________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
कोणी तुमच्यावर अन्याय केला असेल तर भगवंताच्या भाषेत ते करेक्ट आहे आणि संसारी भाषेत त्यास चुकीचे केले असे म्हणतील..
हे जग पूर्णपणे न्यायस्वरूप आहे. ही काही नुसती थाप नाही. एक मच्छर देखील तुम्हाला विनाकारण स्पर्श करू शकेल असे होत नाही. मच्छर चावला म्हणजे यामागे काही कारण आहे. नाही तर एक स्पंदन सुद्धा तुम्हाला विनाकारण स्पर्श करू शकत नाही. तुम्ही पूर्ण स्वतंत्र आहात. तुमच्या आड कोणीही येऊ शकत नाही.
प्रश्नकर्ता : संघर्षात मौन ठेवणे हितकारी आहे की नाही? दादाश्री : मौन तर खरोखर खूप हितकारी आहे.
प्रश्नकर्ता : पण दादाजी बाहेर मौन असेल पण आत तर आकाशतांडव चालत असेल त्याचे काय?
दादाश्री : असे मौन काहीच कामाचे नाही. मौन तर सर्वात प्रथम मनाचे असले पाहिजे.
सर्वात उत्तम एडजस्ट एव्हरीवेर प्रश्नकर्ता : जीवनात स्वभाव जुळत नाहीत म्हणूनच संघर्ष होतात ना?
दादाश्री : संघर्ष होणे, याचेच नाव संसार आहे! प्रश्नकर्ता : संघर्ष होण्याचे कारण काय? दादाश्री : अज्ञानता.
प्रश्नकर्ता : फक्त शेठजींबरोबरच संघर्ष होतो असे नाही, तर सगळ्यांशीच होत असतो, त्याचे काय?
दादाश्री : हो, सगळ्यांशीच होतो. अरे, या भिंतीबरोबरही होतो. प्रश्नकर्ता : त्यावर उपाय काय?