________________
क्लेश रहित जीवन
कुठलीच घड्याळाची कंपनी, रेडियोची कंपनी पैसे घेऊन गेलेली नाही. आम्ही अशा गोष्टी खरेदीच केल्या नाही. या सगळ्या गोष्टींचा उपयोगच काय? निरर्थक गोष्टी आहेत. ज्या घड्याळाने मला त्रास दिला, ज्याला बघताच धास्ती वाटते, त्या घड्याळाचा काय उपयोग? काही मुलांना वडील दिसताचक्षणी अस्वस्थ व्हायला होते. तो अभ्यास करीत नसेल, पुस्तक एका बाजूला ठेवून खेळत असेल आणि अचानक त्याला वडील दिसले तर त्याला वडिलांची भीती वाटते, चीड यायला लागते. तसेच घड्याळाकडे बघून घाबरायला होत असेल तर नको ते घड्याळ. आणि हे रेडियो, टीव्ही वगैरे हे सर्व तर प्रत्यक्ष वेडेपणा आहे, प्रत्यक्ष 'मॅडनेस' आहे.
प्रश्नकर्ता : रेडियो तर घरोघरी आहेत.
दादाश्री : ती वेगळी गोष्ट आहे. जिथे ज्ञानच नाही मग तिथे काय होणार? यालाच मोह म्हणतात ना? मोह म्हणजे काय? गरज नसलेल्या वस्तू आणणे आणि गरज असलेल्या वस्तूंमध्ये चालढकल करणे म्हणजे
मोह.
हे कसे आहे ते सांगतो. कोणी साखरेच्या पाकात कांदा बुडवून दिला तर तो घेऊन येतो. अरे, तुला कांदा खायचा आहे की पाक खायचा आहे, हे आधी ठरव. कांदा म्हणजे फक्त कांदाच खायला पाहिजे. नाही तर कांदा खाण्याचा फायदाच काय? हाच सगळा मूर्खपणा आहे ? स्वतःचा निर्णय नाही, समज नाही आणि कसले भानही नाही! एखाद्याला साखरेच्या पाकात कांदा बुडवून खाताना पाहिले असेल म्हणून स्वतःही खातो! कांदा अशी वस्तू आहे की त्यास साखरेच्या पाकात टाकले म्हणजे तो वाया जातो. म्हणजेच लोक बिलकुल अडाणी आहेत. कोणत्याच गोष्टीचे भानच नाही. निव्वळ बेभानपणा आहे. स्वतःविषयी मनात बाळगतो की, 'मी विशेष आहे' आणि आपण त्याला तू विशेष नाहीस असे कसे म्हणू शकतो? हे आदिवासी लोक सुद्धा स्वत:ला 'विशेष' समजतात . कारण त्याला असे वाटते की, मी तर या दोन गायी आणि या दोन बैलांचा उपरी (मालक) आहे! आणि नाही तरी तो या चार