________________
क्लेश रहित जीवन
मित्राने किती छान बंगला बांधला आहे.' आणि आपण तर बिन बंगल्याचे आहोत! हे असे दुःख आले!!! म्हणजे हे अशाप्रकारे दुःखांना आमंत्रण दिले जाते!
मी न्यायाधीश झालो तर सगळ्यांना सुखी करून शिक्षा करेल. कुणाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायची संधी आली तर मी त्याला 'पाच वर्षापेक्षा कमी शिक्षा होऊ शकत नाही' असे सांगेन. जर वकिलाने कमी करण्याची विनंती केली तर प्रथम चार वर्ष, मग तीन वर्ष, नंतर दोन वर्ष, असे कमी करत-करत शेवटी सहा महिन्यांची शिक्षा देईल. त्यामुळे तो व्यक्ती जेलमध्ये तर जाईल, पण सुखी होईल. मनात खुश होईल की, पाच वर्षाची शिक्षा सहा महिन्यातच पूर्ण झाली. म्हणजे हे मान्यतेचेच दुःख आहे. जर त्याला पहिल्यापासूनच सहा महिने जेलमध्ये जावे लागले असे सांगितले तर त्याला ती खूप मोठी शिक्षा वाटली असती.
पेमेन्ट चुकवताना समभाव ठेवावा हे तुम्हाला गादीवर बसल्यासारखे सुख आहे पण ते उपभोगताच येत नसेल तर काय करणार? हे म्हणजे ऐंशी रुपये किलोच्या बासमती तांदुळात रेती टाकण्यासारखे आहे ! जर दुःख आले तर माणसाला सांगता यायला पाहिजे ना की, 'इथे का आला आहेस? मी दादाजींचा आहे. तुला इथे यायची गरज नाही. तू दुसरीकडे जा. इथे का म्हणून आला आहेस? तुझा पत्ता चुकला आहे.' तुम्ही एवढे म्हणालात तर ते दुःख निघून जाईल. ही तर तुम्ही संपूर्ण अहिंसाच केली (!) दुःख आले तर काय त्याला येऊ द्यायचे? त्याला सरळ हाकलून लावायचे. यात अहिंसा तुटत नाही (हिंसा होत नाही) दुःखांचा अपमान केला तर ते निघून जातात. तुम्ही दुःखांचा देखील अपमान करत नाही. एवढे अहिंसक होण्याची गरज नाही.
प्रश्नकर्ता : दुःखाला विनंती करून ते जाणार नाही का? दादाश्री : नाही. दुःखाला विनंती करायची नाही. विनंती करून