________________
[५]
समजदारीने शोभेल गृहसंसार
मतभेदात समाधान कशा प्रकारे
काळ विचित्र येऊ राहिला आहे. वादळा पाठोपाठ वादळे येणार आहे! म्हणून सावध राहा. जशी वाऱ्याची वादळे येतात ना तशी निसर्गाची वादळे येणार आहेत. मनुष्याच्या डोक्यावर महासंकटे आहेत. रताळे जसे भट्टीत भाजले जाते त्याचप्रमाणे लोक भाजली जात आहेत ! कशाच्या आधारावर जगत आहोत, याचे स्वतःला भान नाही. स्वतःवर असलेला आत्मविश्वास पण उडाला आहे! तेव्हा आता काय होईल ? घरात बायकोशी मतभेद होतात ते दूर करता येत नाहीत. मुलांशी वाद होतात त्याचेही समाधान करता येत नाही आणि आतल्या आत गोंधळत राहतो.
प्रश्नकर्ता : नवरा तर असेच म्हणतो ना की, बायकोनेच तडजोड करावी, मी नाही करणार !
दादाश्री : हं..., म्हणजे 'लिमिट' संपली. बायको तडजोड करू शकते आणि नवरा करू शकत नाही म्हणजे नवऱ्याची 'लिमिट' संपली. खरा पुरुष असेल तो तर असे बोलेले की ज्यामुळे बायको खुश होईल. आणि असे करून गाडी पुढे चालवत राहील. आणि तुम्ही तर पंधरापंधरा दिवसापर्यंत, महिनाभर गाडी उभी करून ठेवता. असे नाही चालणार. जोपर्यंत समोरच्याच्या मनाचे समाधान होत नाही तोपर्यंत तुम्हाला अडचण राहणार. म्हणून त्याचे समाधान करावे.
प्रश्नकर्ता : समोरच्याचे समाधान झाले असे कशावरून म्हटले