________________
[३] वास्तवात दुःख आहे? 'राईट बिलिफ' तिथे दुःख नाही प्रश्नकर्ता : दादा दुःखाविषयी काहीतरी सांगा. हे दुःख कशातून उत्पन्न होते?
दादाश्री : जर तुम्ही आत्मा असाल तर आत्म्याला कधीही दुःख होत नाही. आणि जर तुम्ही चंदुलाल असाल तर दुःख आहे. तुम्ही आत्मा असाल तर दुःख होणारच नाही, उलट जे दुःख असेल तेही संपून जाईल. 'मी' चंदुलाल आहे ही 'रॉग बिलिफ' (चुकीची मान्यता) आहे. ही माझी आई आहे, हे माझे वडील आहेत, हे माझे काका आहेत किंवा मी एक्स्पोर्ट-इम्पोर्ट चा व्यापारी आहे, या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या 'रॉग बिलिफ्स' आहेत. या सगळ्या 'रॉग बिलिफमुळे' दुःख उत्पन्न होते. जर 'रॉग बिलिफ' निघन गेली आणि त्या जागी 'राईट बिलिफ' बसली तर जगात काही दुःख राहणारच नाही. आणि तुमच्या सारख्या (खात्या-पित्या सुखी घरच्या) लोकांना दु:ख नसते. हे सगळे तर योग्य समज नसल्यामुळे होणारे दुःख आहे.
दुःख केव्हा म्हणता येईल? । दुःख कशाला म्हणतात? या शरीराला भूक लागली आणि मग आठ तास, बारा तास खायला मिळाले नाही, तर त्याला दुःख मानले जाते. तहान लागल्यानंतर दोन-तीन तास पाणी नाही मिळाले तर तेही दुःखासमान आहे. संडास लागल्यावर जर संडासला जाऊ दिले नाही तर