________________
फॅमिली ओर्गेनायझेशन
नाती खरी की ओढवून घेतलेली पीडा?
मुलगा आजारी असेल तर उपचार वगैरे अवश्य करा; पण सर्व वरवर. आपल्या मुलांना कसे समजावे? तर सावत्र समजावे. मुलांना आपली मुलं म्हणता आणि मुलगा सुद्धा माझी आई आहे असे म्हणेल, पण आतून फार मोठा संबंध नाही. म्हणून या काळात सगळी नाती सावत्र आहेत असेच समजा, नाही तर मेलात म्हणून समजा. मुले कुणाला मोक्षाला नेणार नाहीत. जर तुम्ही समंजस झालात तर मुलेही समंजस होतील. मुलांचे अति लाड करणे चांगले आहे का? हे लाड-कौतुक तर गोळीबार करतात. या लाड-कौतुकाचे रुपांतर द्वेषामध्ये होते. नाईलाजास्तव करावे लागेल असे प्रेम करावे. त्यांच्यासमोर 'तू प्रिय आहेस' असे म्हणावे पण आतून ही जाणीव कायम ठेवावी की ही वरवरची गोष्ट आहे, बळजबरीने करावी लागलेली आहे. ही नाती खरी नाहीत. मुलांबराबरचे खरे नाते केव्हा कळते की जेव्हा तुम्ही त्याला तासभर मारले, शिव्या दिल्या, तेव्हा त्याचे तुमच्यावर किती प्रेम आहे ते कळेल. तो तुमचा खरा मुलगा असेल तर मार खाऊन देखील तो तुमचे पाय धरेल आणि म्हणेल, 'बाबा, मला मारून तुमचे हात खूप दुखले असतील!' असा म्हणणारा मुलगा असेल तर मात्र खरे नाते ठेवा. पण हे तर तासभर मुलांना रागावले तर उलट वडिलांनाच मारायला धावतील! मोहामुळे ही आसक्ती होत
आहे. 'रियल' मुलगा कोणास म्हटले जाईल की जो बाप मेल्यानंतर मुलगाही स्मशानात जाऊन म्हणेल, की 'आता मला जगण्याची इच्छाच उरली नाही. मला ही मरायचे आहे.' तुमच्या मुंबईत बाप मेल्यानंतर एखादा मुलगा जातो का बापासोबत?
ही सगळी स्वत:हून ओढवून घेतलेली पीडा आहे. मुलगा असे म्हणतच नाही की सगळे माझ्यासाठी खर्च करा. पण बापच सगळे मुलावर उधळतो. ही बापाचीच चूक आहे. तुम्हाला वडिलांची सगळी कर्तव्य पार पाडायची आहेत. योग्य ती सगळीच कर्तव्य पार पाडायची