________________
५८
क्लेश रहित जीवन
दादाश्री : मुले वेडी-वाकडी वागतात, तेव्हा देखील तुम्ही फक्त पाहत राहा आणि जाणत राहा. मनात त्यांच्या (कल्याणाची) भावना करा. आणि परमेश्वराजवळ प्रार्थना करा की त्यांच्यावर कृपा करा.
___ आपण तर जे घडले तोच न्याय म्हणावे. जो भोगतो त्याची चूक आहे. जे घडले तेच बरोबर म्हणून चालतात तर समाधान होईल, भगवंत म्हणाले की 'तू स्वतः सुधर म्हणजे तुझ्या हजेरीने सर्व सुधारेल'
लहान मुला-मुलींना समजवावे की सकाळी अंघोळ वगैरे करून सूर्यपूजा करावी आणि थोडक्यात बोलावे की मला आणि साऱ्या जगाला सद्बुद्धी द्या, जगाचे कल्याण करा. एवढे बोलले तरी त्यांना संस्कार मिळाले असे म्हटले जाईल. आणि आई-वडीलही त्यांच्या कर्मबंधनातून सुटतील. हे सर्व कर्तव्यच आहे. आई-बापाने पाच हजाराचे कर्ज करून मुलाला शिकवले असेल तरी सुद्धा एखाद्या दिवशी मुलगा उद्धटपणे वागला तेव्हा आई-वडिलांना त्याला आम्ही (कर्ज करून) तुला शिकवले अशी उपकाराची भाषा बोलून दाखवू नये. ते तर तुम्ही 'ड्युटी बाऊन्ड' होते, तुमचे कर्तव्यच होते, कर्तव्य होते म्हणूनच केले. आपण फक्त आपले कर्तव्य करत राहावे.