________________
वास्तवात दुःख आहे ?
ऐकणाऱ्यापैकी ते नाहीत. त्याच्यावर डोळे वटारावेच लागतील. ते नपुसंक जातीचे आहे. त्या जातीचा स्वभावच तसा आहे. त्याच्याशी लाडीगोडी कराल तर त्याला आनंदच होईल. टाळ्या वाजवील आणि सारखा आपल्या जवळ-जवळ येत राहील.
'वारस अहो महावीरना, शुरवीरता रेलावजो, कायर बनो ना कोई दी, कष्टो सदा कंपावजो.'
('तुम्ही महावीरांचे वारस आहात, तुमच्याकडून शौर्य प्रकट होऊ दे, भित्रे कधीही होऊ नका, कष्टांनाच नेहमी घाबरवा.')
तुम्ही घरी बसला आहात आणि कष्ट (दुःख) आले तर ते तुम्हाला पाहन थरथर कापले पाहिजे आणि त्यास वाटले पाहिजे की आपण इथे कुठे फसलो! आपण घर चुकलो असे वाटते? दुःख आपले मालक नाहीत, ते तर आपले नोकर आहेत.
जर कष्ट तुम्हाला पाहून घाबरत नसतील तर तुम्ही दादांचे कसे? कष्टाला म्हणावे की 'तुम्ही दोनच का आलात? पाच मिळून या. 'आता तुमचे सगळेच पेमेन्ट चुकते करून देऊ.' तुम्हाला जर कोणी शिव्या दिल्या तर आपले ज्ञान त्याला काय सांगते? तो तर 'तुला' ओळखतच नाही. उलट 'तूच' 'त्याला' सांगायचे की, 'बाबा, माझ्याकडूनच काही चुक झाली असेल म्हणूनच त्याने शिव्या दिल्या. म्हणून शांत रहा.' एवढे केले की तुझे पेमेन्ट चुकते झाले! हे लोक कष्ट आले म्हणजे आरडओरड करून सोडतात, अरेरे, 'मी मेलो!' असेही बोलतात. मरायचे तर एकदाच असते. हे तर शंभर वेळा 'मी मेलो, मेलो' असे म्हणतात! अरे, तू तर जिवंत आहेस मग 'मी मेलो' असे कसे म्हणतोस? मेल्यानंतर म्हण की 'मी मेलो म्हणन.' जिवंत माणूस कधी मरतो का? 'मी मेलो' हे वाक्य संपूर्ण आयुष्यात एकदाही बोलण्यासारखे नाही. खरोखर दुःख कशास म्हणतात, हे नीट समजून ओळखायला हवे.