________________
वास्तवात दुःख आहे?
प्रश्नकर्ता : सगळ्यांनाच आपापले दु:ख मोठे वाटते ना?
दादाश्री : ते तर स्वत:च निर्माण केलेले दुःख आहे, त्यामुळे तुम्ही त्यास जेवढे मोठे कराल तेवढे ते मोठे होईल. चाळीस पट केलेत तर चाळीस पट होईल!
...अवश्य करण्यायोग्य 'प्रोजेक्ट' आयुष्य कसे जगावे हेच या लोकांना कळत नाही, 'जगावे कसे' याची चावीच ते हरवून बसले आहेत. चावी पूर्णपणे हरवली होती; पण आता इंग्रज आल्यामुळे परत थोडे चांगले घडू लागले आहे. इंग्रज आल्यामुळे यांचे कट्टर संस्कार थोडे शिथिल होऊ लागले आहेत, म्हणून ते आता दुसऱ्यांच्या व्यवहारात ढवळाढवळ करत नाहीत, आणि आता तर ते कष्ट करू लागले आहेत, पूर्वी फक्त ढवळाढवळच करत असत.
हे लोक उगीचच मार खात राहतात. या जगात तुमचा कोणीही मालक नाही. तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहात. तुमचा प्रोजेक्ट सुद्धा स्वतंत्र आहे, पण तुमचा प्रोजेक्ट असा असायला हवा की कोणत्याही जीवाला तुमच्याकडून किंचितमात्र पण दु:ख होणार नाही. तुमचे प्रोजेक्ट प्रचंड मोठे करा. संपूर्ण जग सामावू शकेल एवढे करा.
प्रश्नकर्ता : असे शक्य आहे का?
दादाश्री : माझा (प्रोजेक्ट) खूप मोठा आहे. कुठल्याही जीवाला दुःख होऊ नये असे मी वागतो.
प्रश्नकर्ता : पण दुसऱ्यांना हे करणे शक्य नाही ना?
दादाश्री : जरी शक्य नसले, पण याचा अर्थ असा नाही की सगळ्या जीवांना दुःख देऊनच आपला प्रोजेक्ट (ध्येय) पूर्ण करावा.
कुणालाही कमीत कमी दुःख होईल असा काही तरी नियम