________________
जीवन जगण्याची कला
टाक, ज्यामुळे लोकांनाही सुख मिळेल आणि घरच्या लोकांना पण सुख मिळू शकेल. खा, प्या आणि मजा करा. येणाऱ्या (भविष्यातील) दुःखांचे फोटो पाडू नका. फक्त नावच ऐकले असेल की मगनभाई येणार आहेत. अजून तर आलेही नाहीत, फक्त पत्रच आले आहे तेव्हापासूनच त्याचे फोटो पाडण्याची (कल्पना करण्याची) सुरुवात होऊन जाते.
हे ' दादा' तर — ज्ञानी पुरुष ' त्यांचे दुकान कसे चालत असेल? संपूर्ण दिवस! या 'दादांचे' तर सुखाचे दुकान. मग त्यात कोणी दगड फेकला असेल तरीही त्याला गुलाबजाम खाऊ घालतील. समोरच्याला थोडेच माहीत आहे की, हे सुखाचे दुकान आहे म्हणून इथे दगड मारू नये? त्यामुळे त्याच्या मनात येईल तिथे तो दगड मारतो.
'आपल्याला कुणालाही दुःख द्यायचे नाही' असे निश्चित केले तरी दुःख देणारा तर दुःख देऊनच जाईल ना? तेव्हा तू काय करशील? बघ, मी तुला एक युक्ती सांगतो. आठवड्यातून एक दिवस तू 'पोस्ट ऑफिस' बंद ठेवायचे. त्या दिवशी कोणाचीही मनीऑर्डर स्वीकारायची नाही आणि कुणाला मनीऑर्डर करायची पण नाही. जर कोणाची मनीऑर्डर आली तर बाजूला ठेवायची आणि सांगायचे की, आज पोस्ट ऑफिस बंद आहे, उद्या बोलूया. आमचे पोस्ट ऑफिस तर कायम बंदच असते.
या दिवाळीच्या दिवशी लोक का चांगले वागतात? कारण त्यांची बिलिफ (मान्यता) बदलते म्हणून. ते नक्की करतात की आज दिवाळी आहे आणि आजचा दिवस आनंदात घालवायचा आहे असे निश्चत करतात म्हणून त्यांची बिलिफ बदलते त्यामुळे ते आनंदात राहतात. 'आपण' मालक आहोत म्हणून आपण ठरवू शकतो. समजा तू निश्चित केले की आज मला सगळ्यांशी चांगलेच वागायचे आहे तर तू निश्चितच चांगले वागू शकशील. आठवड्यातून एक दिवस आपण नियमात राहायचे. एक दिवस पोस्ट ऑफिस बंद ठेवायचे. मग खुशाल लोक ओरडू देत की आज पोस्ट ऑफिस बंद का?