________________
१०२
क्लेश रहित जीवन
संसार चांगला चालेल असा कोणी सहकारी मिळेल म्हणून लोक लग्न करतात ना?
संसार तसा आकर्षक वाटतो पण संसारात पडल्यावर अशी कुचंबणा होते की त्यातून बाहेर पडता येत नाही. संसार म्हणजे लाकडाचा लाडू, जो खातो तोही पस्तावतो आणि जो खात नाही तोही पस्तावतो.'
लग्न करून पश्चाताप होतो, पण पश्चातापातून ज्ञान मिळते. अनुभवातूनच ज्ञान मिळायला हवे ना? नुसते पुस्तक वाचल्याने अनुभवज्ञान थोडेच मिळते? पुस्तक वाचल्याने काय वैराग्य येते? वैराग्य तर पश्चाताप झाल्यानतंरच येतो.
अशा पद्धतीने लग्न ठरते एका मुलीला लग्न करायचेच नव्हते. तिच्या घरचे लोक तिला माझ्याकडे घेऊन आले. मी तिला समजावून सांगितले की लग्न करण्यावाचून पर्याय नाही आणि लग्न केल्यानंतर पश्चाताप केल्याशिवाय पण पर्याय नाही. म्हणून तुझे रडगाणे थांबव आता आणि मी सांगतो त्याप्रमाणे लग्न कर. जसा मिळेल तसा, पण नवरा पण नवरा तर हवा. मग लोक तुझ्याकडे बघून बोट दाखवू शकणार नाही ना! आणि कशाच्या आधारावर नवरा मिळतो (संबंध जुळते) हे पण मी तिला समजावून सांगितले. तिला ते समजले, आणि माझ्या सांगण्याप्रमाणे मग तिने लग्न केले. तिला मुलगा जरा दिसायला देखणा नाही वाटला पण तरीही तिने सांगितले की, 'मला दादाजींनी सांगितले आहे म्हणून मी लग्न करणार.' त्या मुलीला लग्नापूर्वीच 'ज्ञान' दिले आणि नंतर तिने माझा एकही शब्द ओलांडला नाही, आणि आता ती एकदम सुखी आहे.
मुले मुलगी पसंत करताना खूप नखरे करतात. खूप उंच आहे, खूप ठेंगणी आहे, खूप जाडी आहे, खूप बारीक आहे, थोडी काळी आहे, अरे चक्रम, ही काय म्हैस आहे ? मुलांना जर समजवा की लग्न करण्याची