________________
क्लेश रहित जीवन
रोख रक्कम देऊन बाकीचे पैसे हफ्त्याने मिळतील अशी व्यवस्था करायचा. आणि मग दोघांना म्हणायचा (मिटले ना भांडण) चला आता माझ्याबरोबर जेवायला बसा. दोघांना जेवायला घालून मग घरी पाठवायचा; आहेत का आता असे वकील? म्हणून जरा समजा, आणि काळानुसार वागा. जर तुम्ही स्वतःचा उपयोग स्वतःसाठी करत राहिलात तर मृत्यूच्यावेळी दु:खाखेरीज काहीही मिळणार नाही. प्राण निघणार नाही! आणि बंगला, गाडी सोडून जायची इच्छा होणार नाही!
जर हे आयुष्य परोपकारासाठी घालविले तर तुम्हाला काहीही कमी पडणार नाही, कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होतील. आणि विनाकारण उड्या मारत राहिलात तर एकही इच्छा पूर्ण होणार नाही. कारण ती पध्दत तुम्हाला अस्वस्थ करून झोप येऊ देणार नाही. या शेठ लोकांना झोपच लागत नाही, तीन-तीन, चार-चार दिवस झोप लागत नाही. कारण त्यांनी ज्याची त्याची लुटमारच केली आहे.
प्रश्नकर्ता : परोपकारी मनुष्याने लोकांच्या भल्यासाठी जरी सांगितले तरी लोक ते ऐकायला तयारच नसतात, अशा वेळी काय करायचे?
दादाश्री : असे आहे, की परोपकार करणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीची समज (अक्कल) बघत असेल तर ती वकिली म्हटली जाईल. म्हणून समोरच्याला किती समज आहे ते बघायचे नसते. हे आंब्याचे झाड आंबे देते. मग ते झाड स्वत:चे किती आंबे खात असेल?
प्रश्नकर्ता : एकही नाही. दादाश्री : मग ते सारे आंबे कोणासाठी आहेत? प्रश्नकर्ता : दुसऱ्यांसाठी दादाश्री : हं...मग ते आंब्याचे झाड असे बघते का की, हे आंबे