________________
फॅमिली ओर्गेनायझेशन
४७
कशाला ओरडतात? तो विचारेल तेव्हा सांगा. तुम्ही यात कशाला गोंधळ घालता? तुम्ही नसाल तेव्हा कोण पाहणार आहे? सगळे 'व्यवस्थित शक्तीच्या' ताब्यात आहे. विनाकारण ढवळाढवळ करीत राहता. शौचाला जाणे सुद्धा 'व्यवस्थित शक्तीच्या' ताब्यात आहे आणि तुमचे तुमच्यापाशी आहे. स्वत:च्या स्वरुपात स्वतः असेल तिथे पुरुषार्थ आहे, आणि स्वत:ची स्वसत्ता आहे. या पुद्गलमध्ये काही पुरुषार्थच नाही. पुद्गल प्रकृतीच्या ताब्यात आहे.
मुलांचा अहंकार जागृत झाला मग त्यांना बोलण्यात काही अर्थ नाही, आणि तुम्ही कशाला बोलायचे? ठोकर लागल्यावर स्वतःच शिकेल. मुलगा पाच वर्षाचा होईपर्यंत त्याला सांगण्याची सूट आहे. पाच ते सोळा वर्षापर्यंतच्या मुलांना कारणास्तव दोन थोबाडीत द्याव्या पण लागतात. पण एकदा का वीस वर्षाचा तरुण झाला की त्याचे नाव पण घेऊ शकत नाही, त्याला एक अक्षर सुद्धा बोलू शकत नाही. तो मोठा गुन्हा होईल. मग तो बंदुकीची गोळी सुद्धा झाडेल.
प्रश्नकर्ता : हे 'अनसर्टिफाईड' 'फादर' आणि 'मदर' (अपात्र आई-वडील) आहेत म्हणून हे 'कोडे' उभे झाले आहे का?
दादाश्री : हो, नाहीतर मुले अशी होणारच नाहीत. तुम्ही सांगाल तशीच ती वागतील. आई-वडिलांमध्येच काही दम नाही. जमीन खराब आहे, बी खराब आहे म्हणून माल पण खराब आहे! आणि असे असून यांना वाटते की आपला मुलगा महावीरांसारखा होईल. महावीरांसारखा मुलगा कसे बरे होऊ शकेल? महावीरांची आई कशी असेल!! वडील एक वेळ कमी पात्र असतील तरी चालेल पण आई, ती तर कशी अशावी!
प्रश्नकर्ता : मुलांना घडविण्यासाठी, त्यांच्यावर संस्कार घडविण्यासाठी आपण काही विचारच करायचा नाही का?
दादाश्री : विचार करण्यास काही हरकत नाही.