________________
वास्तवात दु:ख आहे ?
त्याला दु:ख वाटेल की नाही? संडासाहून जास्त अवघड मुतारीची गोष्ट आहे. या मुताऱ्या सगळ्या बंद केल्या, तर सगळे लोक आरडाओरडा करतील. लघवी रोखणे खूप मोठे दुःख आहे. या सगळ्या दुःखांना दुःखं म्हणता येईल.
प्रश्नकर्ता : हे सगळे ठीक आहे पण सध्या जर जगात पाहिले तर दहापैकी नऊ लोकांना दुःख आहे.
दादाश्री : दहापैकी नऊ नाही, तर हजारामागे फक्त दोन लोक सुखी असतील, त्यांना थोडीफार शांती असते. बाकीचे सर्व तर रात्रंदिवस जळतच राहतात. रताळे भट्टीत ठेवले, तर ते किती बाजूंनी भाजतात?
प्रश्नकर्ता : हे जे कायमचे दुःख आहे त्यामधून फायदा कसा घेता येईल?
दादाश्री : या दुःखांवर जर विचार करायला लागलात तर दुःख आहे असे जाणवणार नाही. दुःखाचे जर यथार्थ प्रतिक्रमण कराल तर दुःख आहे असे वाटणार नाही. लोकांनी सरसकट हे दुःख आहे, ते दुःख आहे असे विचार न करताच बोलायला सुरुवात केली आहे. असे समजा, तुमच्याकडे खूप जुना सोफासेट आहे. आणि तुमच्या मित्राच्या घरी सोफासेटच नाही म्हणून तो आजच दुकानातून नवीन फॅशनचा सोफासेट घेऊन आला. तुमची बायको तो सोफा पाहून आली आणि घरी आल्यावर तुम्हाला ती म्हणाली की, 'तुमच्या मित्राकडे किती सुंदर सोफासेट आहे. आणि आपला सोफा तर किती खराब झाला आहे.' तर हे असे दुःख तयार झाले!!! घरात दुःख नव्हते, दुसऱ्यांचा सोफासेट पाहायला गेलात आणि स्वत:च्या घरात दुःख घेऊन आलात!
तुम्ही बंगला बांधला नसेल आणि तुमच्या मित्राने बंगला बांधला. तुमची बायको तिथे गेली आणि तो बंगला पाहून ती म्हणाली, 'तुमच्या