________________
४४
क्लेश रहित जीवन
नाही. वडिलांनी मुलास काही सांगितले तर मुलगा म्हणतो की, 'मला तुमच्या सल्याची' गरज नाही. मग सल्ला देणारा कसा आणि घेणारा कसा? कशाकशा प्रकारचे लोक एकत्र आले आहेत?! हे लोक तुमचे म्हणणे का ऐकत नाहीत? कारण तुमचे म्हणणे खरे नाही म्हणून. खरे असेल तर ऐकतीलच ना? लोक असे का सांगतात? आसक्तीमुळे असे सांगतात. या आसक्तीमुळे तर लोक स्वतःचे पुढील जन्म बिघडवून घेतात.
आता, या जन्मात तर सांभाळून घ्यावे 'व्यवस्थित शक्ती' सगळे चालवित असते, त्यामुळे बोलण्यासारखे काहीच नाही. 'स्वत:चा धर्म' करून घेण्यासारखा आहे. या पूर्वी तर असेच समजत होते की, 'आपणच चालवित आहोत' म्हणून आपल्यालाच (भांडण) मिटवावे लागेल. आता तर आपल्याला चालवायचे नाही ना? आता तर हा (स्वतः) सुद्धा भोवरा आणि तो सुद्धा भोवरा. मग सोड ना सगळी भानगड! ग्लास फुटो, कढी सांडो किंवा बायको मुलाला रागवत असो, असे होत असल्यावर देखील तुम्ही कुशी बदलून तसेच पडून रहा. तुम्ही पाहिलेत तर बायको म्हणेल की, तुम्हाला दिसत असून गप्प का बसला आहात? आणि नाही तर हातात माळ घेऊन माळ जपत रहा, मग बायकोला वाटेल की ते तर मंत्रजाप करीत आहेत. अरे, सोडा ना. आपले काय देणेघेणे? स्मशानात जायचे नसेल तर मग कटकट करा! अर्थात काहीही बोलण्यासारखे नाही. या गायी, म्हशी सुद्धा त्यांच्या वासरांजवळ त्यांच्या पद्धतीने थोडेसेच भो-भो करतात, जास्त बोलत नाहीत! आणि फक्त हा एक मनुष्यच शेवटपर्यंत बडबड करत राहतो. जे बोलतात ते मूर्ख म्हटले जातात, पूर्ण घराला बरबाद करून टाकतात. याचा अंत कधी येणार? अनंत जन्म संसारात भटकले. नाही स्वत:चे भले केले, नाही दुसऱ्यांचे भले केले. जो माणूस स्वत:चे भले करू शकतो तोच दुसऱ्याचेही भले करू शकतो.