________________
१४
क्लेश रहित जीवन
वैरभाव मिटेल आणि आनंदही वाटेल
या जगातील कोणत्याही जीवाला किंचितमात्रही दुःख न देण्याची भावना असेल, तर तीच खरी कमाई. दररोज सकाळी अशी भावना करावी. कोणी शिवी दिली, तुम्हाला ते आवडत नसेल तरी पण ती जमा करा, तपास करण्यास जाऊ नका की मी कधी बरे शिवी दिली होती ? आपण लगेच ती जमा करावी म्हणजे हिशोब पूर्ण होईल. लोक तर काय करतात की समोरच्याने एक शिवी दिली तर त्याला चार शिव्या ऐकवतात ! देवाने काय म्हटले आहे की, जे तुला आवडते ते दुसऱ्यास दे आणि जे आवडत नाही ते दुसऱ्यासही देऊ नकोस. एखादा मनुष्य म्हणाला की 'तुम्ही खूप चांगले आहात' तेव्हा आपण सुद्धा म्हणायचे की, भाऊ साहेब, तुम्ही पण खूप चांगले आहात.' अशा चांगल्या गोष्टी उधार दिल्या तर चालतील.
4
हा संसार हिशोब चुकते करण्याचा कारखाना आहे. वैरभावनेचा बदला तर कधी सासूच्या रुपात, सुनेच्या रुपात, मुलाच्या रुपात, शेवटी बैलाच्या रुपात का होईना पण चुकवावाच लागेल. जसे बाराशे रुपये देऊन बैल विकत घेतला आणि दुसऱ्याच दिवशी तो बैल मेला ! जग हे असे आहे!! अनंत जन्म वैरभावनेतच गेले! हे जग वैरभावानेच टिकून राहिले आहे! हे हिंदू लोक घरातल्या लोकांशी वैर बांधतात आणि या मुस्लिमांच्या बाबतीत पाहिले तर ते कधी घरातल्या लोकांशी वैर बांधत नाहीत. बाहेरच्या लोकांशी भांडण करून येतील. ते तर ओळखतात की ज्यांच्यासोबत रात्रंदिवस याच खोलीत एकत्र राहायचे आहे मग त्यांच्यासोबत भांडण करून कसे चालेल ? खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची कला काय आहे की, ‘संसारात कुणाशीही वैर न बांधता सुटून जाणे.' हे साधू संन्याशी सुद्धा संसारातून पळूनच जातात ना ? पळून जाण्यात अर्थ नाही. ही जीवनाची लढाई आहे. जन्मापासूनच लढाई चालू ! तिथे लोक मौजमजेच्या मागेच लागले आहेत.