? कोर्टात समोरासमोर 'तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात, माझ्या अशिलावर तुम्ही खोटे आरोप करत आहात' असे भुंकत असतात. त्यांना पाहून आपल्याला असे वाटते की, हे दोघे बाहेर जाऊन मारामारीच करतील, पण बाहेर आल्यानंतर पाहिले तर दोघेही सोबत बसून आरामात चहा पित असतात! प्रश्नकर्ता : याला ड्रामेटिक (नाटकी) भांडण म्हणायचे का? दादाश्री : नाही याला पोपटमस्ती म्हणतात. ड्रामेटिक तर ज्ञानी Page #146 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार १३१ पुरुषाशिवाय कुणालाही जमणार नाही. पोपट मस्ती करतात तेव्हा आपल्याला भीती वाटते की, आता हे दोघेही मरतील, पण ते काही मरत नाहीत. ते फक्त वरवर चोची मारत राहतात, कोणाला इजा होणार नाही अशा चोची मारतात. ____ आम्ही वाणीला रेकॉर्ड म्हटले आहे ना? रेकॉर्ड वाजत असेल की 'चंदुला अक्कल नाही, चंदुला अक्कल नाही.' मग तुम्ही पण म्हणायला लागा की 'चंदुला अक्कल नाही.' ___ममतेचे वेढे उलगडावे कसे? दिवसभर काम करत असतानाही नवऱ्याचे प्रतिक्रमण करीत राहावे. एका दिवसात सहा महिन्यांचे केलेले वैर (शत्रुत्व) संपेल आणि जरी अर्धा दिवस झाले तरीही तीन महिन्यांचे तरी कमी होईल! लग्नापूर्वी नवऱ्यावर ममता होती का? नाही. मग ममता कधीपासून जडली. लग्नाच्या वेळी मंडपात समोरासमोर बसले तेव्हा आता माझा नवरा आला, असे तिने ठरवले. थोडे जाड आहेत, थोडे सावळे आहेत. आणि त्याचवेळी नवऱ्यानेही ठाम ठरवले की ही माझी बायको आहे. तेव्हापासून हे चक्र सुरु झाले. 'माझे आहे, माझे आहे' असा जो पीळ मारला आणि नंतर ते पीळ वाढतच जातात. ही पंधरा वर्षांची फिल्म कशी उलट फिरवायची? तर 'हे माझे नाहीत,' हे माझे नाहीत' असे म्हणत राहिले तर हा पीळ सुटत जातो आणि ममता कमी होत जाते. हे तर लग्न झाल्यापासून असे अभिप्राय तयार झाले, प्रेज्युडीस (पूर्वग्रह) धरले गेले की 'हे असेच आहेत, हे तसेच आहेत.' लग्नापूर्वी असे काही होते का? आता तुम्ही मनात पक्के करा की, 'जे आहे ते हे असेच आहे.' आपणच त्यांना पसंत केलेले आहे. आता काय नवरा बदलता येईल? सगळीकडेच फसवणूक! कुठे जावे? ज्याचा उपाय नाही त्याला काय म्हणाल? ज्याचा उपाय नाही Page #147 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन त्यासाठी रडबोंबल करायची नसते. हा संसार अनिवार्य आहे ! घरात बायकोचा भांडखोर स्वभाव आवडत नसेल, मोठ्या भावाचा स्वभाव आवडत नसेल, दुसरीकडे वडिलांचा स्वभाव पसंत नसेल, अशा टोळीत माणूस फसला असेल तरीही त्याला तिथे राहावे लागते. मग जाणार कुठे ? अशा फसवणूकीचा कंटाळा येतो, पण जाणार कुठे ? चारही बाजूंनी कुंपण आहे. समाजाच्या मर्यादा असतात, 'समाज मला काय म्हणेल ? सरकारच्याही मर्यादा असतात. जर कंटाळून जलसमाधी घ्यायला जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर गेलो तर पोलीसवाला पकडतो. 'अरे बाबा, मला आत्महत्या करू दे, निवांतपणे मरू दे !' तेव्हा तो म्हणेल 'नाही. मरू पण देणार नाही. तू इथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, हा गुन्हा केला म्हणून आम्ही तुला तुरुंगात टाकणार आहोत !' धड जगूही देत नाहीत आणि धड मरूही देत नाहीत, यालाच म्हणतात संसार ! म्हणून रहा ना आरामात...शांतपणे झोपाना! असे हे अनिवार्य जग! मरूही देत नाही आणि जगूही देत नाही. १३२ कसेही करुन, एडजस्ट होऊन, वेळ निभावा, म्हणजे उधारी चुकती होईल. कुणाचे पंचवीस वर्षाचे, कुणाचे पंधरा वर्षांचे, कुणाचे तीस वर्षाचे, नाईलाजाने का होईना कर्ज चुकवावेच लागते. इच्छा नसेल तरीही त्याच खोलीत एकत्र रहावे लागते. इथे भाऊसाहेबांचे अंथरून आणि तिथे बाईसाहेबांचे अंथरून! बाईसाहेब तोंड फिरवून झोपल्या तरी मनात भाऊसाहेबांचेच विचार चालू असतात ना! सुटकाच नाही. हे जगच असे आहे. आणि त्यातही फक्त नवऱ्यालाच बायको आवडत नाही असे नाही, तर बायकोलाही नवरा आवडत नसतो ! म्हणून यात सुख घेण्यासारखे नाहीच. विचारवंत माणसाला तर संसाराची झंझट आवडणारच नाही. जे विचारवंत नाहीत त्यांना तर संसार ही तर एक झंझट आहे हेच समजत नाही. जसे एखाद्या बहिऱ्या माणसासमोर आपण कितीही खाजगी गोष्टी केल्या तर त्यात काही अडचण आहे का ? तसेच आत सुद्धा बहिरेपणा Page #148 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार असतो. म्हणून त्यांना संसारातील अडचणी चालून जातात. पण लोक तर संसारात सुख शोधू पाहतात, यात काय सुख मिळत असेल का ? पोलम्पोल कुठपर्यंत झाकाल ? ! हे सगळे जग नकली आहे ! घरात भांडून रडून, आणि मग पाण्याने तोंड धुवून माणसे घराबाहेर पडतात!! आपण त्यांना विचारले, ‘कसे आहात चंदुभाऊ ?' तेव्हा तो म्हणेल, 'खूप मजेत आहे. ' अरे तुझ्या डोळ्यात तर अश्रू आहेत, तोंड धुवून आला असेल तरी डोळे तर लाल दिसतात ना? त्यापेक्षा सरळ सांग की, 'मी सध्या दुःखात आहे. ' सगळ्यांना असेच वाटते की दुसऱ्यांना काही दुःखच नाही फक्त मलाच दुःख आहे. पण नाही रे बाबा! सगळेच रडत आहेत. प्रत्येक जण घरी रडून मग तोंड धुवून घराबाहेर पडत आहेत. हे पण एक मोठे आश्चर्यच आहे ना ! तोंड धुवून का घराबाहेर पडता ? तोंड धुतल्याशिवाय निघालात तर लोकांना कळेल की संसारात किती सुख आहे म्हणून ? ! मी रडत बाहेर पडलो, तुम्ही रडत बाहेर पडलात, सगळेच रडत बाहेर पडलात म्हणजे मग समजेल की हे जग पोकळ आहे. लहान वयात वडील वारले म्हणून स्मशानभूमित रडत रडत गेलेत ! घरी आल्यावर अंघोळ केली मग काहीच नाही!! अंघोळ करायचे लोकांनी शिकवले, अंघोळ वैगैरे करून स्वच्छ करून घेतात! असे हे जग आहे ! सगळेच तोंड धुवून बाहेर पडलेले, सगळे पक्के खोटारडे आहेत. त्यापेक्षा खरे बोललात तर ते अधिक चांगले. १३३ आपल्या महात्म्यांमधून एखादाच मोकळेपणाने सांगतो की, 'दादा आज तर मला बायकोने मारले!' एवढा सरळपणा कुठून आला ? तर आपल्या ज्ञानामुळे आला. दादांना तर सगळ्या गोष्टी सांगू शकतो. अशी सरळता आली तेव्हापासूनच मोक्षाला जाण्याची तयारी झाली. अशी सरळता बघायला मिळत नाही ना ? मोक्षाला जाण्यासाठी सरळ व्हायचीच आवश्यकता आहे. नवरा तर बाहेर छे, छे असे काहीच नाही, असे Page #149 -------------------------------------------------------------------------- ________________ १३४ क्लेश रहित जीवन म्हणतो. बायकोचा मार खातो आणि बाहेर सांगतो, छे, छे, ती तर मुलीला मारत होती! अरे पण मी स्वतः तुला मार खाताना पाहिले ना? याचा काय अर्थ ? मिनिंगलेस. त्याऐवजी खरे-खरे सांगून टाक की! आत्म्याला थोडेच कुणी मारणार आहे? आपण आत्मा आहोत, मारेल तर शरीराला मारेल. आत्म्याचा तर कुणी अपमानही करू शकणार नाही. कारण ती आपल्याला (आत्म्याला) बघू शकली तरच अपमान करेल ना? बघितल्याशिवाय कसा अपमान करेल? या देहाला तर म्हैस सुद्धा मारते. तेव्हा तुम्ही सांगताच ना की, या म्हशीने मला मारले? म्हशीपेक्षा बायको मोठी नाही का? मग त्यात काय? त्यात कुठे अब्रू जाणार आहे ? मुळात अब्रू आहेच कुठे? या जगात किती जीव राहतात? कोणी कपडे घातले का? अब्रूदार कपडे घालतच नाही. ज्याला अब्रू नाही तेच कपडे घालून अब्रू झाकत फिरतात, (कपडे) फाटले तर शिवत बसतात. कोणी बघितले तर, कोणी बघितले तर! अरे, शिवन-शिवून किती दिवस अब्र झाकशील? शिवलेली अब्रू टिकत नाही. अब्रू तर जिथे नीति आहे, प्रामाणिकता आहे, दयाभाव आहे, जिव्हाळा आहे, परोपकारी स्वभाव आहे तिथे आहे. फसवणूक अशी वाढत गेली या भाजी आणि भाकरीसाठी लग्न केले. नवऱ्याला वाटते की मी पैसे कमावून आणेल पण स्वयंपाक कोण बनवेल? बायकोला वाटते की मी स्वयंपाक बनवेल पण पैसे कोण कमवेल? असा विचार करून दोघांनी लग्न केले आणि सहकारी मंडळ उभे केले. नंतर मुलेही होणार. दुधीचे एक बी पेरले मग त्यावर दुध्या येणार की नाही? वेलीच्या पानापानांवर दुध्या येतील. अशाप्रकारे ही माणसेदेखील दुधीसारखे उगवत राहतात. दुधीची वेल अशी म्हणत नाही की या माझ्या दुधी आहेत. फक्त ही मनुष्य जातच असे बोलते की, ही माझी मुले आहेत. हा बुद्धीचा दुरुपयोग केला, ही मनुष्य जाती बुद्धीवर अवलंबून राहिली म्हणून निराश्रित म्हटली गेली. इतर कुठलाही जीव बुद्धीवर अवलंबून नाही. Page #150 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार १३५ म्हणून त्यांना आश्रित म्हणतात. आश्रितांना दु:ख नसते. यांनाच (मनुष्यजातीलाच) सगळे दुःख असते ! माणसे विकल्पी सुखाच्या मागे धावतात. पण जेव्हा बायको भांडण करते तेव्हा या सुखाविषयी कळते की हा संसार उपभोगण्यासारखा नाही. पण हा तर लगेच मूर्छित होऊन जातो! मोहामुळे एवढ्या प्रचंड प्रमाणत मार खातो त्याचेही त्याला भान राहत नाही. बायको रुसलेली असते तोपर्यंत 'या अल्लाह परवर दिगार' करतो (देवाची आठवण करतो). आणि बायको परत बोलू लागली की म्हणजे मियाँभाई खुश! मग अल्लाह वगैरे सगळेकाही एका बाजूला! किती कटकटी!! असे कधी दु:ख दूर होते का? तू थोडा वेळ अल्लाहजवळ बसला म्हणून काय दुःख संपते? जितका वेळ तिथे बसशील तितका वेळ आतील आग शांत होईल. पण मग तिथून उठलास की आग परत सुरु ! निरंतर प्रकट अग्नी आहे, घटकाभर पण सुख मिळत नाही! जोपर्यंत शुद्धात्मा स्वरूप प्राप्त होत नाही, स्वत:च्या दृष्टीत 'मी शुद्ध स्वरूप' आहे, असे भान होत नाही तोपर्यंत ही शेगडी पेटलेलीच राहणार. मुलीच्या लग्नाच्यावेळी देखील आत आग चालूच असते! सतत संतापच असतो! संसार म्हणजे काय? तर जाळे. या शरीराचा विळखा देखील एक जाळेच आहे. जाळे कोणाला आवडेल का? पण जाळे आवडते हेही एक आश्चर्यच म्हटले आहे ना! माश्यांची जाळ वेगळी आणि ही जाळ वेगळी! माश्यांच्या जाळ्याला तर कापून बाहेर निघता येते. पण यातून निघताच येत नाही. थेट तिरडी निघेल तेव्हाच बाहेर पडता येईल! ...त्याला तर लटकता सलाम यात सुख नाही असे समजावे तर लागेल ना? नवरा अपमान करतो, बायको अपमान करते, मुले अपमान करतात! हा तर सगळा नाटकीय व्यवहार आहे, पण शेवटी यांच्यातील कोणी सोबत थोडीच येणार आहे? Page #151 -------------------------------------------------------------------------- ________________ १३६ क्लेश रहित जीवन तुम्ही स्वतः शुद्धात्मा आहात आणि हा सगळा व्यवहार तुम्हाला वरवर म्हणजे सुपरफ्लुअस करायचा आहे. स्वतः 'होम डिपार्टमेंट' मध्ये (शुद्धात्म्यात) राहायचे आणि फोरेन डिपार्टमेंट मध्ये सुपरफ्लुअस राहायचे. सुपरफ्लुअस म्हणजे कुठेही तन्मायाकार वृत्ती नाही. फक्त नाटकीय. फक्त हे नाटकच साकारायचे आहे. नाटकात नुकसान झाले तरी हसायचे आणि फायदा झाला तरी देखील हसायचे. नाटकात दिखावा पण करावा लागतो. नुकसान झाले असल्यास तसे हावभाव पण करावे लागतात! तोंडाने बोलायचे की खूप नुकसान झाले पण आतून तन्मयाकार व्हायचे नाही. आपण लटकता सलाम (वरवरचा, दुरून नमस्कार) करायचा. बरेच जण सांगतात ना की, 'भाऊ, माझा तर याच्याशी दुरुन नमस्काराचा संबंध आहे!' अशाच प्रकारे संपूर्ण जगाशी राहावे. ज्याला साऱ्या जगाशी दुरुन नमस्कार करणे जमले तो ज्ञानीच झाला. या देहालाही दुरुन नमस्कार! आम्ही निरंतर सगळ्यांशी दुरुन नमस्काराचाच संबंध ठेवत असतो. तरीही सगळे म्हणतात की आमच्यावर आपला खूप चांगला भाव आहे. मी सगळाच व्यवहार करतो पण आत्म्यात राहून. प्रश्नकर्ता : कित्येकदा घरात खूप मोठे भांडण होते. तर अशा वेळी काय करावे? दादाश्री : शहाणा माणूस असेल तर लाख रुपये दिले तरी तो भांडण करणार नाही! आणि इथे तर फुकट भांडण करतो, मग तो अडाणी नाही तर काय? महावीर भगवंताना कर्म संपवण्यासाठी साठ मैल चालून दूर अनार्य क्षेत्रात जावे लागले, आणि आत्ताचे लोक तर पुण्यवान, म्हणून त्यांना घर बसल्या अनार्य क्षेत्र उपलब्ध आहे! केवढे हे धन्य भाग्य! कर्म संपविण्यासाठी तर हे खूपच लाभदायक आहे, पण सरळ राहिला तर! गुन्हा एका तासाचा, दंड आयुष्यभराचा एक तास नोकराला, मुलाला किंवा बायकोला छळले असेल तर Page #152 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार १३७ ती व्यक्ती पुढच्या जन्मी तुम्हाला नवऱ्याच्या रुपात किंवा सासूच्या रुपात आयुष्यभर त्रास देत राहील! न्याय तर हवा की नको? हे भोगावेच लागेल. तुम्ही कुणाला दुःख दिले तर तुम्हाला आयुष्यभर दुःख मिळेल. फक्त एक तास जरी छळले तरी त्याचे फळ आयुष्यभर मिळेल. मग तुम्ही उगाचच तक्रार करत असता की 'माझी बायको माझ्याशी अशी का वागते?' आणि बायकोला ही असे वाटते की, माझ्याकडून असे का वागले जाते?' तिला पण वाईट वाटते, पण काय करणार? मग मी त्यांना विचारले की, तुम्ही बायकोला पसंत केले होते की बायकोने तुम्हाला पसंत करून आणले होते? तेव्हा ते म्हणाले की, 'मी बायकोला पसंत करून आणले होते.' मग त्या बिचारीचा काय दोष? तुम्हीच तिला घेऊन आलात आणि आता ती तुमच्या अपेक्षेनुसार निघाली नाही, त्याला ती तरी काय करणार? ती कुठे जाणार? काही बायका तर नवऱ्याला मारतात देखील. पतिव्रता स्त्रीला तर पत्नी पतीला मारते हे ऐकूनच पाप लागल्यागत वाटते. प्रश्नकर्ता : जो पुरुष मार खातो त्याला बायल्या म्हणायचे का? दादाश्री : असे आहे, मार खाणे म्हणजे काही पुरुषाची निर्बळता नाही पण ते त्याचे ऋणानुबंधच तसे असतात. बायको दुःख देण्यासाठीच भेटलेली असते, म्हणून ती हिशोब चुकते करणारच. वेडा अहंकार, तर भांडण-तंटे करवितो संसार व्यवहारात भांडण-तंट्याचे नावच काढायचे नाही, तो एक रोग आहे. भांडणे हा अहंकार आहे, उघड-उघड अहंकार आहे. त्यास वेडा अहंकार म्हणतात. त्या वेड्या अहंकारामुळे असे वाटते की माझ्याशिवाय चालणार नाही. कुणाला रागावल्यामुळे तर उलट आपल्याला ओझे वाटते, डोकेच दुखायला लागते. भांडायची कुणाला हौस असते का? घरात जर कोणी विचारले, सल्ला मागितला तरच उत्तर द्यावे. Page #153 -------------------------------------------------------------------------- ________________ १३८ क्लेश रहित जीवन विचारल्याशिवाय सल्ला देत राहणे याला भगवंताने अहंकार म्हटले आहे. नवऱ्याने विचारले की, 'हे ग्लास कुठे ठेवू' तर बायको म्हणेल की 'इथे ठेवा.' मग तुम्ही ते ग्लास तिथे ठेवा. त्याऐवजी नवरा म्हणेल 'तुला अक्कल नाही का? कुठेतरीच काय ठेवायला सांगतेस?' त्यावर मग बायको म्हणेल, 'मग चालवा तुमची अक्कल आणि ठेवा तुम्हाला हवे तिथे.' आता या गोष्टी कधी संपतील? हा संयोगांचा संघर्ष आहे ! म्हणून हे भोवरे उठता-बसता खाता-पिताना एकमेकांवर सारखे आदळतच असतात! भोवरे आदळतात, खरचटतात आणि कधी कधी त्यातून रक्तही निघते!! इथे तर (शारीरिक नाही पण) मानसिक रक्त निघणार ना! अंगातून रक्त निघत असेल तर ते उलट चांगले, पट्टी बांधली म्हणजे थांबते. पण या मानसिक जखमांवर कोणती पट्टी पण लावता येत नाही! अशी भाषा कधीच उच्चारु नये घरात कोणाला काही सांगणे हा तर अहंकाराचा सर्वात मोठा रोग आहे. सगळे जण आपापला हिशोब घेऊनच आलेले आहेत! प्रत्येकालाच आपआपली दाढी येतच असते, आपल्याला सांगावे लागत नाही की तू का दाढी उगवत नाही? ती तर त्याला येतेच. सगळे जण स्वतःच्या डोळ्याने पाहतात, कानाने ऐकतात, मग विनाकारण आपण दुसऱ्यांच्या व्यवहारात ढवळाढवळ करण्याची काय गरज आहे ? एक अक्षरही बोलू नका. म्हणूनच आम्ही तुम्हाला हे 'व्यवस्थित शक्ती' चे ज्ञान देत असतो. अव्यवस्थित कधीच घडत नाही. जे अव्यवस्थित वाटते ते सुद्धा व्यवस्थितच आहे. म्हणून हे समजून घेण्याची गरज आहे. कधी पतंगाने गटांगळी खाल्ली तेव्हा दोरा ओढायचा. दोरा आता आपल्या हातात आहे. ज्याच्या हातात दोरा नाही त्याची पतंग गटांगळी मारेलच, तो मग काय करणार? पतंगाची दोरीच हातात नाही आणि विनाकारण आरडाओरडा करतो की माझ्या पतंगाने गटांगळी खाल्ली ! घरी एक अक्षरही बोलू नका. 'ज्ञानी' व्यक्तीखेरीज कोणी एक Page #154 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार १३९ शब्दही बोलू नये. कारण ज्ञानीची वाणी कशी असते? तर परेच्छानुसार असते. दुसऱ्यांच्या इच्छेनुसार ते बोलतात. त्यांना का बोलावे लागते? तर दुसऱ्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते बोलतात. पण इतर जण जेव्हा बोलतात तेव्हा ऐकणारे अस्वस्थ होतात, भयंकर पाप लागते. इतरांनी मुळीच बोलू नये. थोडे जरी बोलले तरी ती कटकट म्हटली जाते. बोलणे असे हवे की ते सतत ऐकावेसे वाटेल. रागावले तरी ते ऐकायला गोड वाटेल. इथे मात्र तुम्ही थोडे जरी बोलायला सुरुवात केली तर लगेच मुले म्हणतात 'काका आता बस, पुरे तुमची कटकट. विनाकारण ढवळाढवळ करू नका.' रागावलेले केव्हा योग्य? पूर्वग्रह नसेल तेव्हा. पूर्वग्रह म्हणजे मनात आधीची आठवण असतेच की काल हा असा वागला होता, भांडला होता, हा तर असाच आहे. घरात जो भांडतो त्याला भगवंताने मूर्ख म्हटले आहे. कोणाला दुःखं जरी दिले तरीही ती नर्कात जाण्याची निशाणी आहे. संसार निभावण्याचे संस्कार-कुठे? मानव जात सोडली तर इतर कोणीही नवरेपणा गाजवत नाही. अरे, हल्ली तर घटस्फोट देखील घेतात ना? वकिलाला सांगतो 'तुला हजार ,दोन हजार रुपये देतो, पण मला घटस्फोट मिळवून दे.' मग वकीलही म्हणेल की, 'हो देतो मिळवून' अरे, तू स्वतःच घे ना घटस्फोट, दुसऱ्यांना का घटस्फोट मिळवून देतोस? जुन्या काळातील एका म्हाताऱ्या आजीची ही गोष्ट आहे ती नवऱ्याचे तेरावे करत होती. 'तुझ्या काकांना हे आवडत असे, ते आवडत असे.' असे करत-करत त्या पाटावर वस्तू मांडत होत्या. मी त्यांना म्हणालो, 'काकी! तुम्ही तर काकांशी रोज भांडायच्या. काका पण तुम्हाला पुष्कळदा मारायचे. मग हे आता कशाला?' त्यावर काकी म्हणाल्या, 'पण तुझ्या काकांसारखा नवरा मला पुन्हा मिळणार नाही.' हे आपले हिंदुस्तानी संस्कार! Page #155 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन नवरा कोणाला म्हणतात ? संसार निभावून नेतो त्याला. बायको कोणाला म्हणायचे ? घर - नाती निभावून नेते तिला. जे संसार उध्वस्त करतात त्यांना आपण नवरा किंवा बायको कसे म्हणू शकतो ? ते त्यांचे गुणधर्म (कर्तव्य) च विसरलेत असे म्हणावे लागेल. बायकोचा राग आला म्हणून तुम्ही पाण्याचा माठ फेकायचा का ? काही जण तर कप-बशा फोडून टाकतात आणि मग पुन्हा नवीन आणतात. अरे, नवीनच आणायचे होते मग फोडले कशासाठी ? रागाने आंधळे होतात आणि हित-अहित याची शुद्धच विसरतात. १४० असे लोक तर नवरे बनून बसलेत. अरे, नवरा असा असला पाहिजे की बायकोला दिवसभर नवऱ्याकडेच बघत राहावेसे वाटेल. प्रश्नकर्ता : लग्नापूर्वी खूप पाहत असते. दादाश्री : ती तर जाळे टाकत असते. माशाला वाटते की हा खूप चांगला आणि दयाळू माणूस आहे. माझी खूप काळजी घेईल. पण एक वेळा जाळे चावून तर पाहा, काटा घुसेल. हे सगळे सापळे आहेत ! यात प्रेम कुठे उरले ? कुटुंबांबरोबर चांगले चालले आहे असे कधी म्हणता येईल की, जेव्हा त्यांना तुमच्या बद्दल प्रेम वाटेल, तुमच्याशिवाय करमणार नाही, तुम्ही कधी येणार, कधी येणार ? असेच त्यांना वाटत राहते. लोक लग्न करतात पण त्यांच्यात प्रेम नाही. ही तर केवळ विषयासक्ती आहे. प्रेम असेल तर दोघांमध्ये कितीही विरोधाभास (मतभेद) असले तरी प्रेम कमी होत नाही. जिथे प्रेम नाही, तिथे केवळ आसक्ती म्हटली जाईल. आसक्ती म्हणजे संडास ! पूर्वी इतके प्रेम असायचे की नवरा परदेशी गेला आणि परत आला नाही तरी आयुष्यभर बायकोचे संपूर्ण चित्त नवऱ्यातच असायचे. दुसऱ्या कोणाची आठवणच यायची नाही. आणि आता तर नवरा दोन वर्ष आला नाही तर दुसरा नवरा Page #156 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार १४१ करतील! याला प्रेम म्हणणार? हे तर संडास आहे, जसे संडास बदलतात तसे! जे गलन आहे त्याला संडास म्हणतात. प्रेमात तर सर्वस्व अर्पण केले जाते. प्रेम म्हणजे संपूर्ण दिवस त्यांचीच आठवण आणि त्यांचीच ओढ. लग्नाचा परिणाम दोन प्रकारे होतो. कधी-कधी पूर्ण भरभराट, तर कधी-कधी पूर्ण सत्यानाश होतो. जे प्रेम जास्त उफाळते ते नंतर संपून जाते. जे उफाळते ती आसक्ती आहे. म्हणून जिथे जास्त प्रेमाचा दिखावा असेल त्यापासून दूर रहा. ओढ तर आतून असायला हवी. बाहेरचे खोके (शरीर) खराब झाले, सडले तरीही प्रेम जसेच्या तसेच रहाते. हा तर हात भाजला असेल आणि नवऱ्याला म्हटले की जरा धुवून देता का? तर नवरा म्हणेल 'नाही, मला बघवत नाही.' अरे इतक्या दिवस तर हात कुरवाळत बसत होतास आणि आज काय झाले? ही घृणा कशी चालेल? जिथे प्रेम आहे तिथे तिरस्कार नाही आणि जिथे तिरस्कार आहे तिथे प्रेम नाही. संसारी प्रेम असे हवे की जे एकदम वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही. नॉर्मालिटीत असले पाहिजे. ज्ञानींचे प्रेम कधीही कमी-जास्त होत नाही. ते प्रेम तर निराळेच असते, त्यास परमात्म प्रेम म्हणतात. नॉर्मालिटी, शिकण्यासारखी प्रश्नकर्ता : व्यवहारात 'नॉर्मालिटी' कशी ओळखायची? दादाश्री : सगळेजण तुला म्हणत असतील की, 'तू उशीरा उठतेस, उशीरा उठतेस.' तर तुला हे समजायला नको की आपली 'नॉर्मालिटी' तुटली आहे. रात्री अडीच वाजता उठून तू चकरा मारू लागलीस तर सगळेजण म्हणणारच ना की, 'इतक्या लवकर कशाला उठलीस?' इथे पण 'नॉर्मालिटी' तुटली असे समजून घे. नॉर्मालिटी सगळ्यांना एडजस्ट होईल अशी आहे. खाण्यातही नॉर्मालिटी पाहिजे, जर जास्त खाल्ले तर झोप येत राहते. आमची खाण्याची, पिण्याची अशी सगळीच नॉर्मालिटी Page #157 -------------------------------------------------------------------------- ________________ १४२ क्लेश रहित जीवन पाहा. झोपण्याची, उठण्याची अशी आमची सगळीच नॉर्मालिटी असते. आम्ही जेवायला बसलो आणि मागाहून कोणी ताटात मिठाई वाढली तर मी त्यातली थोडीशी मिठाई घेतो पण मग भाजी थोडी कमी करतो. म्हणजे जेवणाचे प्रमाण बदलत नाही. तुम्हाला इतके सर्व करण्याची गरज नाही. तुम्ही उशिरा उठत असाल तर बोलत रहा की माझ्याकडून ‘नॉर्मालिटत' राहिले जात नाही. म्हणजे तुम्ही स्वतःला टोकत राहिले पाहिजे की, 'मला लवकर उठायला हवे.' असे टोकल्याने फायदा होईल. यालाच पुरुषार्थ म्हटले आहे. रात्री झोपताना सतत बोलत राहा की 'उद्या लवकर उठायचे आहे, उद्या लवकर उठायचे आहे.' याचा फायदा होईल. पण जबरदस्तीने उठायचा प्रयत्न केलात तर मनाला खूप त्रास होईल. शक्ती किती कमी झाल्या प्रश्नकर्ता : 'पतीच परमेश्वर आहे' असे म्हणणे चुकीचे आहे ? दादाश्री : आजकालच्या नवऱ्यांना परमेश्वर मानले तर ते वेडे होतील! एक नवरा त्याच्या बायकोला म्हणाला, 'तुझ्या डोक्यावर निखारे ठेव आणि त्याच्यावर भाखरी भाज!' अगोदरच माकड आणि त्याला दारू पाजली तर त्याची काय दशा होईल ? पुरुष तर कसा असतो ? पुरुष असे तेजस्वी असतात की, हजार स्त्रिया असल्या तरी त्याच्यापुढे थरथरतील ! त्याला पाहता क्षणीच थरथरतील! आजकालचे पुरुष असे आहेत की त्यांच्या बायकोचा हात कोणी पकडला तर त्याला विनंती करतात, 'अरे सोड, सोड माझी बायको आहे, माझी बायको आहे.' अरे गाढवा तू त्याला विंनती करतोस ? किती मूर्ख आहेस तू? त्याला मार, त्याचा गळा पकड, चाव त्याला. त्याच्या पाया काय पडतोस? आपणहून सोडेल असा तो माणूस नाही. मग हा ‘पोलिस, पोलिस, वाचवा, वाचवा' असे ओरडतो. अरे तू नवरा असून Page #158 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार १४३ पोलिसाला कशाला बोलावतोस? तू जिवंत आहसे की मेला आहेस? पोलीसाचीच मदत घ्यायची असेल तर नवराच होऊ नकोस. घरचा मालक 'हाफ राऊंड' चालतच नाही. तो तर ऑल राऊंडच पाहिजे. त्याला कलम, कडछी, बरछी, तरवू, तांतरवू आणि तस्करवू (लिहिणे-वाचणे, स्वयंपाक करणे, प्रसंगी शस्त्र चालवणे, पोहता येणे, चोरी करणे, वाद-विवाद संभाषण करता येणे) या सहाही कला अवगत पाहिजेत. ज्याला या सहा गोष्टी येत नाहीत तो पुरुष नाही. कितीही निर्लज्ज माणूस समोर आला तर त्याच्याशी कसे वागावे ते जमले पाहिजे. अगदी डोके शांत ठेवून, चिडून चालणार नाही. ज्याला स्वत:वर विश्वास आहे त्याला या जगात सर्व काही मिळू शकेल. पण हा विश्वासच नाही ना! कित्येकांचा तर, 'आपली बायको आपल्याबरोबर राहील की नाही? हाही विश्वास उडून गेलेला असतो. पाच वर्षे तरी निभावेल की नाही?' असे वाटत असते. 'अरे इतकाही विश्वास नाही? विश्वास तुटला म्हणजे संपले. विश्वासात अनंत शक्ती आहे. अज्ञानतेत का होईना पण विश्वास हवाच. 'माझे कसे होईल' असे वाटले म्हणजे संपले! या काळात लोक फारच गोंधळलेले आहेत. कोणी धावत-धावत आला आणि त्याला तुम्ही विचारले की तुझे नाव काय आहे ? तर तो एकदम गांगरून जाईल. चुकांमुळेच चुका करणारे भेटतात प्रश्नकर्ता : मी बायकोबरोबर एडजस्ट होण्याचा खूपच प्रयत्न करतो पण मला एडजस्ट होता येतच नाही. दादाश्री : सगळे हिशोबानुसार आहे! वाकड्या पेचासाठी वाकडा नट असतो. तिथे नट सरळ फिरवून कसे चालेल? तुम्हाला वाटते की या स्त्रिया अशा का असतात? पण त्या तर तुमच्या काउन्टरवेट असतात. जितके तुम्ही वाकडे तितक्या त्या वाकडया. म्हणून तर सगळे 'व्यवस्थित' आहे असे म्हटले ना? Page #159 -------------------------------------------------------------------------- ________________ १४४ क्लेश रहित जीवन प्रश्नकर्ता : सगळेच आम्हाला सरळ करण्यासाठीच आले आहेत असेच वाटते. दादाश्री : तुम्हाला सरळ करायलाच हवे. सरळ झाल्याशिवाय या जगात जमणार कसे? सरळ झाला नाहीत तर बाप कसे बनू शकाल? सरळ झालात तर बाप बनायला योग्य. शक्ती विकसित करणारे हवेत म्हणजेच या स्त्रियांचा दोष नाही, स्त्रिया तर देवी समान आहेत. स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये आत्माच आहे, फक्त देहाचा फरक आहे. 'डिफरन्स ऑफ पॅकिंग!' स्त्री हा एक प्रकारचा परिणाम आहे, आणि म्हणून त्या परिणामाचा आत्म्यावर परिणाम दिसतो.त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये. तसे झाले की बरोबर. स्त्री तर शक्ती आहे. या देशात अनेक स्त्रीया मोठमोठ्या पदावर पोहोचल्या आहेत. आणि ज्या स्त्रीने धर्मक्षेत्रात प्रवेश केला ती तर कशी (शक्तीमान) असेल?! या क्षेत्रातून तर ती साऱ्या जगाचे कल्याण करु शकते. स्त्रीमध्ये जगाचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहे. तिच्यात स्वतःच्या कल्याणाबरोबर दुसऱ्याचेही कल्याण करण्याची शक्ती आहे. प्रतिक्रमणाने सगळे हिशोब मिटतील प्रश्नकर्ता : कित्येक जण स्त्रियांना कंटाळून घर सोडतात हे योग्य आहे का? दादाश्री : नाही. पळून जाण्यात काय अर्थ आहे ? तुम्ही परमात्मा आहात. तुम्हाला पळपुटे व्हायची काहीच गरज नाही. आपण तिचा समभावे निकाल करावा. प्रश्नकर्ता : निकाल तर करायचा आहे पण कसा करावा? हे सर्व मागील जन्माच्या कर्मामुळे घडत आहे, असा मनात भाव ठेवायचा का? दादाश्री : फक्त एवढ्यानेच भागणार नाही. निकाल म्हणजे Page #160 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार १४५ समोरच्याला फोन पोहोचला पाहिजे, त्याच्या आत्म्यापर्यंत तुमचे भावना पोहोचली पाहिजे. त्या आत्म्याजवळ आपण चूक केली आहे असे कबूल केले पाहिजे. म्हणजेच त्यासाठी मोठे प्रतिक्रमण केले पाहिजे. प्रश्नकर्ता : समोरच्या माणसाने आपला अपमान केला तरीदेखील आपण त्याचे प्रतिक्रमण करायचे? दादाश्री : त्याने अपमान केला तरच प्रतिक्रमण करायचे, तुम्हाला तो मान देतो तेव्हा करायचे नाही. प्रतिक्रमण केलेत तर तुम्हाला समोरच्यावर द्वेषभाव होणारच नाही. एवढेच नाही तर त्याच्यावर तुमचा चांगला प्रभाव पडेल. तुमच्यावर द्वेषभाव होणार नाही ही तर पहिली स्टेप समजायची, पण नंतर तुमची भावनाही त्याच्यापर्यंत पोहोचते. प्रश्नकर्ता : त्याच्या आत्म्यापर्यंत पोहोचते? दादाश्री : हो, निश्चितच पोहोचते. नंतर तो आत्मा त्याच्या पुद्गलला पण सांगतो की, 'भाऊ, तुझा फोन आला आहे.' आपले जे प्रतिक्रमण आहे ते अतिक्रमणासाठी आहे, क्रमणासाठी (सामान्य व्यवहारासाठी) नाही. प्रश्नकर्ता : त्यासाठी बरेच प्रतिक्रमण करावे लागतील का? दादाश्री : जेवढ्या स्पीडमध्ये आपल्याला घर बांधायचे आहे त्यानुसार मजूर वाढवावे लागतील. असे आहे, की या बाहेरच्या लोकांचे प्रतिक्रमण नाही झाले तरी चालेल, पण तुमच्या जवळच आणि तुमच्या आसपास राहणाऱ्या घरच्या लोकांचे जास्त प्रतिक्रमण करावेत. कुटुंबातील लोकांसाठी भावना करावी की माझ्याबरोबर जन्म घेतला आहे, माझ्यासोबत राहत आहेत, ते पण कधीतरी या मोक्षमार्गावर येवोत. ...तेव्हा संसाराचा अस्त होईल ज्याला एडजस्ट होण्याची कला जमली तो संसाराकडून मोक्षाकडे Page #161 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन वळला. एडजस्टमेन्ट करता आले, त्याचेच नाव ज्ञान. जो एडजस्टमेन्ट शिकला तो ( भवसागरातून) तरुन गेला. जे भोगायचे आहे ते तर भोगावेच लागेल पण एडजस्टमेन्ट घेता आली त्याला त्रास होत नाही आणि हिशोब संपत जातात. सरळ माणसाबरोबर कुणीही एडजस्ट होईल पण वाकड्याकठीण-कडक प्रकृतीच्या माणसाबरोबर, सगळ्यांबरोबरच एडजस्ट होणे जमले तर काम फत्ते झाले समजा. मुख्य वस्तू एडजस्टमेन्ट आहे. 'हो' म्हटल्याने मुक्ती आहे. आणि आपण 'हो' जरी म्हटले तरीही 'व्यवस्थित' च्या बाहेर काही होणार आहे का ? पण 'नाही' म्हटले की मग त्रासच त्रास ! १४६ घरात नवरा-बायको दोघांनी निश्चय केला की मला एडजस्ट व्हायचे आहे. तर दोघांचेही प्रश्न सुटतील. एकाने जास्त ताणले तर दुसऱ्याने एडजस्ट व्हायचे, तर प्रश्न सुटेल. एका व्यक्तीचा हात दुखत होता, त्याने दुसऱ्या कोणाला सांगितले नाही. त्याने स्वतःच्याच दुसऱ्या हाताने हात चेपून, दुसऱ्या हाताने एडजस्ट केले! असे एडजस्ट होता आले तर समस्या सुटतील. मतभेदाने समस्या सुटत नाही. मतभेद पसंत नसतील, तरी होतातच ना ? समोरचा जास्त ओढाताण करीत असेल तर तुम्ही आग्रह सोडून द्या आणि पांघरून घेवून झोपून जा. जर सोडले नाही आणि दोघेही आपल्या मतासाठी भांडतच बसाल तर दोघांनाही झोप लागणार नाही आणि रात्रभर त्रास होत राहील. व्यवहारात, व्यापारात, भागीदारीत आपण सांभाळून घेतोच ना ! मग या संसाराच्या भागीदारीत सांभाळायला नको का ? संसार म्हणजे भांडणाचे संग्रहस्थान आहे. कुणाकडे दोन आण्याची कुणाकडे चार आण्याची आणि कुणाकडे सव्वा रुपयापर्यंतही (मर्यादे पलीकडे) भांडणे होतात ! इथे घरात ‘एडजस्ट' होता येत नाही आणि आत्मज्ञानाचे शास्त्र वाचत बसतात! अरे, ते ठेवा बाजूला, प्रथम हे शिका. घरात तर एडजस्ट होता येत नाही. असे आहे हे जग ! म्हणून मोक्षाचे काम करुन घेण्यासारखे आहे. Page #162 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार १४७ 'ज्ञानी' सोडवतात संसार जाळ्यातून प्रश्नकर्ता : या संसाराच्या वहीखात्यात तर सर्वत्र तोटाच दिसतो. तरीदेखील कधी कधी नफा आहे असे का वाटते? दादाश्री : ज्या खात्यात तोटा आहे असे वाटते, तिथे जर कधी नफा दिसला तर ते वजा करून टाका. हा संसार इतर कुठल्याच गोष्टीतून उत्पन्न झालेला नाही, गुणाकारानेच झालेला आहे. मी तुम्हाला जी रक्कम दाखवतो त्याच्याने तुम्ही भागाकार कराल म्हणजे शिल्लक काही उरणार नाही. हे शिकता आले तर शिका, नाही तर 'मला दादांच्या आज्ञांचे पालन करायचेच आहे, संसाराचा भागाकार करायचाच आहे.' असे ठरवले तेव्हापासून भागाकार झालाच समजा! नाहीतर हे जीवन व्यतीत करणे सुद्धा खूप कठीण झाले आहे. नवरा येईल आणि म्हणेल की, 'माझ्या छातीत दुखत आहे.' मुलं येतील आणि म्हणतील 'आम्ही नापास झालो.' नवऱ्याच्या छातीत दुखत आहे असे ऐकल्यावर तिच्या मनात विचार येईल की, नवऱ्याचा 'हार्टफेल' झाला तर काय होईल? असे विचार माणसाला चारीबाजूंनी घेरतात, चैनच पडू देत नाहीत. ज्ञानी पुरुष या संसारच्या जाळ्यापासून सुटण्याचा मार्ग दाखवितात, मोक्षाचा मार्ग दाखवितात. रस्ता चुकला तर परत रस्त्यावर आणतात. मग आपल्यालाही जाणीव होते की, आपण या सर्व संकटातून मुक्त झालो! अशा भावनेने सोडवणारे मिळतातच ही सगळी परसत्ता आहे. खातो, पितो, मुलांची लग्ने लावतो या सगळ्या गोष्टी परसत्तेत आहेत. त्यात आपली सत्ता (अधिकार) नाही. आत जे कषाय (क्रोध, मान, माया, लोभ) दडले आहेत, त्यांची सत्ता आहे. ज्ञानी पुरुष 'मी कोण आहे ?' याचे ज्ञान देतात तेव्हा या कषायांतून, या सर्व जंजाळातून सुटका होते. हा संसार सोडल्याने किंवा धक्का Page #163 -------------------------------------------------------------------------- ________________ १४८ क्लेश रहित जीवन मारल्याने सुटेल असा नाही. त्यामुळे या संसारातून सुटलो तर खूप बरे होईल अशी भावना मनात बाळगत राहा. अनंत जन्मांपासून सुटण्याची भावना निर्माण झाली पण मार्ग दाखविणारा कोणी जाणकार हवा की नको? मार्ग दाखविणारे 'ज्ञानीपुरुष' हवेत. जशी चिकटपट्टी जर शरीरावर चिकटवली आणि मग ती ओढली तरी ती सहज निघत नाही. तिच्याबरोबर अंगावरचे केस पण ओढले जातात. तसाच हा संसार सुद्धा चिकट आहे. 'ज्ञानीपुरुष' औषध देतील तेव्हाच संसार सुटू शकेल. हा संसार सोडला तर सुटेल असा नाही. ज्यांनी संसार सोडला आहे, त्याग केला आहे ते त्यांच्या कर्माच्या उदयामुळे घडून आलेली गोष्ट आहे. प्रत्येकाला आपापल्या कर्माच्या आधारावर त्यागधर्म किंवा गृहस्थधर्म मिळत असतो. समकित प्राप्त होते तेव्हापासून सिद्धदशा प्राप्त होते. हे सर्व तुम्ही चालवत नाही. क्रोध, मान, माया. लोभ, कषायच हे सगळेकाही चालवतात. कषायांचेच राज्य आहे ! 'मी कोण आहे' याचे जेव्हा भान येते तेव्हा कषाय निघून जातात. क्रोध झाल्यावर पश्चाताप होतो पण जोपर्यंत भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे प्रतिक्रमण करता येत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही. प्रतिक्रमण करता आले तर सुटका होईल. हे कषाय घटकाभर देखील चैन पडू देत नाहीत. मुलाच्या लग्नाच्यावेळी तुम्ही मोहाने घेरलेले असता! तेव्हा मोहात मूर्छित असतात, एरवी मात्र दिवसभर उकळत्या चहासारखी बैचेन अवस्था असते या माणसांची. तरीही मनात वाटते की, 'मी' तर थोरली जाऊ आहे ना! हा तर व्यवहार आहे, फक्त नाटकच करायचे आहे. हा देह सुटला म्हणजे दुसऱ्या (जन्मात) नाटकातील भूमिका निभावायची आहे. ही नाती खरी नाहीत. हे तर संसारी ऋणानुबंध आहेत. हिशोब संपल्यावर मुलगा आईवडिलांबरोबर जात नाही. 'याने माझा अपमान केला!' अरे, बाबा सोड ना आता. अपमान Page #164 -------------------------------------------------------------------------- ________________ समजदारीने शोभेल गृहसंसार १४९ तर गिळून टाकण्यासारखे आहे. नवरा अपमान करतो तेव्हा लक्षात यायला हवे की हा तर माझ्या कर्माचे उदय आहे. यात नवरा मात्र निमित्तच आहे, निर्दोष आहे. जेव्हा माझ्या कर्माचा उदय बदलतात तेव्हा तोच नवरा मला 'ये,ये' असे म्हणतो. म्हणून मनात समताभाव ठेवून प्रश्न सोडवत राहिले पाहिजे. जर असे मनात आले की 'माझा काहीच दोष नसताना नवरा मला असे का म्हणाला?' मग रात्री तीन-चार तास जागरण होईल आणि मग थकून झोप लागेल. जे भगवंताचे वरिष्ठ झाले, त्यांचे काम झाले. आणि जे बायकोचे वरिष्ठ झाले (बायकोवर हुकुमत गाजवत बसले) ते मार खाऊन मेले. वरिष्ठ बनायला गेले ते मार खात गेले. पण भगवंत काय म्हणतात? माझे वरिष्ठ बनलात तर मला आवडेल. मी खूप दिवस वरिष्ठपणा केला, आता तुम्ही माझे वरिष्ठ व्हा की मग जास्त चांगले. 'ज्ञानी पुरुष' जी समज देतात त्या समजमुळे मुक्ती मिळते. समजशिवाय काहीच होऊ शकत नाही. वीतराग धर्मच सर्व दुःखांपासून मुक्ती देते. घरात सुंदर व्यवहार करता आलाच पाहिजे. बायकोला मनापासून असे वाटले पाहिजे की, असा चांगला नवरा पुन्हा कधीच मिळणार नाही. आणि नवऱ्यालाही असे वाटले पाहिजे की अशी बायकोही कधीच मिळणार नाही!! असा सुंदर हिशोब जुळवून आणला तर समजावे की आपण खरे!!! Page #165 -------------------------------------------------------------------------- ________________ [६] व्यापार, धर्मासकट आयुष्य कशासाठी खर्च झाले? दादाश्री : हा व्यापार तुम्ही कशासाठी करता? प्रश्नकर्ता : पैसे कमावण्यासाठी. दादाश्री : पैसे कशासाठी कमावता? प्रश्नकर्ता : माहीत नाही. दादाश्री : ही कशासारखी गोष्ट आहे ? एक मनुष्य दिवसभर इंजिनच चालवित राहतो, पण कशासाठी? माहीत नाही. इंजिनला पट्टाच जोडलेला नाही, फक्त फिरवतच राहतो. तसेच तुमचेही आहे. जीवन कशासाठी जगायचे आहे ? फक्त पैसे कमावण्यासाठी? प्रत्येक जीव सुख शोधत असतो. सर्व दुःखांपासून मुक्ती कशी मिळेल हे जाणून घेण्यासाठीच जीवन जगायचे आहे. विचार करा, चिंता नाही प्रश्नकर्ता : धंद्याची खूप काळजी वाटते, खूपच अडचणी येतात. दादाश्री : काळजी वाटायची सुरुवात झाली की समजायचे आपले कार्य बिघडणार आहे. जास्त काळजी वाटत नसेल तर समजायचे की Page #166 -------------------------------------------------------------------------- ________________ व्यापार, धर्मासकट १५१ कार्य बिघडणार नाही. चिंता-काळजी कार्याला अवरोधक (अडचणकारक) आहे. चिंतेमुळे धंद्याचे मरण ओढावेल. ज्यात चढ-उतार होते त्यालाच धंदा म्हणतात. हे पुरण-गलन आहे. पुरण झालेले गलन झाल्याशिवाय राहणारच नाही. या पुरण-गलनात आपली काहीच संपत्ती नाही, आणि जी आपली संपत्ती आहे त्यातून काहीच पुरण-गलन होत नाही! इतका चोख व्यवहार आहे !! हे तुमच्या घरात तुमची बायको-मुले सगळेच तुमचे भागीदार आहेत ना? प्रश्नकर्ता : सुख-दुःखात तर भागीदार आहेत. दादाश्री : तुम्ही तुमच्या बायको-मुलांचे पालक म्हटले जातात. फक्त पालकानेच का म्हणून काळजी करावी? आणि घरची माणसे तर उलट तुम्हाला म्हणतात ना की, आमची काळजी करू नका. प्रश्नकर्ता : चिंतेचे स्वरूप काय आहे? जन्माला आलो तेव्हा तर चिंता नव्हती, मग आता आली कुठून? दादाश्री : जसजशी बुद्धी वाढते तसतसा संतापही वाढत जातो. जन्मले तेव्हा बुद्धी होती का? व्यापार-धंद्यासाठी विचार करण्याची गरज आहे. पण त्यापुढे गेलात तर सगळे बिघडते. व्यापार-धंद्यासाठी दहापंधरा मिनिटे विचार करणे ठीक आहे पण त्यापुढे जाऊन सतत विचार चक्र चालूच राहिले तर ते नॉर्मालीटीच्या बाहेर गेले म्हटले जाईल. तेव्हा मग विचार करणे बंद करा. धंद्याचे विचार तर येतील, पण त्या विचारात तन्म्याकार झालात तर त्या विचारांचे ध्यान उत्पन्न होईल आणि त्यामुळे काळजी सुरु होईल. ते मग प्रचंड नुकसान करते. कर्जफेडीच्या बाबतीत दानत साफ ठेवा प्रश्नकर्ता : व्यापारात खूप तोटा झाला आहे तर काय करू? व्यापार बंद करू की दुसरा व्यवसाय करू? कर्ज खूप झाले आहे. Page #167 -------------------------------------------------------------------------- ________________ १५२ क्लेश रहित जीवन दादाश्री : कापसाच्या व्यापारातील नुकसान भरपाई किराणा दुकान टाकून निघत नाही. व्यापारातील झालेल्या नुकसानाची भरपाई व्यपारातूनच भरून निघते. नोकरीतून होत नाही. कॉन्ट्रॅक्ट व्यवसायातील नुकसान पानाच्या टपरी मधून भरून निघेल का? ज्या बाजारात नुकसान झाले त्याच बाजारातून नुकसान भरून निघेल. तिथेच त्याचे औषध असते. आपण मनात कायम एकच भाव नक्की करावा की आपल्याकडून कोणत्याही जीवाला किंचितमात्रही दुःख होता कामा नये. संपूर्ण कर्ज फेडले जावे, असा आपला शुद्ध भाव असावा. तुमची दानत साफ असेल तर उशीरा का होई ना संपूर्ण कर्ज फेडू शकाल. लक्ष्मी म्हणजे अकरावा प्राण आहे. म्हणून कुणाचीही लक्ष्मी आपल्याजवळ राहता कामा नये. आपली लक्ष्मी कुणाजवळ राहिली तर हरकत नाही. पण कायम एकच ध्येय ठेवले पाहिजे की मला कर्जाची एक-एक पै चुकती करायचीच आहे. ध्येय लक्षात ठेवूनच खेळ खेळा. खेळ खेळा पण खेळाडू बनू नका. खेळाडू झालात तर तुम्ही संपलेच समजा! ...जोखीम ओळखून निर्भय राहावे प्रत्येक धंद्यात उदय-अस्त (चढ-उतार) असतातच. खूप डास असले तरी रात्रभर झोपू देत नाहीत आणि फक्त दोनच असले तरी रात्रभर झोपू देणार नाहीत! म्हणून तुम्ही म्हणा, 'हे डासमय दुनिया! दोनच जर झोपू देत नाहीत तर मग सगळेच एकदम या ना.' हा नफा-तोटा हा पण डासांसारखाच आहे. नियम कसा ठेवावा? समुद्रात शक्यतो उतरायचे नाही! पण उतरायची वेळ आलीच तर घाबरायचे नाही. जोपर्यंत तुम्ही निर्भय, तोपर्यंत अल्लाह तुमच्याजवळ. तुम्ही जर घाबरलात तर अल्लाह म्हणेल, जा त्या ओलीयाकडे! देवासाठी तर रेसकोर्स आणि कपड्याचे दुकान दोन्हीही सारखेच. पण तुम्हाला जर मोक्षाला जायचे असेल तर या Page #168 -------------------------------------------------------------------------- ________________ व्यापार, धर्मासकट १५३ जोखीमेत पडूच नका. या समुद्रात प्रवेश केल्यानंतर तिथून बाहेर पडणेच उत्तम. आम्ही व्यापार कशा पद्धतीने करतो हे माहित आहे का? व्यापाराची बोट समुद्रात सोडताना आधी पूजाविधी करून मग बोटीच्या कानात सांगतो, 'तुला जेव्हा बुडायचे असेल तेव्हा बुड, पण तू बुडावी अशी माझी इच्छा नाही.' मग सहा महिन्यात बुडो की दोन वर्षात बुडो. तेव्हा आम्ही एडजस्टमेन्ट करून घेतो. चला सहा महिने तरी टिकली! व्यापार म्हणजे हे टोक किंवा ते टोक. आशेचा महाल निराशा दिल्याशिवाय राहत नाही. संसारात वीतराग राहणे खूप कठीण आहे. पण आमची ज्ञानकला आणि बुद्धिकला जबरदस्त असते त्यामुळे संसारात वीतराग राहता येते. ग्राहकांचे पण नियम आहेत प्रश्नकर्ता : दुकानात जास्त ग्राहक येवोत म्हणून मी दुकान लवकर उघडतो आणि उशीरा बंद करतो, हे बरोबर आहे ना? दादाश्री : ग्राहकांना आकर्षित करणारे तुम्ही कोण? लोक ज्या टाईमाला दुकान उघडत असतील त्याच टाईमाला तुम्ही पण उघडा. लोक सात वाजता उघडतात आणि तुम्ही साडे नऊ वाजता उघडलेत तर तेही चुकीचे म्हटले जाईल. लोक जेव्हा दुकान बंद करतात तेव्हा तुम्हीही बंद करून घरी जावे. व्यवहार काय सांगतो की, लोक काय करतात ते तुम्ही पाहा. लोक झोपतात त्यावेळी तुम्ही पण झोपा. रात्री दोन वाजेपर्यंत धुमाकूळ घालता, ही कोणासारखी गोष्ट आहे ! जेवल्यानंतर विचार करता का की हे कसे पचेल? त्याचे फळ सकाळी मिळूनच जाते ना? असेच व्यापाराचे सुद्धा आहे. प्रश्नकर्ता : दादा, सद्या दुकानात बिलकूल ग्राहक नसतात, मग मी काय करू? Page #169 -------------------------------------------------------------------------- ________________ १५४ क्लेश रहित जीवन दादाश्री : ही लाईट गेली तर, 'लाईट केव्हा येईल, केव्हा येईल' असे केल्याने ती लवकर येते का? तेव्हा तुम्ही काय करता? प्रश्नकर्ता : एक-दोन वेळा फोन करतो किंवा स्वतः सांगायला जातो. दादाश्री : शंभर वेळा फोन करता का? प्रश्नकर्ता : नाही. दादाश्री : ही लाईट गेली तेव्हा आपण आरामशीर गात होतो आणि मग ती आपोआपच आली ना? प्रश्नकर्ता : म्हणजे आपण नि:स्पृह (विरक्त) व्हायला हवे का? दादाश्री : नि:स्पृह होणे हाही गुन्हा आहे आणि सस्पृह होऊन जाणे हाही गुन्हा आहे. 'लाईट आली तर चांगले होईल' एवढा भाव ठेवावा. सस्पृह-निस्पृह राहण्याचे सांगितले आहे. 'ग्राहक आले तर बरे होईल' असा भाव मनात बाळगा. पण विनाकारण उपद्व्याप करू नका. रेग्युलारिटी असावी आणि भाव बिघडवू नये हा रिलेटिव्ह पुरुषार्थ आहे. गिहाईक आले नाहीत तरी व्याकूळ व्हायचे नाही आणि एखाद्या दिवशी गिहाईकांच्या झुंडी आल्या तरी सगळ्यांचे समाधान होईल असे त्यांच्याशी वागा. हे तर एखाद्या दिवशी गिहाईक आले नाही तर लगेच शेठजी नोकरावर खेकसतात! नोकराच्या जागी तुम्ही असाल तर तुम्हाला कसे वाटेल? काय वाटले असते? तो बिचारा नोकरी करायला येतो आणि तुम्ही त्याच्यावर सतत खेकसतच राहिलात तर नोकर असल्या कारणाने तो सहन तर करेल पण मनात वैर बांधेल. नोकराला रागावू नका. तो पण माणूसच आहे. त्याला घरी पण दुःखं आणि इथे पण तुम्ही शेठ असल्यामुळे दडपणात ठेवाल, तर तो बिचारा कुठे जाईल? त्या बिचाऱ्यावर थोडा तर दयाभाव ठेवा. Page #170 -------------------------------------------------------------------------- ________________ व्यापार, धर्मासकट १५५ ग्राहक आला तर शांतपणे आणि प्रेमाने त्याला माल द्या. दुकानात ग्राहक नसतील तेव्हा देवाचे नाव घेत रहा. तुम्ही तर सारखे इकडे-तिकडे डोकावून कोणी येत आहे का ते पाहत राहता. मनातल्या मनात व्याकूळ होता, 'आजचा दिवस तोट्यात गेला.आजचा सगळा खर्च अंगावर येईल.' असे विचारचक्र चालू ठेवता. स्वत:ही चिडता आणि नोकरावरही रागावता. असे आर्तध्यान आणि रौद्रध्यान करत राहता! जे कोणी गिहाईक येतात ते 'व्यवस्थित शक्ती' च्या हिशोबाने येणार असतात तेच येतात. त्यामुळे त्यात ढवळाढवळ करू नका. दुकानात गिहाईक आले तर देणेघेणे करायचे पण कषाय करू नका. त्यांच्याशी सौजन्याने व्यवहार करावा. दगडाखाली हात अडकला असेल तर आपण दगडावर हातोडा मारतो का? नाही ना? उलट तिथे तर हळूच हात काढून घेतो. त्यात कषायाचा वापर केला तर वैर बांधले जाईल, आणि एका वैरामधून अनंत वैर निर्माण होतील. या शत्रुत्वामुळेच जग उभे झाले आहे, या संसाराचे मूळ कारण हेच आहे. प्रामाणिकता, देवाचे लायसन्स प्रश्नकर्ता : आजकाल प्रामाणिकपणे धंदा करायला गेलो तर जास्त अडचणी येतात, असे का? दादाश्री : प्रामाणिकपणे काम केले तर एकच अडचण येईल, पण अप्रामाणिकपणे काम कराल तर दोन प्रकारच्या अडचणी येतील. प्रामाणिकपणाच्या अडचणीतून सुटता येईल परंतु अप्रामाणिकपणाच्या अडचणीतून सुटका करून घेणे अवघड आहे. प्रामाणिकपणा म्हणजे परमेश्वराचे मोठे लायसन्स आहे, त्याच्यावर कोणीच आरोप करू शकत नाही. तुम्हाला हे लायसन्स फाडून टाकावेसे वाटते का? ...नफा-तोट्यात, हर्ष-शोक कशासाठी? व्यापार मन बिघडवून केलात तरी नफा ६६,६१६ रुपयेच होणार Page #171 -------------------------------------------------------------------------- ________________ १५६ क्लेश रहित जीवन आणि मन न बिघडवता केला तरीही ६६,६१६ रुपयेच होणार, मग कुठला व्यापार करावा? आमचे मोठमोठे व्यापार चालतात पण व्यापाराचे पत्र 'आमच्या' डोक्यावर कधी येत नाहीत. कारण व्यापारातील नफा आणि व्यापारातील तोटाही आम्ही व्यापारातच ठेवतो. जर मी नोकरी केली असती तर मला जो पगार मिळाला असता तेवढाच पैसा मी घरी घेऊन जातो. बाकीचा नफाही व्यापाराचा आणि तोटाही व्यापाराच्या खात्यात. पैशांचे ओझे ठेवण्यासारखे नाही. बँकेत जमा झाले की आनंद, गेलेली दु:ख. या जगात काहीच हुश्श... करून मस्त वाटून घेण्यासारखे नाही. कारण सगळे टेम्पररी (तात्पुरते) आहे. व्यापारात हिताहित कोणता व्यापार चांगला? तर ज्या व्यापारात हिंसा नाही असा व्यापार चांगला, कुणालाही आपल्या व्यापारामुळे दुःख होत नसेल. धान्याचा व्यापार असेल तर धान्य मोजताना मापातून थोडे काढून घेतात. हल्ली तर भेसळ करायचे शिकले आहेत. त्यातही जे खाण्याच्या वस्तूंमध्ये भेसळ करतात ते तिर्यंच (जनावर) गतीत चार पायात जातील. चार पाय असले म्हणजे पडणार तर नाहीत ना? व्यापारात धर्म असू द्या, नाही तर अधर्म शिरेल. प्रश्नकर्ता : व्यापार किती वाढवावा? दादाश्री : व्यापार इतका करावा की रात्री शांतपणे झोपू शकाल. आपल्याला जेव्हा बदलायचा असेल तेव्हा बदलू शकू. स्वतःहून उपाधीला आमंत्रण देऊ नये. व्याज घेण्यात काही हरकत? प्रश्नकर्ता : शास्त्रात व्याज घेण्यास मनाई केलेली नाही ना? Page #172 -------------------------------------------------------------------------- ________________ व्यापार, धर्मासकट १५७ दादाश्री : आपल्या शास्त्रात व्याज घेण्यास हरकत घेतलेली नाही. पण व्याजखाऊ होणे हानिकारक आहे. समोरच्याला दुःख होत नाही तोपर्यंत व्याज घेण्यास हरकत नाही. काटकसर तर नोबल ठेवा घरात काटकसर कशी असावी? बाहेरून खराब दिसणार नाही अशी काटकसर असावी. काटकसर स्वयंपाकघरात घुसता कामा नये. काटकसरीत उदारपणा असावा. स्वयंपाकघरात काटकसर घुसली तर मन (भाव) बिघडते. मग कोणी पाहुणे आले तरी भाव बिघडेल की तांदूळ वापरले जातील! एखादा खूप उधळा असेल तर आम्ही त्याला 'नोबल' काटकसर करण्यास सांगतो. Page #173 -------------------------------------------------------------------------- ________________ वरिष्ठांचा व्यवहार अंडरहेन्डची तर रक्षा करावी प्रश्नकर्ता : दादा, शेठजी माझ्याकडून खूप काम करून घेतात, पगार खूप कमी देतात शिवाय सतत दटावतातही. दादाश्री : हे हिंदुस्तानातील शेठजी तर पत्नीला देखील धोका देतात. पण शेवटी जेव्हा अंत्ययात्रा निघते तेव्हा तर स्वतःच धोका खातात. हे हिंदूस्तानातील शेठ लोक नोकरांना पिळून काढतात, धड दोन घास खाऊ पण देत नाहीत, नोकरीच्या पगारातून सुद्धा काटछाट करतात. इन्कमटॅक्सवाले पैसे कापून घेतात, तेव्हा तिथे सरळ होतात, पण आजकाल तर इन्कमटॅक्सवाल्यांचेही हे लोक कापून घेतात! (कर भरत नाहीत) जगात सर्व अंडरहेन्ड (हाताखालची माणसे,नोकर) ला धमकावत असतात. अरे, साहेबांना धमकावून दाखव ना, ते जमले तर तुझा खरा विजय! जगाचा व्यवहारच हा असा आहे. पण भगवंताने तर एकच व्यवहार सांगितला होता की, तुमच्या हाताखाली जी पण माणसं आहेत त्यांचे रक्षण करा. आणि ज्यांनी रक्षण केले ते देव बनलेत. मी लहानपणापासून अंडरहन्डचे रक्षण करत आलो. आता इथे कोणी नोकर चहा घेऊन आला आणि त्याच्या हातून चहाचा ट्रे पडला, तर लगेच शेठ त्याच्यावर ओरडतील की, 'तुझे हात तुटलेत का? तुला दिसत नाही?' तो तर बिचारा नोकर आहे. वास्तवात Page #174 -------------------------------------------------------------------------- ________________ वरिष्ठांचा व्यवहार १५९ नोकर कधी काही फोडत नाही, आपल्या राँग बिलिफ (चुकीच्या मान्यते) मुळे असे वाटते की, हे नोकराने फोडले. वास्तवात फोडणारा दुसरा कोणी आहे. इथे तर निर्दोष व्यक्तीला दोषित ठरवले जाते, नोकर त्या वागणुकीचे फळ देतो, कुठल्या तरी जन्मात. प्रश्नकर्ता : मग त्यावेळी फोडणारा कोण असतो? दादाश्री : आम्ही जेव्हा ज्ञान देतो तेव्हा ज्ञानविधीत या बद्दल सविस्तर सांगत असतो. फोडणारा कोण? जग चालवणारा कोण? त्या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगत असतो. खरे तर अशा परिस्थितीत आपण काय केले पाहिजे? भ्रांतीच्या अवस्थेत सुद्धा कुठला आधार घेतला पाहिजे? नोकर तर सिन्सियर आहे, तो मुद्दाम फोडणाऱ्या पैकी नाही. प्रश्नकर्ता : तो कितीही सिन्सियर असला पण अखेर त्याच्या हातून चहाचा ट्रे पडला मग तो अप्रत्यक्षपणे जबाबदार नाही का? दादाश्री : जबाबदार आहे! पण त्याची जबाबदारी किती ते आपण समजून घेतले पाहिजे. सर्व प्रथम त्याला विचारले पाहिजे की, 'तुला भाजले तर नाही ना?' भाजले असेल तर औषध लावले पाहिजे. मग हळूवार सांगावे की याच्यापुढे अशी घाई करू नकोस, जपून चालत जा. सत्तेचा दुरुपयोग इथे सत्ता असणारी व्यक्ती सत्तेचा उपयोग आपल्या कनिष्ठांना तुडवण्यासाठी करते. जो सत्तेचा दुरुपयोग करतो त्याची सत्ता त्याच्या हातून निघून जाते, शिवाय पुन्हा मनुष्य जन्मही मिळत नाही. एकच तास जर आपण आपल्या हाताखालच्या माणसाला त्रास दिला तरी आयुष्यभराची कर्म बांधली जातात. विरोध करणाऱ्यांना धमकावले तर गोष्ट वेगळी आहे. प्रश्नकर्ता : समोरचा आगाव असेल तर त्याच्याशी जशास तसे नको का वागायला? Page #175 -------------------------------------------------------------------------- ________________ १६० क्लेश रहित जीवन दादाश्री : समोरच्या व्यक्तीची वागणूक आपण पाहायची नाही, ती त्याची जबाबदारी आहे, जर समोरुन दरोडेखोर येत असेल तर तुम्ही दोन हात केलेत तर ठीक आहे पण तेव्हा तर तुम्ही सगळे देऊन टाकता ना? निर्बळ व्यक्तीवर तुम्ही अधिकार गाजवता त्यात काय विशेष? हातात अधिकार असून देखील तुम्ही निर्बळ व्यक्तीशी नम्रतेने वागलात तर बरोबर. हे ऑफिसर लोक घरी बायकोशी भांडून येतात आणि ऑफिसमध्ये असिस्टन्ट लोकांचे तेल काढतात (छळतात)! अरे, असिस्टन्टने जर चुकीच्या कागदावर तुमची सही घेतली तर तुझी काय दैना होईल? असिस्टन्टची तर खूपच गरज आहे। ___ आम्ही असिस्टन्टची खूप काळजी घेतो. कारण त्याच्यामुळे तर आपले काम चालते. काहीजण शेठला खुश करण्यासाठी स्वत:ची हुशारी दाखवतात. शेठने सांगितले 'वीस टक्के घ्या.' तेव्हा स्वतःची हुशारी सिद्ध करण्यासाठी पंचवीस टक्के घेतो. असे करुन पापाचे गासुडे का बांधता? Page #176 -------------------------------------------------------------------------- ________________ [८] आपण सर्व निसर्गाचे 'गेस्ट' निसर्ग, जन्मापासूनच हितकारक या संसारात जितकेही जीव आहेत ते सर्वच निसर्गाचे 'गेस्ट' (पाहुणे) आहेत. तुम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट निसर्ग तुमच्यासाठी तयार करून पाठवितो. योग्य समज नसल्यामुळे तुम्हाला सतत क्लेशबेचैनी-चिंता वाटत राहते कारण तुम्हाला असे वाटते की हे 'मीच करत आहे.' हिच भ्रांती आहे. खरे तर कुणाकडून काहीही होऊ शकत नाही. __इथे जन्म होण्यापूर्वीच, आपण या संसारात येण्याआधीच लोक सगळीच तयारी करून ठेवतात. भगवंतांची स्वारी येत आहे! जन्म होण्याआधी बाळाला काळजी करावी लागते का की बाहेर आल्यानंतर माझ्या दुधाचे काय होईल? इथे तर दुधाच्या कुंड्या वगैरे आधीच तयार असतात! डॉक्टर, सुईन सगळेच तयार असतात? आणि सुईन नसेल तर न्हावीन तरी असतेच. पण कसली ना कसली तयारी असेलच. मग जसा 'गेस्ट' असेल तशी! 'गेस्ट' फर्स्ट क्लास असेल त्याची तयारी वेगळी, सेकण्ड क्लासची वेगळी आणि थर्ड क्लासची वेगळी, सगळे क्लास असतात ना? म्हणजे सगळ्याच तयारीनिशी तुम्ही आला आहात. मग एवढी हाय-उपस कशासाठी करता? आपण ज्यांचे पाहुणे असू, तिथे त्यांच्याबरोबर विनय कसा असला पाहिजे? मी तुमच्या घरी पाहुणा म्हणून आलो तर मला पाहुणा Page #177 -------------------------------------------------------------------------- ________________ १६२ क्लेश रहित जीवन म्हणून विनय नको का ठेवायला? तुम्ही सांगाल की, 'इथे झोपू नका, तिथे झोपा,' तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला तिथे झोपायला हवे. दोन वाजता जेवायला वाढले तरी शांतपणे जेवायचे. ताटात जे वाढतील ते मुकाट्याने खाल्ले पाहिजे. तिथे तक्रार करता कामा नये. कारण 'गेस्ट' आहोत. आता जर पाहुणा स्वयंपाकघरात जाऊन कढीत चमचा ढवळू लागला तर ते योग्य होईल का? घरात ढवळाढवळ करू लागलात तर तुम्हाला घरात कोण ठेवून घेईल? जेवणात बासुंदी असेल तर खाऊन घ्यावी तिथे असे सांगू नये की 'आम्ही गोड खात नाही.' जेवढे वाढले तेवढे आरामात खायचे. खारट वाढले तर खारट खावे. जास्त आवडत नसेल तर कमी खायचे, पण खायचेच! पाहुण्याचे सगळेच नियम पाळा. पाहुण्याने राग-द्वेष करुन चालणार नाही. पाहुणा राग-द्वेष करू शकतो का? तो तर विनयपुर्वकच राहतो ना? आम्ही तर 'गेस्ट' प्रमाणेच राहतो. आमच्यासाठी सगळ्याच वस्तू येतात. आपण ज्यांच्या घरी 'गेस्ट' म्हणून गेलो असू त्यांना त्रास द्यायचा नाही. आमच्यासाठी सगळ्याच वस्तू घरबसल्या येतात. आठवण झाली की लगेच हजर होतात आणि समजा नाही मिळाल्या तरीही मला काही हरकत नाही. कारण आपण त्यांच्या घरी 'गेस्ट' आहोत. कुणाच्या घरी? तर निसर्गाच्या घरी! निसर्गाची मर्जी नसेल तर आपण समजावे की हे माझ्या हितासाठी आहे. आणि निसर्गाची मर्जी असेल तरीही समजावे की, हे पण माझ्या हितासाठीच आहे. आपल्या हातात करण्याची सत्ता असती तर एका बाजूला दाढी उगवली आणि दुसऱ्या बाजूला नाही उगवली तर आपण काय केले असते? आपल्या हातात करायची सत्ता असती तर सगळा गोंधळ करुन ठेवला असता. पण हे सर्व निसर्गाच्या हातात आहे. निसर्गाची कुठेही चूक होत नाही. सगळे पध्दतशीर असते. पाहा ना, चावण्याचे दात वेगळे, सोलण्याचे दात वेगळे, चघळण्याचे वेगळे, पाहा तरी! किती सुंदर व्यवस्था आहे ! जन्मत:च पूर्ण शरीर मिळते. हात, पाय, नाक, कान, डोळे सगळे मिळते पण तोंडात हात घातले तर दात नसतात, Page #178 -------------------------------------------------------------------------- ________________ आपण सर्व निसर्गाचे 'गेस्ट' मग यात निसर्गाची काही चूक झाली असेल का ? नाही, निसर्गाला माहित आहे की जन्माला आल्यावर लगेच दूध प्यायचे आहे, दुसरा आहार पचणार नाही, आईचे दूध प्यायचे आहे, दात दिले तर तो चावून घेईल ! पाहा किती सुंदर रचना केली आहे ! जसजशी गरज भासेल तसे दात येत जातील. प्रथम चार येतील मग हळूहळू आणखी दुसरे येतील, आणि या म्हाताऱ्यांचे दात पडले तर परत येत नाहीत ! १६३ निसर्ग सगळीकडून पद्धतीने रक्षण करतो. राजासारखे ठेवतो. पण या अभाग्याला हे समजत नाही त्यास काय करणार ? पण ढवळाढवळ करून दुःख निर्माण केले रात्री पुरणपोळी खाऊन झोपून जातो ना ? मग घोरत राहतो! अरे बाबा, आत काय चालू आहे त्याचा तपास तरी कर! तेव्हा म्हणेल 'त्यात मी काय करू?' आणि निसर्गाची कार्यपद्धती कशी आहे ? पोटात पाचक रस निर्माण होतात, बाईल (पित्त) वगैरे सर्व निर्माण होतात. सकाळी रक्त रक्ताच्या जागी, लघवी लघवीच्या जागी, संडास संडासच्या जागी अगदी बरोबर पोहोचते. कशी पद्धतशीर सुंदर व्यवस्था केलेली आहे ! आत निसर्ग केवढे मोठे काम करत आहे ! जर डॉक्टरला एक दिवस अन्न पचवायचे काम सोपवले तर तो मनुष्याला मारून टाकेल! आतील पाचकरस टाकायचे, बाईल टाकायचे, असे सर्व काम डॉक्टरवर सोपवले असेल तर डॉक्टर काय करेल ? भूख लागत नाही म्हणून आज पाचक रस जरा जास्त टाकू दे. आता निसर्गाचा नियम कसा आहे की, मरेपर्यंत पुरेल अशा तऱ्हेने तो पाचकरसाची व्यवस्था करतो. डॉक्टरकडे ही व्यवस्था सोपवली तर तो रविवारी पाचकरस जास्त टाकतो, म्हणून बुधवारी काही पचनारच नाही, कारण बुधवारचा हिस्सा पण रविवारीच टाकला. निसर्गाच्या हातात कशी सुंदर बाजी आहे ! आणि तुमच्या हातात Page #179 -------------------------------------------------------------------------- ________________ १६४ क्लेश रहित जीवन व्यापार आहे. खरे म्हणजे व्यापार देखील तुमच्या हातात नाहीच. तुम्ही फक्त मानता की मी व्यापार करतो. आणि म्हणूनच विनाकारण हायहाय करीत राहतात! दादरहून बॉम्बे सेन्ट्रल जायला टॅक्सी केली की मनात धडक लागेल अशी सारखी धास्ती वाटत राहते. अरे कोणीच धडकणार नाही. तू आपला समोर बघून चाल. तुझे कर्तव्य किती? तर फक्त समोर बघून चालायचे एवढेच. खऱ्या अर्थाने तर तेही तुझे कर्तव्य नाही. निसर्गच ते तुझ्याकडून करवून घेत आहे. पण समोर पाहत नाही आणि विनाकारण ढवळाढवळ करीत राहतो. निसर्ग तर इतका चांगला आहे! अरे शरीरात इतका सुंदर कारखाना चालू आहे तर बाहेर का नाही चालणार? बाहेर काहीच चालवायची गरज नाही. बाहेर काय चालवायचे आहे ? प्रश्नकर्ता : कोणी चुकीचे वागत असेल तर ती सत्ता देखील त्याच्या हातात नाही? दादाश्री : नाही, ती सत्ता नाही, आणि चुकीचे होईल असेही नाही, पण त्याने बरे-वाईट भाव केले म्हणून हे असे चुकीचे घडले. स्वत:च निसर्गाच्या संचालनात ढवळाढवळ केली आहे, नाही तर हे कावळे, कुत्रे या जनावरांचे कसे (जीवन) आहे? दवाखाना नको, कोर्ट नको, हे प्राणी त्यांची भांडणे कसे मिटवतात? दोन बैल भांडतात, खूप भांडतात पण सुटल्यानंतर ते काय कोर्ट शोधायला जातात का? दुसऱ्या दिवशी पाहिले तर दोघेही मजेत हिंडत असतात! आणि या मूर्खाचे दवाखाने असतात, कोर्टस् असतात आणि तरीही सदा दुःखीच! या लोकांची तर नेहमीच रडबोंबल सुरु असते. अशा लोकांना अकर्मी म्हणावे की सकर्मी म्हणावे? या चिमण्या, कबुतरे, कुत्रे सगळे किती सुंदर दिसतात! ते काय हिवाळ्यात आयुर्वेदिक जडीबुटी टाकलेले हिवाळीपाक खातात का? आणि हे लोक तर असे सर्व खाऊनही रूपवान दिसत नाहीत. कुरूपच दिसतात. या अहंकारामुळे सुंदर मनुष्य सुद्धा कुरूप दिसतो. म्हणजे आपले कुठेतरी चुकत असावे, असा विचार करायला नको का? Page #180 -------------------------------------------------------------------------- ________________ आपण सर्व निसर्गाचे 'गेस्ट' १६५ ... तरीही निसर्ग सदैव तुमच्या मदतीसाठी तयार प्रश्नकर्ता : शुभ मार्गी जाण्याचे विचार येतात पण ते टिकत नाहीत आणि पुन्हा अशुभ विचार मनात येतात, हे असे का? दादाश्री : विचार म्हणजे काय? पुढे जायचे असेल तरी विचार काम करतात आणि मागे वळायचे असेल तरीही विचार काम करतात. परमेश्वराकडे जाणाऱ्या वाटेने पाऊल उचलतात आणि पुन्हा मागे वळतात, हे अशाप्रकारे होत आहे. एक मैल पुढे जातात आणि एक मैल मागे वळतात, एकाच प्रकारचे विचार करणे उत्तम. मागे यायचे ठरवले म्हणजे मागेच यायचे आणि पुढे जायचे ठरवले मग पुढेच जायचे. ज्याला पुढे यायचे असेल तर त्यालाही निसर्ग मदत करतो आणि ज्याला मागे जायचे असेल त्यालाही निसर्ग मदत करतो. निसर्ग काय म्हणतो? 'आय विल हेल्प यु.' (मी तुम्हाला मदत करेल.) तुला जे काम करायचे असेल, मग चोरी करायची असेल तरीही 'आय विल हेल्प यु.' निसर्गाची तर खूप मोठी मदत आहे, निसर्गाच्या मदतीनेच तर हे सगळे चालत आहे! पण तू ठरवतच नाहीस की मला काय करायचे आहे ? जर तू ठरवलेस तर निसर्ग तुला मदत करण्यासाठी तयारच आहे. प्रथम हे ठरवा की मला असे असे करायचे आहे, मग तो निश्चय रोज सकाळी आठवा. तुमच्या निश्चयाला तुम्ही 'सिन्सियर' राहिले पाहिजे, तर निसर्ग तुम्हाला मदत करेल. तुम्ही निसर्गाचे ‘पाहूणे' आहात. ___म्हणून गोष्ट नीट समजून घ्या. निसर्ग तर नेहमीच म्हणतो 'आय विल हेल्प यु.' देव तुम्हाला मदत करीत नाही. देव तसा रिकामाही नाही. ही सगळी निसर्गाचीच रचना आहे. आणि ती फक्त भगवंताच्या हजेरीमुळेच निर्माण झाली आहे. प्रश्नकर्ता : आपण निसर्गाचे 'गेस्ट' आहोत की 'पार्ट ऑफ नेचर' (निसर्गाचा भाग) आहोत? Page #181 -------------------------------------------------------------------------- ________________ १६६ क्लेश रहित जीवन दादाश्री : 'पार्ट ऑफ नेचर' पण आहात आणि 'गेस्ट' पण आहात. आम्ही पण 'गेस्ट' बनून राहणे पसंत करतो. तुम्ही कुठेही बसलात तरी तुम्हाला हवा मिळत राहील, पाणी मिळत राहील आणि ते सुद्धा 'फ्री ऑफ कॉस्ट' (फुकट)! जे जास्त मौल्यवान आहे ते फुकट मिळत राहते. निसर्गाला ज्याची किंमत आहे त्याची किंमत मनुष्याला वाटत नाही. आणि निसर्गाला ज्याची किंमत नाही (जसे की हिरे, मोती) त्याची मनुष्याला खूप किंमत आहे. Page #182 -------------------------------------------------------------------------- ________________ [९] मनुष्यपणाची किंमत किंमत तर सिन्सियारीटी व मोरालिटीची साऱ्या जगाचा ‘बेसमेन्ट' (पाया) सिन्सियारीटी व मोरालिटी याच दोन गोष्टी आहेत. या दोन्ही गोष्टी सडल्या तर सगळे कोसळून पडते. या काळात सिन्सियारीटी आणि मोरालिटी असेल तर ती खूप मोठी संपत्ती आहे. हिंदुस्तानात या गोष्टी खूप मुबलक प्रमाणात होत्या पण हिंदुस्तानातील लोकांनी या गोष्टींची परदेशात निर्यात केली आहे. आणि त्या बदल्यात परदेशातून काय आयात केले आहे हे माहित आहे का तुम्हाला ? ही एटीकेट ची भुते (शिष्टाचाराचा वेडेपणा) मागवली ! त्यामुळे या बिचाऱ्यांना चैन पडत नाही. आपल्याला या एटीकेटच्या भुतांची काय गरज आहे ? ज्यांच्यात नूर नाही त्यांच्यासाठी गरज आहे. आपण तर तीर्थंकरी नूर असणारे लोक आहोत, ऋषीमुनींचे संतान आहोत ! तुमचे कपडे फाटले असतील तरी तुमच्या चेहऱ्यावरचे तेजच सांगेल की 'तुम्ही कोण आहात ?' प्रश्नकर्ता : 'सिन्सियारीटी' आणि 'मोरालिटी' चा नेमका अर्थ काय ? ते समजवा. दादाश्री : ‘मोरालिटी' चा अर्थ काय ? की स्वत:च्या हक्काचे आणि सहज मिळत असेल ते उपभोगण्याची सूट. हा 'मोरालिटी' चा अगदी अंतिम अर्थ आहे. 'मोरालिटी' तर अतिशय खोल गोष्ट आहे. Page #183 -------------------------------------------------------------------------- ________________ १६८ क्लेश रहित जीवन त्यावर तर अनेक शास्त्र लिहिता येतील. पण या अंतिम अर्थावरून तुम्ही समजून घ्या. आणि 'सिन्सियारीटी' म्हणजे जो माणूस दुसऱ्याला 'सिन्सियर' राहत नाही, तो स्वत:ला देखील 'सिन्सियर' राहत नाही. कोणालाही थोडे देखील 'इनसिन्सियर' असता कामा नये, त्यामुळे आपलीच 'सिन्सियारीटी' तुटते. ____'सिन्सियारीटी' आणि 'मोरालिटी' या काळात हे दोन गुण असतील तर खूप झाले. अरे यापैकी एक गुण जरी असेल तरीही तो तुम्हाला थेट मोक्षापर्यंत घेऊन जाईल! पण तुम्ही या गुणांना घट्ट धरून राहिले पाहिजे. आणि जेव्हा-जेव्हा तुम्हाला अडचण येईल तेव्हा ज्ञानी पुरुषांची भेट घेऊन स्पष्टता करून घेतली पाहिजे की ही 'मोरालिटी' आहे की नाही? ज्ञानी पुरुषांचा राजीपो (गुरुंजनांची कृपा आणि प्रसन्नता) आणि 'सिन्सियारीटी' या दोन्हींच्या गुणाकाराने सर्व कार्ये सफळ होतील! 'इनसिन्सियारीटी' ने सुद्धा मोक्ष एखादा वीस टक्के सिन्सियर आणि ऐंशी टक्के इनसिन्सियर माणूस जर माझ्याजवळ आला आणि त्याने मला विचारले की, 'मला मोक्ष हवा आहे आणि माझ्यात तर असा माल (दुर्गुण) भरलेला आहे तर मी काय केले पाहिजे?' तेव्हा मी त्याला सांगेल शंभर टक्के 'इनसिन्सियर' होऊन जा, मग मी तुला मोक्षाला जाण्याचा दुसरा मार्ग दाखवीन. या ऐंशी टक्याच्या कर्जाची भरपाई तो कशी करणार? त्यापेक्षा एकदम दिवाळेच काढ. 'ज्ञानी पुरुषां' चे फक्त एक वाक्य जरी पकडून चाललात तरीही मोक्ष प्राप्त कराल. संपूर्ण जगाशी 'इनसिन्सियर' राहिलात तरी देखील मला हरकत नाही पण एक इथे (ज्ञानीपुरुषांशी) सिन्सियर राहिला तर ते तुला मोक्षात घेऊन जातील. शंभर टक्के 'इनसिन्सियारीटी' हा पण एक Page #184 -------------------------------------------------------------------------- ________________ मनुष्यपणाची किंमत १६९ फार मोठा गुण आहे, तो मोक्षाला घेऊन जाईल. कारण भगवंताच्या संपूर्ण विरोधात गेला. भगवंताच्या संपूर्ण विरोधीला मोक्षात घेऊन जाण्याशिवाय सुटकाच नाही! एकतर भगवंताचा भक्त मोक्षाला जातो किंवा भगवंताचा संपूर्ण विरोधी मोक्षाला जातो!! म्हणून जो नादार आहे त्याला मी सांगतो की शंभर टक्के 'इनसिन्सियर' हो, मग मी तुला दुसरा मार्ग दाखविन, जो तुला थेट मोक्षात घेऊन जाईल. केवळ शंभर टक्के 'इनसिन्सियर' राहून भागणार नाही, त्याला दुसरा मार्ग दाखवावाच लागेल, तेव्हाच काम होईल. Page #185 -------------------------------------------------------------------------- ________________ [१०] आदर्श व्यवहार अखेर, व्यवहार आदर्श हवाच आदर्श व्यवहाराशिवाय कुणीही मोक्षाला गेलेला नाही. जैन व्यवहार म्हणजे आदर्श व्यवहार नाही. वैष्णव व्यवहार म्हणजे आदर्श व्यवहार नाही. मोक्षाला जाण्यासाठी आदर्श व्यवहार पाहिजे. आदर्श व्यवहार म्हणजे आपल्याकडून कोणत्याही जीवाला किंचितमात्र दुःख होऊ नये असे वर्तन. घरातील, बाहेरील, शेजारीपाजारी असे कुणालाही दुःख होणार नाही असे वर्तन म्हणजे आदर्श व्यवहार. जैन व्यवहाराचा अभिनिवेश (आपलेच मत बरोबर आहे असे मानणे) करणे योग्य नाही. तसेच वैष्णव व्यवहाराचाही अभिनिवेश करणे योग्य नाही. हा सगळा अभिनिवेश व्यवहार आहे. महावीर भगवंताचा आदर्श व्यवहार असायचा. आदर्श व्यवहार असला तर शत्रूला सुद्धा दुःख होणार नाही. आदर्श व्यवहार म्हणजे मोक्षाला जाण्याची निशाणी. जैन किंवा वैष्णव संप्रदायातून मोक्ष मिळत नाही. आमच्या आज्ञा तुम्हाला आदर्श व्यवहाराकडे घेऊन जातात. त्या तुम्हाला संपूर्ण समाधी अवस्थेत ठेवू शकतील अशा आहेत. आधी-व्याधी-उपाधी अशा तीनही अवस्थेत समाधीत ठेवू शकतील अशा आहेत. सारा बाह्य व्यवहार हा रिलेटिव्ह आहे, आणि हे तर 'सायन्स' आहे. सायन्स म्हणजे रियल! Page #186 -------------------------------------------------------------------------- ________________ आदर्श व्यवहार १७१ आदर्श व्यवहारामुळे आपल्याकडून कुणालाही दुःख होत नाही. आपल्याकडून कुणालाही दुःख होऊ नये एवढेच पाहायचे आहे. तरीदेखील आपल्याकडून कुणाला दुःख झालेच तर त्वरित प्रतिक्रमण करून घ्यावे. लोक आपल्याशी जसे वागतात तसे आपण वागायचे नाही. व्यवहारात पैशांची देणघेण होते ती होणार, तो तर सामान्य व्यवहार आहे, सामान्य रिवाज आहे, त्यास आम्ही व्यवहार म्हणत नाही. आपण फक्त आपल्याकडून कुणाला दुःख होत नाही एवढेच जपायचे आणि कदाचित कोणाला दुःख झालेच तर ताबडतोब प्रतिक्रमण करायचे यालाच आदर्श व्यवहार म्हणतात! आमचा व्यवहार आदर्श असतो. आमच्याकडून कधी कुणाला दःख होईल असे घडतच नाही. कोणाच्याच खात्यात माझ्या नावावर त्रास दिला अशी नोंद होत नाही. आम्हाला कोणी त्रास दिला आणि त्याबदल्यात आम्ही पण त्रास दिला तर आमच्यात आणि तुमच्यात काय फरक? आम्ही सरळ असतो, समोरच्याला ओटीत घालून आम्ही सरळ असतो. म्हणून समोरच्याला वाटते की दादा कच्चे (भोळे) आहेत, हो, कच्चे बनून सुटून जाणे चांगले पण पक्के बनून त्याच्या तुरुंगात जाणे हे चुकीचे. असे करण्याची काय गरज? एकदा आम्हाला आमचा भागीदार म्हणाला होता की, 'तुम्ही खूप भोळे आहात.' तेव्हा मी म्हणालो की 'मला भोळे म्हणणारा स्वतःच भोळा आहे.' त्यावर तो म्हणाला की 'तुम्हाला खूप जण फसवून जातात.' मग मी त्याला म्हणालो की आम्ही जाणून बुझून फसवून घेतो.' आमचा व्यवहार संपूर्ण आदर्श व्यवहार असतो. ज्याच्या व्यवहारात थोडी देखील कमतरता असेल तो मोक्षासाठी लायक म्हटला जाणार नाही. प्रश्नकर्ता : ज्ञानींच्या व्यवहारात दोन व्यक्तींमध्ये भेदभाव केला जातो का? Page #187 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन दादाश्री : त्यांच्या दृष्टीत भेदभाव नसतोच, वीतरागताच असते. त्यांच्या व्यवहारात (वागण्यात) फरक असतो. एक मिल मालक आणि त्याचा ड्रायव्हर इथे आले तर शेठला समोर बसवेल आणि ड्रायव्हरला माझ्याजवळ बसवेल, म्हणजे शेठचा पारा (घमंड) उतरून जाईल ! आणि जर पंतप्रधान आले तर मी उठून त्यांचे स्वागत करेल आणि त्यांना आसन ग्रहण करायला सांगेल, त्यांच्या सोबतचा व्यवहार चुकणार नाही. त्यांना तर विनयपूर्वक उच्च आसनावर बसवेल, आणि त्यांना जर माझ्याकडून ज्ञान ग्रहण करायचे असेल तर त्यांना माझ्या समोर खाली बसवेल आणि तसे नसेल तर वर बसवेल. लोकमान्य असेल त्यास व्यवहार म्हटले आहे आणि जे मोक्षमान्य असेल त्यास निश्चय म्हटले आहे, म्हणून सर्वसामान्यांशी वागताना सर्व सामान्य व्यवहारानेच वागावे लागते. पंतप्रधान आले आणि मी उठलो नाही तर तो त्यांचा अपमान होईल. त्यांना दुःख होईल आणि त्याची जबाबदारी आमच्यावर येईल. १७२ प्रश्नकर्ता : जे मोठे आहेत त्यांना पूज्य मानले पाहिजे ? दादाश्री : मोठे म्हणजे वयाने मोठे असे नाही, तरीदेखील जर आजीबाई मोठ्या असतील तर त्यांच्याशी विनयपूर्वक वागावे आणि जे ज्ञानवृद्ध (ज्ञानाने मोठे) असतील त्यांना पूज्य मानावे. सत्संगातून आम्ही घरी वेळेवर जातो. जर मी रात्री बारा वाजता दरवाजा ठोठावला तर ते कसे दिसेल ? घरचे लोक तोंडावर सांगतील की, 'तुम्ही कधीही या चालेल.' पण त्यांचे मन त्यांना सोडणार नाही ना? मन तर वेगवेगळ्या गोष्टी दाखवत राहील. आपण त्यांना सहजही दुःख कसे देऊ शकतो ? हा तर नियम म्हटला जातो आणि नियम तर पाळायलाच हवा. त्याचप्रमाणे रात्री दोन वाजता उठून जर कोणी रियलची (आत्म्याची) भक्ती केली तर कोणी काही बोलेल का? नाही, कोणीच विचारणार नाही. Page #188 -------------------------------------------------------------------------- ________________ आदर्श व्यवहार १७३ शुद्ध व्यवहार : सद्व्यवहार प्रश्नकर्ता : शुद्ध व्यवहार कशास म्हणावे? सद्व्यवहार कशास म्हणावे? दादाश्री : स्वरूपाचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर शुद्ध व्यवहाराची सुरुवात होते, तोपर्यंत सद्व्यवहार चालू असतो. प्रश्नकर्ता : शुद्ध व्यवहार आणि सद्व्यवहार यात काय फरक आहे? दादाश्री : सद्व्यवहार अहंकार सहित असतो आणि शुद्ध व्यवहारात अहंकार नसतो. निरहंकारी असतो. शुद्ध व्यवहारात संपूर्ण धर्मध्यान असते आणि सद्व्यवहारात अत्यंत अल्प प्रमाणात धर्मध्यान असते. जितका शुद्ध व्यवहार असेल तितका शुद्ध उपयोग राहतो. शुद्ध उपयोग म्हणजे 'स्वतः' ज्ञाता-द्रष्टा असतो, पण पाहायचे काय? तर म्हणे, शुद्ध व्यवहाराला पाहा. शुद्ध व्यवहारात निश्चय, शुद्ध उपयोग असतो. कृपाळू देवांनी म्हटले आहे: 'गच्छ्मतनी जे कल्पना ते नही सद्व्यवहार.' (सगळ्या पंथाची, संप्रदायाची मते किंवा कल्पना म्हणजे सद्व्यवहार नव्हे.) सगळे संप्रदाय, कल्पित गोष्टी आहेत. तिथे सद्व्यवहार सुद्धा नाही मग तिथे शुद्ध व्यवहाराविषयी काय बोलावे? शुद्ध व्यवहार हे निरहंकारी पद आहे, शुद्ध व्यवहार हे स्पर्धा रहित आहे. आपण जर स्पर्धेत उतरलो तर राग-द्वेष होतीलच. आम्ही तर सगळ्यांना सांगतो की, तुम्ही जिथे आहात तिथेच ठीक आहात. आणि त्यात तुम्हाला जर काही Page #189 -------------------------------------------------------------------------- ________________ १७४ क्लेश रहित जीवन उणीव भासत असेल तर आमच्याजवळ या. आमच्याकडे तर प्रेमाचाच वर्षाव असतो. कोणी द्वेषाने आला असेल तरीही त्याला प्रेमच मिळेल. क्रमिक मार्ग म्हणजे प्रथम शुद्ध व्यवहार करा, आणि शुद्ध व्यवहारवाले बनून मग शुद्धात्मा बना आणि अक्रम मार्ग म्हणजे प्रथम शुद्धात्मा बना मग शुद्ध व्यवहार करा. शुद्ध व्यवहारात व्यवहार सगळाच असतो पण त्यात वीतरागता असते. एक-दोन जन्मात मोक्षाला जाणार असाल तेव्हापासून शुद्ध व्यवहाराची सुरुवात होते. शुद्ध व्यवहार स्पर्शत नाही त्याचे नाव निश्चय! व्यवहार अशा पद्धतीने पूर्ण करावा की, निश्चयाला स्पर्श करू शकणार नाही, मग तो कुठल्याही प्रकारचा व्यवहार असो. चोख व्यवहार आणि शुद्ध व्यवहारात फरक आहे. व्यवहार चोख ठेवणे म्हणजे मानवधर्म आणि शुद्ध व्यवहार तर थेट मोक्षाला घेऊन जातो. घरात किंवा बाहेर भांडण-तंटे न करणे म्हणजे चोख व्यवहार. आणि आदर्श व्यवहार कशास म्हणतात? स्वतःचा सुगंध सर्वत्र पसरवणे म्हणजे आदर्श व्यवहार. आदर्श व्यवहार आणि निर्विकल्प पद, या दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्यानंतर आणखी काय पाहिजे. यात तर पूर्ण ब्रम्हांडाला बदलण्याची शक्ती आहे. आदर्श व्यवहाराने मोक्ष प्राप्ती दादाश्री : तुझा व्यवहार कसा करु इच्छितो? प्रश्नकर्ता : संपूर्ण आदर्श. दादाश्री : म्हातारे झाल्यानंतर आदर्श व्यवहार केला तर त्याचा काय उपयोग? आदर्श व्यवहार तर जीवनाच्या सुरुवातीपासूनच असायला हवा? Page #190 -------------------------------------------------------------------------- ________________ आदर्श व्यवहार जगात एक माणूस जरी आदर्श व्यवहार करणारा असेल तर त्यामुळे संपूर्ण जग बदलू शकते. प्रश्नकर्ता : आदर्श व्यवहार कशाप्रकारे होऊ शकतो ? १७५ दादाश्री : तुम्हाला ( महात्म्यांना) जे निर्विकल्प पद प्राप्त झाले आहे, तर त्यात राहिल्याने आदर्श व्यवहार आपोआप येईल. निर्विकल्प पद प्राप्त झाल्यानंतर काही हस्तक्षेप होत नाही, तरी सुद्धा तुमच्याकडून हस्तक्षेप झाला तर तुम्ही माझ्या आज्ञेत नाही. आमच्या पाच आज्ञा तुम्हाला महावीर भगवंताच्या स्थितीत ठेवतील अशा आहेत. (दैनंदिन) व्यवहारात आमच्या आज्ञा तुम्हाला बाधक नाहीत, त्या तुम्हाला आदर्श व्यवहारात ठेवतील अशा आहेत. हे 'ज्ञान' तर व्यवहाराला संपूर्ण आदर्श करू शकेल असे आहे. मोक्ष कोणाला मिळेल ? ज्याचा व्यवहार आदर्श आहे त्याला. आणि 'दादां' ची आज्ञा व्यवहाराला आदर्श बनवते. थोडी जरी चूक झाली तरी तो व्यवहार आदर्श नाही. मोक्ष म्हणजे काय नुसत्या थापा मारणे नाही, ते वास्तविक स्वरूप आहे. मोक्ष म्हणजे वकिलांनी लावलेला शोध नाही! वकील तर गप्पांमधूनही ( पुरावे) शोधून काढतील, तसे हे कर. एकच जन्म क्लेशरहित जीवन जगलात तरी तुम्ही मोक्षाला जाण्याचा हद्दीत आलात नाही. हे तर वास्तविक स्वरूप आहे. एक भाऊ मला एका मोठ्या आश्रमात भेटले. मी त्यांना विचारले की, 'तुम्ही इथे कसे ?' तेव्हा ते म्हणाले, 'मी या आश्रमात गेल्या दहा वर्षांपासून राहत आहे.' तेव्हा मी त्यांना म्हणालो, 'तुमचे आई-वडील तर अत्यंत हलाखीच्या अवस्थेत गावात म्हातारपण घालवत आहेत, खूप दु:खी आहेत.' तेव्हा त्यांनी सांगितले की, 'त्यात मी काय करू ? मी त्यांचे करीत बसलो तर माझे धर्मकार्य करण्याचे राहून जाईल.' याला धर्म कसे म्हणू शकतो ? धर्म तर त्यास म्हणतात की, ज्यात आई - वडिलांना विचारतात, भावाला विचारतात. सगळ्यांनाच धरून चालतात. व्यवहार आदर्श असायला हवा. जो व्यवहार स्वत:च्या धर्माचा तिरस्कार करतो, Page #191 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेश रहित जीवन आई-वडिलांच्या नात्याचाही तिरस्कार करतो अशा व्यवहाराला धर्म कसे म्हणता येईल ? अरे, मनातल्या मनात दिलेली शिवी किंवा अंधारात गुप्तपणे केलेली कृत्ये, या गोष्टी म्हणजे भयंकर अपराध आहेत ! त्याला वाटते की, 'मला कोण पाहणारा आहे ? आणि कोणाला हे कळणार आहे ?' अरे, हे काही पोपाबाईचे राज्य नाही ! हा तर खूप मोठा अपराध आहे! या सगळ्यांना अंधारातील चुकाच त्रास देतात ! १७६ व्यवहार आदर्श असायला हवा. या व्यवहारात जास्त खोलवर गेलात, तर कषाय निर्माण होतात. हा संसार तर एक होडीसारखा आहे, या होडीत चहा-नाश्ता वगैरे सर्व करायचे पण हे मात्र लक्षात ठेवायचे की, होडीतून आपल्याला किनाऱ्यावर पोहचायचे आहे. म्हणून या गोष्टी नीट समजून घ्या. 'ज्ञानीपुरुषांकडून' हे सर्व फक्त समजूनच घ्यायचे आहे. करायचे काहीच नाही! आणि जो समजून सामावला तो झाला वीतराग !! -जय सच्चिदानंद Page #192 -------------------------------------------------------------------------- ________________ प्रतिक्रमण विधी प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने देहधारी... (ज्याच्या प्रति दोष झाला असेल त्या व्यक्तिचे नाव) च्या मन-वचन-कायेचे योग, भावकर्म, द्रव्यकर्म, नोकर्माहून भिन्न असे हे शुद्धात्मा भगवान! आपल्या साक्षीने, आजच्या दिवसापर्यंत जे जे ** दोष झाले आहेत, त्यांची क्षमा मागत आहे, हृदयपूर्वक खूप पश्चाताप करीत आहे. मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. आणि पुन्हा असे दोष कधीही करणार नाही, असा दृढ निश्चय करीत आहे, त्यासाठी मला परम शक्ती द्या. ** क्रोध-मान-माया-लोभ, विषय-विकार, कषाय इत्यादीपासून त्या व्यक्तीला दुःखं दिले गेले असेल, त्या सर्व दोषांना मनात आठवायचे. शुद्धात्म्या प्रति प्रार्थना (दररोज एक वेळा बोलायची) हे अंतर्यामी परमात्मा! आपण प्रत्येक जीवमात्रांमध्ये विराजमान आहात, तसेच माझ्यामध्ये पण विराजमान आहात, आपले स्वरूप हेच माझे स्वरूप आहे, माझे स्वरूप शुद्धात्मा आहे. हे शुद्धात्मा भगवान ! मी आपल्याला अभेदभावे अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. अज्ञानतेमुळे मी जे जे **दोष केले आहेत, त्या सर्व दोषांना आपल्या समक्ष जाहीर करीत आहे. त्यांचा हदयपूर्वक खूप पश्चाताप करीत आहे आणि आपल्याजवळ क्षमा प्रार्थित आहे. हे प्रभू! मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा आणि पुन्हा असे दोष करू नये अशी आपण मला शक्ती द्या, शक्ती द्या, शक्ती द्या. हे शुद्धात्मा भगवान ! आपण अशी कृपा करा की आमचे भेदभाव मिटून जावेत आणि अभेद स्वरूप प्राप्त व्हावे. आम्ही आपल्यात अभेद स्वरूपाने तन्मायाकार राहू. ___ ** (जे जे दोष झाले असतील ते मनात जाहीर करावे.) Page #193 -------------------------------------------------------------------------- ________________ संपर्क सूत्र दादा भगवान परिवार अडालज : त्रिमंदिर, सीमंधर सिटी, अहमदाबाद-कलोल हाईवे, पोस्ट : अडालज, जि.-गांधीनगर, गुजरात - 382421. फोन : (079) 39830100 राजकोट : त्रिमंदिर, अहमदाबाद-राजकोट हाईवे, तरघड़िया चोकड़ी (सर्कल), पोस्ट : मालियासण, जि.-राजकोट. फोन : 9924343478 भुज : त्रिमंदिर, हिल गार्डनच्या मागे, एयरपोर्ट रोड. फोन : (02832) 290123 अंजार : त्रिमंदिर, अंजार-मुंद्रा रोड, सिनोग्रा पाटीया जवळ, सिनोग्रा गाँव, ता-अंजार. फोन : 9924346622 मोरबी : त्रिमंदिर, पो-जेपुर (मोरबी), नवलखी रोड, ता-मोरबी, जि-राजकोट, फोन : (02822) 297097 सुरेन्द्रनगर : त्रिमंदिर, लोकविद्यालय जवळ, सुरेन्द्रनगर-राजकोट हाईवे, मुळी रोड. फोन : 9879232877 अमरेली : त्रिमंदिर, लीलीया बायपास चोकडी, खारावाडी. फोन : 9924344460 गोधरा : त्रिमंदिर, भामैया गाँव, एफसीआई गोडाउन समोर, गोधरा, (जि.-पंचमहाल). फोन : (02672) 262300 वडोदरा : त्रिमंदिर, बाबरिया कोलेज जवळ, वडोदरा-सुरत हाई-वे NH-8, वरणामा गाँव. फोन : 9574001557 अहमदाबाद : दादा दर्शन, 5, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे, उस्मानपुरा, अहमदाबाद-380014. फोन : (079) 27540408 वडोदरा : दादा मंदिर, 17, मामानी पोळ-मुहल्ला, रावपुरा पुलिस स्टेशन समोर, सलाटवाड़ा, वडोदरा. फोन : 9924343335 मुंबई : 9323528901 दिल्ली : 9810098564 कोलकता : 9830093230 चेन्नई : 9380159957 जयपुर : 9351408285 भोपाल : 9425024405 इन्दौर : 9039936173 जबलपुर : 9425160428 रायपुर : 9329644433 भिलाई : 9827481336 पटना : 7352723132 अमरावती : 9422915064 बेंगलूर : 9590979099 हैदराबाद : 9989877786 पणे : 9422660497 जालंधर : 9814063043 U.S.A. : (D.B.V.I.) +1877-505-DADA (3232) U.K. : +44 330-111-DADA (3232) UAE : +971557316937 Kenya : +254722722063 Singapore : +6581129229 Australia: +61 421127947 New Zealand: +64 210376434 Website : www.dadabhagwan.org Page #194 -------------------------------------------------------------------------- ________________ क्लेशरहित घर, मंदिर समान जिथे क्लेश नाही तिथे निश्चितच देवाचा वास आहे, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. क्लेश तर बुद्धी आणि समजदारीने सुद्धा मिटवता येतो. दुसरे काही येत नसेल तर त्याला समजवा की, 'क्लेश असेल तर आपल्या घरातून देव निघून जातील. म्हणून तू ठरव की मला क्लेश करायचाच नाही. आणि असे ठरवल्यानंतरही जर क्लेश झाला तर समजून जावे की है। आपल्या सने बाहेरचे घडले आहे. मग त्यासाठी पश्चाताप करा. एकच जीवन क्लेशरहित जगलात तरी तुम्ही मोक्षाला जाण्याच्या हद्दीत आलात. -दादाश्री INNAPHABAnd Preeta 97masan Printed in India dadabhagwan.org Price Rs40