________________
क्लेश रहित जीवन
आहेत. एका बापाने मुलाला इतके कवटाळले की मुलगा बापाला चावला ! कोणीही आत्मा कोणाचा पिता किंवा पुत्र होऊ शकतच नाही. या कलियुगात तर जास्त करून मागणारे घेणेदारच मुलाच्या रुपात आलेली असतात! आपण गिऱ्हाईकाला म्हटले की, मला तुमच्याशिवाय करमत नाही, तुमच्याशिवाय करमत नाही, तर गिऱ्हाईक काय करेल ? तुम्हाला मारेल. ही सगळी रिलेटिव्ह नाती आहेत, यातूनच कषाय ( क्रोध - मानमाया-लोभ) उत्पन्न होतात. या राग कषायातूनच द्वेष कषाय उत्पन्न होतो. जास्त उड्या मारण्याची गरजच नाही. खीर उतू गेली तर चुलीतून लाकूड बाहेर काढावे लागते. तसेच हे आहे.
४६
... मग योग्य व्यवहार कोणता ?
प्रश्नकर्ता : मुलांच्या बाबतीत योग्य काय आणि अयोग्य काय ते समजत नाही.
दादाश्री : जेव्हा आपण स्वतःहून देत सुटतो तोच अतिशहाणपणा आहे. पाच वर्षाचा होईपर्यंत ते ठीक आहे. मग पुढे मुलगा म्हणेल की, 'पप्पा मला फीसाठी पैसे द्या' तेव्हा त्याला सांगा, 'पैसे नळातून येत नाहीत. दोन दिवस अगोदर सांगायला हवे होतेस. मला उधार आणावे लागतील.' असे सांगून दुसऱ्या दिवशी पैसे द्यावे. मुलांना असे वाटू लागते की, नळाला पाणी येते तसे बाबा पैसे देतात. म्हणून मुलांशी असे संबंध ठेवा की नाती तर टिकतील पण मुलगा डोक्यावर बसणार नाही, बिघडणार नाही. सध्या तर मुलांचे इतके जास्त लाड करतात की ती बिघडतात. जास्त लाड करायची काय गरज? या बकरीवर प्रेम वाटते का ? बकरीत आणि मुलात काय फरक आहे ? दोघांतही आत्मा आहे. जास्त लाड पण नाही आणि अगदी निःस्पृह पण होऊ नये. मुलांला सांगावे की काही अडचण असेल तर सांग जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत काही अडचण असेल तर जरूर सांग. अडचण असेल तरच, एरवी नाही. हे तर मुलाच्या खिश्यातून पैसे पडले तर वडील ओरडतात, 'अरे चंदू, अरे चंदू !' तुम्ही