________________
६६
क्लेश रहित जीवन
'न्याय स्वरूप, ' तिथे उपाय तप
प्रश्नकर्ता : संघर्ष टाळायचा, समताभावे निकाल करायचा, अशी आपली वृत्ती (इच्छा) असेल, तरी सुद्धा समोरचा मनुष्य आपल्याला हैराण करत असेल, अपमान करत असेल मग अशावेळी आपण काय करावे ?
दादाश्री : काहीच नाही. हा आपला हिशोब आहे म्हणून त्याचा समभावे निकाल करायचा आहे असा तुम्ही निश्चय करा. तुम्हाला तुमच्या नियमातच राहायचे आणि तुमच्या परिने प्रश्न सोडवत राहायचे.
प्रश्नकर्ता : समोरच्या व्यक्तीने माझा अपमान केला आणि मला अपमान वाटला, याचे कारण माझा अहंकार आहे ?
दादाश्री : खरे तर, समोरचा अपमान करतो तेव्हा तो तुमचा अहंकार विरघळवत असतो. आणि तो सुद्धा ड्रामेटिक अहंकार. जितका एक्सेस अहंकार असतो तोच विरघळतो, त्यात काय बिघडेल ? ही कर्म आपल्याला सुटू देत नाहीत. आपण तर लहान मुल समोर असले तरी म्हटले पाहिजे 'ये बाबा, आता सुटका कर. '
तुमच्यावर कोणी अन्याय केला आणि तुम्हाला असे वाटले की माझ्यावर हा अन्याय का केला तर तुमचे कर्म बांधले जाईल. कारण तुमच्या चुकीमुळे समोरच्याला तुमच्यावर अन्याय करावा लागत आहे. आता बुद्धीला हे कसे काय समजणार ? त्यामुळे सगळे लोक भांडणत बसतात. भगवंताच्या भाषेत कोणी न्याय पण करत नाही आणि अन्याय पण करत नाही, योग्य तेच करतात. आता या लोकांची बुद्धी इथपर्यंत कशी पोहोचेल? घरातील मतभेद कमी होतील, भानगडी कमी होतील, आजूबाजूच्या लोकांना आपल्याविषयी प्रेम वाटेल तर आपण समजू की ज्ञान समजले म्हणून. नाही तर ज्ञान समजलेले नाही.
ज्ञान सांगते की, तू न्याय शोधत राहिलास तर तू मूर्ख आहेस ! म्हणून त्याच्यावर उपाय आहे तप !