________________
जीवन जगण्याची कला
जणांचा मालकच म्हटला जातो ना ? मनात येईल तेव्हा तो त्यांना मारू शकतो, तो अधिकार आहे त्याला. आणि जरी कोणाचा मालक नसला तरी शेवटी बायकोचा मालक तर असतोच. जिथे विवेकबुद्धी नाही, चांगले-वाईट, योग्य-अयोग्य याचा सारासारचे विचार करण्याची शक्तीच नाही, त्याला आपण काय सांगणार ? मोक्षाची गोष्ट तर जाऊ द्या, पण संसारिक हिताहीतचे सुद्धा भान नाही.
११
संसारात काय सांगितले आहे की, रेशमी चादर फुकट मिळत असेल तरी ती आणून अंथरू नका आणि कॉटनची चादर विकत जरी मिळत असेल तरी ती आणा. आता तुम्ही विचारले यात काय फायदा ? तर म्हणे, अशी फुकट आणण्याची सवय लागली असेल आणि मग जेव्हा फुकट मिळत नाही तेव्हा खूप त्रास होतो. म्हणून अशीच सवय ठेवा की नेहमी मिळू शकेल. म्हणून कॉटनची चादरच विकत आणा. नाही तर एकदाची जर फुकट आणण्याची सवय पडली तर हाल होतील. हे संपूर्ण जगच असे झाले आहे की, उपयोग नावापुरता सुद्धा नाही. मोठमोठ्या आचार्य महाराजांना सांगितले की, 'साहेब तुम्ही आज या चार गाद्यांवर झोपा.' तर त्यांना महाउपाधी वाटेल, रात्रभर झोपच लागणार नाही ! कारण त्यांना चटईवर झोपायची सवय झाली आहे ना! त्यांना चटईवर झोपायची सवय झालेली आहे तर काहींना चार-चार गाद्यांशिवाय झोप लागत नाही. देवाला तर दोन्ही गोष्टी मान्य नाहीत. साधू लोकांचे तप आणि गृहस्थाचे विलासी जीवन या दोन्ही गोष्टी देवाला मंजूर नाहीत. देव तर म्हणतो की जर तुमचे उपयोगपूर्वक (ज्ञान जागृतीपूर्वक) असेल तर ते खरे. उपयोगपूर्वक नसेल आणि अशीच सवय लावून घेतली असेल तर निरर्थक म्हटले जाईल.
या सर्व गोष्टी समजून घ्याव्यात की या वाटेने गेलो तर असे होईल आणि त्या वाटेने गेलो तर तसे होईल. नंतर (आपण ) ठरवायचे की आपल्याला कोणत्या वाटेने जायचे आहे. समजत नसेल तर दादांना विचारायचे, मग 'दादा' तुम्हाला सांगतिल की हे तीन रस्ते धोकादायक