________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
पद्धतशीरपणे पाहून द्यायचे. कोणतीही वस्तू आपल्या खात्याच्या बाहेरची नसते.
हिशोब चुकता झाला की नवीन कॉजेस पडलीत? प्रश्नकर्ता : नवीन दणेघणे होऊ नये हे कसे होऊ शकेल?
दादाश्री : नवीन देणेघेणे कशास म्हणतात? तर कॉजेस-कारणे, यांना नवीन देणेघेणे म्हणतात. घडत आहे तो सर्व परिणाम आहे आणि कारणे अदृश्य आहेत (ती दिसत नाहीत) इंद्रियांद्वारे कॉजेस दिसत नाहीत, पण दिसतात ते सर्व परिणामच आहेत. म्हणून तुम्ही हे समजले पाहिजे की हिशोब पूर्ण झाला. नवीन जे होत असते ते आत होत असते, ते आत्ता दिसणार नाही, ते तर जेव्हा परिणाम येईल तेव्हा दिसेल. आत्ता कच्च्या हिशोबात लिहिले जात आहे नंतर ते पक्क्या हिशोबात नोंदविले
जाईल.
प्रश्नकर्ता : मागील पक्क्या हिशोबात नोंद झालेले ते आता उदयात येते का?
दादाश्री : हो.
प्रश्नकर्ता : हा जो संघर्ष होतो तो 'व्यवस्थित शक्तीच्या' आधारामुळेच होतो ना?
दादाश्री : हो. हा संघर्ष होतो तो 'व्यवस्थित शक्तीच्या' आधारामुळेच होत असतो, पण असे केव्हा म्हणायचे? तर संघर्ष झाल्यानंतर. आपल्याला संघर्षात पडायचे नाही असा आपला निश्चय असतो. समोर खांब दिसला तेव्हा आपण समजतो की रस्त्यात खांब येणार आहे, वळन जावे लागेल. घडक टाळायची आहे. आणि तरी देखील घडकलो, तेव्हा आपण म्हणू शकतो की 'व्यवस्थित' आहे. आधीच आपण 'व्यवस्थित' आहे असे मानून चाललो तर तो 'व्यवस्थित शक्तीचा' दुरुपयोग म्हटला जाईल.