________________
५६
क्लेश रहित जीवन
व्यवहार करायला हवा. मुले प्रेम शोधतात पण ते त्यांना मिळत नाही. म्हणून त्यांच्या अडचणी तेच जाणतात. ते सांगूही शकत नाही आणि सहनही होत नाही. आजच्या तरुणांसाठीचा मार्ग आमच्याजवळ आहे. या जहाजाची दिशा कुठे फिरवावी, याचा मार्ग आम्हाला आतूनच सापडतो. माझ्याजवळ असे प्रेम उत्पन्न झाले आहे की जे वाढतही नाही आणि कमीही होत नाही. जे वाढते, कमी होते त्यास आसक्ती म्हटली जाते. जे कमी-अधिक होत नाही ते परमात्म प्रेम आहे. या प्रेमाने कुठलाही व्यक्ती वश होऊन जातो. मला कोणालाही वश करायचे नाही, तरी देखील प्रेमामुळे प्रत्येकजण आपोआपच वश होतो. आम्ही तर निमित्त आहोत.
आता खऱ्या धर्माचा उदय प्रश्नकर्ता : या नव्या पिढीतून धर्माचा लोप का होत चालला
आहे?
दादाश्री : धर्माचा लोप तर झालेलाच आहे, लोप (नाश) व्हायचे काहीच शिल्लक राहिलेले नाही. आता परत धर्माचा उदय होऊ लागला आहे. जेव्हा एकीकडे लोप होऊ लागतो त्याचवेळी दुसरीकडे उदयाची सुरुवात होत असते. जसे या समुद्राची ओहोटी पूर्ण होते आणि अर्ध्या तासात भरतीला सुरुवात होते. त्याचप्रमाणे हे जग चालत राहते, भरती
ओहोटीच्या नियमाप्रमाणे. धर्माशिवाय तर मनुष्य जगुच शकत नाही. धर्माशिवाय मनुष्याला दुसऱ्या कशाचा आधार आहे ?
ही मुले तर आरशासारखी आहेत. मुलांवरून समजते की 'आपल्यात किती चुका आहेत!' बाप रात्रभर झोपत नाही आणि मुलगा आरामशीर झोपतो, यात बापाची चूक आहे. मी बापाला म्हटले, 'यात तुझीच चूक आहे.' मागील जन्मात तूच मुलाला डोक्यावर चढवले होतेस, बिघडवले होतेस, आणि ते देखील स्वत:च्या फायद्यासाठी. म्हणजे हे समजण्यासारखे आहे. या अशा अनसर्टिफाईड फादर आणि अनसर्टिफाईड मदरच्या पोटी ही मुले जन्मलेली आहेत, त्यात ते काय करतील? वीस