________________
फॅमिली ओर्गेनायझेशन
घरात भांडणे का होतात? मुलांशी वादविवाद का होतो? हे सगळे जाणून घायला नको का? मुलगा उलट उत्तर देत असेल? आणि यावर उपचार म्हणून डॉक्टरला विचारले तर डॉक्टर तरी काय सांगणार? अरे, घरी डॉक्टरचीच बायको डॉक्टरचे ऐकत नाही ना!
हे तर आयुष्यभर कापसाचे सर्वेक्षण करतो, तर कोणी लवंगाचे सर्वेक्षण करतो, असे काही ना काही सर्वेक्षण चालूच असते; परंतु आतील सर्वेक्षण मात्र कोणी कधी करत नाही!
शेठ घरात तुमचा सुगंध दरवळतो का? प्रश्नकर्ता : सुगंध दरवळतो म्हणजे काय?
दादाश्री : तुमच्या घरात तुम्ही सर्वांना खुश ठेऊ शकता का? घरात भांडण-तंटे होत नाहीत ना?
प्रश्नकर्ता : भांडण तर होतच असते, रोजच होते.
दादाश्री : अरे, असे कसे तुम्ही शेठजी? बायकोला सुख दिले नाही, मुलांना सुख दिले नाही, अरे स्वत:ला देखील सुखी ठेऊ शकला नाही! तुम्हाला मोक्षाला जायचे असेल तर मला तुमच्यावर रागवावेच लागेल. आणि तुम्हाला देवगतीत जायचे असेल तर दुसरा सरळ रस्ता पण मी तुम्हाला दाखवीन. मग मी तुम्हाला 'या शेठजी या, या' असे म्हणेल. मला दोन्ही भाषा बोलता येतात. ही अशी भ्रांतीची भाषा मी काही विसरलेलो नाही. पूर्वी 'तुन्डे तुन्डे मतिर्भिन्ना' होती म्हणजे, कुटुंबाकुटुंबात मतभेद असत; पण आज तर घरातल्या घरात एकमेकांशी कलह असतात! कुटुंबे गेली आणि व्यक्ती उरल्या! संसाराच्या हिताहीतचे कोणाला भानच नाही.
असे संस्कार घडविणे शोभते का? आई-वडील म्हणून कसे वागावे याचेही भान नाही. एक भाऊ