________________
क्लेश रहित जीवन
आहेत आणि हा चौथा रस्ता सुरक्षित आहे. म्हणून आमचा आशीर्वाद घेऊन त्या रस्त्याने जा.
आणि अशा व्यवस्थेमुळे सुख लाभते एक व्यक्ती मला म्हणाली की, मला काही समजतच नाही. मला काहीतरी आशीर्वाद द्या. तेव्हा त्याच्या डोक्यावर हात ठेवून मी म्हणालो, 'जा, आजपासून तू सुखाचे दुकान उघड.' आणि आज तुझ्याजवळ जे दुकान आहे ते रिकामे कर.' सुखाचे दुकान म्हणजे काय? सकाळी उठल्यापासून दुसऱ्यांना सुख द्यायचे. दुसरा कुठलाच व्यापार करायचा नाही. त्या माणसाला माझी गोष्ट एकदम नीट समजली. त्याने तर त्याप्रमाणे वागायला सुरुवात केली. म्हणून त्याला खूप आनंद झाला. जेव्हा तुम्ही सुखाचे दुकान उघडाल तेव्हा तुमच्याही वाट्याला सुख येईल आणि इतरांच्याही वाट्याला सुखच येईल. जर तुमचे मिठाईचे दुकान असेल तर जिलबी विकत घेण्यासाठी दुसऱ्यांच्या दुकानात जाण्याची गरज पडेल का? जेव्हा खावीशी वाटली तेव्हा खाऊ शकाल. दुकानच मिठाईचे असेल मग काय? म्हणून तू सुखाचेच दुकान उघड. म्हणजे मग कसली उपाधीच नाही. ___तुम्हाला जे दुकान उघडायचे असेल ते उघडू शकता. जर दररोजसाठी उघडू शकत नसाल तर आठवड्यातून एक दिवस रविवारच्या दिवशी तरी उघडा! आज रविवार आहे, 'दादांनी' सांगितले आहे की सुखाचे दुकान उघड म्हणून.' तुम्हाला सुख घेणारे गिहाईक भेटतीलच. 'व्यवस्थितशक्ती' चा नियमच असा आहे की गिहाईक गोळा करूनच देईल. तू जसे नक्की केले असेल त्यानुसार गिहाईक पाठवून देते. ___ज्याला जे आवडत असेल त्याने त्याचे दुकान टाकावे. कित्येक तर लोकांना डिवचत राहतात. त्यातून त्यांना काय मिळते? एखाद्याला मिठाईची आवड असेल तर तो कसले दुकान टाकेल? मिठाईचेच ना. लोकांना कशाची आवड आहे ? तर सुखाची. म्हणून सुखाचेच दुकान