________________
योग उपयोग परोपकारासाठी
खाणारे चांगले आहेत की वाईट आहते म्हणून? जो येईल आणि घेऊन जाईल त्याचे ते आंबे, माझे नाही. परोपकारी जीवन तर ते झाड जगत
आहे.
__ प्रश्नकर्ता : पण जो अपकार करतो, त्यालाच जर दोष देत असतील, तरीही उपकार करावेत का?
दादाश्री : हो, तेच तर पाहायचे आहे. अपकार करणाऱ्यावर (कृतघ्न व्यक्तीवर) जो उपकार करतो तोच खरा माणूस. अशी समज लोक कुठून आणतील? अशी समज जर आली तर तुमचे कामच (कल्याणच) झाले! परोपकारी असणे ही खूप मोठी उच्च स्थिती आहे, हेच साऱ्या मनुष्य जीवनाचे ध्येय आहे. आणि हिंदुस्तानात दुसरे ध्येय, अंतिम ध्येय मोक्षप्राप्तीचे आहे.
प्रश्नकर्ता : परोपकाराबरोबर 'इगोईजम' असतो का?
दादाश्री : परोपकार करतो त्याचा अहंकार नॉर्मलच असतो, वास्तविक 'इगोईजम' असतो. पण जो कोर्टात दिडशे रुपये घेऊन दुसऱ्याचे काम करत असेल त्याचा 'इगोईजम' खूप वाढलेला असतो. अर्थात जो 'इगोईजम' वाढायला नको, तो 'इगोईजम' खूप वाढतो. ___ या जगाचा नैसर्गिक नियम काय आहे की तुम्ही तुमची फळे जर दुसऱ्याला दिलीत तर निसर्ग तुम्हाला सांभाळून घेईल. हेच गुह्य सायन्स (गूढ विज्ञान) आहे. हा परोक्ष धर्म आहे. नंतर प्रत्यक्ष धर्म येतो, आणि शेवटी आत्मधर्म येतो. मनुष्यजन्माचा हिशोब एवढाच आहे. अर्क (सार) एवढाच आहे की मन-वचन-कायेचा उपयोग दुसऱ्यांसाठी करा.