________________
६४
क्लेश रहित जीवन
कुठला आणि कोणत्या खात्याच्या माल आहे ? म्हणून आपल्याला असे वाटते की या व्यक्तीने नवीन माल द्यायला सुरुवात केली. नवीन कोणी देतच नाही, आपण पूर्वी दिलेलाच परत येतो. आपल्या या ज्ञानात सहन करण्याचे नसतेच. ज्ञानाने खुलासा करून घ्यावा की समोरचा 'शुद्धात्मा' आहे. हे जे काही दुःख आले आहे ते माझ्याच पूर्वकर्माच्या उदयामुळे आले आहे. समोरची व्यक्ती तर मात्र निमित्त आहे. मग हे ज्ञान आपसूकच आपल्याला कोडे सोडवून देते.
प्रश्नकर्ता : याचा अर्थ असाच झाला ना की आपण आतल्या आत मनाचे समाधान करुन घ्यायचे की आपण पूर्वी पाठवलेलाच माल पुन्हा परत आला आहे असेच ना?
दादाश्री : तो स्वतः शुद्धात्मा आहे आणि ती त्याची प्रकृती आहे. प्रकृती फळ देत आहे. आपण शुद्धात्मा आहोत, तो पण शुद्धात्मा आहे. आता या दोघांची वायर कुठे जोडली जाते? तुमची प्रकृती, आणि त्याची प्रकृती, दोन्ही समोरासमोर सर्व हिशोब चुकवतात. यात तुमच्या प्रकृतीच्या कर्माचा उदय आहे म्हणून तो तुम्हाला काहीतरी देत आहे. म्हणून तुम्ही असे म्हणा की हा आपल्याच कर्माचा उदय आहे आणि यात समोरचा निमित्त आहे, तो परत करून गेला म्हणून आपला हिशोब मिटला. जिथे हे सोल्युशन असेल तर मग तिथे मग सहन करण्याचे राहतच नाही ना?
सहन केल्याने काय होईल? असे स्पष्टीकरण केले नाही तर एके दिवस ती स्प्रिंग जोरात उसळेल. स्प्रिंग उडताना पाहिली आहे का? माझी स्प्रिंग खूप उडत होती. मी खूप दिवस सहन करायचो आणि ज्या दिवशी ती स्प्रिंग उसळली की सगळे तोडफोड करून टाकायचो. हे सर्व अज्ञानदशेत होत असे, याची मला जाणीव आहे. ते माझ्या लक्षात आहे. म्हणूनच मी सांगतो ना की सहन करण्याचे शिकू नका. सहन करायचे तर अज्ञान दशेत असते. आपल्या इथे तर विश्लेषण करुन द्यायचे की याचा परिणाम काय, याचे कारण काय हे आपल्या हिशोब खात्यात