________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
१०३
काय पद्धत असते? तू जाऊन मुलीला पाहून ये आणि तिला पाहून तुला आकर्षण वाटले तर तुझे लग्न निश्चित आहे असे समज आणि आकर्षण नाही वाटले तर मग गोष्ट तिथेच थांबवावी.
जग सूड घेतेच एक मुलगा मुलगी पाहताना 'तू अशी फिर, तू तशी फिर' असे त्या मुलीला सांगत होता! मी त्याला खूप खाणकावले. मी म्हणालो, 'तुझी आई सुद्धा कधीतरी सून झाली होती. कसा माणूस आहेस तू?' स्त्रियांचा एवढा घोर अपमान ! सध्या मुलींची संख्या वाढली आहे म्हणून स्त्रियांचा एवढा अपमान होत आहे. पूर्वी तर या बावळटांचा अपमान होत असे, त्याचाच हा आता बदला घेतला जात आहे. यापूर्वी चारशे, पाचशे मूर्ख राजे रांगेत उभे राहत आणि एक राजकुमारी वरमाला घेऊन निघत असे आणि हे बावळट (आपल्याला वरमाला घालावी म्हणून) मान वाकवून उभे राहत असत राजकुमारी सरळ पुढे निघून गेली की आपमानाने आतल्या आत जळत असे. किती घोर अपमान! जळो, हे लग्न करण्याचे!! त्यापेक्षा तर लग्न नाही केलेलेच उत्तम!!
आणि आजकाल तर या मुली सुद्धा मुलांना सांगू लागल्या आहेत की, 'जरा असे गोल फिरून दाखवा बरं? मला नीट बघू द्या तुम्ही कसे दिसता?' बघा आता, तुम्हीच असे बघण्याची सिस्टम काढली त्यामुळे तुमची ही अवस्था झाली ना? यापेक्षा सिस्टम काढली नसती तर त्यात काय वाईट? आपणच हे लफडे काढले म्हणून आपल्यालाच ते भोवले. ___ या काळातच, मागील पाचएक हजार वर्षांपासूनच पुरुष कन्या आणायला जातात. त्यापूर्वी तर वडील स्वयंवर रचत असत.त्यात शंभर बावळट आलेले असत! मुलगी त्यातल्या एका बावळटला पास करत असे! असे पास होऊन लग्न करण्यापेक्षा लग्न न करणेच चांगले. हे सर्व मूर्ख एका रांगेत उभे राहत, त्यांच्या समोरून ती कन्या वरमाला घेऊन चालत असे. सगळ्यांच्या मनात खूप आशा असायच्या की आता